अंजीला तलाठ्याला मारायचे नव्हतेच मुळी.. पण तिला त्याची " ती " भूक भागवायचीदेखील नव्हती.
.
.
.
.
.
घाबरलेली अंजी सैरभर होऊन शेवटी मामाकडे आली होती. बापानंतर त्याचाच आधार होता. आईचा लांबचा नातेवाईक..
अडीनडीला तोच कमी यायचा.
.
.
.
.
.
म्या तुला कायबी हूं न्हाय देणार अंजे.. म्या हाये ना .. बघू पुढं काय करायचं.. माह्यावर इश्वास ठेव.. . जेवून घे आणि शांतपणे झोप..
.
.
.
.
.
अंजी सुखावली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर छानशी खळी पडली. टेकाडावरच्या काळूबाईचे मनोमन आभार मानत होती... बऱ्याच दिवसांनी अंजी पोटभर जेवली होती.
.
.
.
.
.
रूपाSSSS...
अचानक कोणतरी मारलेल्या हाकेने ती दचकली.
गोंगाट आणि फक्त गोंगाट.. अगदी मासळी बाजारात असतो तसाच.. जड पावलांनी ती जिना उतरू लागली.. आलेल्या गिर्हाईकाची " ती " भूक भागवण्यासाठी..!!
प्रतिक्रिया
5 Feb 2019 - 9:38 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
5 Feb 2019 - 9:46 pm | जव्हेरगंज
+1
मस्त!
6 Feb 2019 - 5:34 am | एमी
+१
6 Feb 2019 - 12:17 pm | विनिता००२
अरेरे बिचारी :(
+१
6 Feb 2019 - 12:28 pm | किसन शिंदे
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काऊन्ट केले शब्द. मधल्या डॉटसकट १२६ भरताहेत.!!
6 Feb 2019 - 1:12 pm | जव्हेरगंज
लेखकाने अकारण मध्ये जास्त Space दिले आहेत. म्हणून जास्त येत असावेत.
Actual १०० च आहेत !
7 Feb 2019 - 12:52 pm | विनिता००२
शब्द १०१ आहेत.
6 Feb 2019 - 1:48 pm | टर्मीनेटर
आवडली!
6 Feb 2019 - 1:50 pm | यशोधरा
परिणामकारक.
6 Feb 2019 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
6 Feb 2019 - 2:38 pm | मोहन
+१
6 Feb 2019 - 11:32 pm | मराठी कथालेखक
प्रेडिक्टिव्ह..
8 Feb 2019 - 11:08 am | राजाभाउ
+१
9 Feb 2019 - 5:46 pm | तुषार काळभोर
आवडली
14 Feb 2019 - 8:19 pm | बोरु
+१
16 Feb 2019 - 5:22 pm | नँक्स
+१
16 Feb 2019 - 8:47 pm | भीमराव
१
18 Feb 2019 - 12:20 am | ज्योति अळवणी
उत्तम लिहिली आहे
18 Feb 2019 - 4:36 am | लोथार मथायस
+1
19 Feb 2019 - 12:50 am | पद्मावति
+१
19 Feb 2019 - 9:46 pm | रांचो
+१