माझ्या कडे असलेला गावां च्या नावांचा डाटाबेस देवी नावांसाठी चाळत असताना
नंदुरबार जिल्ह्यातील तर टवळाई (जि नंदुरबार महाराष्ट्र ) नावाच्या गावाने गमंत म्हणून लक्ष गेले (आपल्या मिपाकर टका काकांची आठवण नसती झाली नवल होते , टका काका हा. घ्या ) . पण अगदी वेगळ्या अनपेक्षित शब्दामागे आई देवी शब्द मिळू शकतात म्हणूनच खरेतर डाटाबेस बघत होतो . टवळाई अजून कुठे सापडतात पाहण्यासाठी पिनकोड डाटा घेतले तर एकदम दूर मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मिळाले .
टवळी नावाची आणखी जराशी गावे असावीत पण देवता म्हणून येतात का याची खात्री दुजोरा मिळाल्या शिवाय करणे संभव नाही . ( तवली इंग्लिश स्पेल्लिंग बऱ्याच गावांच् नावांच्या प्रत्यायात येते पण त्याचीही खात्री करणे संभव नाही )
शब्दार्थ शोधण्यासाठी ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग वरील दाते कर्वे कोशाचा आणि आंजावर उपलब्ध मोल्सवर्थ शब्द कोशाचा आधार घेतला .
दाते कर्वे कोशानुसार टवळं - न . म्हणजे समई , दिवा किंवा पळीचें तोंड , चाडें ( यांत तेल व वात असते ). हृदयटवळा दीपकु । - मुआदि २६ . २१६ . तुतारीचा टोंकाचा भाग ; चुनाळयाचा , तपकिरीच्या डबीचा , डब्याचा अर्धा भाग ; दुहेरी शिंपीचें
अर्ध ; वाटीच्या आकाराचें भांडयाचें अर्ध ; गोफणींत दगड ठेवावयाची जागा .
टवळी नारळाच्या करवंटीचा काढलेला तुकडा , ढलपी . २ ओलाण दिव्यामध्यें ज्या खोलगट तबकडींत तेलबात घालतात ती ; पितळी पंती . ३ डोक्याचा पुढचा भाग ; कपाळ . ४ ( बायकी टवाळ स्त्री ) एक प्रकारचा शिवीचा शब्द . ५ जोंधळा किंवा ऊंस यांतील एक प्रकारचें बांडगूळ . [ का . टवळी ]
तर एकूण मूळ शब्दात नकारात्मक काही नाही पण टवळी शब्दात एकदम अर्थ बदलतो दाते कर्वे कोश टवळी अमावस्या अवंस - स्त्री . १ आषाढी अमावास्या ; या दिवशीं टवळयांची म्हणजे दिव्यांची पूजा करितात . २ अभद्र किंवा अपशकुनी स्त्री असा एकदम ३६० अंशात बदलेला वेगळा अर्थ देते . एकूण आपल्या देशात विघ्नकर्त्या शक्तींनी विघ्ने आणू नयेत म्हणून त्यांचेही पूजन होत असे त्यातीलच एक कथित शक्ती राहिली असण्याची शक्यता दिसते.
तवा, तवली , (तवक) तबक हे शब्द सपाट स्वरूपाच्या भांड्यांसाठी परिचित आहेत , तवकणे , ताव खाणे हि क्रियापदे संतप्त होणे कोप पावण्याच्या जवळच्या अर्थाने येताना दिसतात . समई , दिवा यांचे वात समोर येणारा मुखासारखा भाग शिवाय तवा या तप्त होणाऱ्या गोष्टी त्यामुळे टवळी म्हणजे कोप पावणारी स्त्री शक्ती असे झाले असेल का ? (टवळीतील टव शब्दाचा प्रवास ठाव , थांग याच्याशी समांतर असण्याची शक्यता असू शकेल का ? पण मग तसे असेल तर कोप शब्दार्थाशी संबंध कमी होण्याची शक्यता निर्माण होते) पण केवळ कोप पावण्याच्या वैशिष्ट्यावरून अभद्रता अथवा शिवी इथं पर्यंत शब्दार्थाची मजल जाणे सहसा कठीण वाटते . टवाळ हा शब्द सहसा उठवळ या अर्थाने येत असावा .
सटवी हे सुद्धा देवीचे नाव आहे . मी आता पर्यन्त सतावणे या शब्दावरून सटवी शब्द येत असेल असे गृहीत धरता होतो आणि कदाचित तसेच असेलही पण टवळी शब्दातील टव नंतरचा ळ गाळून पडला आणि अनेक शब्दाची सकारात्मक बाजू दाखवण्यासाठी स हा उपसर्ग येतो तसे सटवी शब्दा बद्दल झाले नसेल ना अशी शंका येऊन गेली . अर्थात हे पूर्ण चूकही असू शकते (चभूदेघे) खासकरुन मुल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी मुलाचा मृत्यू होऊ नये म्हणून वेगळ्या कारणासाठी सटवीची पुजा केली जाते असे दिसते. सट शब्दाचा संबध शष्टी तिथीशी लावला गेल्याचे दिसते .
** टवरा, टवरी, टवरकी , टवरचाळ हे टवळी आणि टवळा शी उच्चार साधर्म्य असलेले शब्द मोल्सवर्ध आणि दाते कर्वे दोन्ही शब्द कोशात जवळपास एकसारख्या अर्थाने दिसतात. टवरा : पु. ( कों . ) टंवका ; उडालेला तुकडा ; विशेषत : तोडलेला , फाडलेला इ० भाग .; टवरकी स्त्रीपु . उनाडटप्पूपणा ; बदफैली ; भटकेपणा ; टवाळकी . टवरी - वि . भटक्या ; उनाड ; विषयी ; बदफैली ; उनाडटप्पू
** मोल्सवर्ह शब्द कोशातील टेव , आणि टिवळी हि उच्चारणान्चे शब्द काहीसे जवळचे वाटतात
* * तवलीन - या थब्दाचा पंजाबीतील अर्थ भक्तीत लीन असा असावा. संबंध असेल असे नाही पण आंजावर दिसले म्हणून नोंदवून ठेवत आहे एवढेच
** वीणकर राहिलेल्या साळी समाजात टवळ हे आडनाव दिसते - बहुधा व्यवसाय निष्ठ काही अर्थ असेल त्यामुळे उपरोल्लेखीत चर्चाविषयाशी संबंधाची शक्यता कमी वाटते.
** तव हि अक्षरे असलेला ताविषी हा शब्द ऋग्वेदात बहुधा त्वेष सारख्याच अर्थाने येत असावा. तावीज शब्द मार्गे अरेबीकउफार्सी करत उर्दूत आलेला . यांचा संबंध असण्याची शक्यता कमी असली तरी नोंद घेणे हा लेखाचा उद्देश्य आहे म्हणुन नोंदवले
* आधी सांस्कृतीकरणाच्या रेट्यात आणि आता आधुनिकीकरणाच्या रेट्यात महाराष्ट्री संस्कृतीतील विस्मरणात जात असलेल्या काही लोक देवतां बद्दलची आधीची एक चर्चा धागा दुवा राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे हा धागा लेख सर्वसाधारण चर्चेसाठी काढला होता यात हिंग्लजा देवी आणि संबंधीत स्थलनामांबद्दल चर्चा आहे.
प्रतिक्रिया
22 Apr 2018 - 2:23 pm | गवि
दाजीपूरच्या जंगलात उगवाईचं मंदिर आहे.
तसंच कोरकू भागात माकडी दंतेश्वरी हे नाव प्रसिद्ध आहे.
22 Apr 2018 - 3:42 pm | manguu@mail.com
छान
22 Apr 2018 - 3:48 pm | कपिलमुनी
टका आजोबांना आज तरुण झाल्यासारखे वाटले असेल
22 Apr 2018 - 4:51 pm | मनिम्याऊ
वर्धा येथील एका गावात 'गाढव -भुकी' माता मंदिर आहे
22 Apr 2018 - 6:48 pm | माहितगार
__/\__
22 Apr 2018 - 5:59 pm | कंजूस
सोमजाई,वाघजाई या माणगाव महाड भागांत. सितलादेवी -पालघर ते अष्टागर (अलिबाग परिसर) भागांत.
22 Apr 2018 - 6:32 pm | माहितगार
सितला /शीतला देवी भारतभर असावी साथीन्चे आजार कमी झाले तसे प्रस्थही कमी झाले.
सोमजाई शब्द कसा प्रचलीत झाला असेल ?
22 Apr 2018 - 9:36 pm | पैसा
केळ्ये गावात नवलाई पावलाई वाघजाई अशा तीन देव्यांची पालखी असते. भालावली इथे जाकादेवी आणि नवलाई आहेत. पैकी जकादेवीच्या डोक्यावर माडीचे थेंब पडले म्हणून ती वेगळ्या पालखीत असते. आगवे गावातही नवलाई आहे. जाकादेवी/जाखमाता सुद्धा सगळीकडे असतात.
22 Apr 2018 - 8:26 pm | चौकटराजा
आमच्या पिन्ची मधे काही रिक्षावर तसेच टेम्पोवर " येडेश्वरी " प्रसन्न असे लिहिलेले पाहिलेले आहे.
22 Apr 2018 - 8:33 pm | माहितगार
उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळ्याच्या येडेश्वरी / येडाईचे प्रस्थ बर्या पैकी असावे . संदर्भ वृत्त .
पिसाई नावाची सुद्धागावे महाराष्ट्रात दिसतात (डाटाबेसमध्ये तरी)
22 Apr 2018 - 8:55 pm | अभ्या..
येरमाळ्याच्या येडाईदेवीचे खूप आधीपासून प्रस्थ आहे. येडाई ही तुळजाभवानीची बहीण असल्याची कथा ऐकल्याचे स्मरते. येथील यात्रेसमयी (चैत्री पौर्णिमा) सबंध डोंगर आदल्या दिवशी चुनखडीच्या दगडानी भरुन जातो. मग तेच खडे वेचुन घाण्यात टाकून चुन्याने मंदीर रंगवले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातले रामलिंग ह्या देवस्थानाजवळ येडशी नामक एक गावही आहे.
22 Apr 2018 - 9:24 pm | पैसा
बाळाच्या जन्माच्या नंतर षष्ठी पूजन करत. ती महालक्ष्मीची बहीण मानली आहे. बाल घातिनी. तिने बाळाला त्रास देऊ नये म्हणून पूजा सुरू झाली. गणपती विघ्न विनायक होता तो विघ्नहर्ता झाला तसेच.
साती आसरा, मातृका आणि सटवाई या सगळ्या मुळात एकच.
https://mr.m.wikisource.org/wiki/शिळासप्तमीची_कहाणी ही शितळा सप्तमीची कहाणी बघ.
23 Apr 2018 - 9:09 pm | माहितगार
काही अंधश्रद्धा अवघडच होत्या.
****
सटवीची कथा आहेच , प्राचीन गोष्टींबद्दल जेव्हा आधार मर्यादीत असतात तेव्हा अनेक शक्यता तपासलेल्या बर्या पडतात -अनेक कथा मूळ कारण माहित नसताना जोडल्या गेल्या असाव्यात. मोल्सवर्थ शब्द कोश सटवी देवतेचा दुर्गेशी सुद्धा संबंध जोडताना दिसते पण ते तेवढे पटले नाही.
एवढेच दिवा विझणे आणि आयुष्य संपणे असा काही संबंध टवळी व्या बाबत संबंध लावून अमवश्येची पुजा वगैरे अंधश्रद्धा जोडली गेली असेल. बाकी जाता जाता रोचक महाराष्ट्र गावांच्या डाटा बेस मध्ये सटवी सटवाई नावाचे गाव मिळाले नाही पण ' सट्वा' नावाचे गव मात्र मिळाले . :)
23 Apr 2018 - 9:15 pm | माहितगार
सॉरी खालील नावाची गावे आहेत असे दिसते
सट्वा
सटेवाडी
सटेगाव
सटालेवाडी (एन.वी.)
सटाना
सटाणे
सटाणा
सटाणा
सटाघरी
सटवाईवाडी
सटलवाडी
23 Apr 2018 - 9:19 pm | माहितगार
यातले एक फक्त नंदुरबार बाकी सगळी विदर्भात दिसताहेत. तेलंगाणा आणि छत्तीसगढ तपासले पाहीजे.
23 Apr 2018 - 9:54 pm | माहितगार
कोल्हापूर जिल्ह्यात एखाद दोन गावे असावित
23 Apr 2018 - 10:08 pm | माहितगार
सटवाया नावाची गावे ओरीसात दिसताहेत त्या शिवाय मध्यप्रदेश आणि उ.प्र. मधील ग्रामनामान्ची खात्री करणे शक्य नसले तरी सट असलेल्या गावान्ची नावे उप्र बर्यापैकी असावीत असे वाटते.
22 Apr 2018 - 9:32 pm | जेम्स वांड
आमची प्रोजेक्ट मॅनेजर सटवी असून आमची एचआर हेड टवळी आहे.
इति जीवनचित्रण सफळ संपूर्ण