अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग – १अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०
शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्याआधी अॅनालीसीस हा प्रकार समजून घेणे आणि तोही फारसा गहन न करता हे खूपच आवश्यक असते. कारण अनालिसिस हा जगण्याचा श्वासच आहे. जर हा श्वास घेणे जमले नाही तर गैरसमजाचा लागणारा दम आपला जीव घेतो हे पक्के गाठीशी बांधूनच सुरुवात करावी.
इतर अन्य व्यवसाय धंदे आणि शेअर मार्केट थोड्याफार फरकाने सारखेच असते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी करावा लागणारा अॅनालीसीस हाही थोड्याफार फरकाने सारख्याच साच्यातून जाणारा असू शकतो. पण आज जेव्हा आपण मार्केटच्या चरणाशी येऊन उभे राहिलो आहोत त्याठिकाणी आपल्याला मार्केटकडून काय हवे आहे हे आपल्याला पक्के माहित आहे. पण कसे हवे आहे आणि काय काय मिळू शकते हेही आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे.
तर, समोरच्या मार्केटकडे बघताना १९८८ साली माझ्या मनातला विचार हा होता कि हे आपल्याला स्वीकारेल का? आणि आज इतक्या वर्षाने त्याने आपल्याला स्वीकारावे म्हणून मार्केटची माझ्याकडून काय अपेक्षा होती? ह्या दोन्ही गोष्टी स्फटिकासमान पारदर्शक रितीने क्लियर झाल्या आहेत.
मार्केटमध्ये पाउल ठेवण्याआधी करावयाचे अॅनालीसीस हे दोन प्रकारचे आहेत हा माझा अनुभव आहे. इथे मी कुठल्याही मोठ्या लेखकाच्या पुस्ताकांचे संदर्भ देऊ इच्छित नाही कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचा प्रवास जर मी इथे मांडला तर तो कदाचित एखाद्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल आणि हि आत्मप्रौढी नसून एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
तर अॅनालीसीस मुख्यतः दोन प्रकारचे असतात. १) सेल्फ अॅनालीसीस किंवा स्वतःची पूर्ण ओळख.
२) मार्केट अॅनालीसीस किंवा मार्केटची पूर्ण ओळख.
सेल्फ अॅनालीसीस म्हणजे बरेच जण आपली आर्थिक परिस्थिती असा गैरसमज करून घेतात आणि “ पाच एक लाख टाकू शकतो मार्केटमध्ये !” ह्या अविर्भावात बोलतात.
पण आपली मानसिक जडणघडण हि सेल्फ अॅनालीसीसचा पहिला टप्पा आहे. मी धंद्याला कशा रितीने लायक आहे ? मला असे का वाटते ? इथून सुरु होतो सेल्फ अॅनालीसीस.
इथे पुन्हा एकदा मागील भागातील भाजीचेच उदाहरण घेऊ जेव्हा मी १८-१९ वर्षाचा होतो तो पर्यंत माझी इंटर्नशिप आईच्या हाताखाली सुरूच होती पण आई अधूनमधून ते काम पूर्णतः माझ्यावर सोपवत असे. आणि अनेक वर्ष भाजीला जाताना माझी निरीक्षण शक्ती चांगलीच बळावली होती. बाजारातील १०% भाजीविक्रेते जे पूर्वी जमिनीवर वाटे लावून बसत होते त्यांनी आता एक छोटेसे दुकान सदृश मचाण रस्त्याच्या कडेला आणि मागे असलेल्या कुठल्यातरी सरकारी इमारतीच्या कम्पाउंड वॉलला खेटून, उभे केले होते हि त्यांची प्रगती त्यांच्या नीटनेटके पणात होती असे प्रथम दर्शनी वाटत होते. पण त्याहीपेक्षा भाजी आकर्षक पद्धतीने मांडून ठेवण्यात त्यांच्या यशाचा ७५% वाटा होता असे वाटते. हिरव्या पालेभाज्यांच्या टोपल्या आणि लालबुंद टोमोटे ह्याची जागा दरवेळी बदलती असायची. प्रत्येक भाजीवर पाणी मारून ठेवलेले असायचे. हा प्राथमिक सापळा लावून तुम्हाला खेचून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न किंवा आपला धंदा व्यवसायातून आपल्याला इतर स्पर्धाकांपेक्षा जास्त मिळाले तर उत्तम ही भावना असावी. पण लाल – हिरव्या रंगाचा वापर तुमची नजर खेचून घेण्यासाठी करताना, त्यांची नजर तुमच्यावर असायची. तुम्ही नवखे असलात कि हमखास न संपणारा माल ते तुमच्या गळ्यात मारणारच हे कळू लागले. तुम्ही रंगसंगतीमध्ये गुंतलेले असतानाच तो अगदी थोड्यावेळा करता (म्हणजे एखादी विशिष्ठ भाजी घेण्यासाठी तो आपल्या मागे लागला आहे हे जाणवणार नाही इतपतच ) तो कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करी किंवा एखादी भाजी तुमच्या हातात कोंबून “ले जाव पैसा बादमे देना” असा आग्रह धरी. माझे सगळे अनुभव उत्तर भारतीय भैय्यांबरोबर असल्याने कदाचित मुंबई बाहेर ते चुकीचे वाटू शकतात किंवा ते माझे गैरसमज हि असू शकतात कारण मी खूप संशयी आहे. पण आजही मी एकाग्र चित्ताने भाजी घेतो आणि काही ठरलेल्या भैयांकडूनच घेतो. असो, तर मुद्दा हा कि त्या गिऱ्हाईक आकर्षून घेण्याच्या पद्धती शेअर मार्केटमध्ये प्रकर्षाने जाणवतील अशा पद्धतीने आपल्या समोर सतत येत असतात. त्या आकर्षणाला रेझिस्ट करण्याची ताकद आपल्यात आहे का ? हा प्रश्नच चुकीचा वाटावा इतकी ती असायलाच हवी हा नियम आहे.
इथे टिप्स देणारे, दिशाभूल करणारे, दुप्पट चौप्पट करून देतो (ह्याचा अर्थ तुमचे पैसे घेऊन माझे चौपट करून तुमचे परत करतो.) म्हणणारे जितके चुकीचे आहेत तितकेच मार्केटमध्ये तुम्ही फसवले जाल, पैसे जातीलच म्हणून सांगणारे पण आहेत. आपण ह्या दोन्ही पासून लांब राहावे. तात्पर्य, जे तुम्हाला आकर्षित करते आहे त्यापासून लांब राहा नाहीतर मग लग्नाची तयारी ठेवा. (इथे लग्न म्हणजे नसते शेअर्स गळ्यात पडणे हे लक्षात घ्यावे. )
सेल्फ अॅनालीसीसमध्ये दुसरा टप्पा चोखंदळ असणे हा आहे. कुठले शेअर्स घ्यावेत आणि का घ्यावेत ह्याचे स्वतः पुरते तरी उत्तर माहित असलेच पाहिजे आणि ते उत्तर स्वतःच्या अभ्यासातूनच तयार व्हायला हवे. कुणीतरी सुचवले म्हणून घेतले तरी त्या चुकीचे किंवा बरोबर आले तर त्याचे क्रेडीट आपलेच असले पाहिजे. तक्रारीला वावच नाही इथे. दुसऱ्याचे ऐकून घेतलेल्या निर्णयालाही फक्त आपले आपणच जबाबदार असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या ओंजळीने कधीच पाणी पिऊ नये.
तिसरा टप्पा आपण कोण आहोत हे ठरवणे. ट्रेडर, इन्व्हेस्टर कि आणखी काही. ह्या ठिकाणी आपली मानसिकता जर भक्कम असेल तर आणि तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो.
चौथा टप्पा आपली आर्थिक बाजू. आपल्याकडे किती पैसे आहेत? त्याचे व्यवस्थापन आपण कसे करू शकतो ? मार्केट आपल्याकडून किती पैशांची अपेक्षा ठेऊन आहे तितके आपल्याकडे आहेत का ? आपण कुठल्या मार्केटमध्ये किती पैसे आणि तितकेच का गुंतवणार आहोत? किती नफा झाला तर मी हुरळून जाण्याची शक्यता आहे (हुरळून गेल्याने तोटा होणारे दिवसाला १०० मिळतात.)आणि किती तोट्याला माझी झोप, आरोग्य पणाला लागू शकते ?
स्वतःच्या स्वभावाचा आणि सवयींचा केलेला उहापोह म्हणजे सेल्फ अॅनालीसीस ज्यातून स्वतःची स्ट्रेंग्थ(S), विकनेस (W), जर कळले तर बाह्य जगतातल्या ऑपरच्यूनिटीज (O), आणि थ्रेटस(T) कळायला मदत होते.
काही भाग रटाळ होतील / वाटतील करणा विषयच रुक्ष आहे. पण जे ह्या रुक्षपणातही रुजतील तेच फोफावतील हा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे प्रयत्न गोड मानून घ्यावा हि विनंती.
एक गृहपाठ :
जॉन एक शेत मजूर होता. दिसायला किंचित उग्र, राकट हातांचा, उंच पुरा जॉन रोज मजुरी करून येणाऱ्या पैशात खर्च भागत नसल्याने किंवा थोडी ज्यादा इन्कम व्हावी ह्या करिता जोड धंदा म्हणून किरकोळ स्वरुपात टोपलीभर अंडी विकण्याचा, व्यवसाय करत असे. बाजारात त्याच्या बरोबरीने अंडी विकणारे इतरही काहीजण होते; पण जितकी अंडी ते विकत त्या मानाने जॉनकडे असलेली अंडी निम्म्यानेदेखील विकली जात नसत ह्यावर त्याला कुणीतरी “तू अंडी विकण्यासाठी तुझ्या बायकोला इथे बसव असे सुचवले.” आणि काही दिवसाने त्याची बायको नाजूक सुंदर, गोऱ्या देहाची मॅटिल्डा अंडी विकायला येऊन बसू लागली आणि अंड्याचा खप इतरांच्या बरोबरीने होऊ लागला नव्हे थोडासा वाढलाच. हे असे का झाले असावे ?
ह्या मागचा तुमचा अॅनालीसीस काय ते प्रतिसादात द्यावे.
प्रतिक्रिया
25 Jan 2019 - 12:53 pm | दीपक११७७
May be पायगुणांमूळे
25 Jan 2019 - 1:25 pm | श्वेता२४
स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक निटनेटकेपणा असतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याची पत्नी ती सुंदर व गोऱ्या देहाची अंडी ती आकर्षक पद्धतीने दिसतील असी रचून ठेवत असण्याची शक्यता आहे.
25 Jan 2019 - 1:42 pm | समीरसूर
काऊंटरवर जर सगळी महिती व्यवस्थित पुरवणारा/री, नेमके पण आपुलकीने बोलणारा/री, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणारा किंवा तसा प्रामाणिक प्रयत्न करणारा/री, ग्राहकाला निर्णय घेण्यास मदत करणारा/री, प्रसन्न मुद्रेने बोलणारा/री, आकर्षक किंवा नीटनेटके दिसणारा/री अशी व्यक्ती असेल तर तिथून वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. अशा ठिकाणी थोडे जास्त पैसे द्यायला लागले तरी ग्राहक तयार असतात. पहिल्याच वेळेस असा दुकानदार मिळाला तर अजून चार ठिकाणी जाऊन तिच वस्तू बघण्याची इच्छा कमी होते आणि शक्यतो तिथूनच ती वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो.
ंमॅटिल्डा आकर्षक आहे म्हटल्यावर ग्राहक तिच्याकडे येणार हे ओघानेच आले. शिवाय स्त्रिया सहसा चांगले बोलतात. त्यांच्यामध्ये पेशन्स असतो. ऐकून घेण्याची तयारी असते. सोल्युशन देण्याची प्रवृत्ती असते. वागण्या-बोलण्यात आक्रमक नसतात. ग्राहक या एकंदरित अनुभवावरून 'बाय डिसीजन' घेत असतो. म्हणून कदाचित अंड्यांचा खप वाढला असावा.
25 Jan 2019 - 2:06 pm | युयुत्सु
गृहपाठ मनापासून आवडला आणी स्वत:चा एक अनुभव आठवला.
एकदा माझे एक सहकारी आपला फ्लॅट कधी विकला जाईल या काळजीत होते. मला अधुनमधुन पत्रिका पण बघायला सांगत असत. मी त्यांना पत्रिकेत काय दिसायचे ते सांगे पण डिल काही केल्या होत नव्हते.
मग एक दिवस त्यांनी मला त्यांचा फ्लॅट मला दाखविण्यासाठी नेले. तिथे गेल्यावर मला तो विकला न जाण्याचे खरे कारण कळले.
मी त्यांना त्याची फक्त रंगरंगोटी करायला सांगितली. त्यांचा स्वभाव तसा चिकट असल्याने पटकन तयार होत नव्हते. पण नंतर त्यांनी रंग काढल्यावर फ्लॅट महिनाभरात विकला गेला.
25 Jan 2019 - 2:21 pm | समीरसूर
एका पुस्तकात मी वाचला होता हा किस्सा. अमेरिकेत एक मोठे घर विकले जात नव्हते. मालकिणीने एजंट बदलला. त्याने तिला सल्ला दिला की मी जेव्हा घर दाखवायला ग्राहक आणेल तेव्हा तू घरात ताज्या केकचा सुवास पसरेल अशी व्यवस्था करायची. म्हणजे थोडक्यात केक बेक करायचा. त्या सुवासामुळे घराचे घरपण कित्येक पटीने वाढल्यासारखे वाटले आणि दुसर्याच प्रयत्नात घराचे चांगले डील झाले.
25 Jan 2019 - 2:52 pm | उपेक्षित
गेली काही वर्ष स्टेशनरी आणि व्हरायटी चा धंदा (रिटेल + थोडे होलसेल सध्या चालू आहे) करतोय शिवाय टूर्स चा मेन धंदा आहेच.
त्यातून असे लक्षात आले कि दुकानातील वस्तूंची जागा सतत बदलती ठेवली कि न जाणारी वस्तू सुद्धा फटक्यात जाते शिवाय लोकांना सतत काही न काही नवीन बदल दिसला छोटा का होईना तरी लोक वस्तू घेतात.
तात्पर्य आपला माल कस्टमरला आकर्षक + उपयोगी आणि मुख्य म्हणजे योग्य किमतीला आहे हे पटवणे आले म्हणजे मिळवले.
अर्थात धंद्यातील बारकावे आत्ता कुठे लक्षात यायला सुरवात झाली आहे. (हे मी 'विनयाने' नाही तर मनापासून सांगतोय)
25 Jan 2019 - 2:54 pm | उपेक्षित
रच्याकने लेख चांगला झालाय पण थोडा मोठा आणि अजून विस्ताराने आला असता तर बरे झाले असते ( हाव हाव म्हणतात ती हीच बहुतेक ;) :)
25 Jan 2019 - 2:55 pm | ज्ञानव
पण पुढील भागात त्याचे विश्लेषणही येतंय.
25 Jan 2019 - 4:37 pm | यशोधरा
सेल्फ अॅनालीसिस बद्दल लिहिलेला भाग अतिशय आवडला. पुढील भागाची वाट बघते.
25 Jan 2019 - 7:46 pm | ज्ञानव
गृहपाठाचे विश्लेषण आपण पुढील भागात करू. तसेच प्रत्येक भागातील विषयाला अनुसरून माझ्याकडून झालेल्या चुका किंवा गैरसमज जर माझ्या निदर्शनास आणून दिलेत तर पुढे जाऊन लिखाणात मला त्याचा उपयोग होईल.
25 Jan 2019 - 8:24 pm | दीपक११७७
छान मालिका सुरु आहे शुभेच्छा.
25 Jan 2019 - 9:00 pm | शाम भागवत
माझे विश्लेषण लेखातील या दोन वाक्यावर अवलंबून आहे.
शेत मजूर होता. दिसायला किंचित उग्र, राकट हातांचा , ( गोरी बायको ही विशेष बाब असेल तर जाॅन गोरा नसावा.)
त्याची बायको नाजूक सुंदर, गोऱ्या देहाची
25 Jan 2019 - 10:45 pm | वीणा३
समीरसूर आणि उपेक्षित यांचा प्रतिसाद पटला. उग्र दिसणाऱ्या भाजीवाल्याकडे जायचं टाळणं / बऱ्या दिसणाऱ्या भाजीवाली कडे जाण हि माझी तरी नैसर्गिक प्रतिक्रिया असेल.
राकट माणूस अस्वछ वाटण आणि त्याची बायको स्वच्छ वाटण असाही होऊ शकत. आणि खासकरून अन्नाबाबत स्वच्छ वाटणाऱ्या (वर वर बघून का होईना ) माणसाकडे लोक नैसर्गिकरित्या जातील
जर अंडी चांगली नसतील तर दुसऱ्याकडे जाईल पण पहिल्यांदा स्त्री कडेच जाईल.
इतर विक्रेते पुरुष असतील आणि हीच एकटी स्त्री असेल तर त्याचाही फायदा मिळेल आणि गिऱ्हाईक जर स्त्री असेल तर पहिल्यांदी ती स्त्री कडे जाईल असं वाटतं. खासकरून स्त्री गिऱ्हाईकाना स्त्री विक्रेता असेल तर जास्त प्राधान्य दिल जात असावं असं वाटतं (माझ्या ओळखीच्या बायकांचं निरीक्षण केलाय त्यावरून)
बाकी लेख छान सोप्या भाषेत आहे, पु भा प्र !!!
26 Jan 2019 - 1:50 am | जेडी
सोपा आणि समजेल असा लेख
26 Jan 2019 - 8:16 pm | अनिंद्य
सुरुवात छान झाली आहे.
ही मालिका पूर्ण वाचणार !
26 Jan 2019 - 8:23 pm | ज्ञानव
गृहपाठाचा थोडासा प्रयत्न करू शकाल का?
29 Jan 2019 - 11:06 am | अनिंद्य
सॉरी, हे उशिरा वाचले, गृहपाठ हुकला :-)
2 May 2019 - 4:31 am | बाजीगर
गृृहपाठ उत्तर : बायको मॅटिल्डा चा हात लहान असल्याने त्याहातात मोठी भासत असल्याने सेल वाढला असे त्यांना म्हणायचे आहे.
2 May 2019 - 4:33 am | बाजीगर
गृृहपाठ उत्तर : बायको मॅटिल्डा चा हात लहान असल्याने त्याहातात मोठी भासत असल्याने सेल वाढला असे त्यांना म्हणायचे आहे.
26 Jan 2019 - 9:44 pm | मारवा
गेले काही महीने मी टेक्नीकल अॅनालिसीस माझ्या कुवतीप्रमाणे शिकतोय व प्रायोगिक तत्वावर ट्रेडींग ही करुन पाहतोय. किरकोळ अपयश वगळता एकुण नेट यशही आजपर्यंत आलेले आहे . मात्र पुर्ण विषय एक गंमत व प्रयोग वा खाज म्हणावा म्हणुन असल्याने व पोटापाण्यासाठी यावर अवलंबुन नसल्याने तसा सिरीयस अनुभव नाही. खर म्हणजे वाचुनच जे काय शिकलो तेवढेच व करुन पाहतो तेवढेच माहीतेय. ट्रेडींग कम्युनिटी शी इंटअॅक्शन नसल्याने तसा लाइव्ह अनुभव नाही. आयसोलेटेड थेअरॉटीकल अॅम्च्युअर ट्रेडर आहे. म्हणूनच या लेखमालाविषयी उत्सुकता आहे तुम्ही कसा अॅनालिसीस करता हे बघायला आवडेल मात्र दोन्ही भाग वाचुन असे कळकळीने म्हणावेसे वाटते की
कम टु द पॉइंट सुन मित्रा
बाय द वे झिरोधा ची व्हर्सीटी हे नविन शिकण्यासाठी उत्तम व झिरोधा काइट हे अतिशय उत्तम ट्रेडींग प्लॅटफॉर्म आहे असा स्वानुभव आहे. झिरोधा हा ब्रोकर म्हणून मला तरी उत्तम अनुभव आला. स्वतः ऑपरेट करता येते कोणावर डिपेन्डन्स नाही एकदम बेस्ट
27 Jan 2019 - 8:03 am | Chandu
27 Jan 2019 - 8:37 am | राघव
लेख आवडलाच. भारी आहे सांगण्याची पद्धत.
बाकी गृहपाठ मस्त आहे. जॉन आणि मॅटिल्डाच्या "चित्रदर्शी" वर्णनानं गाभ्यावरून लक्ष सहज उडतं. ;-)
सरळ हिशोब आहे, मॅटिल्डा जॉन पेक्षा चांगली विक्रेती आहे म्हणून अंड्यांचा खप वाढला. मृगजळाकडे लोक खेचल्या जातात हे एक गृहितक आहे. विन्डो शॉपिंग करणारे माल विकत घेतीलच असे नाही. तात्पुरता वाढलेला खप हा कालांतराने कमी होईलच. मुळात विकण्याची कला अंगी असायलाच हवी. नाहीतर लोक फायदा घेतील. मग दुकानही जाईल आणि बायकोही.
27 Jan 2019 - 9:03 am | यशोधरा
गृहपाठाबद्दल सहमत!
28 Jan 2019 - 3:35 pm | चष्मेबद्दूर
१. विक्रेता/ती आकर्षक आणि नीटनेटकी असेल तर मालाची विक्री जास्त होणार. त्या विक्रीत वाढ करायची जबाबदारी विक्रेत्यांच्या विक्रीकलागुणांवर आणि मालाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकावर अवलंबून. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या. विक्री करताना नंतर नंतर ग्राहकांना काही सवलती देणे आणि हळूच किमतीत थोडीशी वाढ करणे अपेक्षित. त्याच बरोबर उत्पादकांने उत्पादनाचा स्तर योग्य राखून मागणीच्या प्रमाणात पुरवठा करणे अपेक्षित.
२. गेल्या एका महिन्यात मी दोनदा झिरोधा चे नाव ऐकले. सोप्या भाषेत जर कोणी माहिती दिली तर बरे होईल.
19 May 2019 - 11:09 am | इरामयी
माझ्यातल्या न्यूनगंडामुळे मी आजवर चार हात दूर ठेवलेल्या विषयावर इतक्या सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल मनापासून आभार.