संध्याकाळ झाली तशी ती सरसरून उठली.
एका अनामिक आनंदाच्या ओढीने आळस झटकून तीने आवरायला सुरूवात केली. एका नव्या आयुष्याची स्वप्ने गेल्या कित्येक रात्री तीने रंगवली होती. आज त्या स्वप्नांची पूर्तता करायची वेळ आली होती.
एव्हाना तो यायला हवा होता.?!! मनाशीच तिला वाटलं, कदाचित त्याने आपला विचार तर बदलला नसेल ना? या विचाराने ती सैरभैर झाली.
बरोबर आठ वाजता तो आला. सर्वांना चुकवत त्यांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. त्या गर्दीत आपल्याला कुणी ओळखणारं नसेल असं वाटलं असावं त्यांना. अचानक एका राठ हाताची पकड तिच्या कोमल हाताभोवती पडली.
"हां अम्मा, ठेसनपें पकडाय सालीको, लेके आता अब्बी उधरही." मुदस्सर फोनवर बोलत होता.
प्रतिक्रिया
4 Feb 2019 - 1:00 pm | सिद्धार्थ ४
+१
4 Feb 2019 - 1:36 pm | खिलजि
काय कळ्या नै ,, भौ.
4 Feb 2019 - 2:31 pm | चिगो
+१. कथा आवडली. (आणि उदासही करुन गेली.)
11 Feb 2019 - 3:31 pm | प्रशांत
+१
4 Feb 2019 - 2:31 pm | समीरसूर
म्हणजे ती वेश्या आणि अम्माच्या गुंडाने तिला पळून जाण्याआधीच पकडलं. परत तिचे तेच भयानक आयुष्य! :-(
4 Feb 2019 - 2:32 pm | विनिता००२
+१
4 Feb 2019 - 2:36 pm | तुषार काळभोर
हेच्यासाठी शशक भारी!!
उगाच पाल्हाळ नाही आणि ललित नाही.
4 Feb 2019 - 4:00 pm | वकील साहेब
हेच म्हणतो. एकदम कडक
4 Feb 2019 - 5:28 pm | प्रचेतस
+१
4 Feb 2019 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
शशकच्या प्रवाहाचा वेग आणि शेवटचा धक्का आवडला.
4 Feb 2019 - 9:03 pm | पद्मावति
+१
4 Feb 2019 - 10:37 pm | जव्हेरगंज
जमलीये. धक्कातंत्र उत्तम!
+१
5 Feb 2019 - 9:15 am | शित्रेउमेश
+१
5 Feb 2019 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
5 Feb 2019 - 9:50 am | राजाभाउ
+१
5 Feb 2019 - 11:17 am | नाखु
अभागी पलायनाची वास्तव कथा
5 Feb 2019 - 6:58 pm | ज्योति अळवणी
आवडली
6 Feb 2019 - 8:54 am | शब्दानुज
+1
6 Feb 2019 - 1:29 pm | टर्मीनेटर
आवडली!
6 Feb 2019 - 1:33 pm | निशाचर
+१
7 Feb 2019 - 11:06 am | संजय पाटिल
+१
12 Feb 2019 - 6:08 pm | माझीही शॅम्पेन
+१
13 Feb 2019 - 3:58 pm | निओ
.
16 Feb 2019 - 12:22 pm | भीमराव
१
16 Feb 2019 - 4:35 pm | नँक्स
+१
16 Feb 2019 - 5:31 pm | दादा कोंडके
मस्त!
19 Feb 2019 - 9:54 pm | रांचो
+१
21 Feb 2019 - 3:06 am | राघवेंद्र
+१
23 Feb 2019 - 7:34 am | उपाशी बोका
+१