कमरेखालचे वार

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in काथ्याकूट
14 Dec 2007 - 11:17 pm
गाभा: 

मिसळपावावरील विकासरावांच्या पारवर्ड चोरीचा प्रयत्न ताजा असतानाच माझाही पासवर्ड चोरायचा प्रयत्न झालेला आहे. भारतील वेळेनुसार संध्याकाळी ४:२४ ला माझ्या जीमेल खात्यात 'मिसळपाववर तुमचा पासवर्ड बदलण्याची विनंती करण्यात आलेली आहे' असे सांगणारा विरोप आलेला आहे. त्यात पुढे काही दुवे दिले असून तेथे जाऊन पासवर्ड बदला वगैरे मार्गदर्शनपर सूचना आहे. त्याबद्दल -
१. मी स्थानिक रात्री २ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ३:३०) निद्राधीन झाल्यानंतर तासाभराने हा प्रकार करण्यात आला. मी मिसळपाववरून जाण्याची नोंद केलेली नव्हती (हे बरेच झाले खरे तर नाहीतर मला पासवर्ड बदलणे वगैरे नाटके करत बसायला लागली असती), आणि बराच काळ 'आयडल' असल्याने माझे नाव आलेल्या सदस्यांच्या यादीत दिसत नसणार. याला फसून कुणीतरी हा फाजीलपणा केल्याचे दिसते. माझे कालचे सेशन अद्याप संपले नसल्याने जो कोणी हा नतद्रष्टपणा केला आहे, त्याचे फावले नाही म्हणायचे.
२. अर्थातच मी माझ्या वतीने पासवर्ड बदलायची अशी कोणतीही विनंती अद्याप मिसळपावला केलेली नाही. त्यामुळे अशी विनंती पाठविणे हे माझे काम नाही.
३. याबद्दल मालक म्हणून तात्यांकडून खुलासा अपेक्षित आहे. पंचायत समितीने उत्तर देणे मिसळपावच्या (नसलेल्या) घटनेत/धोरणांमध्ये बसत असेल, तर तिच्याकडूनही. इतर सदस्यांना याबाबत काय म्हणायचे आहे, हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
४. या नीचपणाविरुद्ध 'आयडेन्टिटी थेफ्ट'ची/तशा प्रयत्नाची तक्रार सायबर क्राइम अंतर्गत करता येईल का? करायची म्हटली तर ती कुणाकडे कशी करावी (अमेरिकेत/भारतात), त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत मिसळपाव मालक व प्रशासनाला पोलीस किंवा संबंधित कायदा व सुव्यवस्था संस्थांशी काय सहकार्य करावे लागेल, याबाबत माहिती हवी आहे. मा. सर्किटकाका यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे दिसते. त्यांना स्वतःहून असा तपास करायचा असेल (आय पी अड्रेस शोधणे वगैरे) तर मी त्यांना मला आलेला विरोप फॉरवर्ड करू शकेन.
तूर्तास इतकेच. यावरच्या साधकबाधक चर्चेतील मते अनेक बाबींवर प्रकाश टाकणारी ठरतील, अशी आशा आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

राजे's picture

14 Dec 2007 - 11:29 pm | राजे (not verified)

अहो हा काही पासर्वड चोरणे प्रकार नाही.... साधी गोष्ट आहे कोणीतरी तुम्हाला पागल बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जो पर्यंत तुमचा विरोप [ईमेल] पत्ता व त्याचा पासर्वड ज्याच्या कडे नसेल तो तुमचा ड्रुपल वरील पासवर्ड वरील पध्दतीने चोरुच शकत नाही.

दुसरी गोष्ट आताच मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो

गमन करा >> नंतर माझ्या नावाने "राजे" ने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा >> तुम्हाला सुचना येईल "क्षमस्व : चुकीचे सदस्यनाम अथवा संकेताक्षर दिलेले आहे. तुम्ही तुमचा संकेताक्षर विसरले आहात का? " तुम्ही तेथे " तुम्ही तुमचा संकेताक्षर विसरले आहात का?
" ह्या वर टिचकी मारलीत तर "सदस्यनाम अथवा विरोप (ईमेल) द्यावा.: " असा रखाना येतो त्यामध्ये जर तुम्ही "राजे" हे सदस्य नाव दिले तर संकेताक्षर बदलण्याचा ईमेल मला पोहचेल पण तो व्यक्ती काहीच करु शकणार नाही.

अहो साधी सोपी पध्दत आहे ही... उगाच घाबरत आहात.....

पण जो शार्प चोर असेल तो असे साधे सोपे रस्ते कधीच वापरणार नाही हे देखील लक्षात घ्या.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 11:40 pm | बेसनलाडू

राजे,
आपण म्हणताय ते बरोबर आहे. मी स्वतः आप्लिकेशन ऍन्ड नेटवर्क सेक्युरिटीमध्ये गेली दीड वर्षे काम करतो आहे, आणि सध्या या क्षेत्रात केवळ 'आयडेन्टिटी थेफ्ट' नाही, तर असा प्रयत्न करणारे नक्की कोण, याचाही शोध धेण्यासंबंधी काम चालू आहे. आणि मला येथे नेमके हेच हवे आहे. तसा प्रयत्न कोणी केला त्यापर्यंत पोचायचे आहे. विकासरावांच्या बाबतीतही हाच प्रकार झाला आहे, अशी माझी खात्री आहे.
त्यामुळे प्रस्तुत चर्चाविषयात तांत्रिक बाजूंवरील स्पष्टीकरणांपेक्षा यासारख्या फाजीलपणास, खर्‍या नावाने न लिहिता दुसर्‍याच नावाने 'टार्गेटेड' कविता वगैरे लिहिण्याच्या हिजडेपणास (आयडेन्टिटी फाल्सिफिकेशन) आळा घालता येण्यासाठी मिसळपावची काय धोरणे (असली तर!) आहेत, अशा मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. आणि मी या संकेतस्थळावरील पासवर्ड चोरीच्या प्रयत्नाची कायदेशीर तक्रार करायचे ठरवले, तर त्यासाठी काय करावे लागेल, त्याचे मिसळपाव या संकेतस्थळाच्या दृष्टीने सभासदांवर, मालक व प्रशासनावर काय परिणाम होतीलम हे जाणून घ्यायचे आहे; जेणेकरून मला माझा निर्णय घेता येईल.

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:32 am | सर्किट (not verified)

आयडेंटिटी फॉल्सिफिकेशन साठी इतर संकेतस्थळांवर काय सोयी आहेत, ते समजा मिसळपावावर लिहिलेस, तर तशा सोयी येथेही करण्यासाठी प्रयत्न करता येतील.

लिहितोस ना ?

- सर्किट

राजे's picture

14 Dec 2007 - 11:47 pm | राजे (not verified)

" त्याचे मिसळपाव या संकेतस्थळाच्या दृष्टीने सभासदांवर, मालक व प्रशासनावर काय परिणाम होतीलम हे जाणून घ्यायचे आहे; जेणेकरून मला माझा निर्णय घेता येईल."

भारतातील कायद्या नूसार काही फरक पडणार नाही... कारण योग्य असे कायदे नाही आहेत भारतात महाजालासाठी.

उदा. गुगल चे काय झाले... गांधी बद्दलची क्लीप आज ही युटूब वर आहे.
उदा. २. बाजी.कॊमच्या सीईओचे काय झाले ... केस बंद.

अहो जेथे नियमच नाही तेथे कायदे कोठून येणार.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 11:54 pm | बेसनलाडू

माहितीबद्दल धन्यवाद. केसचा निकाल लागणे वगैरे वेगळा मुद्दा आहे. त्याचा येथे संबंध अपेक्षितच नाही.
मुद्दा हा आहे की या प्रकाराबद्दलची प्रथम तक्रार १. कोणाकडे २. कुठे (भारतात/अमेरिकेत (कारण मी वास्तव्याने अमेरिकेत आहे म्हणून) ३. कशी करावी.
मिसळपावच्या पंचायत समितीच्या अखत्यारीत अशा स्वरूपाच्या तक्रारी असाव्यात असे वाटत नाही. कारण तसे असते, समितीवरच्याच एका सदस्याच्या बाबतीत असा दुर्दैवी प्रकार मग घडला नसता; आणि घडला असता, तर त्याचा आतापर्यंत योग्य तो निकालही लागला असता. मालकांकडे तक्रार करण्यात हशील नाही कारण माझ्या मते मालक या बाबतीत तरी तद्दन यूसलेस आहे. त्यामुळे मग तक्रार कोठे करावी आणि दाद कोठे मागावी, याबाबत काही सांगता येईल का? की स्वतःहून शक्य आहे तितके येथे मांडून सभासदांनी आपली सक्रीयता दाखवून या प्रकाराच तपास करून निष्कर्ष जाहीर करण्याचा धोशा लावावा?
(प्रश्नांकित)बेसनलाडू

नमस्कार,

मी पण जरी काल या विषयी लिहीले असले तरी त्याहून जास्त त्रागा मीन करून घेतला नाही. कारण हा उगाच कोणीतरी चावटपणा करतयं इतके समजते. तसा प्रकार इतर सर्वांच्याच बाबतीत होऊ शकतो. मिसळपाव न आवडणार्‍या व्यक्तीने/व्यक्तींनी हा न्युइझन्स केला आहे या व्यतिरीक्त यात जास्त काही बघता येणार नाही (जो पर्यंत कोणी अकांउंट फोडू शकत नाही तो पर्यंत).

बाकी राहीला प्रश्न तक्रार करायचा - ते तुमचे तुम्ही ठरवा, पण त्यात काही कायदेशीर हशील आहे असे पण वाटत नाही. विचार करा, तुम्ही अबकच्या सिटी बँकेच्या अकांउंट मधे जाण्याचा प्रयत्न केला. जमला नाही, मग तीच ट्रिक केलीत पण पासवर्ड चेंजची इमेल अबकच्य व्यक्तिगत इमेलवर गेली. आता त्या अबक ने उद्या त्यावरून सिटीबँकेवर आणि सिईओ पंडीतांवर खटला भरला तर त्यात काय हशील? अकांऊट सॅक्रीफाईस झाले होते का? - नाही, पैसे गहाळ झाले का - नाही, क्रेडीट - गैरवापर ? - नाही... थोडक्यात कुठेच सकृतदर्शनी गुन्हा नाही, शिवाय कोणी केला ते माहीत नाही. म्हणून याचा उपयोग नाही. असो.

बरं, यात आय पी ऍड्रेस शोधणे - आपल्यास आलेल्या इमेल द्वारे, शक्य नाही. मी सर्कीटरावांना मला आलेली इमेल पाठवली, त्यांनी काही माहीती काढली तर गोष्ट वेगळी, पण आलेली इमेल ही मिपाच्या सर्व्हर वरून आल्याने आयपी ऍड्रेस मिपाचा आहे. फक्त एकच म्हणजे जर मिपाच्या सर्व्हर वर / ड्रूपल सिस्टीममधे अशी विनंती झाल्यावर आयपी ऍड्रेसची नोंद ठेवली जात असेलतर...

थोडक्यात एक सल्ला तुर्तास हे विसरून जा... आणि लेखनास लागा...

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 1:09 am | विसोबा खेचर

विकासराव,

मुद्देसूद उत्तराबद्दल मनापासून धन्यवाद! लाडू म्हणतो त्याप्रमाणे खरोखरंच मी या बाबतीत युसलेस माणूस आहे. नुकतेच ह्या मुद्द्यावर नीलकांतशी बोलल्यानंतर 'हा चावटपणा कुणीही करू शकतो' असंच काहीसं तो ही म्हणाला. असो..

थोडक्यात एक सल्ला तुर्तास हे विसरून जा... आणि लेखनास लागा...

हेच म्हणतो!

तात्या.

बेसनलाडू's picture

15 Dec 2007 - 1:34 am | बेसनलाडू

विकासराव आणि इतर सदस्यजन,
'त्या' विरोपाचे हेडर्स तपासले. जे हाती लागले ते सभासदांपुढे मांडत आहे.
माझा परवलीचा शब्द बदलण्याविषयीची विनंती केली असल्याचे सांगणार्‍या विरोपातील सगळ्यात महत्त्वाचा हेडर (जो हा मेल मुळात कुठून कसा पाठवला गेला हे सांगतो आणि या संदर्भाता थोडीशी तो 'कोणी' पाठवला याचीही माहिती सांगतो) -
Received: from misavcom by lin22.netwayweb.net with local (Exim 4.68)
envelope-from misavcom@lin22.netwayweb.net
id 1J38Bz-00051o-57
for [माझा विरोप पत्ता]; Fri, 14 Dec 2007 16:24:55 +0530
या हेडरचा अर्थ पुढीलप्रमाणे -
misavcom@lin22.netwayweb.net या पत्त्यावरून 'तो' विरोप मुळात आला आहे. lin22.netwayweb.net (आय पी पत्ता 72.52.199.37) हा सर्वर आहे जो एक संकेतस्थळ होस्ट करतो. कोणते? अर्थातच तुमचेआमचे लाडके मिसळपाव! हे पहा - The IP address of www.misalpav.com is 72.52.199.37 (येथून साभार!) आणि
हा विरोप या सर्वरकडे misavcom या यूजरकडून, Exim 4.68 या मेल ट्रान्स्फर एजन्टकडून local प्रोटोकॉल ने पाठवला गेलाय = हा विरोप त्या misavcom या यूजरकडून त्या सर्वरवरच तयार झाला आहे (locally), जो मिसळपाव होस्ट करतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचे - X-Mailer: Drupal = हा विरोप ड्रुपल वापरून तयार झाला आहे, जे मिसळपावच्या बांधणीसाठी वापरले आहे :)
आता दुर्दैवाने misavcom हा यूजर आय डी असणार्‍या कोणाचा मिसळपावावरील कोणाशीही संबंध केवळ प्रस्तुत माहितीवरून जोडणे शहाणपणाचे ठरायचे नाही, हे मी जाणतो; पण विकासराव तुम्ही मला सांगा, जो सर्वर मिसळपाव 'होस्ट करतो', त्यावर ड्रुपल वापरणारा misavcom हा यूजर आय डी कोणाचा असेल, इतकाही 'लॉजिकल गेस' आपल्याला करता येणार नाही का? :)
नीलकांताने याबाबत अधिक खुलासा करावा अशी अपेक्षा आहे.
आणि सगळे तूर्तास विसरणे तर आपण करतच आलोय हो आतापर्यंत! त्यामुळेच 'तूर्तास' या शब्दाचा अर्थ निदान मिसळपावावर तरी 'कायमचे' असाच होत जातो आहे, नाही का? विसरण्याचे सल्ले मी सुद्धा देईन हो अगदी विनामूल्य; पण काहीतरी चांगले लिहावाचायच्या उद्देशाने इकडे येऊन पहावे, आणि पश्चिम रेल्वेच्या माटुंगा-माहीम स्थानकांदरम्यान सकाळी लोकलमधून प्रवास करताना जो नजारा दिसतो, तोच येथे दिसावा, याहून अधिक दुर्दैव काय?
धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 2:02 am | विसोबा खेचर

नीलकांताने याबाबत अधिक खुलासा करावा अशी अपेक्षा आहे.

या ओळीवरील तांत्रिक मजकूर काहीही कळला नाही!

नीलकांताने याबाबत अधिक खुलासा करावा अशी अपेक्षा आहे.

हेच म्हणतो!

हा सर्वर आहे जो एक संकेतस्थळ होस्ट करतो. कोणते? अर्थातच तुमचेआमचे लाडके मिसळपाव!

आमचे आहे परंतु तुमचे ते लाडके आहे किंवा नाही याबद्दल आम्ही साशंक आहोत!

पण काहीतरी चांगले लिहावाचायच्या उद्देशाने इकडे येऊन पहावे, आणि पश्चिम रेल्वेच्या माटुंगा-माहीम स्थानकांदरम्यान सकाळी लोकलमधून प्रवास करताना जो नजारा दिसतो, तोच येथे दिसावा, याहून अधिक दुर्दैव काय?

चांगले वाचावयास नक्कीच मिळेल, परंतु चांगल्या वाचनासोबतच वरील नजाराही दिसावा अशी 'मालक' म्हणून आमची वैयक्तिक इच्छा आहे! तेव्हा 'दुर्दैव' वगैरे म्हणून खोटे गळे निदान आम्हालातरी काढावे लागणार नाहीत!:)

किंबहुना, 'इथे चांगले वाचावयास तर मिळत नाहीच, उलटपक्षी पश्चिम रेल्वेच्या माटुंगा-माहीम स्थानकांदरम्यान सकाळी लोकलमधून प्रवास करताना जो नजारा दिसतो, तोच नजारा इथेही दिसतो म्हणून अश्या मंडळींनी इथे येऊच नये, हे उत्तम! असे आम्हाला वाटते! अश्या मंडळींनी चांगलं वाचण्याकरता इतर अनेक संस्थळे आहेत तिकडे जावे असेही आम्हाला 'मालक' म्हणून अगदी मनापासून वाटते!

असो, मूळ प्रस्तावात आमच्याकडून 'मालक' म्हणून काही खुलासा अपेक्षित केला होता, आम्ही आमच्याकडून या बाबतीत इतपतच खुलासा करू शकतो!

एक सूचना - आता पुढचे निदान दोनतीन दिवस तरी (किंबहुना जास्तही!) आम्हाला मिसळपावचा 'मालक' या नात्याने कुठलाही खुलासा करणे जमणार नाही/आम्ही तो करणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी!

(मालक) तात्या.

बेसनलाडू's picture

15 Dec 2007 - 2:51 am | बेसनलाडू

इथे येऊच नये, हे उत्तम! असे आम्हाला वाटते! अश्या मंडळींनी चांगलं वाचण्याकरता इतर अनेक संस्थळे आहेत तिकडे जावे असेही आम्हाला 'मालक' म्हणून अगदी मनापासून वाटते!
--- बरे झाले हे तुम्हीच बोललात. मिसळपावावरून अनेकांचे 'मन उडण्याचे' कारण आणि मिसळपावावरून मन उडालेल्यांच्या नावाने शिमगा करायचे लायसन्स या दोन्ही गोष्टी कुठून कशा मिळतात/निर्माण होतात, हे तरी आता सगळयांना कळले असेलच :)
आता पुढचे निदान दोनतीन दिवस तरी (किंबहुना जास्तही!) आम्हाला मिसळपावचा 'मालक' या नात्याने कुठलाही खुलासा करणे जमणार नाही/आम्ही तो करणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी!
--- उत्तम! आमच्या तसेच इतरांच्याही 'लॉजिकल गेसवर्क'ला बळकटी यायला आपला हा प्रतिसाद फारच मोलाचा आहे. धन्यवाद.
(समाधानी)बेसनलाडू

बेसनलाडू's picture

15 Dec 2007 - 6:32 am | बेसनलाडू

लहानशी पण महत्त्वाची सुधारणा - व्यक्तिगत निरोपांची देवाणघेवाण, परवलीचा शब्द बदलणे अगर तसा प्रयत्न करणे या प्रकारातून येणारे विरोप हे misavcom या यूजरकडून ड्रुपलचा वापर करून 'ऑटोजनरेट' होतात, असे पुढील तपासात आढळून आले. सबब, माझा परवलीचा शब्द बदलण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा misavcom हा यूजर आय डी कोणाचा, याबाबत माझ्या गेसवर्कचे एरर मार्जिन वाढले आहे, असे खेदाने स्पष्ट करावेसे लागते आहे. त्यामुळे आधीच्या प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे कोणी कोणावर संशय घेत असेल, तर त्यांनी योग्य तसा पुनर्विचार करावा.
नीलकांताने या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केल्यावर ड्रुपलच्या लॉग्सची तपासणी करून 'त्या' वेळेत 'बेसनलाडू' या यूजर आय डी च्या वतीने किंवा अन्य कोणाकडून याच यूजरसाठीची आलेली परवलीचा शब्द बदलायची विनंती कोणत्या आय पी पत्त्यावरून केली गेली, हे मिसळपावच्या सदस्यांसमोर जाहीर करावे, अशी नम्र विनंती.
धन्यवाद.
(सुधारीत)बेसनलाडू

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:37 am | सर्किट (not verified)

दोन मिनिटात तुला पुन्हा तसाच एक संदेश येईल....

तो मी जनरेट केलेला आहे...

मला मिसळपावाचा पासवर्ड माहिती नाही (आणि माहिती असला तरी तो मी वापरला नाही.) शेकडॉ सदस्यांसारखाच मिसळपावाचा एक सदस्य म्हणून मी जाहीरपणे हे केलेले आहे, हे लक्षात घे..

आणि मग ओरड तिच्यायला !

उगाच बोंबाबोंब करत जाऊ नकोस म्हणून तुला सांगितले होते (तुझ्या शब्दात, मार्गदर्शन केले होते), मग उगाच कशाला बोंबाबोंब ?

- सर्किट (काका)

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:46 am | सर्किट (not verified)

एकदा नव्हे तर दोनदा तुला तो संदेश मिळेल !!

विकास, तुम्हाला देखील पाठवतोय तसाच संदेश..

(अरे, विकास आणि बेसनलाडू, हे दोघेही दिसत नाहीत डाव्या बाजूला.., मग डाव्या बाजूला दिसताहेत, त्यांना पिडतो ;-)

- सर्किट

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:50 am | सर्किट (not verified)

सहज, नंदन, आणि घटनाकार प्रमोद देव, ह्यांना अशा प्रकारचे विरोप पाठवण्यास मिसळपावला भाग पाडले आहे..

आता लक्षात येईल, की अशी घाबरवणारी घटना घडवून आणणे किती सोपे आहे ते..

- सर्किट

सहज's picture

15 Dec 2007 - 8:53 am | सहज

हे म्हणजे दारावरची घंटी वाजवून पळुन जाणे :-)

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:55 am | सर्किट (not verified)

प्रमोद देवांना तर उपक्रमावरून पण असाच निरोप येणार !!!!

(तुम्हालाही पाठवतो सहजराव.)

आता लक्षात आले असेल्,अ की विकास, आणि बेसनलाडूंना असे संदेश येण्याचा मुद्दा मिटला..

आता फक्त मिसळपाव सदस्य क्रमांक चार कडून शुद्ध मराठीत आपोआप संदेश आलेत, हा मुद्दा शिल्लक आहे..

- सर्किट

बेसनलाडू's picture

15 Dec 2007 - 1:27 pm | बेसनलाडू

बोंबाबोंब का हे न समजण्याइतके तुम्ही दुधखुळे असाल, असे वाटले नव्हते. असो. वेड पांघरून पेडगावला जायचे ठरवले की कोणी काय करावे? कुणीकुणी खरोखरच झोपतात; कुणीकुणी सोंग घेऊन झोपतात. जे सोंग घेऊन झोपतात, त्यांना जागे करता येत नाही :)
(जागरुक)बेसनलाडू

सर्किट's picture

15 Dec 2007 - 8:45 am | सर्किट (not verified)

की विकासराव, आणि बेसनलाडू ह्यांना जे विरोप आले होते, ते सहज एखादा पाहुणादेखील भाग पाडू शकतो.

नीलकांत (अथवा ओंकार) ह्या मिसळपावाच्या तांत्रिक अभिक्रियकांना विनंती. "आपण आपला परवलीचा शब्द विसरला आहात का", ह्या प्रश्नावर टिचकी मारल्यास जे पृष्ठ येते, त्यात आपले सदस्य नाव किंवा विरोप पत्ता लिहावा असे लिहून येते. ह्यातील "सदस्यनावाचा" पर्याय नाहीसा करावा.

सोप्पे !!!

- सर्किट

आजानुकर्ण's picture

15 Dec 2007 - 10:02 am | आजानुकर्ण

हा पर्याय सोपा वाटतो

विकास's picture

15 Dec 2007 - 10:06 am | विकास

सर्कीटराव ते माहीत आहे. मला एक प्रश्न पडला होता की मी जेंव्हा सक्रीय नसतो तेंव्हा कोणीतरी हा प्रकार केला आणि तो मग माझ्याबरोबर का? बर मी तर मिपावर सध्या काही विशेष लिहीलेलेपण नाही की जेणे करून कुणा नवख्याला माझे नाव लक्षात ठेवावेसे वाटावे. तेंव्हा नव्या सभासदाने रँडमली मुद्दामून सभासदाच्या नावात "विकास" असे लिहून पासवर्ड मागणे म्हणजे जरा अतीच वाटत नाही का? माझ्या दृष्टिने हा मुद्दामून केलेला न्युइझन्स आहे, पण तो येथील माहीतगार व्यक्तिने केलेला आहे.

सर्किट's picture

15 Dec 2007 - 10:14 am | सर्किट (not verified)

हा न्यूसन्स आहे हे नक्की.

आपल्याच नावावर हा केला, का केला, हा प्रश्नही उचित.

पण बेसनलाडूला, अथवा कोलबेरालाही असाच प्रश्न आला, हेही निश्चित.

अर्थात, इतर संपादकांपेक्षा आपले नाव टंकन करणे सोपे.

नाही का ?

असे मला तरी वाटते..

खरे खोटे देव जाणे (प्रमोद देव नाही, खरा खुरा देव).

पण प्रामाणिकपणाच्या आधारावर आजवर उभे राहिलेले मिसळपाव आपला आधार सोडून मनोगताच्या स्वरूपात विलीन होत अहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

- (सखेद) सर्किट

आजानुकर्ण's picture

15 Dec 2007 - 10:20 am | आजानुकर्ण

>>पण प्रामाणिकपणाच्या आधारावर आजवर उभे राहिलेले मिसळपाव आपला आधार सोडून मनोगताच्या स्वरूपात विलीन होत अहे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

आणि याविरुद्ध आवाज उठवला की इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतो.

सर्किट's picture

15 Dec 2007 - 10:23 am | सर्किट (not verified)

आणि याविरुद्ध आवाज उठवला की इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतो.

हे देखील मनोगतावरूनच जेनेटिकली मिळवलेले आहे..
मनोगताविरुद्ध (नाही, तेथील दडपशाहीविरुद्ध) आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास, हा अख्ख्या मराठीविश्वाविरुद्ध कट आहे, हे लिहिणारे लोक तेथे दिसायचे..
पहिले प्रेम नाही, पहिली जनुके म्हणा...

- सर्किट

आजानुकर्ण's picture

15 Dec 2007 - 10:13 am | आजानुकर्ण

या चर्चेवरून एक बोधकथा आठवली.

एकदा एका खोलीमध्ये गुरू शिष्याला व एका माशीला "प्रयत्नांती परमेश्वर" व "हाती घेतले ते तडीस न्यावे" असा धडा शिकवत असतात. गुरुंनी शिक्षण देऊन चतुर बनवलेली एक माशी हातात घेतली आणि तिला काचेच्या बंद खिडकीकडे बोट दाखवून "बाहेर जा" असे सांगितले . माशी टेन्शनमध्ये आली आणि जोरजोरात खिडकीच्या काचेला धडका देऊ लागली.
थोड्या वेळाने माशी थकून गेली.
गुरुंनी शिष्याला विचारले, "तुझे काय मत आहे?"
शिष्य म्हणाला "प्रयत्नांती परमेश्वर. लवकरच माशीला काचेतून बाहेर जाता येईल."
गुरू म्हणाले, "माशीबरोबरच तूही मूर्ख आहेस. ही काच फुटणार नाही. तिने सरळ उघड्या दरवाजाने बाहेर जावे."

इथे तात्पर्य काय, तर ज्या गोष्टीवर चर्चा करून काहीही उपयोग नाही त्याऐवजी दुसरा विषय घ्यावा.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Dec 2007 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

आजानुकर्णाने लिहिलेल्या बोधकथांना आजानुकर्णोर्क्ती म्हणावे.
प्रकाश घाटपांडे

विजय पाटील's picture

15 Dec 2007 - 2:06 pm | विजय पाटील

मी ही आजानुकर्णानी लिहिलेल्या बोधकथेशी सहमत आहे.
हा विषय ईथेच सोडुन दुसरा विषय घ्यावा.
-विजय

ॐकार's picture

15 Dec 2007 - 3:14 pm | ॐकार

बे.ला. ची मते के केवळ तर्क आहेत.
ड्रुपल प्रणाली, इ-मेल पाठवताना पुरवलेल्या इ-मेल पत्त्याच वापर करते. उद्या जर मी मिसळपावच्या वरील पत्त्याऐवजी दुसर्‍या कुठल्या एस्.एम्.टी.पी. वरचा माझ्या नावाचा पत्ता दिल्यास इ-मेल माझ्या नावाने येईल.

परवलीचा प्रश्न बदलण्यासंदर्भातः
सदस्य होताना अमुक एक इ-मेल पत्ता दिला होता हे नंतर आठवणे प्रत्येकाला शक्य नाही. जीमेल, याहू, रेडीफ, तसेच अनेक मेल पुरवठादारांचे माझे अनेक -मेल पत्ते आहेत. त्यात मनोगतावर कोणता, मिप वर कोणता, कूलगूझ वर कोणता हे दरवेळेस लक्षात राहीलच असे नाही. त्यामुळे तुमचे सदस्य नाव किंवा इ-मेल पत्ता हे पर्याय उपयुक्त ठरतात.

तुम्ही तुमचे नाव आणि पत्ता यलो पेजेस मध्ये दिलात तर कोणा फुकट्या माणसाने फोन करून अथवा पत्र पाठवून "यंदा कर्तव्य आहे का?" अशी विचारणा केल्यास तुम्ही यलो पेजेस वाल्यांना जबाबदार धरू शकत नाही.

बेसनलाडू's picture

15 Dec 2007 - 4:15 pm | बेसनलाडू

मी केलेले तर्क हवेतले नाहीत, त्याला संदर्भ आणि तांत्रिक माहितीचा भक्कम आधार आहे. हे आतापर्यंत पुरेसे स्पष्ट झालेलेच आहे. ड्रुपलकडून असे विरोप ऑटोजनरेट होणे, ही हलकट मनोवृत्तीच्या कोणा एका न्यूसन्स निर्माण करणार्‍यासाठी देणगी, हेच केवळ आमचे दुर्दैव. आणि टु ऍड टु दॅट, मालक व संकेतस्थळाची तांत्रिक बाजू सांभाळणार्‍यांची प्रकरण तडीस नेण्यातली उदासीनता किंवा कातडीबचावूपणे सोईस्कर दुर्लक्ष.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

ॐकार's picture

15 Dec 2007 - 4:27 pm | ॐकार

तर्काविषयीचे वाक्य हे ऑटोजनरेटेड मेलच्या बाबतीतच आहे. त्याचा खुलासा तू स्वतःच एरर मार्जिनच्या उल्लेखाने केला आहेस त्यामुळे ते विधान तर्क आहे इतकेच माझे म्हणणे आहे. ड्रुपलच्या तंत्रप्रणालीशी जवळचा संबंध असल्याने हे विधान खुलाश्याखातर दिले आहे.
मिपा च्या ethical or technical बाबींत गमभन सोडल्यास माझा सहभाग नाही त्यामुळे बाकी विधानांबाबत मला माझे काही म्हणणे मांडायचे नाही.
मी यलो पेजेसचा उल्लेख उदाहरणादाखल दिला इतकाच. ड्रुपल आणि मिपा ह्यात गल्लत होऊ नये म्हणून हा प्रपंच.