आता संघटित होणे, ही काळाची गरज !

सनातन's picture
सनातन in काथ्याकूट
29 Oct 2008 - 10:21 am
गाभा: 

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार्‍या `झी मराठी' या दूरचित्र वाहिनीवरील `आयडिया सारेगमप लिटल चॅम्प' ही स्पर्धा सध्या चर्चेत आहे. या स्पर्धेत पनवेल येथील कु. मुग्धा वैशंपायन ही को.ए.सो. के.व्ही. कन्याशाळेची विद्यार्थिनी अंतिम फेरीत पोहोचली आहे.

त्यासाठी तिचे कौतुक करावे, यात दुमत नाही; परंतु याचाच फायदा घेऊन तिला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा व जिंकून येण्यासाठी जास्तीतजास्त लघुसंदेश पाठवा, या आशयाची भित्तीपत्रके सर्व पनवेल भागात लावण्यात आली आहेत, तसेच तो कसा करायचा ? याची इत्थंभूत माहिती त्यात दिली आहे. अनेक वाहिन्या व भ्रमणध्वनी कंपन्या लोकांच्या भावनांना हात घालून प्रचंड नफा मिळवतात, हे मागेच `इंडीयन आयडॉल' या कार्यक्रमात समोर आले आहे; परंतु नाटके व चित्रपट यांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी अशी भित्तीपत्रके लावून विडंबन रोखता आले असते. करमणुकीच्या कार्यक्रमासाठी लघुसंदेश पाठवून ५ रुपये खर्च करणारे एक रुपयाचा दूरध्वनी करून वाहिन्यांवरील विडंबनाचा निषेध नोंदवू शकतात. आज देशात फटाके फुटल्याप्रमाणे दहशतवादी बाँबस्फोट करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी कधी असे फ्लेक्स लावून आवाहन केल्याचे दिसत नाही. राष्ट्र व धर्म संकटात असतांना अशा प्रकारे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे योग्य वाटते का ? अशी वेळ उद्या आपल्यावर आल्यास आपल्यालादेखील कोणी मदत करणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून राष्ट्र रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे.

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

29 Oct 2008 - 10:36 am | जैनाचं कार्ट (not verified)

पहील्यांदा तुमचा मुद्दा पटला !

राष्ट्र रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे.
१००% सहमत.

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विनायक प्रभू's picture

29 Oct 2008 - 10:48 am | विनायक प्रभू

निषेध कसले नोंदवताय. ही कार्य करायची वेळ आहे.

विजुभाऊ's picture

29 Oct 2008 - 10:52 am | विजुभाऊ

राष्ट्र व धर्म संकटात असतांना अशा प्रकारे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे योग्य वाटते का ?
वाहिन्यानी कार्यक्रम करणे म्हणजे राष्ट्र संकटात आहे हा जावई शोध कसा लावला?
धर्म सम्कटात आहे म्हणजे काय?
धर्म संकटात आहे हे कशावरुन? कोट्यावधी रुपये जाळून यज्ञ केले तर धर्म वाचु शकतो असे तुमचे मत आहे का?
मुम्बै पुण्यात रात्रभर झैरात फलकाना वीज पुरवली जाते .आणि त्याच वेळेस खटाव माण किंवा अगदी कोकणातल्या एखाद्या गावात वीज नसते म्हणून तेथे गावाची पाण्याची टाकी ही रिकामी रहाते. यावर कधी तरी आवाज उठवा.
( यज्ञाला सुधा वीज लागतेच/ आणि ती मिळतेच)
धर्माचा आणि वहिन्यांवरील कर्यक्रमाचा बादरायण संबन्ध का लावताय?
अर्थात कशाचाही धर्माशी संबन्ध लावणे ही सनातन धर्मी परम्परा आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सनातन तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे.
झी मराठी वरील लिटिल चॅम्पस मधिल सहभाग घेणारे सगळेच उद्याचे होवु घातलेले कलाकार अप्रतिम गात आहेत.
अश्या प्रकारच्या प्रतिभेचा शोध घेण्यार्‍या कार्यक्रमांचे निकाल देखिल त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनीच द्यावेत या मताची निदान मी तरी आहे.यात जनतेच सहभाग हा फक्त कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यापुरताच असावा.

"राष्ट्र रक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे."
सध्या देशात होत असल्या घडामोडी लक्षात घेता आजच नव्हे तर कायमच राष्ट्र रक्षणासाठी संघटित रहायला हवे.

"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

आमच्या धर्मावर कुठेच धाड भरली नाही आहे. धर्म रक्षणासाठी ३५६ संधटना कार्यरत आहेत.भारतात सगळ्या राज्यात निदान १ /२ ठिकाणी प्रत्येक राज्यात यज्ञ चालु आहेत.प्रत्येक रस्त्यावर एक तरी मंदिर उभा आहे.जगात सगळ्यात श्रीमंत देव भारतातच रहातात.धर्म प्रवचनासाठी २० ते ३० (प्रादेशिक सोडुन) वाहिन्या प्रवचन रतीब घालत असतात.धर्मासाठी रोज देशात एकाना एका राज्यात दंगा सुरु असतो.
ह्या व्यतिरिक्त दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या नदीकाठी साधुसंताचे स्नान चालु असते.देशातले साधुसंत ५स्टार आश्रम स्थापन करण्यात मग्न आहे त्यातुन धर्माला कोणता धोका संभवतो? प्रश्न एकच आहे आम्ही धर्माला वाचवायचे का असल्या धर्मापासुन स्वःताला?
वेताळ

प्रितम's picture

29 Oct 2008 - 2:00 pm | प्रितम

आमच्या धर्मावर कुठेच धाड भरली नाही आहे. धर्म रक्षणासाठी ३५६ संधटना कार्यरत आहेत.भारतात सगळ्या राज्यात निदान १ /२ ठिकाणी प्रत्येक राज्यात यज्ञ चालु आहेत.प्रत्येक रस्त्यावर एक तरी मंदिर उभा आहे.जगात सगळ्यात श्रीमंत देव भारतातच रहातात.धर्म प्रवचनासाठी २० ते ३० (प्रादेशिक सोडुन) वाहिन्या प्रवचन रतीब घालत असतात.धर्मासाठी रोज देशात एकाना एका राज्यात दंगा सुरु असतो.
ह्या व्यतिरिक्त दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या नदीकाठी साधुसंताचे स्नान चालु असते.देशातले साधुसंत ५स्टार आश्रम स्थापन करण्यात मग्न आहे त्यातुन धर्माला कोणता धोका संभवतो? प्रश्न एकच आहे आम्ही धर्माला वाचवायचे का असल्या धर्मापासुन स्वःताला?

अगदि १००% सहमत

प्रितम ज्ञा. पाटिल

सनातन's picture

29 Oct 2008 - 1:33 pm | सनातन

प्रति -
श्रि वेताल
३६५ संधटना(त्याहुन जास्त), साधुसंत असलेला हा देश आहे..आज ते जे काहि करत आहेत(१ /२ ठिकाणी प्रत्येक राज्यात यज्ञ, धर्म प्रवचनासाठी २० ते ३० वाहिन्या प्रवचन, नदीकाठी साधुसंताचे स्नान)त्याच्याप्रति आदर असायला पाहिजे.
देशातले साधुसंत ५स्टार आश्रम स्थापन करण्यात मग्न आहे असे कसे आपन लिहु शकता ? (क्रुपया साधुसंताच्या आश्रमास जरुर जाउन येने)
ते करत असलेलि जनजाग्रुति आपनाला मोलाचि आहे असे विचार मनात येत नाहित का ?
`आज आपल्या देशाची परिस्थिती आणि वातावरण पाहून दुद्म्ख होते. परकीय लोक भारतावर अत्याचार करतील, त्यापेक्षा आपलेच लोक `कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' अशी परिस्थिती निर्माण करत आहेत, हे पाहून यातना होतात.भारताला पूर्वी तेजस्वी अशा राजांची थोर परंपरा होती. त्यांचा धर्माभिमान, धर्मनिष्ठा, धर्मपालन, रयतेप्रतीचा भाव, क्षात्रवृत्ती, नीतीमत्ता व त्यागी वृत्ती यांमुळेच भारतात तेव्हा सुवर्णयुग होते.

खरे पहाता साधुसंत व त्यांचे कार्य या दोन भिन्न गोष्टी नाहीतच. धर्मी व धर्म यांचे जसे अद्वैत आहे, तद्वतच साधुसंत व त्यांचे कार्य आहे. काहीनाच असामान्यत्व समजते; परंतु सर्वसामान्य मानवाला साधुसंतासारख्या अवतारी विभूतीचे असामान्यत्व समजावे, यासाठी त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख करून देणे अपरिहार्य ठरते.बुद्धीप्रामाण्यवादी व नास्तिक लोक देव आणि धर्म यांना मानत नाहीत. त्यामुळे ते या ना त्या प्रकारे हिंदूंची देवतांवरील श्रद्धा डळमळीत करण्याचे, तसेच देव आणि धर्म यांचे विडंबन करण्याचे प्रयत्‍न करत असतात. श्री. विश्‍वासराव देशमुख, र. रुंभोडी, ता. अकोले, जि. अहमदनगर यांचे `गणपतीची संगीत प्रेतयात्रा\' हे पुस्तक, हे याचेच एक उदाहरण आहे.

असो ,
आम्ही धर्माला वाचवायचे का असल्या धर्मापासुन स्वःताला? प्रथम धर्म म्हनजे काय ते जानुन घेने.

जैनाचं कार्ट's picture

30 Oct 2008 - 1:08 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>क्रुपया साधुसंताच्या आश्रमास जरुर जाउन येने)

आम्ही जाऊन आलो आहोत !

आसाराम बापू चे आश्रम पहा कळेल !
रामदेव बुआची लझरी गाडी पहा / त्यांचे राहणीमान पहा कळेल (टीव्हीवर दिसते तेच सत्य असे समजू नका )
श्री श्री रवीशंकर महाराजांची श्रीमंती पहा !

देशाचा कानानकोपरा फिरलो ह्यांच्या मागे कधी काळी .. आम्हाला नका सांगू की आश्रम पहा म्हणून !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 1:11 pm | विनायक प्रभू

धंधा आहे तो. गिर्हाईक असल्या शिवाय कुठलाही धंधा चालत नाही.

जैनाचं कार्ट's picture

30 Oct 2008 - 1:21 pm | जैनाचं कार्ट (not verified)

बरोबर आहे प्रभु तुमचं !
हे लेकाचे धर्माचा धंदा करतात व वरील टाईपची लोक त्यांची जाहीरात !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

वेताळ's picture

29 Oct 2008 - 2:04 pm | वेताळ

देवावरचा कुणाचाही विश्वास डळमळीत मला करायचा नाही. किंवा माझ्या लिखाणामुळे कुणाच देवावरच विश्वास डळमळीत झाला असल्यास तो त्या व्यक्तिचा दोष समजावा.

पुन्हा राजेशाही भारतात अवतरावी असे तुम्हाला वर सुचवायचे आहे काय ? पण आमच्या मते आहे ती लोकशाही योग्य आहे.

कोणत्या साधुसंतानी स्वःताला देशासाठी,सर्वसामान्य माणसाच्या उन्नती साठी वाहुन घेतले आहे? कोणत्याही आश्रमाला भेट देण्या आधी आपला खिसा तपासावा लागतो अन्यथा त्याला बाहेर हाकलले जाते .तसेच अवतार म्हणन्या योग्यतेचे आज घडीला किती साधुसंत आहेत? त्याचे चित्रविचित्र अवतार मात्र बघण्यासारखे असतात.
बाकी काही वाद नाही.
वेताळ
स्वामी विवेकानंदाचा कट्टर अनुयायी.

सनातन's picture

30 Oct 2008 - 9:32 am | सनातन

कोणत्याही आश्रमाला भेट देण्या आधी आपला खिसा तपासावा लागतो अन्यथा त्याला बाहेर हाकलले जाते - हा आपला चुकिचा समज आहे.
आपन कोनत्याहि आश्रमाला भेट जरुर द्या. येथे भाव महत्त्वाचा आहे आनि बघन्याचा द्रुस्तिकोन....!!!

'संघटीत राहणे' ही गरज वगैरे पेक्षा राष्ट्र भावनेतच अंतर्भूत आहे.
धर्म-राष्ट्र सर्व ठीक आहे, पण उठ-सुठ सगळ्याच गोष्टीत हे आणण्यात काही अर्थ नाही.

असो.
>> राष्ट्र व धर्म संकटात असतांना अशा प्रकारे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे योग्य वाटते का ?
हे लघुसंदेश न पाठवल्यामुळे आपला धर्म (नक्की कोणता आणि कुणाकुणाचा?) कसा वाचणार आणि राष्ट्र कसे संकटातून (पुन्हा नक्की कोणत्या?) बाहेर येणार हे काही कळले नाही.

- अभिजीत

विकि's picture

30 Oct 2008 - 12:13 pm | विकि

राष्ट्र रक्षणासाठी दैनिक सनातन प्रभात वाचणे.
ऐ सनातन दै.सनातन प्रभात आता प्रकाशित होते का?