परप्रांतीयांचे लोंढे येतच होते. मुजोर राज्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारांना बळी पडलेल्या त्या लोकांना हे शांतताप्रिय राज्य खुणावत होतं. त्या लोंढ्याबरोबर आलेल्या, अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेल्या, त्या झोपलेल्या किडकिडीत मुलाला सैनिकाने उठवलं.
‘कोण रे तू? कुठून आलास? तुझे आई आणि वडील कुठे आहेत?’
तो दचकून जागा झाला. प्रवासात सहस्रवेळा त्याच्या आई आणि वडिलांची चौकशी लोकांनी केली होती आणि दर वेळी नको नको वाटत असतानाही, त्यांच्या झालेल्या अपमानाचा, छळाचा आणि खुनाचा तो काळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता!
दूरवर दिसणाऱ्या तक्षशिला विद्यापीठाकडे पाहत तो म्हणाला, ‘मी विष्णुगुप्त चाणक्य. मगध प्रांतातल्या चणकपुरीतून इथे शिक्षणासाठी आलो आहे.’ आता त्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्नं तरळत होती.
प्रतिक्रिया
9 Feb 2019 - 2:38 pm | पद्मावति
+१
9 Feb 2019 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
9 Feb 2019 - 3:58 pm | तुषार काळभोर
आशावादी, सकारात्मक अंत असलेल्या कथा छान वाटतात.
शोकांतिका, नकारात्मक शेवट असलेल्या कथा उगाच त्रास देतात.
10 Feb 2019 - 10:09 am | नाखु
कथेला+१
पैलवान दादा,काही टिकाकारांना, विश्लेषकांना राजकारणातील,जीवनातील आणि एकूणच जगातल्या सकल नकारात्मक गोष्टींचा प्रसार,प्रचार आणि जाहीरात करण्यात स्वारस्य असते.
सगळ फक्त चांगलं आणि प्रगतीशील आहे आंधळेपणाने मानणं गैर आहेच पण फक्त विनाशकारी आणि दुर्गती कडे वाटचाल आहे असंही नाही.
तसं भासवून विखारी आरोप करणं ही एक विचारजंती विकृती आहे
उच्चशिक्षित हुशारांना तेच पुरोगामित्व वाटते हीच शोकांतिका आहे
9 Feb 2019 - 8:33 pm | स्मिता.
सुरूवातीला कथा महाराष्ट्रातल्या आलेल्या उत्तर भारतीय मुलाची वाटत असतांना विष्णूगुप्त वाचून अनपेक्षीत धक्का बसला, कथा आवडली.
9 Feb 2019 - 9:36 pm | यशोधरा
+1
10 Feb 2019 - 6:23 am | पुष्कर
.
11 Feb 2019 - 1:55 am | दादा कोंडके
छान!
11 Feb 2019 - 9:50 am | मोहन
+१
11 Feb 2019 - 12:33 pm | उपेक्षित
+१
11 Feb 2019 - 12:36 pm | नरेश माने
छान कथा. +१
11 Feb 2019 - 1:06 pm | सिद्धार्थ ४
+१
11 Feb 2019 - 6:07 pm | मनुष्य
+१
11 Feb 2019 - 7:39 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
11 Feb 2019 - 8:08 pm | मित्रहो
+१
12 Feb 2019 - 5:51 pm | ज्योति अळवणी
आवडली
12 Feb 2019 - 10:35 pm | टर्मीनेटर
+१
आवडली!
13 Feb 2019 - 11:56 pm | समर्पक
आवडली
14 Feb 2019 - 1:53 am | श्वेता२४
+1
14 Feb 2019 - 7:44 am | आनन्दा
+1
14 Feb 2019 - 3:21 pm | nanaba
.
17 Feb 2019 - 8:20 am | भीमराव
१
19 Feb 2019 - 9:32 pm | रांचो
+१
19 Feb 2019 - 9:33 pm | रांचो
+१
1 Mar 2019 - 12:09 pm | पुष्कर
... आणि मान्यवरांचे आभार (यात +१ देणारे, वाचक, परीक्षक, आयोजक - सर्वच मान्यवर _/\_ )