कुरूप राणीने देशातले आरसे फोडून टाकले. तळी, विहिरीसुद्धा बंद.
पण जसिंताच्या अप्रतिम सौंदर्याचं वर्णन वॅलेंटिन तिला प्रेमभराने सतत ऐकवत असे. एके दिवशी दोघांचं लग्न ठरलं.
मग आली थेरडी भिकारीण. राणीने पढवलेलं गरळ ओकून गेली.. "किती ग बाई कुरूप तू! काय ते तिरळे डोळे..काजळासारखा चेहरा..पिवळे फताडे दात..विद्रुप कान.."
दुखावून, शरमून जसिंताने लग्नाला नकार दिला.
वॅलेंटिन म्हणाला, "च्च! आरसा हवा एखादा...चल राणीकडे."
"बापरे, किती भयाण दिसते ही." राणी हसली.
"डोकं फिरलंय राणीचं! " वॅलेंटिन भडकला.
"उडवा त्याचं डोकं."
कुऱ्हाडीचं पातं लख्खकन चमकलं.
क्षणभर आरशात एक सुंदर चेहरा.. एक भयाण.
दोन कर्कश किंकाळ्या घुमल्या.
मारेकरी दचकला. वार चुकून वॅलेंटिन वाचला.
--------------------------------------------------------------------------------
ही कथा खालील कथेवर आधारित आहे.
https://www.gutenberg.org/files/10577/10577-h/10577-h.htm#link2H_4_0005
प्रतिक्रिया
8 Feb 2019 - 9:43 am | प्रमोद देर्देकर
वॉव सही
+१
8 Feb 2019 - 10:17 am | संजय पाटिल
+१
8 Feb 2019 - 10:50 am | राजाभाउ
+१
8 Feb 2019 - 9:44 pm | जव्हेरगंज
छान
+१
8 Feb 2019 - 10:22 pm | सही रे सई
मस्तच
8 Feb 2019 - 10:33 pm | प्रचेतस
+१
सुपर
8 Feb 2019 - 10:41 pm | आनंद
+१
9 Feb 2019 - 1:02 pm | नाखु
अप्रतिम
9 Feb 2019 - 11:22 pm | दादा कोंडके
मला कथा कळलीच नाही. मूळ कथा वाचल्यावर मग कळली. :(
10 Feb 2019 - 12:13 am | वामन देशमुख
मलाही .
मूळ कथा इथे आहे .
http://www.gutenberg.org/files/10577/10577-h/10577-h.htm#link2H_4_0005
12 Feb 2019 - 12:45 pm | विजुभाऊ
+१ असे न लिहिले नसेल तर तो प्रतिसाद स्पर्धेसाठी ग्रुहीत धरला जाईल का
19 Feb 2019 - 9:37 pm | रांचो
+१
25 Feb 2019 - 3:15 pm | विजुभाऊ
शशक स्पर्धेसठी केवळ +१ मतांची संख्या हाच एकमेव निकाला साठीचा क्रायटेरीया आहे काय?