'हिंसक घटना' हे लोकशाहीचे अपयश की लोकशाही चालवणार्‍यांचे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
31 Jul 2018 - 9:42 am
गाभा: 

सामाजिक, राजकीय कारणांनी होणार्‍या'हिंसक घटनांनी व्यक्तिग्त, सामाजिक, आर्थिक नुकसान या बद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. हिंसा होऊ नयेत या बद्दल सर्वजण सहमत असतात, पण कुठेतरी काही तरी बिनसते आणि रस्त्यावर हिंसा दिसते. गेली पाउणे दोनशे वर्षे वर्षोंवर्षे सरकारे विरोधी पक्ष आंदोलक आणि आंदोलनांची कारणे बदलतात पण रस्त्यावरची हिंसा टळत नाहीए. ती अगदी महात्मा गांधींच्या काळात टळली नव्हती, अगदी इतिहास काळापासून ते आज तागायत वेळ प्रसंगी हिंसा अंहिंसावाद्यांच्या नावेही होतात. ब्रिटीशांची परकीय सत्ता होती ती गेली . लोकांचे राज्य आले लोकांच्या अपेक्षा तक्रारी खदखद हि लोक्शाही मार्गाने कायदे मंडळात व्यक्त होऊन लोकांना न्याय मिळावा हा लोकशाहीचा उद्देश्य व्यवस्थीत पार पडत गेला तर सहसा सार्वजनिक हिंसेसाठी कारणे शिल्लक रहावयास नकोत.

माझा या चर्चेचा उद्देश्य केवळ सध्या चालू किंवा मागच्या ७० वर्षातील कोणत्याही विशीष्ट आंदोलनांना वेगळे काढून ब्लेम करण्याचा उद्देश्य नाही. कुठेतरी काही तरी बिनसत , लोकशाहीने अपेक्षित दखल नाही घेतली की स्पिल ओव्हर होत कुठे तरी हिंसक घटना घडते आपण तात्पुरते सुन्न होतो पण आंदोलनाची कारणे, सरकारे, विरोधी पक्ष बदलले तरी वर्षानुगतीक होणार्‍या हिंसा चुकत नाहीत. आता गेली सत्तर वर्षांपासुन ब्लेम करण्यासाठी परकीय राज्यकर्तेही नाहीत. तरीही सार्वजनिक हिंसा होतात हे अपयश लोकशाहीचे की लोकशाही चालवणार्‍यांचे ?

पुन्हा एकदा विषय सध्या चालू आंदोलना पुरता मर्यादीत नाही. माझ्या डोळ्या समोर गेल्या सुमारे पाऊणे दोनशे वर्षांचा सार्वजनिक हिंसाचाराचा इतिहास आहे. सहसा बहुतांश वेळा हिंसा छोट्याश्या पॉकेट्स(स्थळा) पुरत्या मर्यादीत असतात. बातम्या पोहोचवणारी साधने वाढल्यामुळेही सगळी कडे सतत हिंसाचारच चालू आहे असे वाटते . प्रत्यक्षात काही पॉकेट्स सोडली तर बाकी भाग शांत असतो. पण कोणत्याही सुसंस्कृत व्यवस्थेत एवढ्याही हिंसाचाराचे कारण / शक्यता शिल्लक का रहावी ? संतज्ञानदेव म्हणतात जो जे वांछिल तो ते लाहो. हव ते मिळवण्यासाथी हिंसेचा आश्रय घेण्याची वेळच येऊ नये, असे लोकशाही नेतृत्व हवे, अशी लोकशाही व्यवस्था हवी असा समाज हवा. तर असे लोकशाही नेतृत्व आपल्यातूनच निर्माण करण्यात जनता कमी पडते आहे ? लोकशाही नेतृत्व केवळ सरकारी पक्षाचे नव्हे तर सर्व बाजूचे कमी पडते आहे ? कि आपण निवडलेल्या लोकशाही व्यवस्थेत काही दोष राहून गेले आहेत आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे ?

मिपा संस्थळ शतकोंशतके चालेल ह्या अपेक्षांवर भरवसा ठेवऊनच मी चर्चा धागे काढतो. राजकीय चर्चा करणे बर्‍याचदा जिवावर येते पण समाजात खदखदणार्‍या विषयांवर चर्चा न होणे क्धी कुठे कधी कुठे कुणाच्या जिवनावर जाऊन पोहोचत असते. हि धागा चर्चा शतकी प्रतिसादाम्चॉ व्हावी लगेच व्हावी अशी कोणतीच अपेक्षा नाही. चर्चा सावकाश काळाच्या ओघात अगदी काही दशके लागली तरी चालतील अभ्यासपुर्ण जास्त समाजाला भावी काळ सुकर सौहार्दपूर्ण ठेव्ण्यासाठी मदत करणारी असावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रतिसादांची घाई टाळण्यासाठी आभार.

* अनुषंगिका पलिकडे अवांतरे, आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण, सुसंदर्भ, तर्कसुसंगत चर्चेसाठी आभार.

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

31 Jul 2018 - 10:40 am | ट्रम्प

छान लिहिले आहे ,
लेखा मध्ये मसाला नाही तरी पण चुंबळ चा त्रास असलेले मिपाकर वाचून शांत बसणार नाहीत ,मग किती ही आग होऊ दे .

डेव्ह फर्नांडिस साहेबांना " भाविकांच्या गर्दीत साप "हे वक्तव्य भोवणार अस दिसतंय . त्या वक्तव्या मुळे आंदोलन जास्त च हिंसक झाले आहे . कदाचित आंदोलन हिंसक करण्यामागे राष्ट्रवादी व काँग्रेस चे गुंड लोक सुद्धा असतील ,
cctv फुटेज नी ती लोक शोधणे अवघड नाही पण शहांच्या सल्ल्यानुसार सत्तेचा लाडू एकट्या भाजप ला खायचा असल्यामुळे सेने ला दाबण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस चे अजून 100 काय 1000 गुन्हे माफ करतील ( गेल्या 4 वर्षात एकही गब्बर नेत्याला हात लावलेला नाही , भुजबळ प्रकरण दमानिया म्याडम मूळे झाले , खडसे प्रकरण हेतुपुरस्सर तापवले का तर मराठी नेता फर्नांडिस च्या पुढे जाऊ द्यायचा नाही आणि प्रकाश मेहता ( शहांचे हस्तक ) प्रकरण गुंडाळले गेले ) .
अशा प्रकारे फर्नांडिस साहेब कन्फेक्शन बॉक्स मधील पद्र्या सारखी भूमिका वठवत आहेत की काय अशी शंका येते .

प्रसाद_१९८२'s picture

31 Jul 2018 - 12:37 pm | प्रसाद_१९८२

लेखात एकही हायपर लिंक नाही ?

माहितगार's picture

31 Jul 2018 - 1:16 pm | माहितगार

कारण कुणाही व्यक्ती, समुदाय, राजकीय पक्षास लिंक (टार्गेट) करण्याचा धागा लेखकाचा उद्देश्य नाही. लोकशाही व्यवस्थेतल्या कमतरता उणीवा काय आहेत हे समजून घेणे जेणे करुन प्रसंग हिंसेच्या स्तरा पर्यंत जाऊ नयेत असा साधा सरळ सात्विक शुद्ध हेतु या चर्चे मागे आहे.

अभ्या..'s picture

31 Jul 2018 - 12:51 pm | अभ्या..

(संपादित)

गणामास्तर's picture

31 Jul 2018 - 2:02 pm | गणामास्तर

मी धागा आत्ता काढला आहे . अशा विषयांवर चर्चा नाही झाल्या नाही तर शंभर किंवा हजार वर्षांनी सुद्धा महाराष्ट्र आणि भारत अशाच चक्रात अडकलेला असेल.

=)) =)) =))
=)) =))
=))
ते महाराष्ट्र आणि भारताचं बघून घ्यायला आहेत बरीच लोकं , ते सोडा.
परंतु इथं किंवा फॉर द्याट मॅटर कुठेही तुम्ही चर्चा चालू केलीत ना तर तुम्हीच एक दिवस टायरमध्ये अडकाल हे नक्की =))

माहितगार's picture

31 Jul 2018 - 3:15 pm | माहितगार

__/\__

मालकांनी हाफिज सय्यद ( शारुख चा फोटो ) ने लिहलेला ' आणि ओबामा हसला ' हा धागा उडवला वाटतं , लै धुमाकूळ चालला व्हता राव .
या पांडू ला तर्रास नका देऊ राव !!! पायजे तर फाट्यावर मारा , बरं पडत्यात रात्रीच लेख वाचायला .

अभ्या..'s picture

31 Jul 2018 - 2:12 pm | अभ्या..

ओके डोनूतात्या.

माहितगार's picture

31 Jul 2018 - 3:16 pm | माहितगार

__/\__

हिंसा हे खरं तर हिंसा करणाऱ्या , त्याला जबाबदार असणाऱ्या आणि त्यातून फायदा घेणाऱ्या समाजाचं अपयश. कोणी जबाबदारी घेवो अथवा न घेवो. कोणत्याही फायद्यासाठी हिंसक घटना घडवणे किंवा करणे म्हणजे जी गोष्ट पाहिजे तीच चुकीची कशी हे सिद्ध करण्या सारखं आहे , बर एक हिंसक गोष्ट भविष्यासाठी अगणित हिंसा आणि प्रव्रुत्ती जन्माला घालते ते वेगळं.

आनन्दा's picture

31 Jul 2018 - 7:48 pm | आनन्दा

हिंसा म्हणजे काय रे भाऊ?

रंगीला रतन's picture

1 Aug 2018 - 2:08 pm | रंगीला रतन

ह्या धाग्यावर नक्की कोणती चर्चा अपेक्षित आहे ते ध्यानात नाही आलंय! पण तुमचे बरेचसे धागे मुस्लीम समाजाशी निगडीत असतात. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाने हिंदू मुसलमान व अनेक जातींमध्ये भांडणे लाऊन दिली. ते गेल्यानंतरही अजून त्यांचे भारतातील चेलेचपाटे चर्च, मिशनरी आणि NGO च्या मार्फत हे उद्योग सदैव करत असतात. हिंदू समाजचे खरे शत्रू मुस्लीम नसून ब्रिटीश सत्ता असताना धर्मांतरित झालेले त्यांच्याशीच एकनिष्ठ ख्रिस्ती लोकं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आहेत असे काही ठिकाणी वाचले होते. तुमच्या अभ्यासू लेखणीतून या विषयावर एखादा धागा काढून चर्च, मिशनरी आणि NGO या माध्यमांतून चालणार्या उद्योगांवर प्रकाश टाकलात तर वाचयला आवडेल!
प्रतिक्रिया अवांतर वाटल्यास चू.भू.द्या.घ्या.

माहितगार's picture

1 Aug 2018 - 3:38 pm | माहितगार

:) रतनजी, काही स्थितीत हत्तीकडे पहाणार्‍या प्रेत्यक व्यक्तीला हत्ती हत्ती आहे हे ओळखू न येता तो काही वेगवेगळा दिसतो म्हणतात , या कडे नंतर येतो. माझ्या सवयीने उलट्या क्रमाने उत्तर देतो. मुख्य म्हणजे मी कशातही वाईटच शोधतो किंवा चांगलेच शोधतो असे होत नाही. माझ्या विवेकाला पटते त्याला चांगलेच म्हणतो आणि आणि जे विवेकाला पटत नाही त्या बद्दल साशंकता व्यक्त करणे अथवा प्रसंगी टिकाही करतो. नोट बंदीचा व्यक्तिग्त जिवनात फटका बसत असूनही अर्थशास्त्रीय तत्वापर्यंत त्याचे समर्थनही करत होतो - आणि तेही मी अबकड भाजपायी अथवा काँग्रेसी नसताना.

....तुमच्या अभ्यासू लेखणीतून या विषयावर एखादा धागा काढून चर्च, मिशनरी आणि NGO या माध्यमांतून चालणार्या उद्योगांवर प्रकाश टाकलात तर वाचयला आवडेल!

असे माझ्या कडून होईलच अथवा होणारच नाही हे दोन्हीही या क्षणी सांगू शकत नाही. अगदी तुम्हाला अपेक्षीत अशी नाही पण इतर धर्मीय आणि धर्मांप्रमाणे प्रसंगोपरत्वे यांच्यातल्याही चांगल्या गोष्टी आणि मर्यादांची मी माझ्य काही धागे आणि प्रतिसादातून दखल घेतली आहे. त्या साठी कदाचित तुम्हाला माझे सुरवातीपासूनचे धागे बघावे लागतील असे वाटते.

...हिंदू समाजचे खरे शत्रू मुस्लीम नसून ब्रिटीश सत्ता असताना धर्मांतरित झालेले त्यांच्याशीच एकनिष्ठ ख्रिस्ती लोकं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आहेत असे काही ठिकाणी वाचले होते...

मी अमूक किंवा तमूक समाजाकडे शत्रु म्हणून बघून लेखन करतो असे आपणास वाटत असल्यास आपला काही चुकीचा ग्रह झालेला आहे. महात्मा गांधींचे नाव ऐकले की बरेच लोक नाक मुरडतात पण त्यांच्या तत्वज्ञानातील मला पटणार्‍या गोष्टीत शत्रुत्व न पटणार्‍या वृत्तींशी असू शकते मतभेद वैचारीक/ तात्विक असू शकतात, शत्रुत्व व्यक्ती अथव समुहाशी असू नये.

मुस्लीम धर्मीय धर्मग्रंथांची मनमोकळी चिकित्सा करण्यावर मर्यादा पडतात, त्यामुळे धर्म ग्रंथांची चिकित्सा करण्या पेक्षा धर्मीयांवर टिका करणे आणि लक्ष्य होणे असे काही प्रमाणात घडत असावे पण वैचारीक मतभेद धर्मग्रंथ विषयक असतील आणि त्याची मनमोकळी चर्चा करता आल्यास आणि जसे मुस्लिम समाज प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून जाईल तसे समुहावरील टिका काळाच्या ओघात कमी होईल असे वाटते. पण इतर धर्मीय जसे प्रबोधनच्या प्रक्रीयेतून पुढे गेले तसे मुस्लिम धर्मीयांनीही पुढे जाण्याची गरज असावी, हे माझे नाही काही मुस्लीम धर्मीय सुधारणावादींचेच मत आहे.

...ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाने हिंदू मुसलमान व अनेक जातींमध्ये भांडणे लाऊन दिली.....

अंशतः मान्य आहे पण काहीच आयडीयॉलॉजीकल डिफरन्सेस नसते तर ब्रिटीशांना किंवा इतर राजकारण्यांना शक्य झाले असते का याचे उत्तर नाही असे असावे. आयडीयॉलॉजीकल डिफरन्सेस बद्दल मनमोकळी चर्चा न केल्यानेच डिफरन्सेस वाढतात गैरसमज टिकून रहाण्यास वाव निर्माण होतो आणि या टिकलेल्या गैरसमजांचाच फूट पाडण्यात उपयोग केला जातो. त्यामुळे मी रस्त्यावर सार्वजनिक हिंसा करण्या पेक्षा मनमोकळ्या चर्चांवर विश्वास ठेवतो.

....पण तुमचे बरेचसे धागे मुस्लीम समाजाशी निगडीत असतात. ....

हे तुम्ही माझ्या अलिकडील धाग्यांवरुन म्हणता आहात की इतर मिपाकर माझ्या बाबत व्यक्तिगत टिका करतात त्याने पुर्वग्रह दुषित होऊन म्हणता आहात ? आपण मी म्हटल्या प्रमाणे माझे सर्व जुने धागे पहावेत आपल्या निष्कर्षात तथ्य नाही असे लक्षात येईल . मी इतर सर्व विषयांवर त्यात धार्मीकही आले जसे लेखन केले तसेच मुस्लीम धर्मीय गोष्टींबद्दल केले आहे ते करताना माझ्या विवेकाला पटलेल्या गोष्टींची सकारात्मक दखल घेतली जिथे मर्यादा आहेत वाटले तिथे मर्यादा अधोरेखित केल्या. इतर धर्मीय आणि धर्म सुधारणांच्या आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून पुढे गेले आहेत त्यात मुस्लीम धर्मीय प्रबोधन आता कुठे युरोमेरीकेत ०.००००००१ इतके सुरु झाले आहे. त्याला १ वरही येण्यास अद्याप मोठा टप्पा आहे.

होत काय आहे की राजकीय वोट बँके साठीच्या गरजेतून अमुकवर टिका करा अमुकवर नको असे काही राजकीय पक्ष बदलतील तसे होत आहे . राजकारण आपापल्या वळणाने जाते त्यास त्याच्या वळणाने जाऊ द्यावे. अभ्यास त्याच्या वळणाने जातो अभ्यासास अभ्यासाच्या वळणाने जाऊ द्यावे. आम्ही अभ्यासाची वळणे बघतो. अभ्यासाची वळणे आपल्याला हवी तशी नसली की मनाला पटवण्यात जरासे कष्ट पडतात. पण दीर्घ काळात अभ्यास कामाला येतो की राजकारणातील तात्पुरती सोईस्करता ? याचा ज्याचा त्याने विचार करणे श्रेयस्कर असावे.

..ह्या धाग्यावर नक्की कोणती चर्चा अपेक्षित आहे ते ध्यानात नाही आलंय!

एक उदाहरण देतो आसामचे मागच्या शतकात तेथिल लोकांना समस्या भेडसावत होती ती चिघळत राहीली शेवटी हिंसाचार झाला (आता कसे बसे प्रकरण हिंसाचारावरुन कमी झाले तरी स्थानिक लोकांना समस्या नव्हत्या असे नव्हे ) जगातल्या तुरळक का होईना देशात अमुक एवढ्या लोकसंख्येचे अर्ज आले की संसदेस आणि विधान सभांना लोकांच्या आवेदनातले प्रश्न लक्षात घेऊन तातडीने सोडवावे लागतात. तशा काही व्यवस्थे बद्दल चर्चा होऊ शकेल काय ह्या बद्दल मी विचार करत होतो.

माहितगार's picture

2 Aug 2018 - 11:09 am | माहितगार

@ रतनजी, खूप राजकारणी आणि राजकीय समर्थकांना तोंड देखले मुस्लीम प्रेम दाखवताना बघत आलो आहे. आपण त्या पैकी नसणार, वेगळे असणार असा विश्वास आहेच. पण हे नुसते तोंडी नको आधी करावे आणि मग सांगावे यावर आपला विश्वास असेलच. आणि खासकरुन मी कोणत्या विषयावर लिहावे ते आपण सुचवले त्या नात्याने आपणास लेखन सुचवणीचा नैतीक अधिकार मला पोहोचावा असे वाटते, म्हणून खालील सुचवण्या करुन ठेवतो.

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी विषयांमधील आपल्या आवडीचा विषय निवडून लेखन करुन दाखवावे असे आव्हान खुले आव्हान आहे. माझ्या किंवा इतरांच्या धाग्यातूनच केले पाहीजे असेही नाही स्वतंत्र पणे करु शकता. सकारात्मक योगदाना पासुन दूर राहून दुरुन उंटावरुन शेळ्या हाकण्या पेक्षा एका शेळीच पाणि पाजून तिचा जीव वाचवणे अधिक उत्तम असावे हे आपण लक्षात घ्याल अशी खात्री आहे.

अलिकडे असेच आवाहन दुसर्‍या धाग्यावर प्राडॉ. सरांनाही केले आहे आणि इतर कथित पुरोगामी मित्रांनाही करणार आहेच. बघुया आपल्यासारखी पुरोगामी मंडळी प्रत्यक्षात किती योगदान करतात ते.

लेखकाचे नाव अहिंसावादी पाहिजे होते , किती शांतपणे विचार समजावून सांगतात /\

हिंसा ही कोणत्या परिमाणात चांगली किंवा वाईट ठरवली जाते तर ती हिंसा करण्यामागे काय कारण आहे हे ते परिमाण ठरवत .
काही ठिकाणी परकीय सत्ताधारी मंडळी पासून स्वतंत्र मिळवण्या साठी हिंसा केली जाते ती हिंसा त्या मंडळी साठी पवित्र आस्ते.
काही ठिकाणी दहशत मजवण्या साठी हिंसा केली जाते ती हिंसा स्विकारता येत नाही . ती कठोर पने म्हणजेच हिंसेचा मार्ग अवलंबून पण सरकारी पातळीवर मोडून काढली जाते त्यालाच आपण कठोर शिक्षा म्हणतो.
आता लोकशाही मध्ये हिंसा का होते आस धागा कर्त्याचा प्रश्न आहे .तर लोकशाही आसली की सर्व जनतेच्या hitachch होत हा गैरसमज आपण का करून घेतो .मुळात लोकशाही ही ऐक राज्यपद्धती आहे .जशी राजेशाही ही सुधा ऐक राज्यपद्धती च आहे .दोन्ही ही पद्धती मध्ये स्वलोकांच हित करणे हेच राज्यकर्त्यांचा कर्तव्य आसात फरक aivdach आहे की लोकशाही मध्ये आपण राज्यकर्ते बदलू शकतो आणि राजेशाही मध्ये नाही .
आणि हयात समाज हा ऐक महत्वाचं घटक असतो ह्याच समजा मधून नेते तयार होतात ,प्रशासन मध्ये काम करणारे सुधा ह्याच समाजातून आलेले आसतात .
त्यांची मानसिकता समाजाच्या मानसिकतेमध्ये च तयार झालेली आस्ते .
समाज मन सशक्त होण्यासाठी लहान पना पासून नैतिक ता शिकवणे गरजेचं आहे ( पण व्यक्ती स्वतंत्र chya नावावर नैतिकतेला विरोध केला जातो)
अत्यंत कामसू आणि प्रामाणिक प्रशासन यंत्रणा आणि निःपक्ष न्याय यंत्रणा (हयात योग्य वेळी आणि कमीत कमी वेळात न्याय मिळणे अपेक्षित आहे ) ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्या लोकशाही देशात मागमूस सुधा नाही .आणि त्यामुळे समाज मन कलुशित झालेलं आहे आणि ते थोड्या थोड्या कारणांनी सुधा विचलित होत .
तिसऱ्या कारण च आपण विचार केला तर गैर काम करणारी लोक आणि त्यांचं त्याच गैर मार्गांनी मिळवलेल्या पैशा मधून उभ राहिलेलं श्रीमंती जीवन ऐशोआरम आणि प्रामाणिक पने राहून मिळालेली गरीबी आणि अवहेलना व्यक्ती का गैरमार्गाने पैसा जमवण्यासाठी आणि त्या साठी हिंसा करण्यास सुधा प्रवृत्त करते .
म्हणून हिंसा नको आसेल तर मी दिलेल्या पहिल्या कारण पासून survat करावी लागेल तेव्हा भविष्यात हिंसा विरहित समाज निर्माण होवू शकेल

वीणा३'s picture

21 Jan 2019 - 11:29 pm | वीणा३

खाली काही उदाहरणे घ्या:

१. एक मुलगी रात्री सुनसान रोड वरून स्कूटर चालवताना पडली जखमी झाली आणि बेशुद्ध पडली :
अ . एक जण येऊन तिला मदत करेल, हॉस्पिटल ला पोचवेल, तिला कुठल्याही प्रकारे नुकसान करणार नाही किंवा ती बेशुद्ध आहे याचा गैरफायदा घेणार नाही.
ब . एक जण वाटेतून जाताना तिला बघेल, पोलिसांना फोन करेल, फार फार तर तिचा फोन चेक करून तिच्या घरच्यांना फोन करायचा प्रयत्न करेल, पण जास्त भानगड नको म्हणून निघून जाईल, जास्तीची मदत करणार नाही, पण कुठलाही नुकसान करणार नाही.
क . एक जण बघेल आणि सरळ निघून जाईल. मदतही करणार नाही नुकसानही नाही.
ड . एक जण, येऊन तिच्याकडचे पैसे/दागिने / मोबाईल घेऊन पळून जाईल, पण शारीरिक इजा करणार नाही
इ . एक जण येऊन तिचे पैसे घेईल, शारीरिक इजा करेल आणि निघून जाईल.

आता हे सर्व नमुने अगदी एका वस्तीत शेजारी शेजारी पण मिळू शकतील. वस्ती = झोपडपट्टी / बिल्डिंग / बंगले कायपण. यात लोकशाही / राजकारणी / समाज हे सगळं सारखा असलं तरी प्रत्येकाचा वागण्याचा पर्याय / चॉईस वेगळा असू शकतो. प्रत्येक माणसाचा कुठल्याही परिस्थिती कडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असू शकतो.

मागे पेपर ला बातमी अली होती "लो वेस्ट जीन्स घातलेल्या मुलीच्या जीन्स मध्ये कोणीतरी जळती सिगरेट टाकली" . त्यावर माझ्या घरच्या काही महिलांची (सगळ्या आर्थिक सुस्थित, साधारण शिकलेल्या, कुठलाही मोठा सामाजिक अन्याय इ इ च्या बळी नसलेल्या) . याना स्वतःला मुली आहेत.
पहिली प्रतिक्रिया : "असे कपडे घातले कि असंच होणार"
तुझ्या मुलीला असं कोणी केलं तर तुला कसं वाटेल, यावर "तिला मी असे कपडे घालूच देणार नाही "

म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे कोणी वागत नसेल तर त्याला वाटेल ती शारीरिक इजा करण्याचा कोणालाही अधिकार आहे, असं तुला म्हणायचंय का? उद्या तुझी मुलगी कॉलेज ला जाते हेच कोणाला आवडत नसेल तर त्याने तिला शारीरिक इजा केली तर चालेल का इ इ - यावर - " नाही, शारीरिक इजा करणं चूक आहे " यावर गाडी अली. पण आधीच्या नैसर्गिक प्रतिक्रिया हिंसक होत्या. ह्याचा लोकशाही / राजकारण या बरोबर संबंध कसा लावायचा देव जाणे. मी फार फार तर हा मुद्दा शालेय शिक्षणात सरकारने घालायला हवा असं म्हणेन.

माहितगार's picture

22 Jan 2019 - 9:16 am | माहितगार

सर्वप्रथम मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी आभार. या लेखाच्या सुरवातीच्या तीन शब्दांकडे पुन्हा लक्ष वेधतो "सामाजिक, राजकीय कारणांनी होणार्‍या हिंसक घटसामाजिकासा आहे. लोकशाहीत सामाजिक, राजकीय समस्यांचे निराकरण लोकशाहीत व्यक्त होण्याच्या संस्थांच्या माध्यमातून होणे अभिप्रेत असते, सामाजिक, राजकीय समस्यांचे निराकरण होण्यासाठी हिंसेचे गरज लोकशाहीत पडू नये, पण तरीही हिंसक घटना होताना दिसतात. असे का होते ? हा या लेखाचा चर्चा विषय आहे.

अर्थात एकुण हिंसक बुद्धीचाही या विषयात प्रभाव पडत असणार हेही खरे

फक्त आपण ऐकाच उदाहरण घेवू ज्या मुळे सर्वात जास्त हिंसा झालेली आहे ती म्हणजे राम मंदिराचा मुद्दा .ह्याला सामाजिक समस्येशी जोडायला काही हरकत नाही वर वर धार्मिक वाटला तरी त्यामुळे दोन समाजात हिंसा झालीच ना .
हा प्रश्न धार्मिक पद्धतीने सोडवायचा प्रयत्न झाला रिझल्ट काही ही नाही प्रश्न तसाच शिल्लक .
हाच प्रश्न लोकशाही मार्गाने म्हणजे कोर्टात जावून .संसदे मध्ये चर्चा करून सोडवायचा प्रयत्न झाला रिझल्ट काय . तर काहीच नाही प्रश्न तसाच .
दोन्ही मार्ग अवलंबून समस्या सुटली नाही मग हाच मुधा राजकीय झाला धूर्त राजकीय लोकांनी आपल्या फायद्यासाठी हयात दोन्ही बाजूचे आले .
लोकशाही मार्गाने निवडून येण्यासाठी ,(म्हणजे जास्त मत मिळावी म्हणून ) ह्याच मुध्याचा वापर केला आणि लोकशाही पद्धतीने त्यांचा फायदा पण झाला .मग लोकशाही च हे अपयश आहे आस का म्हणू नये

माहितगार's picture

23 Jan 2019 - 1:13 pm | माहितगार

सामाजिक, राजकीय कारणांनी होणार्‍या'हिंसक घटनांची उदाहरणे अगदी वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ तामीळनाडू सहसा भाजपा पासून लांब असलेले राज्य तेथील राज्यकर्त्या राजकीय पक्षांची तत्वज्ञाने पाहीली तर केव्हाच जातीयवादापासून मुक्त व्हावयास हवे होते , इतर जातीय हिंसांची उदाहरणे तामीळनाडूतून समोर येतातच पण अगदी अलिकडीळ उदाहरण बैल का म्हशीच्या झुंजी खेळवल्या जाणार्‍या जलीक्ट्टू खेळाचे त्यात हिंसेचा प्रदुर्भावाची ताजी बातमी आहे.

उत्तर-पूर्व भारतातील एका ख्रिस्चन बहुसंख्य राज्यातून स्थानिक स्वराज्य संस्थातून स्त्रीयांना आरक्षण मिळू नये म्हणून सार्वजनिक हिंसाचार केला गेला. किंवा केरळात लसीकरण नको ते नाटक नको या कारणाने शांततेच्या अनुयायांनी केलेला हिंसाचार असेल किंवा साबरीमालाच्या बाबतीतील हिंसाचार असेल.

कोणत्याही एकाच गटाला धरून हेच हिंसाचार करतात असे काही नसावे, कायदा हातात घेताना सगळेच एका माळेचे मणि होऊ बघतात. अर्थात त्यात जरासा जो फरक असतो त्या फरकाचे मी इतर धाग्यातून विवेचन केले आहे.