सकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. कपडे घालताना तो तिला बिलगू लागला. तिच्या अंगावर रेलू लागला. तिलाही ते हवं होतं पण घड्याळाकडे बघून तिने मन आवरलं. रिक्षाचा आवाज येताच तो रिक्षापाशी चालत गेला, आणि मागे वळून म्हणाला “आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!” आणि ती आसवांच्या पडद्याआडून हात हलवत राहिली..........
प्रतिक्रिया
5 Feb 2019 - 3:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
बिच्चारा ससुल्या
पैजारबुवा,
17 Feb 2019 - 11:43 pm | चोपदार
आरारारा! लै बिचारं प्वार न त्याची आय. हा ससूला नशीबवान याची आय त्याला काय वाटत आसल ते समजून टिप गाळती. आमाला ल्हानपनी येवडा हानलंय आमच्या आय नि बापुस न कि असं कुटं प्रांगन बिंगन ला पाटीव्हल असतं तर उड्या मारत गेलू अस्तू +11111111
लै चोपला गेलेला चोपदार
5 Feb 2019 - 3:57 pm | विनिता००२
:(
+१
5 Feb 2019 - 5:17 pm | यशोधरा
आवडली.
5 Feb 2019 - 6:30 pm | तुषार काळभोर
कथा आवडली, पण ससुल्याच्या स्थितीचं वाईट वाटलं.
5 Feb 2019 - 8:41 pm | जव्हेरगंज
“आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो. बाय!”
वाह! क्या बात!!
+१
5 Feb 2019 - 10:36 pm | पलाश
+१.
6 Feb 2019 - 1:46 pm | टर्मीनेटर
आवडली!
6 Feb 2019 - 3:04 pm | मोहन
+१
6 Feb 2019 - 3:22 pm | चांदणे संदीप
+१
Sandy
7 Feb 2019 - 10:17 am | संजय पाटिल
+१
7 Feb 2019 - 10:54 am | सिद्धार्थ ४
+१
7 Feb 2019 - 7:52 pm | खिलजि
खरंच भावुक होती ओ शशक .. वाईट वाटलं आणि चित्र उभं राहील त्या पाळणाघरातल्या मुलांचं .. त्याच ते निरागस भावविश्व् , आई किंवा बाबा आता येतील मला घरी घेऊन जायला . वेळ तर कळत नाही , त्यामुळे चिमुकल्याना वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो . खात्री आहे मला कि हि कथा ज्या पण कामावर जाणाऱ्या महिला वाचतील , त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही .
7 Feb 2019 - 7:56 pm | सुधीर कांदळकर
आवडली.
8 Feb 2019 - 11:00 am | राजाभाउ
+१
8 Feb 2019 - 12:06 pm | नाखु
आवडली
8 Feb 2019 - 12:35 pm | विजुभाऊ
+१
8 Feb 2019 - 10:11 pm | नावातकायआहे
+१
आवडली
9 Feb 2019 - 7:12 pm | अनिल मोरे
आवडली
11 Feb 2019 - 6:31 pm | उपेक्षित
+१
कटू वास्तव पण आई वडील तरी काय करणार बिचारे :(
12 Feb 2019 - 11:56 am | गौतमी
ला कि हि कथा ज्या पण कामावर जाणाऱ्या महिला वाचतील , त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही . +१
नक्कीच माझं बाळ १० महिन्यांच आहे. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी अगदी धाय मोकलुन रडले होते मी ऑटोत आणि ऑफिसला जाईपर्यंत. तिला ठेऊन जाताना अपराधी वाटतं खुप पण नाईलाज आहे, काय करणार?
बाकी कथा आवडली.
12 Feb 2019 - 5:44 pm | ज्योति अळवणी
अगदी खरं. पहिल्या बाळाला आई/वडील घ्यायला आले की त्याक्षणापासून खिडकीत बसून आपल्या पालकांची वाट बघणारी पाळणाघरातली चिमुकली आठवली. पण आई-बाबा देखील संसार चक्रात अडकलेले आहेतच की
12 Feb 2019 - 5:44 pm | ज्योति अळवणी
अगदी खरं. पहिल्या बाळाला आई/वडील घ्यायला आले की त्याक्षणापासून खिडकीत बसून आपल्या पालकांची वाट बघणारी पाळणाघरातली चिमुकली आठवली. पण आई-बाबा देखील संसार चक्रात अडकलेले आहेतच की
13 Feb 2019 - 4:03 pm | निओ
.
14 Feb 2019 - 4:21 pm | nanaba
.
14 Feb 2019 - 4:23 pm | पुंबा
++१११
14 Feb 2019 - 5:13 pm | अमरप्रेम
+१
14 Feb 2019 - 8:27 pm | बोरु
+१
आईची वाट बघण्यासाठी पोरगं पाळणाघरात जातं. निरागसता सरसरून बोचली.
16 Feb 2019 - 5:00 pm | भीमराव
आमच्या दिदिचं पाळणाघर आहे, तिथली चिल्लर आठवली. तिची ती पोरं अकाली समजुतदार झालीत.
१
18 Feb 2019 - 4:41 am | लोथार मथायस
+1
21 Feb 2019 - 4:34 am | रुपी
थोड्याफार फरकाने रोजची सकाळ अशीच.
21 Feb 2019 - 10:54 am | पियुशा
आवड्ली :)