अक्रसताळा शब्दास इंग्रजीत पर्याय शोधावा म्हणून आधी मोल्सवर्थ शोधला तर आधी शब्दच मिळाला नाही जरासे आश्चर्य वाटले; मग दाते- कर्वे शोधले, तर दाते कर्वे शब्द कोशाने अकरताळा शब्द शोधण्यास सांगितले . त्या शब्द कोशांचे लेखन होत असताना अकरताळा हे रूप कदाचित अधिक ' प्रमाण' असावे हि शक्यता जरा रोचक वाटली. असो
*अकरताळा या शब्दाचे मोल्सवर्थ ने दिलेली माहिती
अकरताळ or ळी or ळ्या a (अकृत & आळ) Wild, wilful, violent, head-strong, ungovernable;--used esp. of women and children.
*दाते कर्वे कोश
आडमुठा , कजाग , खोडकर . माथेफिरू , दांडगा (विशेषतः: मुले व स्त्रियांच्या बाबतीत ) [ सं अकृत +लु =आळ ; प्रा. दे. अक्कसाला = उन्मत्त स्त्री ]
हे शब्द कोश बनल्या पासून माथेफिरू शब्दाची अर्थछटा बदलून अधिक राखीव झाल्याची शक्यता असू शकते असे वाटते .
पण मुख्य म्हणजे अक्रस्ताळेपणा या बद्दल माझ्या मनातील प्रतिमेस हे सर्व पर्यायी शब्द नेमकेपणाने न्याय देताहेत असे वाटतं नाहीए . ( माझे व्यक्तिगत मत )
१) खरेतर हा शब्द शोध मी केवळ लहानमुले किंवा स्त्रियांना समोर ठेऊन केला नव्हता , अजूनही ह्या शब्दाची उपयोग व्याप्ती लहानमुले किंवा स्त्रियां पर्यंत मर्यादित आहे कि सर्वाना लागू होतो ?
२) अक्रसताळे शब्दाची तुमची स्वतः:ची व्याख्या काय ? सोदाहरण स्पष्ट केल्यास उत्तम
३) आक्रस्ताळी भूमिका / वागणे कसे ओळखावे
४.१) आग्रही भूमिका आणि अक्रस्ताळी भूमिका यातील नेमके फरक कोणते ?
४.२) विक्षीप्तपणा आणि अक्रस्ताळेपणा यातील नेमके फरक कोणते ?
( ५) जर करायचाच असेल तर, जाणीवपूर्वक पद्धतशीत्र अक्रसताळेपणा कसा करावा ? )
६) आक्रस्ताळी भूमिका / वागणे कसे टाळावे ( किंवा लपवावे ;) )
७) या शब्दासाठी मराठी मधील कोणते पर्यायी शब्द तुम्हाला अधिक चपखल वाटतात
८)या शब्दासाठी इंग्रजी आणि हिंदी मधील कोणते पर्यायी शब्द तुम्हाला अधिक चपखल वाटतात
चर्चा धागा गंभिरपणेच काढला आहे . पण धागाचर्चा अगदीच हायजॅक होणार नाही असा विरंगुळा चालू शकेल .
धागाचर्चा अगदीच हायजॅक न करता चर्चा सहभागासाठी आभार
प्रतिक्रिया
31 May 2018 - 6:22 pm | खिलजि
"अक्करमाशी"टाकून बघितलं का ? मी लहानपणी गावाला भरपूर ऐकलेला आहे . माझ्या दानपेटीत तर माझ्या कैलाशवासी आईची ती मला देणगी आहे . आपण अक्करमाशी हा शब्द टाकून बघावे . मला वाटत काहीतरी मार्ग मिळेल .
31 May 2018 - 6:34 pm | माहितगार
हम्म पहिल्या प्रयत्नात दोन्ही शब्दकोशात हाती नाही लागले. काही वेगळे लेखन करुन येत असेल तर माहित नाही.
31 May 2018 - 9:55 pm | सर टोबी
अनौरस संतती. खाली डॉक्टर म्हात्रे यांनी सुचविलेला शब्द क्रियाविशेषण म्हणून योग्य आहे. त्याचे नाम स्वरूप म्हणजे हिस्टेरिक.
1 Jun 2018 - 1:18 pm | खिलजि
हा असा अर्थ आहे हे ठाऊक नव्हते . फारच भयानक अर्थ आहे . कोकणात हा शब्द सर्रास वापरला जातो . अगदी सध्या बोलण्यातही .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
31 May 2018 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
आक्रस्ताळा = hysterical.
1 Jun 2018 - 12:36 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
माझ्या मते hysterical = उन्मादित = उन्माद झालेला / ली. इथे बेभानपणा अपेक्षित आहे.
याउलट आक्रस्ताळी भूमिका म्हणजे तटस्थ आगम ( = neutral approach) अशक्य करणारा युक्तिवाद. म्हणून अशा भूमिकेस pro biased म्हणता यावं. आक्रस्ताळ्या व्यक्तीसही हेच विशेषण लागू पडावं.
आ.न.,
-गा.पै.
1 Jun 2018 - 4:34 pm | आनन्दा
How about chaotic?
1 Jun 2018 - 6:17 pm | गामा पैलवान
आनन्दा,
chaotic हा शब्द सावळागोंधळ, निर्नायकी, अनागोंदी वगैरेसाठी वापरतात. आक्रस्ताळेपणात माझ्याबरोबर नसलेले सगळे माझ्याविरोधी आहेत असा दुराग्रह असतो.
आ.न.,
-गा.पै.
1 Jun 2018 - 1:53 am | अनिता
१) सर्वाना लागू होतो
२, ३, ५) उदाहरण, आक्रस्ताळी भूमिका =केजरीवाल
1 Jun 2018 - 6:49 pm | मराठी कथालेखक
स्वतःला माहितगार म्हणवता आणि असले फालतू धागे काढता. ... काथ्याकूट करायला जी किमान माहिती लागते ती तरी आहे का तुमच्याकडे ?
आक्रस्ताळेपणा माहित नाही का ? लोकांना व्याख्या विचारत फिरताय ते ? जसं काही तुमच्या पन्नास पिढ्यांत कधी कुणी आक्रस्ताळेपणा केलाच नाही असा आव आणलाय..
तुम्हाला काही काम धंदा आहे की नाही की नुसते मिपावरच पडीक असता ?
आणि उगाच मी कसा तो अभ्यासू हे दाखवण्याची फार हौस दिसतेय तुम्हाला.. पण इथे.. इथे.. मिपावर असलं काही चालणार नाही हे सांगून ठेवतो.. चला निघा आता..
....
....
....
....
याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करुन बघितला ..
माफी असावी माहितगार साहेब :)
1 Jun 2018 - 8:48 pm | माहितगार
:)) जमल्यासारखे दिसतेय :)
2 Jun 2018 - 12:52 pm | आनन्दा
मला वाटतं नॉनसेन्स हा शब्द पुरेसा असावा आक्रस्ताळेपणा साठी..
बादवे ते अक्रस्ताळेपणा नाहीये. आ आहे.
4 Jun 2018 - 12:34 am | नेत्रेश
अक्रसताळा =
frenzy
temper tantrums