परभणी भटकंती - कशी नि कुठे ?

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in भटकंती
22 Aug 2018 - 7:09 pm

नमस्कार ... १. दिवसाची धावती भेट परभणी येथे कामानिमित्त होणार आहे . औंढा नागनाथ नि परळी वैजनाथ दर्शनाचा बेत आहे . १ला चलो रे असल्याने भटकंतीचे बंधन नाही . कृपया कोणी अजून स्थळे वा ट्रॅव्हल प्लॅन सुचवल्यास मदतच होईल.

थँक्स इन ऍडव्हान्स .....

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

22 Aug 2018 - 9:27 pm | उगा काहितरीच

१) परभणीत पारदेश्वर मंदिरात जा , भारतातील (बहुधा) सर्वात मोठे पा-याचे शिवलिंग आहे. शहरातच आहे , बस स्थानकापासुन ३-४ किमी च्या आत.

२) परभणी- औंढा रोडवर नॕशनल ढाबा आहे तिथे चांगले जेवण मिळेल. औंढ्याच्या जवळ जवळ आहे.

३) परभणीत सकाळी लौकर पोचलात तर वसमत रोडवर शिवशक्ति बिल्डिंगच्या समोर तुलसी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथला डोसा अजिबात चुकवू नका.

४) औंढ्याच्या मंदिरापासुन जवळच गार्डन आहे तिथे जाऊ शकता. तिथे बहुधा बोटींग वगैरे चालू आहे.

५) परभणी शहरात संध्याकाळच्या वेळी असाल तर स्टेडियम जवळची बॉम्बे भेळ खाऊ शकता.

६)औंढ्याच्या मंदिरापासून जवळच आनंदआश्रम म्हणून एक जागा आहे , तिथे ध्यानमंदिर आहे आवड असल्यास जाऊ शकता.

७) वेळ असेल तर औंढ्यापासून जवळच २४ किमीवर हिंगोली आहे तेथील खटकाळी भागात दत्त मंदिर आहे. जाऊ शकता.

८) परभणीत शाकाहारी चांगले जेवण हवे असेल तर बस स्थानकाजवळ ऐश्वर्या रेस्टॉरंट चांगले आहे. वसमत रोडवर थोडं शहराबाहेर वाटीका.

काही मदत लागली तर सांगा .

(माहिती थोडी जुनी आहे. बरेच दिवस झाले त्या भागात जाऊन )

विअर्ड विक्स's picture

22 Aug 2018 - 9:53 pm | विअर्ड विक्स

धन्यवाद ... २४-२५ व्हिजिट आहे . बघू किती ठिकाणी जाऊन होतंय ते !

विअर्ड विक्स's picture

22 Aug 2018 - 9:55 pm | विअर्ड विक्स

२४-२५ ऑगस्ट

विअर्ड विक्स's picture

27 Aug 2018 - 11:31 pm | विअर्ड विक्स

नमस्कार . तुमची to - do - list कामी आली .

मुद्देसूद रिप्लाय देतो कारण official visit होती ना ;)

१) परभणीत पारदेश्वर मंदिरात जा , भारतातील (बहुधा) सर्वात मोठे पा-याचे शिवलिंग आहे. शहरातच आहे , बस स्थानकापासुन ३-४ किमी च्या आत. - दर्शन घेतले , मंदिर आवडले शांत नि स्वच्छ आहे . बहुधा या मंदिराच्या ट्रस्ट तर्फे दोन्ही शिवलिंग ठिकाणी अन्नछत्र चालवले जाते .

२) परभणी- औंढा रोडवर नॕशनल ढाबा आहे तिथे चांगले जेवण मिळेल. औंढ्याच्या जवळ जवळ आहे. - दुपारचे जेवण टाळले वेळ कमी असल्या कारणास्तव

३) परभणीत सकाळी लौकर पोचलात तर वसमत रोडवर शिवशक्ति बिल्डिंगच्या समोर तुलसी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथला डोसा अजिबात चुकवू नका. - नाही चुकवला , सामान्यतः मला बाहेरचा डोसा आवडत नाही आणि मी जवळपास पूर्ण दक्षिण भारत फिरलॊ असल्याने साशंक होतो . डोसा लाजवाब आहे. अर्ध्या ऑफिसर लोंकांचा नाश्ता इथूनच होतो. त्याची गोष्ट सुद्धा आहे , आधी आचारी होता एका हॉटेलात नि आता स्वतःचे हॉटेल . वा !!!! वेळ - सकाळी ७ ते १ दुपारी

४) औंढ्याच्या मंदिरापासुन जवळच गार्डन आहे तिथे जाऊ शकता. तिथे बहुधा बोटींग वगैरे चालू आहे. - श्रावणात नि त्यात सुद्धा शनिवारी गेल्याने १ तास रांगेत गेला पण मंदिर आवडले. मंदिरातील कोरीवकाम प्रेक्षणीय आहे. नमस्कार मुद्रेत मूर्ती बहुधा विष्णूची असावी . गार्डन परत कधीतरी !!!!

५) परभणी शहरात संध्याकाळच्या वेळी असाल तर स्टेडियम जवळची बॉम्बे भेळ खाऊ शकता. - स्टेडियम नाही पण राजगोपालाचारी बागेजवळ चाट खाल्ला . १० रुपयात पाणीपुरी पाहून मुंबईकराच्या पोटातील पाणी डचमळले :)

६)औंढ्याच्या मंदिरापासून जवळच आनंदआश्रम म्हणून एक जागा आहे , तिथे ध्यानमंदिर आहे आवड असल्यास जाऊ शकता. - वेळेचा अभाव नि रस्त्यांचा स्वभाव यामुळे ४० किमी अंतरला सुद्धा २ तास लागले. आश्रम वगळला .

७) वेळ असेल तर औंढ्यापासून जवळच २४ किमीवर हिंगोली आहे तेथील खटकाळी भागात दत्त मंदिर आहे. जाऊ शकता. - औंढा / परळी नि पारदेश्वर प्लस मराठवाडा स्मृती स्मारक अशी ठिकाणे निवडली.

८) परभणीत शाकाहारी चांगले जेवण हवे असेल तर बस स्थानकाजवळ ऐश्वर्या रेस्टॉरंट चांगले आहे. वसमत रोडवर थोडं शहराबाहेर वाटीका. - ऐश्वर्या त अक्षरशः ऐश्वर्यात जेवलो . (१५० रु. थाळी पण पैसा वसूल ) हॉटेल चे बाह्यरंग नि टेबल खुर्च्या पाहून हॉटेलच्या चवीचा अंदाज बाळगू नका .

मामूची कॉफी मिस करू नका नि गंगाखेडचे कलम सुद्धा . नि अजून १ मराठी शब्द कळला " डिकासन चहा "

तसेच इथे बंगळुरू प्रमाणे बऱ्याच बेकऱ्या आहेत चविष्ट पफ खायला

परळी नि औंढा हि दोन्ही ठिकाणे परभणीपासून विरुद्ध दिशेला आहेत व दोन्ही कडचे रस्ते खराब आहेत . परळीहून अंबेजोगाई जवळ आहे परंतु रस्ता खराब असल्याने जाणे टाळले.
मत्स्य प्रेमी असाल तर येलदरी येथे १ च्या सुमारास बाजारात जा . मी चव घेतली नाही ,पण येलदरी ला मी जातोय म्हटल्यावर माझ्या चालकाच्या तोंडास पाणी सुटले होते

उगा काहितरीच's picture

28 Aug 2018 - 9:25 pm | उगा काहितरीच

वा! बरं वाटलं आवर्जून सांगितल्याबद्दल .
आण्णाच्या डोस्याबद्दल काय बोलणार साहेब , अनुभव हीच खात्री ! आण्णा अगोदर आत्ता आहे त्याच्या थोडं जवळ एका हॉटेलच्या( चांगलं मोठं लॉज + रेस्टॉरंट वगैरे) समोर रोडच्या बाजूला डोसे बनवत असे. वेळ तीच सकाळी सात ते एक वगैरे . चव अप्रतिम चटणी , सांबर पण अप्रतिम तिथेच टेबलवर ठेवलेले असे किती लागेल तितके घ्या. इतक्यात त्यांनी आत्ता आहे त्या जागेत चालू केलंय रेस्टॉरंट. १७ रुपये किंमत असताना डोसा खाल्लेला आठवत आहे तिथे.

बॉम्बे भेळ पण निश्चित आवडली असती तुम्हाला . कोल्हापूर , पुणे वगैरे इथे जे स्पेशल स्पेशल म्हणून देतात त्यापेक्षा खरंच भारी असते. असो ! राजगोपालाचारी जवळ विशाल पाणीपुरी खाल्ली का दुसरी ? तिथे विशालची छान असते.

ऐश्वर्याची पण चव चांगली आहे. हे ऐकून बरं वाटलं. पुढच्या वेळी जाणं झालं तुम्हाला तिखट खायची इच्छा असेल तर आवर्जून इथली दाल कोल्हापूरी अॉर्डर करा. ;-)

- परभणीला मिस करणारा नावापुरता परभणीकर :'( :-(

मार्गी's picture

24 Aug 2018 - 5:34 pm | मार्गी

नमस्कार! परभणीमध्ये स्वागत! कुठे फिरलात?

चौथा कोनाडा's picture

24 Aug 2018 - 9:19 pm | चौथा कोनाडा

किती घाई ! आजच तर पोहोचलेत.

पोखर्णी नृसिंह येथे सुंदर नृसिंह मंदिर आहे. परभणी पासून 17-18 किमी वर