लक्ष्मीपूजन कसं केलत?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
29 Oct 2008 - 6:05 pm
गाभा: 

नमस्कार
काल "लक्ष्मीपूजन" होतं...पुजनाची वेळ संध्याकाळी ०६.०५ ते ०८.३८ होती. तुम्ही घरी लक्ष्मीपुजन केलं का ? आणि नेमकं कसं केलतं?

आमच्याकडे...

श्रीयंत्र पुजन, नैवेद्य, श्रीसुक्ताच्या १६ आवृत्त्या, लक्ष्मीकवच, महालक्श्म्याष्टक पठन करुन नंतर श्रीविद्येच्या मुलमंत्राचा जप केला आणि प्रार्थना केली..

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

29 Oct 2008 - 6:08 pm | लिखाळ

आम्ही देवासमोर उभे राहून म्हणालो,
देवा 'जेथे तू तेथे लक्ष्मी' (श्रीकृष्णरावो जेथ। तेथ लक्ष्मी ।) असे आम्ही गीतेत-ज्ञानेश्वरीत वाचले आहे. त्यामुळे तू आमच्या सोबत राहा !
--लिखाळ.

शिवा जमदाडे's picture

29 Oct 2008 - 7:21 pm | शिवा जमदाडे

- शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

भास्कर केन्डे's picture

29 Oct 2008 - 7:55 pm | भास्कर केन्डे

जमदाडे साहेब, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अहो पण हे काय? चक्क गांधीजींचीच पुजा केलीत तुम्ही! ते निधर्मि पक्षाचे नेते होते हे माहित नाही का तुम्हाला? काय पण बॉ हिंमत. जरा जपून रहा बॉ ... आजकाल अहिंसेची तत्वे सांगणारे अन बापूंच्या वारश्याचे तख्त मिरवणारे पण हल्ले करु लागलेत म्हणं... ;)

शिवा जमदाडे's picture

30 Oct 2008 - 7:30 am | शिवा जमदाडे

अहो आम्ही लक्ष्मी ची पूजा केली. तिथे गांधीजी होते म्हणून त्यांचीही झाली (गाड्यासोबत नळाची यात्रा !).

आता तसे चालत नसल्यात गांधीजीचा फोटो नका लावू नोटेवर. (माझा लावा)... ;)

- (तुतीची योग्य वाढ होण्यासाठी काय करावे याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

आणि असं केल्याने घरची लक्ष्मी प्रसन्न झाली.

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 1:08 pm | विनायक प्रभू

बाहेरची चे काय?

भास्कर केन्डे's picture

29 Oct 2008 - 8:05 pm | भास्कर केन्डे

आम्ही पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असलेल्या नोटा ठेवल्या होत्या. पुजा भारतातल्या सारखीच केली. पण बाहेर भरपूर पाऊस (व थोडासा बर्फ) चालू असल्याने मुलीला या वर्षी घरातल्या घरात फुलझाड्यांवर समाधान मानावे लागले.

घरच्या घरी बनवलेला आकाशकंदिल मस्त दिसत होता. लाईट-माळांनी घर रंगिबेरंगी वाटत होते. पटेलांच्या दुकानाने पणत्यांची सोय केलेली असल्याने पारंपारिक दिवे पण आपला साज दिमाखात दाखवत होते. इकडे फुले जरा अंमळ महाग वाटतात. पण लक्ष्मी पुजनासाठी फुलांची हायगय करण्यात काय अर्थ? एकंदरीत पुजा मस्त झाली... एक गोष्ट सोडून - कार्पेटी घरांमध्ये यथोचित रांगोळी काढायला भेटली नाही म्हणून सौ जरा हिरमुसल्या होत्या.

आपला,
(साधा) भास्कर

रेवती's picture

29 Oct 2008 - 8:16 pm | रेवती

देवासमोर पैसे, दागिने, वही ठेवतो. पूजेच्या तयारीत बत्तासे, ज्वारीच्या लाह्या, गुळ, अख्खे धने, फुलं ठेवतो. सगळ्या आरत्या (त्यात लक्ष्मीची आरती आलीच) म्हणतो (काही आरत्या पुस्तकात बघून).
यातील प्रत्येक गोष्टं दरवर्षी मिळेलच असे नाही. जे आहे त्यात मनोभावे पूजा केली जाते. पणत्या आहेतच, सुगंधी मेणबत्त्याही लावल्या होत्या यावर्षी.

रेवती

mina's picture

29 Oct 2008 - 11:11 pm | mina

काल दिवसभर घरी धामधुमच होती.सुमारे चारच्या सुमारास मस्त संस्कारभारतीची रांगोळी दारात काढली.छान लक्ष्मीची पावलं अन स्वस्तिकने संपूर्ण माळा मी सजविला.दिव्यांची लखलखती आरास सभोवताली केली. पूजेत आम्ही ज्वारीच्यालाह्या बत्ताशे,पेढे,विविध प्रकारची मिठाई,घरी केलेला फराळ ठेवतो.चारी बाजूने तुपाचे दिवे लावतो.घरात असलेलं धन पूजेत ठेवतो.मी माझा पगार आर्वजुन ठेवते.एका कोर्‍या कागदावर 'श्रीमहालक्ष्मी मातायै नमः',शुभ-लाभ आणि स्वस्तिक कुंकाने काढतो.व्यवहाराच्या नवीन वहीची पुजा करतो.दिपोवत्सवाच्या त्या झगमगाटात,प्रसन्न वातावरणात पुजेतील आराध्य देवतेला म्हणजे श्री लक्ष्मीला शेवंती आणि कमळाच्या फुलांनी सजवून,तिची खणानारळ्,हिरवाचुडा देऊन ओटी भरली , यथासांग सर्व विधीपूर्वक पुजा कुटुंबियासमवेत केली.पाच आरत्या म्हटल्या. यावेळी मी खास पूजेसाठी घेतलेल्या सुगंधीत तुपाच्या वाती लावल्या होत्या.सुगंधीत अगरबत्ती सोबतीला होतीच्.मग काय दिवाळीचा आनंद्,पूजेमुळे घरात पसरलेले प्रसन्न वातावरण अन त्यात चारी बाजूने दरवळणारा सुगंध यामुळे आमचा आनंद आणखीच व्दिगुणीत झाला.घरच्यामंडळींना आणि शेजारी प्रसाद दिला.घरातील सर्व मोठ्यांच्या पाया पडून त्यांचा आर्शिवाद घेतला. यावर्षीपासून आम्ही फटाके न उडविण्याचा संकल्प केला.त्यामुळे बाहेर सुरू असलेली फटाक्यांची आतिषबाजी बघत दिवाळीचा आनंद लुटला.

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 11:07 am | विसोबा खेचर

आमचे लक्ष्मीपूजन -

त्यानंतर मस्तपैकी फटाकडे फोडले व नंतर एका आवडत्या स्त्रीसोबत बराच वेळ वरळी सीफेसवर बसलो होतो. त्यानंतर वरळीच्याच कॉपर चिमणी नावाच्या अंमळ पॉश हाटेलात ग्लेनफिडिचे दोन पेग व सुरेखसं जेवण..!

मजा आली..

आपला,
(लक्ष्मीदास) तात्या.

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 12:22 pm | विनायक प्रभू

मी पण असेच केले. आवड्त्या स्त्री बरोबर तिचा आवड्ता मुलगा पण होता.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:33 pm | विसोबा खेचर

हा हा हा, हे खास वि प्र पेश्शल...........! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Oct 2008 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते

जै हो प्रभुदेवा...

=))

बिपिन कार्यकर्ते

येडा खवीस's picture

30 Oct 2008 - 4:16 pm | येडा खवीस

तात्या लक्ष्मीपुजनात नोटा खर्या होत्या ना? का त्या पण मिपा वर दिल्या होत्या त्यातल्या..... 8}

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

कोणता प्रिन्टर वापरता? :))
बाकी तुमची लक्ष्मीपुजा आवडली आपल्याला.
वेताळ