समजा तुम्ही यनांसारखे नास्तिक धर्माचार्य किंवा प्राडाँसारखे नास्तिक गुरु किंवा कुणातरी नास्तिक गुरुचे नुसतेच अबकड नास्तिक शिष्य आहात किंवा गुरु शिवाय नास्तिक आहात . समजा एका तुरुंगात काही अस्तीक कैदी आहेत जे त्यांना मिळणार्या विवीध धर्माच्या उपदेशकांचे सुसंस्काराचे उपदेश जेलच्या बाहेर पडल्यावर विसरुन पुन्हा पुन्हा जेलच्या वार्या करतात . आता एका चांगल्या जेलर महोदयांना नास्तिक चळव्ळीबद्दल सकारात्मक माहिती मिळाल्याने आणि आस्तीक उपदेशकान्चा प्रभाव जाणवत नसल्याने , यनांसारखे नास्तिक धर्माचार्य किंवा प्राडाँसारखे नास्तिक गुरु किंवा तुमच्या सारख्या अबकड नास्तिकास नास्तिक असूनही मुल्ये चांगली ठेऊन जगता म्हणून, कैद्यांस्मोर एक आदर्श घालून देण्यासाठी बोलवतात.
तुम्ही कैद्यांना मुल्य आणि सुसंस्काराचा पाठ / आदर्श कश्या पद्धतीने द्याल की त्यांना कैदेतून बाहेर आल्यावर पुन्हा गुन्हे करण्यास उद्युक्त व्हावे वाटणार नाही ?
* हा प्रश्न नास्तिकांना हे जमणार नाही समजून विचारलेला नाही तर जमेल अशा विश्वासानेच विचारला आहे .
१) नाही हे आस्तीक धर्मोपदेशकांचाच प्रांत आहे म्हणून सोडून द्याल ?
२) नाही हे मानसशास्त्र तज्ञांचे काम आहे म्हणून सोडून द्याल ?
३) कि असे आव्हान समोर आले तर पेलाल ? समजा पेलू शकता असे वाटले तर कसे पेलाल म्हणजे कैद्यांना मुल्य आणि संस्कारांचा किंवा इतर जो काही तुम्हाला योग्य वाटतो तो उपदेश नेमका कसा कराल ? म्हणजे जेलर महोदयांचे कैदी चान्गल्या मार्गाला लागणे हे उद्दीष्ट सफल होईल.
* ( नास्तिकांना कोणत्याही जेल व्हिजीटचे खरोखरचे आमंत्रण नाही , केवळ समजा समजून चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यामुळे दुसरी कडे जाण्यास वेळ नाही हे कारण चर्चेत सहभागी न होण्यास नास्तिकांसाठी पुरेसे नाही,
* किंवा हे काम करण्यात आस्तीक का कमी पडतात अथवा अंधश्रध्देमुळे होणारे गुन्हे हेही या चर्चेतून टाळणे अपेक्षीत आहे . चर्चेचा ओघ कैद्यांच्या मुल्य / संस्कार संवर्धनात नास्तिक म्हणून तुम्ही किंवा तुमच्यासारखे नास्तिक योगदान नेमक्या कोण कोणत्या पद्धतीने करु शकतात हे जाणून घेणे आहे. )
* हि धागा लेख चर्चा जेल मधील आस्तीक अथवा नास्तीकांची संख्या किती असते या वादासाठी काढलेली नाही , आस्तीक आहेत हे ह्या उदाहरणापुरते गृहीत धरले आहे .
* मुख्य उत्तरांची मिपावरील जाणकार नास्तिकांकडून अपेक्षा आहे. आणि मिपाकर आस्तीकांनी संबंधीत शंका विचारल्यास आपल्या परीने शंका समाधानात सहभागी होणे सुद्धा.
* आस्तीकांनी मुख्य उत्तरे देण्ञाचे टाळून नास्तिकांचे प्रतिसादातील कोणता भाग तुम्हाला पटतो आणि कोणता पटत नाही याची चिकित्सा जरुर करावी.
* अपेक्षा व्यक्तिलक्ष्य तर्कदोष टाळून मुद्द्यांवर तर्कसुसंगत व्हावी अशी अपेक्षा आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
आस्तीक-नास्तिकपाव जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
प्रतिक्रिया
11 Apr 2018 - 3:20 pm | पगला गजोधर
दो आंखे और दोइचं हाथ ....
प्रथम आज महात्मा फुले जयंती निमित्त त्यांना अभिवादन,
व माहितीगार सरांना धन्यवाद की त्यांनी या मुहूर्तावर, असे जनकल्याणकारी विषय (जरी काल्पनिक प्रमेयाधारीत असला तरीही) चर्चेस घेतला.
असो,
आपल्यावरून जग ओळखावे, त्यांच्याशी वर्तावे सत्य तेच ||
असे म्हणून मी विविध प्रतिसाद वाचण्यासाठी उत्सुक आहे हे नम्रपणे म्हणतो.
11 Apr 2018 - 7:31 pm | प्रसाद गोडबोले
मी काय म्हणतो कि केवळ प्रयोग म्हणुन काही दिवस आस्तिकनास्तिकपाव बंद करुयात का ? कि पाणी निवळुच द्यायचे नाही , गढुळच ठेवायचे असा अजेंडा आहे?
आस्तिकनास्तिक वगळता इतर किती तरी टॉपिक्स आहेत !? उदाहरणार्थ...
१) मार्क झकरबर्ग ची उलट तपासणी , सोशलमिडीया रेग्युलेशन्स
२) कर्नाटक निवडणुका अंदाज आणि २०१९ ची तअंदाज
३) मी अमेरिकेत होतो तेव्हा...
४) अमृतानुभव मधील माऊलींनी केलेले रसाळ विवेचन आणि बामणाचे कसब
५) पुण्यात गांजाच्या मागणीत वाढ गांजा लिगलाईझ/ डिक्रिमिनलाईझ करावा का ?
६) युटुबवरील अफलातुन मराठी वेब सीरीज
७) ट्रम्प तात्या ने सुरु केलेले ट्रेड वॉर
८) उन्हाळी भटकंती
९) पौडची दिपक मिसळ
१०) मिपावरचे जुने भारी लेख वर काढणे
११) आंब्या सिझन निमित्ताने परत एकदा सुकांता कट्टा
१२) गाडी कोणती घ्यावी : रॉयल इन्फिल्ड की डॉमिनॉर
वगैरे वगैरे ...
11 Apr 2018 - 7:37 pm | पुंबा
++११
सारखे सारखे तेच विषय चघळून, त्याच त्याच अवली खेळाडूंनी शिमगा करायचा हे काही बरं नाही..
विविध विषय चर्चेला यायला हवेत..
11 Apr 2018 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
सहमत. बहुसंख्य मिपाकरांना आस्तिक-नास्तिकिचं अजिर्ण झाले आहे, असा अंदाज आहे. काही काळ गेल्यावर हे मुद्दे चर्चेला आले तर जास्त समतोल आणि उपयोगी विचार पुढे येतील असे वाटते.
11 Apr 2018 - 9:09 pm | पुंबा
गांजावर धागा काढला आहे. तिथे अवश्य चर्चा व्हावी.
12 Apr 2018 - 9:22 am | अनिरुद्ध.वैद्य
वर आमचे मत:
जर आपण एन्फील्डचे कल्ट फॉलोअर नसाल, तर नक्कीच डॉमीनर घ्या.
तरीही शेवटी,
When your drive a car, your body travels.
When you ride a motorcycle, your soul travels.
तेव्हा, जो बाईक दिलसे अच्छी लगी, वोही लिजीएगा!
12 Apr 2018 - 4:26 pm | माहितगार
धारयति इति धर्मः हि मर्यादीत व्याख्या घेतली तर आस्तीक आणि नास्तिक यांच्या एकमेकांबद्दलच्या वादा पेक्षा नास्तिक राहून समाज धारणेसाठी सकारात्म्क योगदान ह्या विषयाचे महत्व अधिक असावयास हवे किंवा कसे . याच दृष्टीने हा आणि याच्या आधीचा एक धागा नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ? काढला अर्थात नास्तिकांनी येथे केलेल्या मांडणीची चिकित्सा करुनये असे नव्हे पण नास्तिक जेव्हा समाजचा घटक आहेत तेव्हा त्यांना त्यांच्या परीने समाज बांधणीत रचनात्मक योगदान देण्याची संधी असावयास हरकत नाही.
त्यामुळे आधी किती चर्चा झाल्या त्या पेक्षा 'धारयति इति धर्मः ' साठी काय काय झाले काय काय राहीले हे म्हत्वाचे समजून धागा काढला आहे.
12 Apr 2018 - 4:57 pm | arunjoshi123
माहितगार,
तुम्ही हा धागा फार मस्त पद्धतीनं काढला आहे. यात तुमचा काही बायस दिसत नाही. आणि तुम्ही नास्तिक मंडळीस फुकटचा पुरोगामीत्वाचा शिमगा करण्याऐवजी प्रत्यक्ष एक फ्रेमवर्क द्यायला सांगीतलं आहे. अर्थातच असला काही प्रकार त्यांचेकडे नसतोच, म्हणून असले धागे अति झाल्याचं म्हटलं जात आहे. एखाद्या विषयावरचे धागे अति झालेत, रटाळ झालेल असं शीर्षक वाचणारांस, १-२ पॉपकॉर्नवाद्यांस वाटू शकते. पण इथे दिलेले काम टिपिकल नास्तिकी प्रचाराचे नाही, विवादाचे नाही. एक सिरियस काम आहे.
अर्थातच कोणाला काही उत्तर सुचलेलं दिसत नाही. अंतरा आनंद यांनी एक प्रामाणिक प्रतिसाद लिहिला पण त्यात नास्तिकी काही नव्हतं. हे सगळं अस्तिक माणसानंही केलं असतं. शेवटी त्यांनी असा विचित्र युक्तिवाद करत कि अस्तिक नास्तिक महत्त्वाचं नसून कैदी सुधरणे महत्त्वाचं आहे काही अस्तिकी प्रथांचाच सहारा घेतला. अरे चाल्लंय काय? आपण अॅक्च्यूअली जेलमधे थोडीच काही सत्कार्य करतोय? तिथे आपण आस्तिक नास्तिक बाजूला ठेऊ. या धाग्यावर विशुद्ध नास्तिकी उपाय सांगणं अभिप्रेत आहे.
==========================
मी जे नेहमी म्हणतो कि नास्तिक महान मूल्ये पाळतात मूख्य कारण धर्माचा शेजार आहे...त्याचा प्रत्यय या धाग्यावर येईल. एका प्रतिसादात तरी आलाच आहे.
11 Apr 2018 - 8:39 pm | shashu
विविध विषय चर्चीले गेलेच पाहिजेत. पण त्यातून काहीतरी निष्पन्न ही व्ह्यायला हवे.
क्षमस्व. जरा स्पष्ट बोलत आहे.
जसे की या धाग्यामधे काही विशेष हाती गावेल असे वाटत नाही. कारण मिपा वर कोणी आजीमाजी कैदी आहे असे ऐकिवात नाही (असल्यास क्षमस्व). तसेच कोणालाही प्रत्यक्ष जीवनात खरिखुरी अशी समुपदेशनाची संधि मिळेल असेही वाटत नाही.( फार म्हणजे फारच क्वचित असे होत असावे). निव्वळ मनोरंजनासाठी असे (हाच असे म्हटले नाही मी) धागे असल्यास तसे नमूद केल्यास उत्तम.
11 Apr 2018 - 9:11 pm | पगला गजोधर
मनोरंजनासाठी नव्हे,
तर हायपोथॅसिस टेस्टिंग साठी कधी कधी काही प्रमेये ठरवुन चर्चा करण्याचा महितीगार यांचा मानस असावा असा माझा कयास आहे.
11 Apr 2018 - 10:41 pm | माहितगार
लबरोबर आहे. आस्तीकांना हा विषय नको असेल पण बाकी नास्तीक कुठे आहेत ?
11 Apr 2018 - 10:42 pm | माहितगार
* बरोबर
11 Apr 2018 - 11:03 pm | पगला गजोधर
'दो आंखें बारह हाथ'
साबित करती है कि चाहे क़ैदी हो या जल्लाद- हैं तो सब इंसान ही । तमाम बातों के बावजूद हम सबके भीतर एक कोमल-हृदय है । हमारे भीतर जज़्बात की नर्मी है । हमारे भीतर आंसू हैं, मुस्कानें हैं । हमारे भीतर अपराध बोध है । प्यार की चाहत है ।
इस फिल्म का सबसे बड़ा संदेश है नैतिकता का संदेश । भारतीय मानस में नैतिकता की गहरी पैठ है । वही हमारे बर्ताव पर 'वॉचफुल आई' रखती है । हमें भटकने से बचाती है । अगर हमसे कोई ग़लत क़दम उठ जाता है तो हम अपराध-बोध के तले दब जाते हैं । इस फिल्म में जेलर आदिनाथ अपने क़ैदियों को इसी ताक़त के सहारे सुधारता है, उनके भीतर की नैतिकता को जगाता है । यही नैतिकता उन्हें फरार नहीं होने देती । इसी नैतिक बल के सहारे वो कड़ी मेहनत करके शानदार फसल हासिल करते हैं ।
"दोन डोळे " कोणाचे तर जेलरचे......
12 Apr 2018 - 4:48 pm | माहितगार
जगात सर्वकाळी सर्व गुन्हेगार तुरुंगात असतात का ? अथवा दंडीत होऊन सुधारल्या नंतरच समाजात पोहोचतात का ? उलटपक्षी असंख्य गोष्टींसाठी कायदे नसतात जसे की शेअर्सच्या इंटर्नल ट्रेडींग होऊ नये म्हणून कायदे आहेत पण स्थावर मालमत्तेच्या बाबतीत इंटर्नल ट्रेडींग होऊ नये म्हणून कायदाच नाही . महाराष्ट्रातील विवीध पक्षीय राजकारणी तर देशात दुसरीकडे काही जावयांना इंटर्नल ट्रेडींगचा फायदा झालेला असावा पण त्या साठी कायदा नाही . हे एक उदाहरण मात्र झाले कि ज्यासाठी काय्दा नाही पण नैतीक अपकर्तव्य झाले आहे. दुसरीकडे १००% सिद्ध न झालेले अनेक गुन्हेगारांना शीक्षा न होताच चुकीचा न्यायापेक्षा निर्दोष सोडत असते म्हणजे त्यातले सर्वच निर्दोष असतात असे नव्हे हे लोक त्या शिवाय ज्यांच्यावर कायद्याची बंधने असूनही खटलाच भरला गेला नाही असे असंख्य लोक तुमच्या आमच्यात रोज वावरत असतात. त्याच गोस्।टी ते पुन्हा करत असतात . इथे जेल मधले कैदी केवळ एक लक्षवेधी उदाहरण म्हणून वापरले आहे. नैतिकतेचे संस्कार जेल मधल्या कैद्यांना काय बाहेर काय बहुतांशी एकसारखेच असणार ते कोणते संस्कार आणि कसे करावे याची , धारयती इति धर्मः या व्याख्येने नास्तिक मंडळी सकारात्मक सहभाग कसा देऊ शकतात हे पहाणे या धाग्याचा उद्देश आहे . आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार.
11 Apr 2018 - 9:08 pm | प्रकाश घाटपांडे
नं २ चा ऑप्शन घेउन सोडून द्या विषय. फार अजीर्ण झाले आहे
12 Apr 2018 - 11:11 am | अंतरा आनंद
तुरुंगातले कैदी हे कोणत्या ना कोणत्या भावनेच्या वावटळीत सापडलेले असणार. अन्याय, पश्चात्ताप, सूडभावना या सारख्या अनेक भावनांच्या भरात त्यांच्या वागण्यात विचित्रपणा आलेला असणार. त्या आवर्तातून बाहेर पडण्यासाठी स्वतच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, काम करताना वापरल्या जाणाऱ्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करणे, त्यानंतर भावना आणि शरीर यांच्यामधील परस्परसंबध(राग आला की सुक्ष्म थरथर सुटणे/डोळ्यात पाणी उभे राहणे इत्यादी) ओळखायला शिकवून त्याद्वारे भावना नियंत्रण साधणे, अश्या गोष्टी शिकवता येतील. जे होऊन गेलय त्यावर गरजेनुसार एकदा/अनेकदा बोलून अपराध वा द्वेष या भावनांना सामोरं जात त्यांचा सल कमी करणे. REBT. Cognitive या सारख्या थेरपीज वापरुन त्याद्वारे किंवा त्यानंतर (तुरुंगातील नियमांच्या कक्षेत बसवून) चित्रकला, गाणं, निसर्ग अश्या इतर आवडींद्वारे मन उल्हसित करणे त्याद्वारे सकारात्मक विचार करायची सवय लावून घेण्यासाठी काही सराव. हे मला सुचलेले काही उपाय. अर्थात हे अतिशयच ढोबळ असतील. माझं मानसशास्त्राचं तुरळक वाचन असलं तरी अभ्यास नाही.
महत्वाचं म्हणजे, एखादा कैदी श्रद्धाळू, भाविक असेल, देव देव करणं हाच त्याचा छंद असेल तर त्याला समुपदेशन करताना देव-धर्म हे शब्द, त्या अनुषंगाने येणाऱ्या कल्पना (निवाड्याचा दिवस वा कर्मफल इ.) वापरणं वर्ज्य नसेल. एवढंच काय, तर पूजेचं अवडंबर माजवण्याने चिडचिड किंवा नियमांच्या बंधनाने जखडले गेल्याने हताशता त्याला अनुभवायला येतेय असं वाटलं तर मानसपूजेची ओळख करूनही देता येईल. कारण त्याला योग्य मार्गावर आणण्याला महत्व आहे. तिथे देव आहे-नाही या मतांचा झेंडा नाचवायची गरज नाही.
कसं आहे ना माहितगार साहेब, हाच आस्तिक आणि नास्तिकांमधला फरक आहे. कला, संस्कार यामध्ये धर्माने जी भुमिका बजावली आहे ती नास्तिक नाकारत नाहीत. पण देवा-धर्माच्या हवाल्यावर न राहता प्रयोगशील राहणारे, प्रसंगी आपले निष्कर्ष देवा-धर्माचा विरोध पत्करुन मांडणाऱ्यांमुळे विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. त्या विज्ञान-तंत्रज्ञानाची फळं चाखत काही आस्तिक त्याला धार्मिक वळण देतात. अहंभाव दूर ठेवण्यासाठी आपल्या श्रमाचं श्रेय देवाला देणाऱ्या वैज्ञानिकांची नावं बकोटीला लावून 'जितं मया' च्या आरोळ्या ठोकतात.
मूल आईचं बोट धरुन चालायला शिकतं. हे बोट कधीही सोडायचं नाहीच असं ठरवलं तर दोघांचीही फरफट होईल. तेच नेमकं व्हायला लागलय, देव-धर्म आणि माणूस या संबंधात. आस्तिक भूमिका घेणाऱ्यांची मोठी रेंज आहे. त्यात देवभोळे, रुढीप्रिय, उत्सवमग्न, देव कर्ता मानणारे, देव फक्त साक्षी मानणारे आणि इतर बरेच येतात. तसंच नास्तिकांचंही आहे हे लक्षात न घेता, त्यांची ठराविक धर्मविरोधी, उद्धट अशी संभावना करण्यातून, कुचेष्टा करण्यातून कोणता सद्गुण जोपासला जातो ते त्यांचा देवच जाणे.
बिरुटेसरांनी फक्त माहिती देणारा धागा काढला, त्यावर नास्तिक बाजू मांडणारे चार-दोन प्रतिसाद आणि बाकी सर्व स्वतला आस्तिक म्हणवणाऱ्याची तलवारबाजी. खरंतर हे आस्तिक नव्हेतच. त्यांचा ईश्वरावर खरोखरचा विश्वास असता तर नास्तिकांचा प्रश्न त्याच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले असते. पण त्यांना निवाडा करण्याची जी उताविळ असते ना की बस्स. तेव्हा वालावलकर सर, काही चिंता करु नका. तुम्ही व्यक्त केलेल्या आशावादानुसार नास्तिकांची संख्या वाढली आहेच. फक्त त्यांनी घेतलेलं आस्तिकत्वाचं पांघरुण दूर होण्याची गरज आहे. तसं वातावरण मिळालं की ते स्वत:हून हे पांघरुण दूर करतील.
12 Apr 2018 - 2:33 pm | arunjoshi123
उपाय छानच आहेत. पण यांत नास्तिकी काय आहे?
12 Apr 2018 - 2:35 pm | arunjoshi123
मानसपूजा काय असते?
12 Apr 2018 - 2:37 pm | arunjoshi123
+१
========================
लेखाचा उद्देश सिमित आहे. नास्तिकी मार्ग कोणकोणते हे पाहणे हा आहे. बाकी जेल रिफॉर्म्सवर अन्य चिंतन प्रचंड आहे.
12 Apr 2018 - 2:41 pm | arunjoshi123
धर्मांनी विज्ञानाचा विरोध केला आहे वा धर्माची विज्ञानाच्या विरोधात एक निगेटिव भूमिका आहे हा नास्तिकांनी चालवलेला फुकाचा अपप्रचार आहे, आणि भारताच्या बाबतीत तर १००% खोटा!!!
=================================
पाश्चात्य साहित्यातली वाक्ये कॉपी पेस्ट मारायची सवय असली कि असली वाक्ये सुचतात.
12 Apr 2018 - 2:45 pm | arunjoshi123
श्रेय हा शब्द धार्मिक आहे. शास्त्रीय जगतात इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राइट हा शब्द आहे. आणि आय पी आर युद्धांची माहीती न दाखवणे हा पुन्हा टिपीकल नास्तिकी दांभिकपणा आहे.
======================
मोठे शास्त्रज्ञ ते अस्तिक का आहेत ते ही सांगतात. त्यांच्या शोंधांचे डिटेल्स न वाचणे आणि त्यांच्या मतांची कारणमिमांसा न वाचणे चूक आहे. वर त्यांना विनम्र म्हणून बिनपरवानगी आपल्या क्लबात टाकणे टीपिकल नास्तिकी .....
12 Apr 2018 - 3:02 pm | arunjoshi123
स्वतःस बुद्धीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकवादी, तर्कवादी, ज्ञानवादी इ इ म्हणवणारा नास्तिकांस अशी विधाने सुचणे नास्तिकत्वाचा पाया किती कच्चा आहे हे दर्शवते.
---------------------
डॉ. बिरुट्यांच्या धाग्यावर जी चर्चा चालली होती ती काय "नास्तिकांचे प्रश्न सोडवण्याबद्दल" चालली होती का? तिथे विषय होता नास्तिकी चळवळीची आवश्यकता आणि प्रसार. हा नास्तिकांचा "विषय" होता. आस्तिकांचा प्रश्न नव्हताच.
आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे? अस्तिकांचा प्रश्न काय होता या संदर्भात? कि असा प्रसार होऊ नये? हा देवाने रोखावा? अस्तिकांची सर्व कामे देव करून देत असलेले तुम्हांस दिसते काय? कि आस्तिक नुसते बसून असतात नि त्यांचे प्रत्येक काम देव करील म्हणून अजिबात हलत नाहीत असा आपला अनुभव आहे? नसेल तर इथे कशाला तशी अपेक्षा व्यक्त करताय? उगाच काहीही.
-----------------------------------
अहो, पार्टिसिपेटरी आस्तिक्य म्हणजे नास्तिक्य कोण्या हिशेबानं झालं? खालीलप्रमाणे म्हणाल का?
मतदार मतदान करतात. खरंतर ते लोकशाहीवादी नव्हेतच. त्यांचा तिच्यावर खरोखरचा विश्वास असता तर जनप्रतिनिधींचा प्रश्न तिच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले असते.
12 Apr 2018 - 3:08 pm | श्रीगुरुजी
LLRC LLRC LLRC LLRC . . .
तसंच नास्तिकांचंही आहे हे लक्षात न घेता, त्यांची ठराविक धर्मविरोधी, उद्धट अशी संभावना करण्यातून, कुचेष्टा करण्यातून कोणता सद्गुण जोपासला जातो ते त्यांचा देवच जाणे.
तसंच आस्तिकांचंही आहे हे लक्षात न घेता तलवारबाजी करणारे, निवाडा करण्याची उतावीळ असणारे, बुद्धीला गंज चढलेले, मेंदू न वापरणारे, अंधश्रद्ध, मूर्ख अशी त्यांची संभावना करण्यातून, कुचेष्टा करण्यातून कोणते बुद्धीप्रामाण्य जोपासले जाते ते त्यांचा चार्वाकच जाणे.
त्यावर नास्तिक बाजू मांडणारे चार-दोन प्रतिसाद आणि बाकी सर्व स्वतला आस्तिक म्हणवणाऱ्याची तलवारबाजी. खरंतर हे आस्तिक नव्हेतच.
आपला तो बाब्या, दुसर्याचं ते कार्टं!
त्यांचा ईश्वरावर खरोखरचा विश्वास असता तर नास्तिकांचा प्रश्न त्याच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले असते.
आस्तिक हे फार पूर्वीपासून सांगताहेत. तुम्ही नास्तिक असलात तर आमची हरकत नाही. पण आस्तिकांना उपदेशाचे डोस पाजायला येऊ नका. आम्ही आस्तिक कसेही असलो तरी आमचे प्रश्न आमच्यावर सोपवून निर्धास्त व्हा. पण नाही. नास्तिकत्वाची खाज स्वस्थ बसू देत नाही आणि म्हणून नास्तिक सारखे खाजवून खरूज काढायला बघतात.
पण त्यांना निवाडा करण्याची जी उताविळ असते ना की बस्स.
आस्तिकांना निवाडा करायची उतावीळ? काहीतरीच काय? नास्तिक हे वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे, बुद्धीप्रामाण्यावादी, विचारवंत, विवेकवादी इ. विशेषणे नास्तिकांना फार पूर्वीच स्वतःला लावून घेतलेली आहे. नास्तिक परीषदा बोलावून एकमेकांचा सत्कार करून पुरस्कार वगैरे देऊन 'अहो रूपम् अहो ध्वनीम्' हा वाक्प्रचारही त्यांनी सिद्ध करून दाखविला आहे. त्याचवेळी आस्तिक हे तलवारबाजी करणारे, निवाडा करण्याची उतावीळ असणारे, बुद्धीला गंज चढलेले, मेंदू न वापरणारे, अंधश्रद्ध, मूर्ख असा निवाडा नास्तिकांनी फार पूर्वीच केलेला आहे.
तेव्हा वालावलकर सर, काही चिंता करु नका. तुम्ही व्यक्त केलेल्या आशावादानुसार नास्तिकांची संख्या वाढली आहेच.
वालावलकर सरांना कोणत्याच प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसल्याने ते कधीच चिंता करीत नाहीत. 'हिट अॅण्ड रन' धोरण असले की हिटरला चिंता नसते. आणि नास्तिकांची वाढलेल्या संख्येबद्दल बोलायचं म्हटलं तर पु. लं. चं वाक्य स्मरलं. . . . "बेंबट्या, या जगात गाढवे फार, कुंभार थोडे. तस्मात कुंभार हो.".
फक्त त्यांनी घेतलेलं आस्तिकत्वाचं पांघरुण दूर होण्याची गरज आहे. तसं वातावरण मिळालं की ते स्वत:हून हे पांघरुण दूर करतील.
नास्तिकांनाही आस्तिकत्वाचं पांघरूण लागतंच असं दिसतंय. पण हे पांघरूण दूर केलं तर ते उघडे पडतील ना (तसेही ते उघडे पडतातच). त्यापेक्षा राहू देत ते पांघरूण.
12 Apr 2018 - 4:55 pm | माहितगार
अंतरा आनंद यांचा प्रतिसाद भावनेच्या भरात झालेल्या कृत्यांबद्दल आहे. भावनेच्या भरात एखादे कृत्य करणारा सहसा पुन्हा पुन्हा करत नाही . जेव्हा भावना उफाळून येते तेथपर्यंय मर्यादीत असतात. असे वाटते चुभूदेघे.
धागा लेखात मुख्यत्वे पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याच्या प्रवृत्ती बद्दल प्रश्न विचारला आहे . हे सहसा भावनेच्या भराचा इथे प्रत्येकवेळी निकष लागत असेल का ? काही जण मानसशास्त्राचा हवाला देतात पण जी कृत्ये भावनेच्या भरात नसतात त्यांच्यासाठीही मानसशास्त्रीय उपाय पुर्सेसे असतात असे मानसशास्त्रज्ञांना स्वतःसतरी वाटते का ?
तर एकुण केवळ भावनेच्या भरात नव्हे तर सरावलेल्यांनाहि योग्य मार्गावर आणण्यासाठी नास्तिक त्यांना कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करु शकतील ?
14 Apr 2018 - 4:54 am | अंतरा आनंद
या वाक्याचा चुकीचा अर्थ काढलात. गुन्हा अगदी ठरवून , थंड डोक्याने केला असेल तरी तुरुंगतील नियमबद्ध आणि बंदिस्त वातावरणात त्यामागचे विचार, भूतकाळाकडे मन पुन्हा पुन्हा ओढले जाणे , राग इत्यादी भावनांचं वर्चस्व असणं अग्दी शक्य आहे. एवढाच त्याचा अर्थ.
12 Apr 2018 - 5:02 pm | arunjoshi123
हा प्रकार धार्मिक वाटतोय. एक्सपर्ट्स टू कन्फर्म.
12 Apr 2018 - 5:26 pm | युयुत्सु
हा प्रकार पूर्णपणे जैविक आहे. आमच्या आगामी पुस्तकात याची सखोल चर्चा आहे.
12 Apr 2018 - 7:16 pm | श्रीगुरुजी
हा प्रकार धार्मिक वाटतोय. एक्सपर्ट्स टू कन्फर्म
धार्मिकच आहे. याबरोबरीने योगासने, सूर्यनमस्कार इ. सुद्धा धार्मिक प्रकार आहेत. म्हणून तर मुस्लिम, खांग्रेस, डावे इ. निधर्मी पक्श शाळेत या गोष्टी करायला विरोध करतात.
13 Apr 2018 - 11:39 am | चौथा कोनाडा
खुप सुंदर प्रतिसाद, अंतरा आनंद !
पर्फेक्ट !!!!!
13 Apr 2018 - 5:44 pm | अर्धवटराव
ज्याला आस्तिकत्व्/नास्तिकत्व म्हणतात ते जीवनाकडे बघायचे दोन पर्स्पेक्टीव आहेत. पहिला तुम्हाला संत्र खायला संगतो, दुसरा त्याचं पृथक्करण करायला. दोन्हि अमर्याद आहेत आणि इंट्रेस्ट असणार्यांना एक्स्प्लोर करायला उपलब्ध आहेत. त्याच्या नावाने वाद घालणं कितीही मूर्खपणाचं असलं तरी ते ही अमर्याद आहे म्हणा :ड. असो.
14 Apr 2018 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत आहे
12 Apr 2018 - 5:01 pm | arunjoshi123
तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर नका होऊ.
==================================
ज्यांना गंभीर उत्तर द्यायचं आहे त्यांनी उत्तर द्यावं.
12 Apr 2018 - 6:51 pm | जानु
श्वासावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. कधी कधी मन फार पसरलेले आणि चंचल, अस्वस्थ वाटत असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सो हं सह श्वास मोजतो. खरच बर वाटते. पुर्वी आम्हाला या मायाजालातुन बाहेर पडायचे होते. तेव्हा यात अधिक खोल मुसाफिरी केली. स्वतःला सावरण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय नाही.
13 Apr 2018 - 5:29 pm | Topi
आस्तिकता ही स्वाभाविक आहे, एखाद्या व्यक्तीला जन्मापासून कुठल्याही रूढ धर्म पद्धती विषयी माहिती दिली नाही तरी कालांतराने तो व्यक्ती आपल्या मनात एक देव कल्पनेने तयार करीलच
मी काही असे नास्तिक पाहिलेले आहेत की ते कालांतराने आस्तिक होतात मात्र अमान आणि फजिती होईल यामुळे नास्तिकतेचा प्रचार पूर्वी केल्यामुळे ते ही गोष्ट सार्वजनिक रित्या प्रकट करीत नाहीत पाप कर्माची बोचणी झाल्याशिवाय कुठलेही व्यक्ती पाप करणे सोडून देणार नाही यास्तव कैद्यांना मार्गदर्शन करण्यास नास्तिक व्यक्ती आस्तिक व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी ठरणार नाही
15 Apr 2018 - 1:10 pm | डँबिस००७
नास्तिक गुरु/शिष्यांनी कैद्यांना सुसंस्कारीत कसे करावे ? ..................
क्राईम पेट्रोल, सावधान ईंडीया बघत असाल तर बालपणीच संस्कार शिस्त असावीच ह्याची प्रखर जाणिव होते.
कैद्यांच्या पुर्नवसना बद्दलचा विषय हा फार पुढचा विषय आहे. आता तर दर क्षणा क्षणाला गुन्हे घडत आहे, जणु काही मर्डर केला तरी पकडले जाणार नाहीतच. पुढे काय होऊ शकत ह्याची कल्पनाही मनाला शिवत नाही ह्यांच्या ? एका क्षणात होत्याच नव्हत करुन टाकतात.
गुन्हे करणारे , त्यांना प्रवृत्त करणारे , गुन्हे करण्यास परिस्थीती निर्माण करणारे सर्वच कारणीभुत आहेत.
कालच्याच एका ऐपिसोड मध्ये ऐका होतकरु क्रिकेटपटु बद्दल दाखवल, बिहार मधुन मुंबईला तो मुलगा येतो. शाळेत दाखला घेतो, शाळेची फी १० हजार रु महीना, त्यावर क्रिकेट कोचींगची फी, पहीले एक वर्ष मामा कडे रहातो, मुलगा स्वतः हॉटेलत पार्ट टाईम काम करुन ३००० रु कमावत असतो. त्यातील रेल्वे पासचे सोडुन सर्व पैसे तो मामीला देत असतो. मामाला शाळेच्या फी साठी एक लाखाच कर्ज काढाव लागत, मामा ते कर्ज काढुन शाळेची फी भरतो. एका वर्षात मुलगा शाळेचा बेस्ट क्रिकेटर वैगेरे होतो.
पण नंतर पुढच्या वर्षात शाळेची कोचींग क्लासची फी भरता येत नाही, मामी घरा बाहेर काढते. रस्त्यावरचा पोस्टर चिकटवणारा पोरगा ह्या मुलाला आसरा देतो. मुलाला कस ही करुन क्रिकेट सोडायच नसत म्हणुन तो पैश्याची सोय करण्याच्या मागे असतो. समोर काहीही पर्याय नाही अश्यावेळेला पैश्यावर तोडगा काढण्यासाठी पोस्टर चिकटवणारा त्या मुलाला एक उपाय सुचवतो.
ज्या लोकांची मुले हरवलेली आहेत त्या लोकांना खंडणी साठी फोन करायचा व पैसे उकळायचे ! प्लान फेल होतो, पोलिस पकडतात !
अश्याप्रकारे एका होतकरु क्रिकेटरचा गुन्हेगार होतो !!
15 Apr 2018 - 6:17 pm | माहितगार
नास्तिक पद्धतीने संस्कार कसे करावेत ? हा लेखाचा मुख्य उद्देश त्याला अनुलक्षून काही मत ?