रामराम मंडळी.
पूज्य (*१) आसारामबापूंबद्दल निरनिराळे प्रवाद ऐकू येत आहेत. वस्तुस्थिती माहीत व्हावी व नोंदी राहाव्या म्हणून हा लेख लिहितो आहे. हा लेख म्हणजे रूढ अर्थाने लेख नसून उपस्थित केलेल्या प्रश्नांचं संकलन आहे. प्रश्न मुख्यत: दोन हिश्श्यांत विभागले आहेत. एकात पूज्य बापूंविषयी प्रश्न आहेत तर दुसऱ्यात प्रसारमाध्यमांविषयी आहेत. लेखाचा स्रोत बापूंच्या अटकेच्या वेळचा म्हणजे २०१३ सालचा म्हणजे जुनाच आहे.
तर होऊ जाऊ द्या :
लेखन दिनांक : २३ सप्टेंबर २०१३ वेळ २२३० जीएमटी
पूज्य आसाराम बापूंच्या बाबतीत उपस्थित केले गेलेले प्रश्न :
१. तक्रारीत पीडित मुलीने पूज्य बापूंनी दीड तास माझे तोंड दाबून धरल्याचे सांगितले आहे. तर मग मुलीच्या तोंडावर कसल्याच खुणा कशा नाहीत? दीड तास जर गुन्हा घडत होता तर ती मुलगी ओरडली का नाही?
२. पीडित मुलीच्या मैत्रिणीने खुलेआम सर्व वाहिन्यांसमोर विधान केलंय की (तथाकथित) पीडित मुलीने हे तिच्या आईबापांच्या आग्रहावरून रचलेलं नाटक आहे. पोलीस या मैत्रिणीची जबानी नोंदवणार का?
http://www.youtube.com/watch?v=aBeMMvk89-E
३. या खटल्यात पीडित मुलीसोबत शासनही वादी आहे. गुन्हा केवळ विनयभंगाचा असतांना शासनाला यात लक्ष घालण्याची गरज काय?
४. पूज्य आसाराम बापूंना त्रिनाडी शूल (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया) या विकारावर उतार पडायला शिरमालिश करण्यासाठी नेहमीची वैद्येला तुरुंगात प्रवेश का नाकारण्यात आला? काय कारण आहे त्यामागे? हा ज्ञात विकारांतील एक सर्वोच्च वेदनादायी विकार समजला जातो. यास इंग्रजीत स्युसाईड डिसिझ असंही म्हणतात. रोगी वेदना असह्य झाल्याने आत्महत्या करतात (http://news.medill.northwestern.edu/chicago/news.aspx?id=79817). तर मग पूज्य बापूजींनी वेदना सहन करीत पडून राहवे काय? त्यांना उपचारांचा हक्क का नाकारण्यात येत आहे?
५. दिल्ली पोलिसांनी भादंवि ३७६ कलम (बलात्कार) लावलं आणि नंतर राजस्थान पोलिसांनी आक्षेप नोंदवल्यावर काढून घेतलं. या ढिसाळपणामुळे खटला खोटा आहे अशी शंका येते.
६. केवळ विनयभंगाचा गुन्हा आहे तर पौरुषत्व चाचणी का घेण्यात आली?
७. न्यायालयीन कोठडी दोनदा वाढवण्यात आली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी २५+ दिवसांची कोठडी कशासाठी? नेमका कसला तपास चालला आहे? साध्वी प्रज्ञासिंह व प्रसाद पुरोहित यांच्यावर आरोपपत्र दाखल नसतांना गेले कित्येक वर्षे दोघे कच्च्या कैदेत आहेत. कशावरून पूज्य बापूंवर असाच प्रसंग ओढवणार नाही?
प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाच्या बाबतीत उपस्थित केले गेलेले प्रश्न :
१. पूज्य बापूजी व/वा त्यांचे सहायक कधीच फरार नव्हते. मात्र वाहिन्या सदैव त्यांना फरार म्हणत होत्या. हा अपप्रचार का करण्यात आला? अटकाज्ञा (वॉरण्ट) नसतांना फरार म्हणून उल्लेख कशासाठी? पूज्य बापूजींवर बजावली गेली ती उपस्थिती आज्ञा (समन्स) होती. अशा वेळी सदर मनुष्य पोलिसांकडे अधिक वेळ मागून घेऊ शकतो.
२. बलात्काराचा गुन्हा दाखल नसतांना माध्यमे बिनदिक्कीतपणे ३७६ कलम लावल्याचं सांगत आहेत.
३. पूज्य आसाराम बापूंची अश्लील चकती अस्तित्वात नसतांना ती असल्याच्या वार्ता माध्यमे का देत आहेत? अशी कुठलीही चकती पोलिसांकडे नाही. https://www.youtube.com/watch?v=qFYUYIBUMpg&noredirect=1
५५ सेकंद - व्हिडीयो तथ्यहीन,
१ मिनिट १५ सेकंद - अहमदाबाद सीडी नाही
४. गेल्या १३ वर्षांपासून पूज्य बापूजींन त्रिनाडी शूल नामक अतिवेदनादायी विकार आहे. यावर उतार पडावा म्हणून वैद्या नीता गेले दोनतीन वर्षे शिरमालिश करीत होत्या. तो उपचार तुरुंगात चालू राहावा म्हणून विनंती अर्ज करण्यात आला. यावर पूज्य बापूजी स्त्रीसहवासासाठी हपापलेले आहेत असं चित्र का रंगवण्यात आलं? प्रसारमाध्यमांनी केलेलं एकांगी वर्णन नीतिमात्तेत कितपत बसतं? उपचार चालू असतांना तिथे इतर लोकंही उपस्थित असणार होते याकडे दुर्लक्ष का? तसेच उपचार डोक्यावर आहे, इतर जागी नाही. हाही मुद्दा विचारात घेतलेला दिसत नाही. इथे स्त्री की पुरुष हा प्रश्नच मुळातून उपस्थित व्हायला नको.
http://daily.bhaskar.com/article/RAJ-JPR-exclusive-actor-salman-khan-and...
तसेच पूज्य बापूजींनी विनंती केली तर त्यास मागणी असं का संबोधण्यात आलं?
५. पौरुषत्व चाचणी होकारार्थी आल्यावर पूज्य बापू बलात्कारी आहेत अशी प्रसारमाध्यमांनी बदनामी का केली? बलात्काराचा गुन्हा दाखल नाहीये.
६. श्याम नावाच्या तथाकथित सहायकाने पीडितेच्या आईवडिलांना धमकीचा फोन केला. त्याची फीत न्यूजएक्स नामक वाहिनीकडे आहे. (http://www.newsx.com/speak-out-india/item/10369-does-the-cd-now-conclusi...) वाहिनीने पोलिसांना याबाबत कळवलं का? ही फीत किती खरी किती खोटी? श्याम हा मनुष्य खरोखरीच आश्रमात सहायक आहे का? का पूज्य बापूजींना जामीन मिळू नये म्हणून मुद्दाम बनाव रचला आहे?
असो.
मिपावर एके ठिकाणी मी पूज्य आसारामबापूंचा अंधभक्त असल्याचं विधान केलंय. त्याचं खंडन करणं हाही एक हेतू आहे. मी पूज्य बापूंचा भक्त कधीच नव्हतो व आत्ताही नाही. ज्याअर्थी मी कसून प्रश्न केले आहेत त्याअर्थी मी अंध नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान
(*१) आसारामबापूंना पूज्य म्हंटल्याने काही लोकांना उचक्या लागतील. त्या तशा लागाव्यात म्हणूनच बापूंना पूज्य म्हंटलंय. उचक्या लागल्या तरी त्या निमूटपणे गिळाव्यात. उगीच आकांडतांडव करून स्वत:ची शोभा करवून घेऊ नये. उचकीबहाद्दरांचा संयम पक्का व्हावा म्हणून ही योजना केलीये, असं समजावं.
प्रतिक्रिया
27 Apr 2018 - 11:21 pm | कपिलमुनी
28 Apr 2018 - 2:23 am | साहना
आसाराम बापू विषयी मनात श्रद्धा नाही पण त्यांना ह्या प्रकरणात गोवण्यात आले आहे असे वाटते. गामा पैलवान ह्यांनी भक्त नसताना सुद्धा हा मुद्धा उचलून धरल्या बद्दल त्यांचे धन्यवाद. भारतीय कायदेव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून जज मंडळींवर हल्ली काडीचाही विश्वास ठेवणे मला तरी शक्य नाही.
आधी ५ वर्षे त्यांना विना चार्जेस तुरुंगात ठेवण्यात आले. मीडियाने त्यांना बलात्काराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न केला. जणू असे चित्र दाखवले कि आसाराम बापू मुलींना बेडरूम मध्ये बोलावून प्रेम चोप्रा प्रमाणे त्यांचे कपडे फाडून त्यांच्याशी जबरदस्तीने संभोग करतात.
पण खरे आरोप खालील प्रमाणे आहेत.
१. त्यांनी १८ वर्षे खालील मुलीशी शारीरिक संबंधांची मागणी केली. ह्यामुळे त्यांना POSCO हा भयानक कायदा लागू होतो. काहींच्या मते मुलगी प्रौढ होती हे कोर्टांत सिद्ध झाले होते तरी सुद्धा त्यांच्यावर पॉस्को लावला गेला. मी जाऊन फायनल जजमेंट वाचली नाही त्यामुळे हे कितपत खरे आहे हे ठाऊक नाही.
२. त्यांनी मुखमैथुन करण्याचा प्रयत्न केला. (म्हणजे नक्की केला कि नाही ? ह्याला आरोपीची साक्ष सोडून इतर पुरावा काय? )
ह्या दोन्ही गोष्टी सिरिअस असल्या तरी माझ्या मते बलात्कार नाहीत. संभोगाची मागणी करणे आणि मुखमैथुन करण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही गोष्टी मुळांत सिद्ध करण्यासाठी फार कठीण आहेत. इथे साक्षीदार कोण, त्यांची साक्ष कितपत विश्वासार्ह आहे इत्यादी मुद्दे चित्रांत येतात. उलट योनिसंभोगांत मुलीला तात्काळ वैद्यकीय परीक्षेसाठी नेले तर महत्वाचे पुरावे मिळू शकतात. त्याशिवाय दोन्ही गुन्हे सिद्ध झाले तरी जन्मठेप देण्याइतके गंभीर आहेत काय ?
तरी सुद्धा त्यांच्यावर बलात्काराचा चार्ज ३७६ -२F ३७६-D ठेवला गेला आहे. इतर कोणीही त्यानी योनी संभोग केल्याचा आरोप केला नाही. त्यांच्या जमीन अर्जात ह्या गोष्टीचे डिटेल मध्ये विवेचन आहे. https://indiankanoon.org/doc/150890944/
जमीन नाकारणारर्या जज च्या मते आसाराम बापू सारखे लोक संत म्हणवून लोकांच्या श्रद्धेस प्राप्त होत असल्याने कायदा त्यांना तितकाच कठोर पणे लागू केला पाहिजे. पण कठोर कायदा ह्याचा अर्थ पुरावे महत्वाचे ठरत नाहीत असा होत नाही. आसाराम किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीचे अनेक शत्रू असतात त्यामुळे त्यांच्यावरील प्रत्येक आरोपावर शत्रूचे षडयंत्र हा अँगल सुद्धा महत्वाचा ठरतो. इथे वेगवान न्याय आणि १००% खात्रीशीर पुरावे फार महत्वाचे ठरतात. मीडियाने पुरावे ह्या विषयावर १००% मौन पाळले आहे ह्यावरून मुलांत पुरावे नव्हतेच असे वाटते. आरोपीची साक्ष सोडून आणखीन काही पुरावा होता का ?
उदाहरण द्यायचे म्हणजे पूज्य मोदीजी ह्यांनी गुजरात चे मुख्यमंत्री असताना सरकारी यंत्रणा बेकायदेशीर पाने वापरून एका तरुण मुलीवर नजर ठेवली होती. एका अर्थी ह्याला सुद्धा विनयभंग म्हटले जाऊ शकते पण मोदी ह्याचे अनेक राजनैतिक शत्रू असल्याने ह्या प्रकरणाकडे षडयंत्र ह्या दृष्टिकोनातून पाहावे असेच जाणकारांचे मत होते. आणि मला ते काही अंशी मान्य सुद्धा आहे.
अश्या वेळी मला पुरीचे शंकराचार्य ह्यांच्या खालील उत्तराचे स्मरण होते.
https://www.youtube.com/watch?v=2Ix9vEi5eb0
संत परंपरेचे काही नियम आहेत. दिशाहीन सत्ताधारी आणि दिशाहीन धनिक ह्यांच्या बरोबर संधान साधून काही संत मंडळी ख्याती प्राप्त करतात पण शेवटी ह्या दोनापैकी एक त्यांचा घात करतो. कधी सत्य साई बाबा प्रमाणे एखादा सगळ्यांवर कुरघोडी सुद्धा करतो.
माझ्या मते भाजपा आणि काँग्रेस ह्या दोघांनाही हा मोती नाकात जड झाला होता म्हणून दोघांनीही त्यांना विसर्जित केले आहे.
सूचना: महिला म्हणून आपण आसाराम बापू ह्यांची बाजू घ्यायला शरम वाटत नाही का असे काही जण विचारतात. माझ्या मते जेंव्हा एका स्त्रीला प्यादे म्हणून वापरून लोक एका शक्तिशाली माणसाला इजा करू इच्छितात तेंव्हा ते लोक न्यायासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी भांडतात. इथे आसाराम बापूंच्या नुकसानीसाठी एक मुलीचा वापर केला गेला आहे. आसाराम बापू ह्यांनी जे काही केले ते एका बंद रम मध्ये झाले त्यातून ती मुलगी कदाचित सावरली असती पण आता अनेक लांडग्यांनी तिला पिंजऱ्यात ठेवून आसारामची शिकार केली आहे. ह्यातून ती मुलगी आयुष्यांत पुन्हा सावरेल असे वाटत नाही.
28 Apr 2018 - 5:39 am | आनन्दा
पूर्ण केसचा अभ्यास नाही, त्यामुळे तूर्तास पास.
परंतु पुरावे *बनवता* येतात याबाबत माझ्या मनात शंका नाही.
28 Apr 2018 - 7:56 am | माहितगार
१०० अपराधी सुटले तरी चालतील एका निरपराध्यास शिक्षा होऊ नये , तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी सुद्धा दोषी ठरवे पर्यंत त्यांना न्याय मागण्याची संधी हि न्याय्य तत्वे मान्य करुन चालू . न्यायालयाचा अलियडील निर्णय मूळातून अभ्यासण्यास उपलब्ध नाही हेही लक्षात घेऊ पण तरीही असारामांच्या बाबतीत काही बाजू निसटताहेत असे वाटते. अजो , गापै आणि साहना यांची निष्कर्ष घाई होते आहे असे प्रथम दर्शनी वाटते .
१) अजोंचा एक मुद्दा वयाच्या ७२ व्या वर्षी असे गैरवर्तन कुणी करु शकेल का ? सहसा नाही पण बील क्लिंटन , डोनाल्ड ट्रंप यांचे वागण्याची उदाहरणे पहा अशक्यही नसावे. ७२ व्या वर्षी ते मुली पेक्षा अशक्त नसावेत का ? असेच सांगता येत नही , आपल्याला मुलीची शरीर यष्टी माहित नाही पण आसाराम तसे तेव्हा अशक्त असतील असे बाह्य दर्शनी तरी वाटत नाही. अर्थात अशा गोष्टी प्रत्यक्ष न्यायदान करणार्या व्यक्तिसच बघता येतात
२) जामिन अर्ज उच्च न्यायालयात जाऊन किमान प्राथमिक विचार झाला आणि जामिन देणे टाळले गेले आणि नंतर कनिष्ठ न्यायालयाचा निकाल ही आसारामांच्या विरुद्ध गेला म्हणजे या स्टेज पर्यंतही किमान दोन न्यायमुर्तीनी केस स्वतंत्रपणे अभ्यासूनही त्यांना असारामांचे वर्तन साशंकीत वाटते आहे .
३) साहनांनी उच्च न्यायालयातील जामीन अर्ज केसचा दाखला तर दिला पण न्यायाधीशांचे म्हणणे पुर्ण लक्षात न घेता काही अंशावरच त्या भर देत आहेत असे वाटते , ते न्यायाधीशांचे पूर्ण रिप्रेझेंटेशन नाही. https://indiankanoon.org/doc/150890944/ हि साहनांनी उधृत केलेली केस मधील न्यायाधीशांचे म्हणणे पूर्ण पुन्हा वचले तर वचकांना लक्षात यावे असे वाटते.
४) या केस मध्ये असारामांच्या साहयकां पैकी एक साहायक -बहुधा माफीचा साक्षीदार - खोलीतील प्रत्यक्ष साक्षिदार नसला तरी असारामांच्या सर्वसाधारण वर्तनवर बोट ठेवतो असे वृत्तपत्रीय बातम्यांवरुन वाटले .
५) ती मुलगी, तो माफीचा साक्षीदार आणि इतरांच्या उलट तपासणी आसारामांच्या दिग्गज वकीलांनी घेतल्या असणार - त्याची माहिती प्रत्यक्ष निकलातच असू शकते - आणि तरुणीच्या न्यायालयीन जवाबाच्या वेळच्या भावना ज्या काही असतील त्या न्यायाधीशांना अनुभवास आल्या असण्याची शक्यता आहे. न्यायाधीश मंडळी वकिली शिकणे वकिली करणे आणि नंतर न्यायदान करणे या सर्व प्रक्रीयेत अनेक केसेसचा अभ्यास करत पुढे जात असतात त्यामुळे त्यांनी अगदीच वरवरचा निकाल दिला असे गृहीतक मांडून बसणे सहसा श्रेयस्कर नसते अर्थात याही पुढे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयतून या निकालाचे पुनरावलोकन यथावकाश होईलच.
६) इतर केसेस मधिल साक्षीदारांच्या अनैसर्गीक / साशंकीत मृत्यूच्या बातम्यां मुळेही शंका बळावतात , बरे यातही आसाराम विरुद्ध काही कट असेल तर बहुतेक उत्तरीय राज्यात आता भजपा राज्यसरकारे आहेत असा काही विरोधीपक्षीय कट असल्यास उघडकीस आणला जावयास हवा होता.
७) आसारामांनी नंतर भाजपाची बाजू घेतली पण त्यांची आधी काँग्रेस नेत्यांसोबत सुद्धा उठबस असण्याची प्रशस्ती पत्रे त्यांनी न्यायालयस सादर केल्याची वृत्ते आहेत चुभूदेघे त्यामुळे आसारामांना अमुकच पक्षाचा म्हणून बघणे श्रेयस्कर ठरत नसावे, आसारामांनी नंतर भाजपाची बाजू घेतली असावी, त्यांच्यावर अश्लाघ्य आरोप नसते तर आसारामाम्चा मोती भाजपास समर्थन मिळतानाही जड होईल यातर्कास आधार दिसत नाही, आता अश्ल्याघ्य आरोप असताना मोती जड झाला असेल तर
त्यातही असहाजिक असे काही असावे असे वाटत नाही
८) वृतमाध्यमात आलेला साक्षीचा भाग आणि उपरोक्त उधृत जामिन अर्ज फेटाळतानाचा न्यायाधिशांचे म्हणणे पहाता नंतर निकाल आसारामांच्या विरुद्ध गेला
असेल तर फार आश्चर्यचे वाटत नाही . तरीही उच्चन्यायालयात आणि सर्वोच्च न्यायलयात निकालाचे न्यायालयीन पुनरावलोकन होऊन जो काही न्याय असेल तो होईलच.
28 Apr 2018 - 7:59 am | माहितगार
* अर्थातच उत्तरदायीत्वास नकार लागू
28 Apr 2018 - 8:52 am | अनिरुद्ध.वैद्य
साक्षात मोदी साहेबांशीच ह्यांच्याशीच डायरेक पंगा घेतला होता.
त्यामुळं हे होणारच होतं.
28 Apr 2018 - 6:53 am | यशवंत पाटील
औघडय राव ...
28 Apr 2018 - 7:29 am | manguu@mail.com
मैत्रीण म्हणते - हा एक बनाव आहे , तिचा जबाब का नाही घेतला ?
पीडीत काय अन कुणीही काय , नुसत्या जबाबावर केस चालत नाही.
.....
मीडियाने त्यांना बलात्काराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न केला.
मेडिया कशी गोवेल ? केस मेडिया चालवते का ?
.......
गुन्हा केवळ विनयभंगाचा असतांना शासनाला यात लक्ष घालण्याची गरज काय?
हास्यास्पदच नव्हे तर निषेधार्ह वक्तव्य आहे.
28 Apr 2018 - 7:55 am | manguu@mail.com
आसारामला हिंदुत्वीय भाजपाच्या काळातच शिक्षा झाली , हे फार बरे झाले.
अन्यथा , काँग्रेस , नेहरु, सोनिया , इतर अहिंदू ... या सर्वांवर लोक तुटून पडले असते.
आता आपलेच दात अन आपलेच ओठ . बसा निवांत चावत.
28 Apr 2018 - 9:03 am | भंकस बाबा
अफझल आणि कसाबला कॉंग्रेस शासनात शिक्षा झाली है पण बरेच झाले , नाहीतर तमाम सेकुलर, मेणबत्यावाले, माओवादी माय मेल्यासारखे रडले असते , आपले मंगूसाहेब तर आपल्या शब्दरूपी तलवारीची धार पाजळत बसले असते ,
28 Apr 2018 - 9:17 am | manguu@mail.com
कसाब , अफजलला मी पाठिंबा कधीच दिला नव्हता. त्यांच्या शिक्षेवर सर्वानी समाधान व्यक्त केले होते.
अफझलच्या केसने तर भाजपाची अब्रूच घालवली. साक्षात संसदेवर हल्ला तोही भाजपाच्या काळात , अन तरीही ह्यांच्या काळात शिक्षा होऊ शकली नव्हती. बहुदा तत्कालीन पंप्र आसारामबरोबर फुगडी खेळत होते.
28 Apr 2018 - 9:38 am | श्रीगुरुजी
Calling अभ्या.. to verify authenticity of this picture.
28 Apr 2018 - 9:49 am | विशुमित
त्यानं काय होणार??
हे चित्र कदाचित खोटे असले तरी तुमचा खोटारडेपणा धुतला जाणार नाही आहे.
उरली सुरलेली ठेवा जपून. मिपा वरून हाकल्यावर कामी येईल.
28 Apr 2018 - 9:56 am | श्रीगुरुजी
कदाचित?
आणि माझा कसला खोटारडेपणा? आणि तो कोणी ठरविला?
28 Apr 2018 - 2:19 pm | यशवंत पाटील
अभ्यादादा, ते बाकी जाउंदे.
फोटुशॉप कसं वळखायचं तेच्यावर लिहा एक वेगळा धागा. माझ्यासारख्याला कायबी कळत नाही फोटु खरा की खोटा ते. लई लोकांचं असंच होत असल बघा. कसं वळखायचं ते कळलं तर जरा लोकं सबुरीन घ्यायला शिकतील.
28 Apr 2018 - 9:45 am | भंकस बाबा
अफझल मास्टरमाइंड होता, कसाब खुद्द गुन्हेगार होता, तरीही खटल्याचं दळण चालले होते, कारण करकरेच्या हत्येचे खापर फोडायचे होते ना?
सत्ता जाणार असे दिसताच घाईघाईने फ़ाश्या दिल्या ,
अफझलला नाही पण कन्हैयाच्या बाजूने तुम्ही दुःखाँचे कढ़ काढलेले आहेतच
आयडी कितीही लपवला तरी ....
28 Apr 2018 - 10:10 am | manguu@mail.com
कन्हैय्याला कोणत्या सरकारने / कोर्टाने देशद्रोही ठरवले आहे ?
28 Apr 2018 - 10:18 am | माहितगार
या बापूंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली लेखी प्रशस्तीपत्रे न्यायालयास सादर केली असावित (चुभूदेघे) ; तरीही एकतर्फी काय संबंध जोडताय ?
२६ एप्रिल म्हणजे कालचे एन डि टि व्ही वृत्त आहे Edited by Deepshikha Ghosh | Updated: April 26, 2018 07:56 IST
Behind Asaram's Multi-Crore Empire, A Roster Of Political "Friends"
Asaram owes much of his early growth to successive Gujarat governments -- both Congress and the BJP.
28 Apr 2018 - 10:35 am | माहितगार
हे सप्टेंबर ३ २०१२ चे इंडिया टुडे वृत्त आहे , इतर वेगळ्या केसचे आसारामवर आरोप असताना मोदींनी चौकशीत कोणतीही दया माया न दाखवल्याने आसाराम बापूंचा तीळपापड होऊन अद्वा तद्वा आरोप करताना ह्या वृत्तातून स्पष्ट होताना दिसते आहे.
मोदींची व्यक्ति पुजा करा असे नाही, जिथे खरेच टिका लागू पडते जरुर करावी, सोईचे चित्र दाखवणे सयुक्तीक वाटत नाही .
28 Apr 2018 - 2:32 pm | manguu@mail.com
आसाराम अडकला म्हणून मोदीना क्रेडिट ?
मग सलमान सुटल्याचे क्रेडिट कुणाला ? पतंगाला ?
28 Apr 2018 - 2:39 pm | arunjoshi123
प्रोफेशनालिझम कमी पडतोय.
28 Apr 2018 - 9:43 am | विशुमित
उलट हे चांगले आहे..
भारतीय समाजामध्ये उभी फूट पडू नये म्हणून युपीए- एनडी- तत्सम इतर राजकिय पक्षांनी देशहिताला प्राधान्य देऊन सामंजस्याने परस्पर विरोधी निर्णय / शिक्षा कराव्यात.
28 Apr 2018 - 8:23 am | चित्रगुप्त
खात्रीलायक माहिती देऊ शकणार्या व्यक्तींविषयी माहिती असूनही संपर्क होऊ शकत नाही. एवढेच सांगू शकतो की दाखल केल्या गेलेल्या आरोपांपेक्षा कैकपट जघन्य अपराध केले गेलेले आहेत.
मख्तूब मख्तूब ...
28 Apr 2018 - 2:42 pm | arunjoshi123
मग २०१८ का उजाडलं?
28 Apr 2018 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे
समजा असे जरी गृहीत धरले की आसाराम यात मिडिया सांगते तितका दोषी नाही तरी तो संत पूज्य वगैरे नाही. तसेच नोंदल्या न गेलेल्या याही पेक्षा भयंकर गोष्टी असू शकतात असे म्हणायला भरपूर जागा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनात अंधश्रद्धेचा बळी हाच अंधश्रद्धेचा वाहक असतो तसे इथे आसारामच्या अंधभक्तांचे आहे.शोषण हेच पोषण वाटत असेल तर कठीण आहे. प्रबोधन हाच धीमा पण उत्क्रांतीसारखा परिणामकारक मार्ग आहे.
आसाराम ने स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीच्या न्यायालयात स्वतःला आरोपी म्हणून पाहिले तर तोच उत्तर देउ शकतो कि दोषी किती जे आपल्याला कळनारच नाही. तो पर्यंत न्यायालय हाच मार्ग
28 Apr 2018 - 10:32 am | कंजूस
कोर्टाच्या खटल्यात नक्की काय दावा लावला आहे, काय आरोप केला आहे हे पेपरवाले /मिडियावाले सांगतात का?
फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तर केव्हापासून, वगैरे पुरावे लागतील. १) विश्वास का वाटला, २) कशाकरता तिथे जावेसे वाटत होते? ३) किती काळ गेल्यावर फसवणूक होत आहे वाटू लागले हे सर्व सिद्ध करायची जबाबदारी तक्रारदारालाच पार पाडावी लागते.
28 Apr 2018 - 10:40 am | माहितगार
न्यायालयीन निर्णयांच्या वृत्तमाध्यमातील भोंगळ अथवा फसव्या चित्रणाची समस्या या विषयावर मागे एक चर्चा धागा चर्चेत आपण सहभागी झाला होता ते आठवले.
28 Apr 2018 - 2:02 pm | जानु
मूळ तक्रारीचे भाषांतर
Under section 154 CrPC
Mr. SHO Sir,
Kamla Market Station
It is humbly requested that I am…………, studying in class 12 at Shri Asaram Ji Gurukul located at Parasiya Road, Chindhwada, Madhya Pradesh. I live with my family consisting of my father Shri……… Singh, mother ……….Singh, elder brother ………Singh and younger brother …………Singh.
One day I suddenly felt faint and a bout of vertigo. I was told by the hostel warden, Shilpi that this was because of the influence of ghosts/spirits. She also said that she would speak with Asaram Bapu about the matter. On 07.08.13, Shilpi telephoned my house and said that I was unwell and also advised the family to take me to a big city for treatment. On 08.08.13 my parents reached my Gurukul between 10-11 p.m. I had spoken to them on the phone. My parents came to the Girls Hostel on 09.08.13 to take me back. There, they spoke to Shilpi who told them that I was under the influence of ghosts and spirits and that she had told Asaram Bapuabout this. She also said that Asaram Bapuhad calle dme , and that my parents should quickly take the girl to wherever Asaram Bapu is at that time.
We reached home, Shahjahanpur, on 09.08.13 itself. My father then found out that Asaram Bapu was due to go to Delhi on 12.08.13. We reached Delhi on 13.08.13, but we came to know that Asaram Bapu had gone to Jodhpur, Rajasthan. Then Shiva, who works as an employee of Asaram Bapu told us that Bapu was in Jodhpur and that we should proceed there directly. Accordingly, on 14.08.13 we reached village Manhi located ahead of Jodhpur. When I reached there, the gate was closed and the sadhakswere standing outside. My father called Shiva who got the gate opened. When we entered, Asaram Bapu was sitting on a chair and conducting satsang. We went it and sat. A little while later, he asked us where we had come from. I replied that I was a student at the Gurukul. He replied saying that he would exorcise the ghost. Then he had me speak to my future. That night he sent a servant to call three of us to him. He showed us our hut and sent us away after giving us prasad. We stayed in the room given to us by him. The nest day, 15.08.13, he sent food for us and conducted satsang. That night, Bapu again called us to the hut and initially spoke with my parents. He told my parents to sit near the gate and pray, meditate and leave after a while.
He made me sit on a raised platform (chabutara) behind the hut and gave me a glass of milk. Once I drank the milk, he told my parents to leave. They didn’t leave immediately, but my father left eventually. My mother remained sitting. Bapu went through a door in front to his room. After a while, he switched off the light of his room, exited through his back door and called me inside. Once I went inside he made me sit beside him and started talking to me. Then he asked me to go and check what my parents were doing. I returned and told him my father had left but my mother was still sitting outside. Bapu then locked the door and began touching me inappropriately. When I started screaming, he said that he would get my parents killed and scared me into silence. Bapu kissed and touched me inappropriately all over my body. He told me to perform oral sex on him. He was not dressed and he started undressing me forcefully. When I started crying and shouting, he clamped my mouth shut. He molested me for about an hour – hour and half. Two or three of his servants were present outside the room we were in. When I managed to leave the room, Bapu again threatened me, and told me not to speak about the incident to anyone. Then I returned with my mother to the room where we were staying in.
On 16.08.13, Bapu left for Delhi. Before leaving he told my father that he should send me to Ahmedabad, Gujarat. There she will perform 7-8 rituals and then I will send her back to Chindhwada. However, after the incident that happened with me, I did not go there and after reaching home, I told my parents all the details of the incident so that investigation is conducted against Asaram Bapu, Shilpi Warden and Shiva.
28 Apr 2018 - 2:09 pm | जानु
वरील तक्रारीतील शिवा निर्दोष सुटला आहे. कारण तो ज्या रात्री घटना घडली त्या रात्री ८ वाजेच्या मंडोर एक्सप्रेस ने दिल्ली निघुन गेला, आणि रेल्वे चार्ट नुसार, साक्षी नुसार ते कोर्टाने मान्य केले आहे.
राहता प्रश्न मिडीयाचा, मिडीयाने कधीही फक्त छेड आणि अयोग्य स्पर्श याबाबत आरोप आहेत हे जनतेला सांगितले नाही. सतत बलात्कार हाच शब्द वापरला. हे चूकच आहे.
28 Apr 2018 - 3:15 pm | माहितगार
साहनांनी वर जो इंडीयन कानून डॉट ऑर्गचा दुवा दिला आहे त्यात उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशांनी कोणत्या कायद्याचे कोणते कलम लागू होण्याची शक्यता आहे त्याची वाच्यता केली आहे त्या पेक्षा ट्रायल कोर्टने बहुधा तेच कलम लावले असण्याची शक्यता वाटते, बाकी प्रश्न उरतो तो उलटतपासणीचा जी उलट तपासणी सोशल मिडीयावर्र होऊ शकत नाही त्यामुळे मिपाच्या माध्यमातून ट्रायल बाय सोशल मिडीया करणे प्रशस्त वाटत नाही. आसाराम साठी भारतातले सर्वोत्कृष्ट वकील आणि त्यासाठी लागणारा पैसा आहे त्यामुळे आसारामाची बाजू या मुमेंटला सोशल मिडियात घेण्यात काहीच पॉइंट नाही. सर्वोच्च न्यायालयातून सुटलेच महाशय तर समर्थकांना आपणच कसे बरोबर होतो हे सांगण्याचा मौका आहेच पण तो पर्यंत कोळसा उगाळणे जेवढे टाळले तेवढे बरे असे वाटते.
28 Apr 2018 - 2:24 pm | श्रीगुरुजी
आसाराम, नित्यानंद, रामरहीम, नरेंद्र इ. बुवा, बापू, महाराजांनी हिंदू धर्माला लाज आणली आहे. माझी एक साधी कसोटी आहे. जो बुवा, बापू, महाराज मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा करतो, मोठ्या प्रमाणात जमीनजुमला जमा करतो, अनेक आश्रम उभारतो, सतत शिष्यशिष्यिणींच्या घोळक्यात असतो, महागड्या गाड्यातून हिंडतो, ज्याला कायम सुरक्षारक्षक जवळ लागतात . . . असा बुवा, बापू, महाराज ढोंगी असतो.
28 Apr 2018 - 2:30 pm | साहना
नित्यानंद महाराजांना ह्यांच कॅटेगोरीत टाकणे थोडे चुकीचे वाटते कारण कोर्टांत त्यांची टेप खोटी होती हे सिद्ध तर झालेच पण त्याशिवाय टेप खरी असली तरी नित्यानंद ह्यांनी कुणावर जोर जबरदस्ती केली नव्हती. राजकीय वातावरणात सुद्धा त्यांचा सहभाग जवळ जवळ शून्य आहे.
28 Apr 2018 - 3:18 pm | माहितगार
सर्वच धर्मांच्या धार्मीक गुरुंना स्ट्रीक्ट कोड ऑफ कंडक्ट घालून दिला गेला पाहिजे असे वाटते.
28 Apr 2018 - 3:28 pm | श्रीगुरुजी
तसे करणे घटनाबाह्य ठरेल. त्याऐवजी भक्तांनीच एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीच्या जीवनाचे निरीक्षण करून ती व्यक्ती खरोखरच आध्यात्मिक आहे का हे ठरवावे. मी वर काही कसोट्या सांगितल्या आहेत. निदान माझ्यापुरत्या तरी मी त्या कसोट्या लावतो. इतर व्यक्ती आपापल्या अनुभवानुसार आध्यात्मिक व्यक्तींना पारखू शकतील. सर्वसाधारणपणे सत्ता, संपत्ती, स्त्रिया, जाहिरातबाजी इ. च्या विळख्यात अडकलेली आध्यात्मिक व्यक्ती भोंदू असते हे माझे निरीक्षण आहे.
खर्या आध्यात्मिक व्यक्ती फकिरी वृत्तीने राहतात. त्यांना संपत्ती, स्त्रिया, सत्ता इ. चा मोह नसतो व ते त्या वाटेलाही जात नाहीत. आपल्याकडे मार्गदर्शनासाठी येणार्यांना परमार्थ मार्गावर जायचे अगदी सोपे मार्ग ते सांगतात व त्यासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत. स्वतःची कोणतीही जाहिरात ते करीत नाहीत.
28 Apr 2018 - 4:20 pm | माहितगार
;)
.
१) हे इतके सोपे असते तर असे फसवणूकीचे प्रसंग आलेच नसते .
२) गरीब आणि व्यस्त लोकांकडे अशी निरीक्षणे करण्याकरता ना वेळ असतो ना संधी असते , त्या क्षणी ते इतरांप्रमाणे बढाई प्रभावा (हाईप इंपॅक्ट ) खाली असतात.
28 Apr 2018 - 3:43 pm | manguu@mail.com
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘माझा तुरुंगवास तात्पुरता आहे. अच्छे दिन नक्की येतील’, असे आसाराम बापूने या क्लिपमध्ये म्हटले आहे. या क्लिपची दखल जोधपूर कारागृह प्रशासनानेही घेतली आहे.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या आसाराम बापू जोधपूरमधील कारागृहात आहे. आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या दोन दिवसानंतरची ही ऑडिओ क्लिप आहे. १५ मिनिटांच्या या क्लिपमध्ये आसारामने भक्तांचे आभार मानले आहे. निकालाच्या दिवशी शांतता कायम राखल्याबद्दल तसेच जोधपूर न्यायालयाच्या आवारात गर्दी न केल्याबद्दल त्याने समर्थकांचे आभार मानले. आपण सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. काही लोकांनी मला आणि आश्रमाला बदनाम करुन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कट रचला. आश्रमाच्या लेटरहेडवर येणाऱ्या पत्रकांवर विश्वास ठेवू नका, असे आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतो.
28 Apr 2018 - 4:24 pm | माहितगार
खरी असणे हा वेगळा प्रश्न , पण खरी असणे ही ग्रेट नाही, नातेवाईक अथवा वकीलांना असलेल्या ऑफीशीअल भेटीच्या परवानगीच्या दरम्यान , कोणत्याही मोबाईल किंवा छुप्या डिव्हाईसने सहज रेकॉर्ड करता येणारी गोष्ट आहे.
28 Apr 2018 - 5:34 pm | भंकस बाबा
काल आसारामने पावटे खाल्ले, आज सकाळी तो पादत होता, हा एक मोठा कट आहे तुरुंगातून पलायन करण्याचा, अस काहीतरी स्फोटक येऊ दे
30 Apr 2018 - 9:17 pm | तुडतुडी
संत कोणाला म्हणावे? केवळ लोकांची श्रध्दा आहे म्हणून कोणी संत ठरतं का? मूर्खांच्या या बाजारात श्रध्दा कोणावर ठेवावी हे मूर्ख अज्ञानी लोकांना समजत नाही. तो जर खरा संत असता तर असे काही झालेच नसते. काल लोकमत मध्ये लेख वाचला . त्यात त्याच्या सेक्रेटरी चा जबाब नोंदवलाय. त्यात तो मुलींना कसा सिलेक्ट करायचा , त्याचे चेले स्त्रियांना कसे फसवून जबरदस्ती ने न्यायचे हे त्याने सांगितलाय . त्याला जाब विचारल्यावर तो म्हणला , ब्रम्हज्ञानी व्यक्तीला या कर्माचं पाप लागत नाही. तेव्हा सेक्रेटरी ने विचारले , ब्रम्हज्ञानी च्या मनात अश्या वासना निर्माण होणे कसे शक्य आहे ? तेव्हा त्याला तिथून हाकलून लावण्यात आलं
1 May 2018 - 4:54 pm | Topi
भारतीय धार्मिक परंपरेत ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास असे विविध आश्रम आहेत आसाराम बापूं नेमक्या कोणत्या आश्रम स्थितीत आहेत जर ते संन्यासाश्रमाचा असतील तर त्यांनी स्त्रियांशी संभाषण निकट सान्निध्य टाळायला हवे होते
बंद खोलीमध्ये मंत्रप्रयोग करण्यासाठी बोलवले त्यामुळे विरोधकांना आक्षेप घेण्यास वाव मिळाला
1 May 2018 - 10:38 pm | arunjoshi123
२००८ च्या आसपास आसाराम जेव्हा "सोनिया भारत छोडो" म्हणाला तेव्हाच निश्चित झालं होतं कि तो २०१३ मध्ये बलात्कार करणार आहे.
====================
संसारी संताला ७२ व्या वर्षी रेप करावा लागावा हे नवलच. त्यापेक्षा तरुण असताना सगळं कसं सुरळित होतं.
1 May 2018 - 11:49 pm | माहितगार
मला वाटत ह्यात काँग्रेस शैली बद्दल माहिती पेक्षा काँग्रेस बद्दलचा राग आहे. काँग्रेस पाताळयंत्री आहे पण ती बनावांवर नव्हे वीकपॉईंट्सवर काम करते. म्हणजे वीक पॉईंट आधीच हेरुन माहित करुन ठेवलेले असतात आणि ते योग्य वेळी वापरले जातात. काँग्रेस पाताळ यंत्री आहे म्हणताना आसारामात वीक पॉईंट नसेलच हे म्हणणे अवघड जाते . असो