मित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे.
माझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत.
रोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात.
परंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात.
विरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून "पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा ", असे गप्प करू इच्छित नाही.
असे का ? तर वर उल्लेखल्याप्रमाणे ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.
म्हणून ते माझी मदत मागत आहेत, मला खात्री आहे की या साईटवर मोदीजींची बाजू मुद्देसूदपणे अभ्यासूरित्या मांडणारे लोकं असतील व ते मला माहिती देतीलच.
तर
टिना म्हणजे TINA = There Is No Alternative = एक प्रकारची परिस्थिती.
मोदीजी = सध्याचे आपले पंतप्रधान
(चर्चेदरम्यान) कौतुक करण्याची (बाबांची) इच्छा = अभ्यासपूर्ण मुद्देसूद परंतु प्रेमाने बाजू पटवून देणे, व त्यासाठीचा डेटा गोळा करणे.
मी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून .
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो,
कि जे,
युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना ते (विवेकानंदांच्या शैलीन ) कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?
.
*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
(*लक्ष्यात घ्या मी मोदीजींची बाजु मुद्देसूद मांडता यावी या अंतस्थ हेतूने विचारतोय)
माझे बाबा, "मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी " अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात .
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,
यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे.
उदा. एकहाती मोदीजी X असे काय निर्णय घेऊ शकतात, की युतीचे मोदीजी घेऊ शकत नाही Y.
*कृपया मोदीविरोधकांनी किंवा इतरही कोणी, मला वैयक्तिक इन्स्लटिंग प्रतिसाद देऊ नये.
*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.
प्रतिक्रिया
23 Nov 2018 - 9:29 pm | माहितगार
पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि इतरांची तडजोड घेऊन भाजपा सरकार होणार असेल तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे असे वाटते. ५६ इंच छातीतून मिआंऊ आवाज मोदींपेक्षा त्यांच्या भक्तांनाच काय शत्रूंनाही ऐकवणार नाही.
23 Nov 2018 - 9:33 pm | मार्मिक गोडसे
सध्या तोही येत नाहीये
23 Nov 2018 - 9:49 pm | विशुमित
*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.
26 Nov 2018 - 5:57 pm | मराठी कथालेखक
*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.
हरकत नाही ...तांत्रिकदृष्ट्या तुमचा प्रतिसाद धाग्याला नाही तर धाग्यावरच्या एका प्रतिसादाला आहे :)
23 Nov 2018 - 10:21 pm | मामाजी
*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
या साठी ही लिंक बघा
https://youtu.be/JIqd_T_uf0E
24 Nov 2018 - 5:54 pm | mrcoolguynice
मामाजी ,
आपण लिंक दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद.
मी लिंक पाहिली, वक्त्याने साध्या सरल शब्दात त्यांची मते मांडली. वक्ते कमालीचे अभ्यासू व विषयात पारंगत जाणवतात.
परंतु त्यांच्या या सव्वा तास प्रदीर्घ लिंकचा संदर्भ द्यावा तर ,
तर एकहाती मोदीजींच्या कारकिर्दीसाठी भविष्यात मते मागणे जिकिरीचे होईल, कारण
देशाची जीडीपी ग्रोथ (एकपक्षीय पंतप्रधान) कारकिर्दीतील सिंगल डिजिट (२-३ % च्या आसपास) होती
(हिला हिंदू ग्रोथ रेट ) म्हणून हिणवण्यात आलय,
तर
(बहुपक्षीय पंतप्रधान) कारकिर्दीतील जीडीपी ग्रोथ तुलनेने जास्त (८-१० % च्या आसपास) होती.
मग माझे बाबा चर्चेत, मोदीजीच्या (एकपक्षीय पंतप्रधान अश्या अर्थीच्या ) बाजूने मते मांडताना, प्रतिपक्षास ऍंडव्हान्टेज मिळेल, अशी भीती मला वाटत आहे.
24 Nov 2018 - 6:50 pm | अभ्या..
काही प्रतिपक्षाला अॅड्व्हान्टेज मिळणार नाही ह्याची खात्री बाळगा. तुमचे बाबा दोन दोन नरेन्द्रांची डबल बॅरल घेऊन उभे आहेत. नॅशनल, इंटरनॅशनल, रिलिजन, युथ, हिंदूत्व, अशी सगळी काडतुसे ह्या गनमध्ये फिट्ट बसतात. दणादणा हाणायचे कायबी. पैले वाट्टेल ते सांगायचे, त्यात चुका काढल्या की तुम्ही करा म्हणायचे (कोण करु देणार नसतंय, सगळे अमरीशपुरी एक दिवसाचा नायक कुणाला बनवत नसतेत हे पक्के ओळखून राहायचे) इतक्यावर ऐकले नाही की समोरच्यांची लायकी काढायची, बिनधास्त देशद्रोही वगैरे म्हनायला कचरु नकात. तो प्रिव्हीलेज आहे असे समजूनच बोलायचे. सगळ्यावर तुम्हीच प्रश्नचिन्हे उपस्थित करायची, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जमतील तितकी वर्षे मागे न्ह्यायची. राजकारण म्हणले की सगळे वाट्टोळे काँग्रेसने केले म्हनायचे, समाजकारण म्हनले की वाटोळे ब्रिटिशांनी केले म्हनायचे. समाजाची वीण मुघलांनी वाटोळे केली म्हनायचे, सगळे विरोधी नास्तिक आणि पाखंडी, अधोगामी ठरवूनच बोलायचे आणि हो इतके बोलतांना समोरच्याला सतत पूर्वग्रह सोडून बोला (पक्षी आमच्यासारखेच बोला) असा उपदेश करत राहायचे. काय टाप आहे समोरच्यांची भीती बाळगायची.
गेल दोनचार वर्षे बघा आमच्या इथे. तेच तर चाललेय.
24 Nov 2018 - 8:11 pm | विशुमित
हाहा!!
24 Nov 2018 - 8:14 pm | सुबोध खरे
जपून हां
ते "mrcoolguynice" एखाद्या वेळेस तुमच्या बाजूचे निघाले तर गोची होईल.
24 Nov 2018 - 8:59 pm | विशुमित
मनमोकळेपणाने हसून तरी द्या राव... हस्यबंदी करून त्याला तरी जीएसटी नका लावू.
...
फेकोबाचे कोणी भगत असले तरी ते आमच्यासाठी आपलेच सगेसोयरे आहेत, त्यांना आम्ही पाकिस्तानी नाही समजत.
...
कंपूगीरी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपद तुमच्याच झोळीत पडणार आहे. काळजी करू नका.
26 Nov 2018 - 6:00 pm | मराठी कथालेखक
एक नंबर ..
24 Nov 2018 - 10:25 am | Nitin Palkar
नमोरुग्ण/ नामोभक्त, मी या दोन्ही पंथांत नाही, तरीही उघड्यावर शौचास बसू नये हे सांगण्यासाठी मोदी यावे लागले हे वास्तव आहे. आज प्रचार माध्यमांमध्ये जी कोल्हेकुई ऐकू येते तिच्या पासून सामान्य नागरिक लांब आहे. चंद्रावरचा सात बारा देखील ज्या काकांच्या नावे असू शकेल असे विनोदाने का होईन म्हटले जाते तेच आणि देशभरातील त्यांचेच टोळीमित्र सध्या बोंबलत आहेत. सामान्य माणूस पेट्रोल,डिझेलची दरवाढ देखील सहन करतोय आणि नोट बंदी देखील स्वीकारतोय....हे केवळ बाबांना नैतिक पाठींबा दर्शवण्या करता. रिलायबल डेटा तज्ज्ञ मिपाकर पुरवतीलच
24 Nov 2018 - 7:02 pm | सुबोध खरे
आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे" हाच आहे का अशी शंका येते आहे?
ती रास्त नसेलही कदाचित.
पण असा रेडिमेड डाटा "खरंच उपयोगास येईल का?"
रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमा करतानाच अनुभव लिहिला आहे (वर्ष १९५६)
नर्मदा परिक्रमा करताना एके ठिकाणी गुहेच्या बाहेर "१० पैशात ब्रम्हदर्शन" असे लिहिलेले आढळले.
ते आत गेले तेथे एक साधू महाराज ध्यान लावून बसलेले होते. काही काळाने साधू महाराजानी डोळे उघडले आणि यांनी दिलेले १० पैसे बाजूला ठेवले आणि याना खाडी साखरेचा खडा दिला आणि खायला सांगितले.
खडा खाल्ल्यावर साधू महाराजानी विचारले कसा लागला?
जोशी -- गोड.
साधू महाराज --गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा ?
जोशी --नाही
साधू महाराज --मग मालपुवा सारखा?
जोशी --नाही
साधू महाराज--मग गोड म्हणजे कसा?
जोशी -- ते तुम्हाला खाऊनच बघायला लागेल.
साधू महाराज- ब्रम्हदर्शन पण असंच आहे. ते "ज्याचं त्यालाच" व्हायला लागतं.
दुसऱ्याचा डेटा वापरण्याऱ्यांचे पण असेच आहे. कॉर्पोरेट जगतात पण मोठे मोठे व्यवस्थापक (एम बी ए) चमकोगिरी करत असतात जेंव्हा सखोल माहितीसाठी प्रश्न विचारला जातो तेंव्हा i shall come back on this म्हणून वेळ मारून नेली जाते.
इथेच (मिपावर) पहा कि मुद्देसूद उत्तर द्यायला सांगितले कि (तथाकथित) उच्चशिक्षित लोकसुद्धा शेपूट घालतात.
24 Nov 2018 - 7:44 pm | विशुमित
i shall come back on this
ते परत system implement झाल्यावर उदघाटन करायलाच येतात.
24 Nov 2018 - 9:25 pm | mrcoolguynice
क्षमस्व परंतु , माझ्याकडून संवादात काही कमतरता राहिली असावी.
ज्याप्रमाणे
दुधाचे दही, दह्याचे ताक, ताकातून लोणी, लोण्याचे तुप आणि तुपाची ईश्वरप्राप्तीच्या यज्ञात आहुती ...
त्याचप्रमाणे
डेटा = रेकॉर्डेड फॅक्टस >>
इन्फॉर्मेशन (माहिती)= प्रोसेस्ड डेटा >>
विजडम (शहाणपण)= मॅनेज्ड इन्फॉर्मेशन >>
ट्रूथ (सत्य ) = कन्सॉलिडिटेड विजडम >>
आणि आपल्याला माहिती असेलच की
ट्रूथ (सत्य ) म्हणजेच गॉड (ईश्वर )
मी तुमच्या सारख्या उच्चशिक्षित मान्यवराकडे , प्रत्यक्ष भगवंतांची रेडिमेड अनुभूती मागत नाहीये , तर विनंती करत आहे
रेकॉर्डेड फॅक्टस कुठे मिळू शकतील ? त्या डेटाचे विश्लेषण मी स्वतःच करेन.
आणि आपणास कदाचित ऑलरेडी माहीत असेल की ,
गार्बेज इन >> तर >> गार्बेज आउट
म्हणजेच
चुकीच्या फॅक्ट्सवर चुकीचे निष्कर्ष लोक काढतील... की जे व्हायला नकोय, असं मला वाटते.
चुकीच्या माहितीच्या आधारे मोदीजींची बाजू मांडिली जाऊ नये.
मला असं म्हणायचं की , या अमुक अमुक फॅक्ट्स मुळे मोदीजींना एकपक्षीय पंतप्रधान केल्यावर , हे तमुक तमुक फायदे देशाला आहेत/होतील,
आणि बहु पक्षीय आघाडीतील पंतप्रधान मोदीजी ते तमुक तमुक फायदे करून देण्यास असमर्थ आहे.
आता कोणी खुळचट मोदीविरोधक लगेचच पिंक टाकतील की समाज NDA ची आघाडी झाली की आघाडीचा पंतप्रधान मोदीजी होण्यास , किती समविचारी पक्ष राजी होतील , तर तो प्रीमॅच्युअर प्रश्न होईल.
मला मनोमन असा विश्वास आहे की आतापर्यंतच्या मोदीजींच्या आतापर्यंतच्या दैदिप्यमान कामगिरी व राष्ट्र प्रेम
कन्सिडर करता , सगळेच एका पायावर त्यांना पाठिंबा देतील. पण मी म्हणतो दुसऱ्याचा पाठींबा घेण्याची वेळच मोदीजींवर येऊ नये.
फक्त त्यांची दैदिप्यमान कामगिरी व राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय, सप्रमाण साधार फॅक्टबेस माहिती , सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या प्रकारे
प्रचारित व्हावी.
उच्चंशिक्षित नाही , परंतु माझ्यासारख्या मोदीजींच्या सर्वसामान्य चाहत्यांनी अश्या कठीण प्रसंगी शेपुट न घालता , पुढे येऊन हिरीरीने मोदीजींची बाजू सार्वजनिक जीवनात उचलून धरावी.
25 Nov 2018 - 11:02 am | सर टोबी
इतकी दैदिप्यमान कामगिरी आणि प्रखर राष्ट्र भक्ती असणाऱ्या माणसाच्या बाजूने बोलण्यासाठी एवढी तयारी करावी लागावी? खरंच दुर्दैव, दुसरं काय! पूर्वी रामराज्य आहे असं म्हटलं कि पुरेसं व्हायचे. म्हणजे कायद्याची बूज राखणे, सामान्य माणसाचे जीवन सुसह्य होणे वगैरे गोष्टी त्यात समाविष्ट असायची. आता, नुसत्या मित्रपरिवारातल्या चर्चेसाठी देखील जीडीपी ग्रोथ वगैरेंचा अभ्यास करणे आले.
26 Nov 2018 - 9:07 am | सुबोध खरे
राम राज्यात पण मंथरा धोबी असे अनेक पडद्या मागचे आणि पुढचे कलाकार होते
आणि
श्रीरामांना पण १४ वर्षे वनवास झाला होता हे आपण विसरला का?
26 Nov 2018 - 6:17 pm | mrcoolguynice
एकदम कड्क प्रतिसाद ....
हा रामायणातील धोबी, अयोध्या नगरीतील जणु एक तत्कालीन, अर्बन नक्षलच ...
दुःख फक्त याचेच की प्रभू श्रीरामाने, या अश्या अर्बन नक्षल्याच्या बोलण्याला सिरिअसली घेतले ...
24 Nov 2018 - 7:37 pm | नाखु
कि विदा घेऊन तुम्ही अयोध्येला जाणार आहात काय,मग इथे न थांबता सरळ तिथेच जा!
तिथेच महाराष्ट्र मधून दिव्य संजयदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व भेटेल ते त्यांच्या वर्तमानपत्रातून थेट ओमाबा पासून पुतीन यांना सज्जड दम देतात,बिनपुराव्याचे आरोप करण्यासाठी ते फक्त युवराजांशीच स्पर्धा करु शकतात.
आणि हो त्यांचे पाइक असाल तर तुम्हाला कुणीही पुरावे,माहीती मागूच शकत नाही याची खात्री बाळगा.
तसली पद्धत नाही.
नाखु वाचकांचीही पत्रेवाला
24 Nov 2018 - 8:52 pm | mrcoolguynice
माफ करा हं, परंतु मी वर लेखात 'युती' हा शब्द वापरला असल्यामुळे, आपली माझ्या हेतूबाबत साशंकता निर्माण झाली असावी, असा माझा अंदाज. परंतु मोदीजींची बाजू, निव्वळ विकास देशसेवा याबाबतीत सप्रमाण उठून दिसावी म्हणूनच मी सध्या इंटरेस्टेड आहे...
24 Nov 2018 - 7:50 pm | सर टोबी
मोदीप्रेमाने ओतप्रोत असा प्रतिसाद देता हा काय प्रकार आहे. आणि स्वच्छ भारत योजनेच्या अंमलबजावणीच रिऍलिटी चेक एकदा बघाच तुनळीवर. फक्त भारतीय एकजात दळभद्री वगैरे सांगू नका.
26 Nov 2018 - 3:26 pm | रणजित चितळे
https://48months.mygov.in/
26 Nov 2018 - 5:47 pm | mrcoolguynice
रणजितजी धन्यवाद.
अतिशय सुरेखरित्या बनवलेले इन्फोग्राफ्स ...
४८ महिन्यांचे प्रगती पुस्तक (कधीपासून ४८ महिने मोजायचे किंवा कुठले ४८ महिने याबाबत प्रथमदर्शनी काही स्पष्ट होत नाही)
सगळी साईट बघणे थोडे शक्य नव्हते , पण उदाहरणादाखल "हेल्थ (आरोग्य)" section मधे
३ पॉईंट डिस्प्ले केलेत.
१. ४ लाख डीओटी केंद्र मार्फत , औषधाला जुमानार्या टीबी रोगजंतू साठी उपचार पुरवले
२. घरोघरी जाऊन ५.५ करोड लोकांचे टीबी साठी स्क्रीनिंग
३. डीबीटी योजने अंतर्गत टीबी रोग्यांना रु ५०० महिना , अर्थसह्हाय्य
अतिशय स्वागतार्ह्य पॉईंट्स
परंतु
माझे बाबा, "मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी " अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात.
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,
यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे.
म्हणजेच की
मला असं म्हणायचं की , या अमुक अमुक फॅक्ट्स मुळे मोदीजींना एकपक्षीय पंतप्रधान केल्यावर , हे तमुक तमुक फायदे देशाला आहेत/होतील,
आणि बहु पक्षीय आघाडीतील पंतप्रधान मोदीजी ते तमुक तमुक फायदे करून देण्यास असमर्थ आहे.
मला खात्री आहे की बहुपक्षीय पंतप्रधान (मोदीजी किंवा इतर कोणीही), वरील उदाहरणादाखल "हेल्थ (आरोग्य)" section रिजल्ट्स मिळवु शकतो.
त्यामुळे, आमच्या बाबांच्यासारख्या मोदीजींच्या चहात्याला, दुर्दैवाने वरील साईटवरील अचिव्हमेंट्स, हे
"बहुमतातील एकपक्षीय पंतप्रधान" स्पेसिफिक, युनिक ऍडव्हान्टेजस, म्हणून, प्रपोज नाही करता येणार.
:(
27 Nov 2018 - 12:47 pm | नितिन थत्ते
यात मोदीजींची चांगली कामे म्हणून जी सांगितली आहेत त्यातली कोणती कामे जर एकहाती सत्ता नसती तर मोदीजी करू शकले नसते? याची यादी केलीत तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल.
मोदीजी जर हिंदुत्ववादी पक्षांच्या युतीचे पंतप्रधान बनले तर प्रश्नच नाही. पण नॉन हिंदुत्ववादी पक्षांच्या समर्थनाने (उदा बिजू जनता दल, संयुक्त जनता दल किंवा डीएमके/अण्णा द्रमुक) पंतप्रधान बनले तर केवळ हिंदुत्वाचा अजेंडा (गोरक्षकांचा हिंसाचार वगैरे) राबवण्यात अडचणी येतील. विकासाशी संबंधित कामे करण्यास अडथळा येण्याचे कारण नाही.
तुमच्या वडिलांना कोणती कामे महत्त्वाची वाटतात? त्यावर एकहाती की युती याचे उत्तर अवलंबून आहे.
27 Nov 2018 - 4:04 pm | mrcoolguynice
इन कॉन्ट्राररी, कामे नव्हे...., माझ्या बाबांना महत्वाचे वाटते की मोदीजींना एकहाती सत्ता मिळावी, व तसे समोरच्यांना विवेकानंदांच्या शैलीत (रिपब्लिक च्या अर्णब शैलीत नव्हे)
पटवून द्यायला आवडेल.
28 Nov 2018 - 4:19 pm | नितिन थत्ते
>> कामे नव्हे...., माझ्या बाबांना महत्वाचे वाटते की मोदीजींना एकहाती सत्ता मिळावी,
मग जस्टिफिकेशन कशाला शोधताय?
मेरी मर्जी असं त्यांनी म्हणून मोकळं व्हावं की !!
28 Nov 2018 - 6:21 pm | mrcoolguynice
ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.
27 Nov 2018 - 12:02 pm | रणजित चितळे
- जे २५ वर्षा वरचे आहेत (व उच्च शिक्षित आहेत) व जे पहील्या पासून कॉन्ग्रेस समर्थक आहेत किंवा संघाच्या विरूद्ध आहेत
त्यांना मोदींचे किंवा भाजपचे किंवा संघाचे गुण सांगितले किंवा मोदींचे चांगले काम सांगितले तरी ते कधीच मानणार नाहीत. त्यामुळे त्यांना सांगण्यात काही उपयोग नाही.
- जे २५ वर्षाच्या खालील आहेत व जे मध्यम वर्गीयांत किंवा बिपीएल लोकांशी संपर्कात येतात त्यांना हळूहळू उज्वला, सौभाग्य योजनांचा लाभ किंवा मुद्रा किंवा भ्रष्टाचारा विरूद्धची मोहीम किंवा IBC ह्यानी मोदीना अजून एक संधी मिळावी असे वाटायला लागते.
- ज्यांचा संपर्क संघाशी आलेला आहे ते आपोआपच मोदींच्या बाजूचे आहेत.
- ज्यांनी राहूल गांधींचे बोलणे व विविध विषयांवरची जाण पाहिली ते आपोआपच निवडणूका आल्या की मोदींना मत देतील.
- जे कुंपणावरचे आहेत त्यांना सौभाग्य, मुद्रा, उज्वला, रस्ते, रेलवे, जनधन, आयूष्यमान, IBC, कॉग्रेसचा भ्रष्ट आचार, नॅशनल हेराल्ड, पी NPA चे जनक चिदंबरम अशा सगळ्यांनी २०१९ ला मोदींना मत देण्यात स्वतःहून तयार होतील.
- जे ७ करोड नवे मतदार होणार आहेत त्यातले बहूतांशी भाजपला मत देतील नाहीतर कोणालाच देणार नाहीत.
त्यामुळे मला वाटते आपल्या वडलांनी सध्या ( त्या दृष्टीने ) काहीच नाही केले तरी चालेल.
27 Nov 2018 - 12:17 pm | mrcoolguynice
मोदीजी लोकप्रिय आहेत त्याबद्दल अजिबात नाही.
फक्त एकहाती (२०१४ प्रमाणे) ते पंतप्रधान व्हावेत तर, वर उल्लेखल्या प्रमाणे
फक्त पॅसिव्ह (सध्या काहीच नाही केले तरी.) मोड धोकादायक ठरू शकतो.
* माझे बाबा अटलजींच्या वेळेस घरोघरी जाऊन, आमच्या अटलजींना मत द्या म्हणायचे.
आकडेवारी द्यायची गरज तेव्हा भासत नव्हती...
आजकाल परिस्थिती फार बदलली आहे.
27 Nov 2018 - 1:08 pm | माहितगार
रिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स नाऊ वरील मोदी आणि अरुण जेटलींच्या मुलाखती पाहिल्यात तर आपल्या वडीलांना अपेक्षीत उत्तरे मिळण्यात बरीच मदत होऊ शकावी असे वाटते
27 Nov 2018 - 1:29 pm | रणजित चितळे
जर नेतृत्व चांगले असेल तर एकहाती काय किंवा दहा पंधरा पक्ष काय कामे होतीलच.
(कामाची गती मंद होईल कदाचीत म्हणजे मनमोहन च्या वेळेस जर १७ किमी एका दिवसात रस्ते होत असतील तर आता मोदी च्या कारकीर्दीत ३४ किमी होतात - एक उदाहरण)
परत गठबंधनात जर ममता किंवा बेहन असेल तर मग तर काय विचारूच नका रोज रुसवे फुगवे काढण्यात जातील त्यातून जर राहूल सारखा (जाणता राजा !!!!!!!!!!) आला तर मग तर रोज करमणूक
पण मोदींसारखे नेतृत्व असेल तर (किंवा नितीश, किंवा पारीकर किंवा प्रणब दा) दहा पक्षांमध्ये पण कामे होतील.
इथे प्रश्न नेतृत्वाचा आहे. तेच पक्ष पण राहूल चे नेतृत्व (नसणे) किंवा मोदींचे असणे ह्यात जमीन असमानाचा फरक
27 Nov 2018 - 4:06 pm | mrcoolguynice
एक्झॅटली..... याप्रकारचा (१७ किमी वि ३४ किमी)
रिलाएबल डेटा कुठे मिळेल ?
27 Nov 2018 - 4:16 pm | रणजित चितळे
इथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत तर अशांसाठी जो राहूल ने दिलेला डेटा आहे तो सगळ्यात रिलाएबल.
बाकींच्यांसाठी mygov चा डेटा ठीक आहे.
29 Nov 2018 - 9:39 am | मामाजी
ही वेबसाइट बघा
https://48months.mygov.in/
29 Nov 2018 - 9:44 am | नितिन थत्ते
https://indianexpress.com/article/india/narendra-modi-govt-put-pressure-...
29 Nov 2018 - 10:21 am | माहितगार
सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा म्हणजे झाले .
29 Nov 2018 - 11:45 am | mrcoolguynice
खालील पर्याय आहेत
१. सुब्रमनीयन स्वामीं (सुस्वा) वर सर्वच बाबतीत विश्वास ठेवा
२. सुस्वा वर सर्वच बाबतीत अविश्वास ठेवा
३. सुस्वा वर आपल्याला आवाडतिल/रुचतिल/सुटेबल असतील, अश्याचबाबतीत विश्वास ठेवा
४. आपल्या स्वतःचा ‘ग्रे मँटर’ तार्किक पद्धतिने वापरावा
29 Nov 2018 - 12:12 pm | माहितगार
=))
31 Dec 2018 - 12:30 pm | mrcoolguynice
=))
सुस्वा वर आपल्याला आवाडतिल/रुचतिल/सुटेबल असतील, अश्याचबाबतीत विश्वास ठेवा ????
30 Nov 2018 - 2:25 pm | mrcoolguynice
असा स्टॅन्ड घेतला, तर "एकहाती" सत्ता द्या,
असे म्हणायला काही यु एस पी नाही ....
माझ्या बाबांची निराशा होणार बहुदा...
.
ह्याच (मोदींसारखे नेतृत्व आणि जमीन असमानाचा फरक) कन्सेप्टसाठी डेटा मिळावा अशी अपेक्षा.
आणि डेटा म्हणून, पक्षीय वचनपूर्तीनाम्याच्या किंवा जाहिरातींचा आधार घ्यायची वेळ बहुदा बाबांवर येणार.
1 Dec 2018 - 9:10 am | रणजित चितळे
ह्याच (मोदींसारखे नेतृत्व आणि जमीन असमानाचा फरक) कन्सेप्टसाठी डेटा मिळावा अशी अपेक्षा.
आणि डेटा म्हणून, पक्षीय वचनपूर्तीनाम्याच्या किंवा जाहिरातींचा आधार घ्यायची वेळ बहुदा बाबांवर येणार.
>>>>>>>>>>>>>>>
इथे world bank व international agencies नी दिलेले डाटा मोदीने फिरवले म्हणणारे लोक आहेत तर अशांसाठी जो राहूल ने दिलेला डेटा आहे तो सगळ्यात रिलाएबल.
बाकींच्यांसाठी mygov चा डेटा ठीक आहे.
इथून घ्या. नाहीतर सोडून द्या. सगळेच भरवता येणार नाही. थोडे आपणही निवडून खायला पाहिजे.
1 Dec 2018 - 12:18 pm | mrcoolguynice
.
एकदम सहमत आहे मी, कर्नलसाहेब तुमच्यासोबत,
मागे मी माझ्या बाबानां, असाच एका international agency ने दिलेला डेटा दिला होता, (की ज्यात युनेस्को या international agency ने मोदीजींना जगातील बेस्ट पीएम म्हणून गौरविले ), बाबांना एवढा आनंद झालेला सांगू ... त्यांनी तो लागलीच त्यांच्या क्लबात शेअर केला. तर समोरचा केतकर काका बाबांकडे पाहून अस्सा फिस्सकन हसला की क्लबातले सगळेच खिदळायला लागले. कोणी घश्यातुन खीखी करुन आपले थुलथुलीत पोट हलवत हसले. कोणी नुसतच सुसु करत अंग गदागदा हलवत हसल. त्यादिवशी बाबांना एकदम कानकोंडं झालं.
म्हणूनच मी तुमच्याबरोबर सहमत आहे, ह्या लोकांना international agency ने दिलेला डेटा दिला तरी त्यात काहीतरी खोड काढतील हे.
27 Nov 2018 - 5:23 pm | चौथा कोनाडा
भारी चर्चा आहे.
पण टीना TINA म्हटलं की अम्हाला ही टीना आठवली:
2 Dec 2018 - 10:17 pm | ट्रेड मार्क
जर सरकारी वेबसाईटवरच्या डेटावर विश्वास नसेल तर असा विस्कळीत डेटा एकत्र मांडून दाखवणे हे थोडे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम आहे. थोडे संशोधन करता एकाने असा प्रयत्न केल्याचे सापडले. quora वरील हे उत्तर वाचा, यात लिंका पण दिलेल्या आहेत. उत्तर बरेच मोठे आहे आणि इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे इंटरेस्ट असणाऱ्याने लिंकवर क्लिक करून संपूर्ण उत्तर वाचावे.
काही मिपाकर मोदींच्या प्रत्येक कृतीमध्ये वाईट काहीतरी शोधत असतात, पण एक प्रॉब्लेम घेऊन तो कसा सोडवता आला असता हे सांगा म्हणले की गोल गोल उत्तरे देतात. मुद्दाम नावे लिहीत नाही कारण जर तुम्ही वरील गोष्ट करत असाल तर तुम्हाला ते स्वतःचे स्वतःच माहित असेल आणि तुम्ही असे करत नाही अशी तुमची समजूत असेल तर मग तुम्हाला वाईट वाटायचे कारण नाही. तात्पर्य लगेच अंगावर येऊ नये.
NOTA विषयी बोलायचं झालं तर १०० मतांपैकी ३० मतं NOTA मध्ये, ~ ३० बीजेपी आणि ~ ३० काँग्रेस गठबंधन आणि ~ १० इतर अशी विभागली गेली तर काय होईल? यात इतर १० ना असाधारण महत्व येऊन शेवटी बीजेपी किंवा काँग्रेस या दोघांपैकी कोणाचे तरी सरकार स्थापन होईल. पण ते सरकार डळमळीतच असेल. त्यापेक्षा जे पर्याय उपलब्ध असतील त्यातील तुम्हाला कोणता पक्ष/ उमेदवार त्यातल्या त्यात बरा वाटतोय त्यालाच मत दिले तर पुढील घोडेबाजार आणि गोंधळ तरी टळेल.
त्यातूनही इतर सर्व पक्षांच्या दृष्टीने बीजेपी वाळीत टाकलेला पक्ष आहे, त्यामुळे इतर काँग्रेसच्या बहुतेक करून वळचणीला जातील. मग तुम्हाला मोदी आवडतच नसतील तर प्रश्नच मिटला पण जर तुम्ही कुंपणावर असाल किंवा मोदींचे काही निर्णय पटले नसतील तर मग सरळ दुसऱ्या कुठल्यातरी पक्षाला मतदान करावे, उगाच NOTA चा वापर करून गोंधळ वाढवू नये.
2 Dec 2018 - 10:42 pm | mrcoolguynice
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
कोरा ची लिंक पाहिली.
मी विचार करत होतो, त्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का ?
किंवा खुद्द मोदीजी समजा गठबंधन टाईपच्या सरकारचे पंतप्रधान असते, तर झाली नसती का ?
किंवा नितीशकुमार पंतप्रधान असते, तर झाली नसती का ?
माझ्यामते झाली असती, कदाचित जास्त जोरात जोमात झाली असती किंवा काहीश्या धीम्या गतीत झाली असती.
त्यामुळे माझ्या बाबांना टिना ची ऍडव्होकसी (फक्त नरेंद्र मोदी व एकहाती सत्ता ) करताना मर्यादा येतात.
असे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,
त्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा
त्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.
3 Dec 2018 - 4:37 am | ट्रेड मार्क
त्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का ? किंवा बाकी कोणी पंतप्रधान असते तर झाली नसती का?
हे सांगता येणं अवघड आहे. गडकरी चांगले डिसिजन मेकर आणि एक्सिक्युटर आहेत. पण बाकी दबावाला आणि विरोधकांच्या कारवायांना ते किती समर्थपणे तोंड देऊ शकतील? भाजप या पक्षाच्या दृष्टीने बघता गडकरी हे मोदींच्या आधी राजकारणात आले, तसेच पक्षाचे अध्यक्ष वगैरे जबाबदाऱ्या त्यांनी पूर्वीपासून पार पडलेल्या आहेत. त्यामानाने मोदींनी त्यांच्या नंतर येऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर सरळ पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे.
या आधी सुद्धा बरेच पंतप्रधान झाले, त्यांनी जर ही कामे केली असती तर मोदींना संधीच मिळाली नसती ना? योग्य वेळी संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्वाचे असते. नितीशकुमारांनी बरेच तळ्यात मळ्यात केले आहे. त्यांना पंप्र पदाची संधी मिळण्याइतके त्यांनी कर्तृत्व गाजवले आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसते काम करत राहण्याइतकेच ते काम लोकांच्या नजरेत आणून देणे हे सुद्धा तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्वाचे आहे. त्या बाबतीत नितीशकुमार आणि गडकरी थोडे कमी पडतात असं मला वाटतं.
लीडर म्हणून एक करिष्मा असायला लागतो. लोकांना आकर्षित करणे, तुम्ही केलेले, अर्धवट केलेले आणि न केलेले काम सुद्धा व्यवस्थित पणे लोकांपुढे मांडता आले पाहिजे. यात गडकरी नितीशकुमारांच्या पुढे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही जास्त करून अंतर्गत समस्यांवर आणि स्थानिक लोकांबरोबर काम करता. पंप्र म्हणून या बरोबरच जगातील इतर नेत्यांबरोबर तुम्ही नुसते संबंधच प्रस्थापित कारण्यापुढे जाऊन त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड ठरणे किंबहुना कुरघोडी करणे आवश्यक असते. हे गडकरी कदाचित करू शकतील, पण नितीशकुमार करू शकतील का? लीडरच्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटेबल असणे. नितीशकुमारांकडे बघून तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीच सांगा.
असे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,
सक्षम पर्याय कोण आहेत? सध्या समविचारी पक्ष कोण आहेत हे जरा सांगा बघू. डाव्या समजल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये सुद्धा मधून विस्तव जाणार नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विचार फक्त "गांधी" घराण्याकडे सत्ता ठेवणे हा आहे, त्यांचे समविचारी कोण आहेत? भाजप - शिवसेना खरं तर समविचारी म्हणायला पाहिजेत. पण उठा उठताबसता भाजपाला शिव्या घालत बसतात. त्यापुढे जाऊन अगदी समविचारी म्हणले तरी जेव्हा सरकार मध्ये मंत्रीपदे वाटायची वेळ येते तेव्हा भांडणं होतातच.
त्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा
त्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.
टिनाची आपल्याला सवय झालेली असते. कितीतरी लोक आवडत नसलेले काम सोडून आवडेल ते करतात? बॉस आवडत नाही पण पर्याय नाही म्हणून आपण मारून मुटकून त्याच्या हाताखाली काम करत राहतोच ना? अगदी बायकोबरोबर भांडणं होतात किंवा आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही असं वाटूनही किती लोक इतर पर्यायांचा वापर करतात?
वरील परिस्थितीत असणारे ९०% लोक टीना मान्य करतात कारण कुठलाही पर्याय शोधून त्यावर अंमल केला तर अगदी लगेच वैयक्तिक परिणाम दिसून येतील. त्यापेक्षा काल बॉसच्या ४ शिव्या खाल्ल्या आज पण खाईन आणि उद्या पण खाईन. न जाणो आपण काही केलं आणि उद्या बॉस बदलला आणि त्याने ५ शिव्या घातल्या तर? त्यापेक्षा या बॉसच्या ४ शिव्या खायची आता सवय झालीये. पण मग हेच भारतीय नेता निवडीच्या वेळी एवढे ढिले का असतात? कारण राज्यकर्ता कोणी का असेना आपल्याला काय फरक पडणार आहे ही मानसिकता आहे? मुघल असो, इंग्रज असो व भारतीय प्रजासत्ताकात कोणीही पंप्र असो, आपल्याला काय त्याचे? माझ्या निरीक्षणानुसार बहुतेक भारतीय स्टेटस को राखण्यात समाधान मानतात. जरा वेगळं काही झालं तर आपल्याला त्रास होईल आणि तो त्रास कोण सहन करणार ही मानसिकता आहे. कदाचित याच मानसिकतेतून २००४ मध्ये परत काँग्रेस निवडून आली असावी का? इतिहास बघता भारतीयांना नेहरू - गांधी घराण्यापासून फार काळ दूर रहावत नाही. म्हणून तर २०१९ मध्ये परत गांधी घराण्याचा वंशज परत पंप्र होईल असं वाटतं. त्यामुळे कुठलाही नरेटिव्ह कोणी पसरवायची काय गरज आहे, अपना दिमाग (हो तो) लगाओ.
तुमच्या प्रतिसादात अजून एक गमतीची गोष्ट आहे की तुम्ही राहुल गांधी किंवा महागठबंधन मधले कोणी पंप्रचे उमेदवार नाही लिहिलेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण पक्षाला मतदान करतो. गडकरी पंप्र करणार असाल तर मी भाजपाला मतदान करीन असा पर्याय मतदाराला उपलब्ध नसतो. त्यामुळे काँग्रेसलाला मत देऊन तुम्ही राहुल गांधी पंप्र म्हणून निवडून आणणार, तर महाठगबंधन पैकी कोणाला तरी मत देऊन कोण पंप्र हे अनिश्चित असणार आहे.
शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी असं काय वाईट केलं आहे. लेखाजोखा मांडायचा झाला तर नोटबंदी आणि थोड्याफार प्रमाणात जीएसटी या दोन्हीची अंमलबजावणी हे निगेटिव्ह मध्ये म्हणता येईल. पण बाकी लोकोपयोगी योजना अमलात आणणे याचबरोबर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणे या जमेच्या बाजू का नसाव्यात? नसेल पटत तर राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. बोला कोणाला पंप्र करताय?
3 Dec 2018 - 10:38 am | आनन्दा
सुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद.
तुम्हाला जर तुलना करायची असेल तर वाजपेयी / ममो आणि मोदींची करा.
मोदींना बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत (अणुकरार आठवा)
356 वापरले नाही म्हणून मोदींचे सरकार एका मताने पडले नाही
सेक्युलर लोकांना खुश करायला मोदीना कोणाला राजनीतीचे डोस द्यावे लागले नाहीत
मोदींच्या मंत्रिमंडळात मी मोठा मी तू मोठा म्हणून भांडणे झाली नाहीत.
अजून राज्यसभेत खोड घालतायत म्हणून प्रॉब्लेम आहेतच बघा.. पूर्ण एकहाती असतं तर हे प्रश्न पण आले नसते
3 Dec 2018 - 11:12 am | mrcoolguynice
सुंदर प्रतिसाद आनंदजी .....
अँटलिस्ट यु अटेम्प्टेड टू एक्सप्लेन .... त्याबद्दल १+
...
परंतु अणुकरारासारखे , अनेक क़रार सोडा, एखादा तरी झाला का ? तेही एखाद्या मताने सरकार पड़न्याचा काहीच धोका नसताना ....
आणि हो
356 वापरले नाही तरीही , विरोधकनी गोवा पैटर्न वरुन केलेलि टिका व कर्नाटकात झालेलि परतफ़ेड,
माझ्या बाबांचे मन दुखावुन जाते
नेतृत्वाची दूसरी फली तयार होउ न देने किंवा दुय्यम नेतृत्व ख़ुरटेच ठेवणे, यांचा बीजेपीला मोदीपश्च्यात फटका बसु शकतो... अशी माझ्या बाबांची चिंता,
हा देश बुद्ध आणि गांधीचा असे इंग्लंड मधे जाउन वक्तव्य देने असो किंवा गायिच्या नावाख़ाली हिंसेचे दुकान चलवणार्या विरोधात त्यानी केलिलि वक्तव्ये,
ही नक्किच सेक्युलर लोकांना खुश करायला नव्हती, असे माझ्या बाबांना वाटते....
लोकसभे प्रमाणे राज्यसभेतही बहुमत असते तर खालील प्रश्न लाग़लीच निकाली निघतिल असे त्यानी जाहिरणाम्यात दाखवले तर कदाचित लोक भरघोस मते देतील
१. क़लम ३७० रद्द
२. आरक्षनचा पुनर्विचार
३. रामजन्मभूमि क़ायदा
४. रॉबर्ट वाड्रा तरूँगात
५. काला पैसा परत
६. दाऊद ला अटक
इतरही अनेक पण तुर्तास इतकेच
3 Dec 2018 - 2:18 pm | आनन्दा
बाकी ठीक आहे.
पण आरक्षण, रॉबर्ट, काळा पैसा आणि दाऊद हे माझ्या अजेंड्यावर नाहीत.
माझ्या अजेंडयावर पाकिस्तान, जीडीपी, इन्फ्रा, भ्रष्टचार, राममंदिर या गोष्टी आहेत. पुन्हा पाकिस्तान म्हणजे युद्ध नव्हे, तर कुटनीती.
आणि याच कारणामुळे मी मोदींवर समाधानी आहे.
ज्यांनी पूर्वी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी ती लुफॉल्स शोधून ठेवली आहेत, त्यांना अडकवमी तितके सोपे नाही, परंतु ही लुफॉल्स भरली गेली पाहिजेत.
जोपर्यंत भारतात पैसे खाऊन मत दिले जाते तोपर्यंत काळा पैसा बंद होऊ शकत नाही.
बाकी, राफेल करार देखील तसा महत्वाचाच आहे. आत्ता भ्रष्टाचार म्हणून एव्हढी बोंब मारतायत, बहुमत नसते तर तर हा करार अक्षरशः अडवलाच असता.
निवडणुकीचे राजकारण मी नेहमीच या सगळ्यांपासून बाजूला ठेवत आलोय, त्यामुळे मला त्या कशातच वावगे वाटत नाही. किंबहुना शत्रूला चितपट करायचे असेल तर त्याचे रस्ते वापरण्यात काही गैर आहे असे देखील मला वाटत नाही त्यामुळे माझा त्या प्रश्नावर पास
3 Dec 2018 - 2:34 pm | mrcoolguynice
अणुकराराच्या यशस्वीततेची ज्याप्रमाणे जाहिरात केली गेली होती, त्याप्रमाणे राफेल ची जाहिरात व्हावी.
भ्रष्टाचाराची लूप होल्स बुजविण्याचे काम , हे लोकसभेत व राज्यसभेत पूर्ण बहुमत असल्यावरच करण्यात येईल असे जाहीर व्हावे.
ज्याप्रमाणे त्यांनी कर्नल पुरोहितांना अटक केली तशी रॉबर्ट ला अटक नाही करता येणार का ? का राज्यसभेत बहुमत येई पर्यंत वाट पहावी लागणार ?
पण त्यासाठीच तर नोटबंदी केलेली नं ? त्याचा प्रचारात वापर करायला हवा की नको ?
आणि भारतात पैसे खाऊन मत दिले जाते, असे म्हटले तर केंद्रात व २५ राज्यात बीजेपी सत्तेवर आहे, त्यामुळे असे विधान मोदीजींच्या विरोधात जाईल की ...