केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.
"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.
"आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली.
"कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले.
“शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!"
केशव विचारात गुंतला.
"गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.”
गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.
प्रतिक्रिया
5 Feb 2019 - 9:14 am | शित्रेउमेश
+१
सुखांतिका....
5 Feb 2019 - 4:18 pm | श्वेता२४
मत ग्राह्य धरावे. चिन्ह टंकण्यास अडचण येत आहे.
5 Feb 2019 - 8:58 pm | मित्रहो
+१
6 Feb 2019 - 12:17 pm | शाली
+१
6 Feb 2019 - 1:25 pm | टर्मीनेटर
आवडली!
6 Feb 2019 - 2:49 pm | अथांग आकाश
+1 हृदयद्रावक!
6 Feb 2019 - 3:24 pm | चांदणे संदीप
+१
Sandy
6 Feb 2019 - 3:39 pm | चिर्कुट
+१
7 Feb 2019 - 10:15 am | संजय पाटिल
+१०००००००
7 Feb 2019 - 10:57 am | ऋतुराज चित्रे
ह्या कथेत १०१ शब्द आहेत. स्पर्धेत कशी काय प्रकाशीत केली गेली?
7 Feb 2019 - 11:28 am | जव्हेरगंज
१०० च आहेत की!!
7 Feb 2019 - 12:03 pm | प्रभाकर पेठकर
+१
सरबतांचे रहस्य प्रतिसादातून लक्षात आले त्यामुळे परिस्थितीतील दाहकता फार अंगावर आली.
कथेतच सरबताचे रहस्य सूचकतेने उलगडले असते तर अधिक आवडले असते.
7 Feb 2019 - 1:35 pm | ऋतुराज चित्रे
केशवने चार ग्लास भरले. ४
बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. ५
"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन ६
पोरांना आवडंल बघ. ३
आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला ६
पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! ४
तेच पिऊन पाहू; ३
कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे. ५
की पिकाला बी चालंल..." ४
केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. ६
गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं ४
आणि मुलांना हाक मारली. ४
"आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं.६
कल्याणी रडू लागली. ३
"कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. ४
“शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. ६
त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" ६
केशव विचारात गुंतला. ३
"गौरी, काहीतरी गोडधोड कर. ४
ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.” ४
गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. ४
केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता. ७
मी वरीलप्रमाणे मोजले त्याप्रमाणे १०१ शब्द होतात.
8 Feb 2019 - 6:36 pm | संजय पाटिल
केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. ६.........
यातला " किंचित" काढून टाका आणि...
केशव खिन्नपणे गौरीशी बोलत होता...... असे वाचा....
हाका नाका!
21 Feb 2019 - 11:15 pm | शब्दबम्बाळ
सहमत.. नियमात जरा हुकली!
चांगली आहे खरतर पण प्रतिसादातूनच विषय कळाला.. कथेत फारसे क्लु नव्हते विषय कळायला, असे माझे तरी मत...
7 Feb 2019 - 8:39 pm | सुधीर कांदळकर
धन्यवाद.
7 Feb 2019 - 11:35 pm | शिवोऽहम्
+१
8 Feb 2019 - 8:28 pm | हरवलेला
+1
11 Feb 2019 - 2:49 pm | पुंबा
+११
16 Feb 2019 - 8:37 pm | सावि
मस्तच !
19 Feb 2019 - 9:56 pm | रांचो
+१
19 Feb 2019 - 9:59 pm | ट्रेड मार्क
+१
20 Feb 2019 - 6:24 pm | चोपदार
शेवट ग्वाड तर समदं ग्वाड
21 Feb 2019 - 4:07 am | रुपी
+१
21 Feb 2019 - 12:38 pm | पियुशा
+१ शेवट वाचुन जीवात जीव आला हुस्श ......
21 Feb 2019 - 12:57 pm | एकविरा
बापरे ,
कसली सकस कथा आहे ,
21 Feb 2019 - 1:02 pm | राजाभाउ
+१
21 Feb 2019 - 2:04 pm | स्वधर्म
प्रथमवाचनी कथा कळली नाही, प्रतिसाद वाचल्यावरच समजले. केशव ‘किंचित’ खिन्न असल्यामुळे अगदी अात्महत्त्येपर्य़ंत पोहोचलेला होता असे वाटले नसावे. तसेच त्याची मन:स्थिती बदलली, त्यासाठी एक अोळ अाली असती तर कथा पटकन समजली असती.
21 Feb 2019 - 5:14 pm | खंडेराव
+1
22 Feb 2019 - 9:45 am | टिल्लू
+१
22 Feb 2019 - 12:23 pm | एमी
लेखक अभ्या..?
4 Mar 2019 - 2:59 am | रांचो
अभिनंदन!
14 Mar 2019 - 12:31 pm | तात्या विन्चू
+१