नमस्कार मंडळी ,
तुम्हा सर्वांची मदत हवी आहे .
ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान ७ दिवसांचा बजेट युरोप टूर कुटुंबासह (बायको, मुलगी वय ८,मुलगा वय ३) किंव्हा थायलँड (४ ते ५दिवस)करण्याचा बेत आहे.
बजेट युरोप टूर कुटुंबासह :
- प्रवासात/टूर मध्ये जास्त धावपळ नको
- पॅरिस आणि स्वित्झर्लंड पाहायचेच आहे
- बाकी अजुन कुठली ठिकाणं बघता येतील ?
- मुंबई >>> पॅरिस >>> मुबई असा प्लॅन योग्य आहे ?
चौघांचे तिकिटं -विसा साधारण १.८ लाख होतील असं जालावरून कळालं
- सगळे शाकाहारी आहोत, तर जेवण व नाश्ता मिळणं अवघड होईल ?
- संपुर्ण टूर २.५ ते ३ लाखात होऊ शकेल ?
थायलँड टूर कुटुंबासह (४ ते ५ दिवस ) :
- पटायात १ दिवसाच्या वर नको
- समुद्रकिनारे, बोट सफर आवडतील
- फुकेट आवडेल
- अजुन कमी गर्दी असलेली ठिकाण आवडतील
धन्यवाद !!
प्रतिक्रिया
26 Jun 2018 - 7:44 pm | सुबोध खरे
युरोपात जायचे असेल तर सरळ केसरी वीणा सारख्या सहल कंपनीने जा. कारण युरोपात स्वतः गेलात तर मैलोगणती चालावे लागेल. आपली मुले लहान आहेत हे लक्षात घेता ते फार कटकटीचे होईल. याउलट सहल कंपन्या सरळ बस भाड्याने घेतात जी युरोपभर फिरवतात आणि प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाच्या अगदी जवळ नेतात त्यामुळे. तंगडतोड बरीच कमी होते.
त्यातून तुम्ही पूर्ण शाकाहारीं आहात त्यामुळे तेथे आपले विशेषतः मुलांचे फार हाल होतील. यास्तव युरोपात जायचे असेल तर सहल कंपनीनेच जा. कारण एकदा त्यांचे पैसे भरले कि पुढची सगळी कटकट वाचते. आणि जर तुम्ही सर्व ठिकाणी स्वतःची टॅक्सी केलीत तर खर्च उलट जास्त होईल.
हीच स्थिती थायलंड मध्ये आहे. बँकॉक फुकेत आणि क्राबी अशी टूर असेल तर घ्या. पट्टाया आणि तेथला "लाल दिव्याचा" भाग यात मुलांना पाहण्यासारखे फारसे नाही. समुद्र किनारा फुकेत आणि क्राबी येथे पट्टाया पेक्षा जास्त चांगला आहे.
थायलंड मध्ये पण शाकाहारी लोकांचे थोडे फार हाल होतातच. तयातून ज्यांना माशांचा वास सहन होत नाही त्यांचे जास्तच. तेंव्हा मी येथे पण सहल कंपनीनेच जा असे सुचवेन.
या दोन पैकी मुलांसाठी थायलंड हे जास्त चांगले असे मला वाटते कारण युरोपात भयंकर थंडी असेल याउलट थायलंड मध्ये हाच मोसम आल्हाददायक असेल. शिवाय मुलांना युरोपातील मोठ्या इमारती इ. चे फारसे आकर्षण वाटणार नाही. याउलट थायलंड मध्ये वेगवेगळे शो मुलांना खूपच आवडतील.
26 Jun 2018 - 8:12 pm | टर्मीनेटर
सहमत. पण केसरी किंवा वीणा वर्ल्ड ने २.५ ते ३ लाखात युरोप टूर शक्य नाही होणार, त्यामुळे बँकॉक फुकेत आणि क्राबी त्या सिझन मध्ये योग्य आहे किंवा हॉंग कॉंग- मकाऊ पण चांगला पर्याय आहे. मुले Disney Land एन्जॉय करतील.
26 Jun 2018 - 7:57 pm | गवि
मुलांना आणि फॅमिलीला फुलटू अम्युझमेन्ट हवी असेल तर दुबईला जा.
धाऊ क्रूझ डिनर, डेझर्ट सफारी, ड्युन बॅशिंग (4x4 वाहन), सँड सर्फिंग बाय एमटीबी (सेल्फ ड्राईव्ह मल्टी टेरेन बाईक), बेली डान्स विथ डिनर, बस आणि बोट दोन्ही होऊ शकणाऱ्या वाहनातून टूर, सर्वात मोठे पॅनल असलेलं अक्वेरियम, भर वाळवंटात फुल फ्लेज प्रचंड इनडोअर बर्फ़ाळ प्रदेश आणि स्की स्लोप, जगातल्या सर्वात उंच इमारतीवरून (बुर्ज खलिफा) १२४ व्या मजल्यावर गॅलरीत फेरफटका, सहज उपलब्ध लिमोझिन कार राईड, पाम आयलंड, अटलांटिस वॉटर वर्ल्ड, स्त्रियांचा लाडका गोल्ड सुख (नवऱ्यासाठी गोल्ड दुःख).. प्रत्येक अनुभव पोरांसाठी आणि फॅमिलीसाठी अफाट.
26 Jun 2018 - 8:19 pm | टर्मीनेटर
उत्तम पर्याय. दुबई बरोबर अबुधाबी पण करा मुलांना फेरारी वर्ल्ड नक्कीच आवडेल.
26 Jun 2018 - 8:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
बजेट फॅमिली कस्टमाईझ्ड टूर्सचे मिपाकर स्पेशालिस्ट चौराकाका कॉलिंग !
26 Jun 2018 - 10:12 pm | गवि
लै तंगडतोड करवत्यात त्ये काका.. काटकपणा पायजे.
26 Jun 2018 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
28 Jun 2018 - 1:44 pm | संपत
:ड
26 Jun 2018 - 11:30 pm | टवाळ कार्टा
हि माझ्या लेखाची झैरात :)
29 Jun 2018 - 1:50 pm | विजुभाऊ
श्री लंका टूर करायचा विचार करा.
हे खिशाला परवडणारी ठिकाणे आहेत. शिवाय. बीचेस, जम्गले वगैरे गोष्टी खूपच सुंदर आहेत.
शाकाहारी असाल तरी जेवणाचे फारसे हाल होणार नाहीत.
भारतीय चवीचे पदार्थ मिळतात.
29 Jun 2018 - 3:19 pm | नजदीककुमार जवळकर
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! डॉ .सुबोध खरे सर.
गवि , टर्मिनेटर , डॉ. सुहास म्हात्रे , टका ...धन्यवाद !!
युरोपासाठी वीणा-केसरी चांगले ठरेल पण बजेट वाढवावे लागणार.
दुबई - अबुधाबी पण चांगला पर्याय आहे.
तुम्ही वर दिलेल्या माहितीनुसार थायलँड जमू शकेल.
विजुभाऊंनी श्रीलंकेचा option दिला आहे .
तर मंडळी ... पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!
30 Jun 2018 - 6:29 pm | चौकटराजा
आपण युरोपला का जायचे व सिंगापूर , दुबईला का नाही याचा विचार प्रथम करा ! आपल्याला वास्तुविद्या , चित्रकारी मोकळा निसर्ग याची आवड नसेल तर युरोपचा विचारही मनात नको. युरोपला केसरीने गेलात तरी चालावे हे लागेलच कारण शहरे जुनी पुराणी आहेत तिथे आत पर्यंत बस जायला मर्यादा आहेत . रोम मध्ये तर ही मर्यादा अधिक आहे झरझर युरोप बघायचा असेल तर यात्रा कंपनी मस्त . आम्ही दोघे गेलो होतो त्यात पत्नीला वास्तुविद्या व चित्रकारी यात काही रस नव्हता व तिने अगोदर तीन महिने चालण्याचा सराव देखील केला नाही पण मी नुसत्या शरीराने नाही तर मनानेही युरोप पाहिला सबब पायपीट मला जाणवलीच नाही . बाकी युरोपात वाहातुकीची उत्तम सोय आहे ई कित्येकाना माहितच नाही . मला विमानातळावर जाण्यासाठी देखील टॅक्सी लागली नाही ! म्हणजे मी सीन नदीच्या काठापासून सी डी जी ला चालत गेलो का ? सध्या मी स्वतंत्र पणे प. अमेरिकेचा दौरा आखत आहे . त्यांत एल ए व एस एफ येथे उत्तम पासेस मिळतात याची माहिती मिळत आहे . केसरी ग्रन्ड कन्यन दाखवतो त्यापेक्षा सरस असे निसर्ग सौदर्य अमेरिकेत आहे . तात्पर्य आपण परदेशी आवड म्हणून जातो की प्रतिष्ठा याचा विचार होणे जरूर !