ईंडस्ट्रियल व्यवस्थापन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Jul 2018 - 9:54 am

ईंडस्ट्रियल व्यवस्थापनाच्या वर्गात विद्यार्थी असताना ऐकलेली एक गोष्ट शेअर करत आहे.
............................
एकदा मानवाच्या सर्व अवयवांची सभा भरली व प्रत्येक जण आपापल्या कामाची यादी देत कौतुक करुन घेत होते...
हात म्हणाले "माझे काम खुप महत्वाचे आहे मी नसेल तर माणुस काम करु शकणार नाहि स्वताचे रक्षण करु शकणार नाहि..माझ्या शिवाय मानवाचे जिवन त्याला असह्य होईल."
पाय म्हणाले" मी म्हणजे वेग..मानवाला इच्छित स्थळी पोहोचवणे वेळप्रसंगी संघर्षात त्याला मदत करणे माझे काम..."
.
मेंदु म्हणाला मित्रानो माझे काम सर्वात महत्वाचे आहे..मी सुचना देतो...तुम्हा सर्वाना कसे काम व काय काम करावे याच्या सुचना देतो..मि नसेल तर हे मानव जिवन व्यर्थ होईल
या प्रकारे लिव्हर..हृदय सारे जण आपले काम सांगत वहावा मिळवत होते..
या प्रकारे डोळे कान..लिव्हर आदी सर्व अवयवांनी आपापली कामे सांगित्तली..
अहो रूपं अहो ध्वनि न्यायाने कौतुके चालु होति
.
शेवटी वेळ आली गुदद्वाराची...
शरिरातले वेस्ट बाहेर टाकणे हेच त्याचे काम..तो बोलायला लागला. व सर्व अवयव कुचेष्टेने हसु लागली..
तुलनेने हिन दर्ज्याचे काम..आपली टर उडवली जात असल्याने ते नराज झाले व त्याने बोलणे बंद केले
सभा संपली मात्र गुदद्वार खुप नाराज व उदास होते.."माझ्या कामाला काहि किंमत नाहि ..मी एक तुछ्य अवयव आहे हि भावना त्याच्या मनात बळावली व त्याने ठरवले ज्या कामाला किंमत नाहि ते काम तरी कशाला करायचे? असा विचार करुन त्याने संप पुकारला व "टुल डाऊन" आंदोलन सुरु केले..
सकाळी मानव उठला . टॉयलेटला गेला पण क्रिया होईना..
तो तसाच बाहेर आला..दुपारी जेवण पण कमी गेले..रात्र झाली अन पोटात गुबारा धरला.
दुसरे दिवशी पण हिच अवस्था ..जेवण नाहि पोट दुखत होते...
तिस~या दिवशी मात्र अंगातले त्राण निघुन गेले रक्त शरिरात तयार होईना म्हणुन हात पाय गळाले.. डोळ्यावर अंधेरी आली..व डोके दुखु लागले..
हे नेमके काय होते हे न कळाल्याने परत अवयवांची सभा भरली ..
मेंदु हुषार असल्याने त्याने ओळखले व त्याला सर्वांची चुक उमगली..
तो ईतर अवयवांना म्हणाला...
आपण आपल्याच कामाच्या कौतुकात गर्क झालो मात्र गुदद्वाराचे काम महत्वाचे नाहि असे समजुन त्याची टर ऊडवली ...आपले चुकले याची सर्वाना जाणीव झाले व खल झाला व सर्वानी त्याची माफि मागायचे ठरवले..
सर्वजण त्याच्या कडे आले व हात जोडत माफि मागीतली व म्हणाले " मित्रा माफ कर आम्हि तुझ्या कामाला कमी लेखले..प्रत्येकाचे काम आपापल्या जागी महत्वाचे असते हे आम्हि अहंकाराच्या नादात विसरलो..आमची चुक झाली....आपण सर्वानी टिम म्हणुन काम केले तरच हा मानवि देव व्यवस्थित काम करु शकेल ..
तु राग सोड व आपले काम नियमीत पणे चालु कर
या वर ते हसले व त्याने आपले काम चालु केले मानवि देह परत व्यवस्थित कामाला लागला...
.
तात्पर्य..मी पामर काय सांगणार तैल बुद्धिच्या समुह सदस्यांनी ते काढले सुद्धा असेल

जीवनमान

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

27 Jul 2018 - 11:28 am | विजुभाऊ

Any Ass hole can make you sick. Respect ass holes. They are the BOSS.
हा संदेश काही वर्षांपूर्वी एमेलवर वाचला होता.
मोठ्या शहराची कोणीही नाकेबंदी घडवून आणू शकतो ...............
आणि सत्तेत नसताना तर तो हे अगदी सहजपणे हे घडवू शकतो.

गामा पैलवान's picture

27 Jul 2018 - 10:51 pm | गामा पैलवान

Everybody worked and asshole passed the shit. Still it is the boss.

-गा.पै.

प्रत्येकजण आपापल्या खुर्चीचा राजा असतो.

संजय पाटिल's picture

27 Jul 2018 - 11:39 am | संजय पाटिल

हंम्म!

आमच्या एका प्रा नी सांगितले होते," सकाळी उठल्यावर साफ होणे हे दिवसभरातले सर्वोच्च सुख असते!"

अर्थात तुमच्या गोष्टी चे तात्पर्य कुठल्याही व्यवस्थापनाला लागू आहे.
आवडले.

सतिश गावडे's picture

27 Jul 2018 - 8:57 pm | सतिश गावडे

छान बोधकथा. आवडली. अजून येऊ द्या, बोधकथा.

जातीव्यवस्था तील उतरंड आणि शरीरातील सर्व भागा चें कार्य उत्तमरीत्या मांडले आहे , बऱ्याच तैलबुद्धी सदस्यांनी व्यवस्थित अर्थ काढला आहे , कुशाग्र बुद्धी वाया नाही जाणार ,
मस्त .

गामा पैलवान's picture

28 Jul 2018 - 1:09 pm | गामा पैलवान

ट्रम्प,

अगदी बरोबर बोललात पहा. आपल्याला सर्वात जवळची जातीव्यवस्था शरीरात असते. एकदा का एखाद्या पेशीने अमुकेक अवयवात जन्म घेतला की जन्मभर तेच कार्य करीत राहावं लागतं. याला अन्याय म्हणावं का, असा प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.