केंब्रीज अॅनालिटीका नावाची राजकीय 'माहिती विश्लेषण कंपनी' आंतरराष्ट्रीय बातम्यातून विवादात आली आहे. फेसबुकवर आणि इतर व्यक्तिगत माहिती उपलब्ध असलेली अणि मिळवून अशा माहितीचे राजकीय आणि मानसशास्त्रीय विश्लेषण आधूनिक संगणक प्रणाली वापरून करणे आणि राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचाराची योजना आखण्यासाठी करणे अशा काही स्वरुपाचे काम ही कंपनी करत असावी. चुभूदेघे. वाद मला वाटते विवीध कारणांनी लोकांनी कुठे कुठे टाकलेली व्यक्तीगत माहिती फेसबुक आणि आंतरजालावर व्यक्त केलेली मते लाईक्स इत्यादींची माहिती मिळवताना व्यक्तीगत गोपनीयता संकेतांचा भंग झाला आहे का ? होतोय का ? आणि जनमनसावर प्रभाव टाकण्यासाठी अशा अत्याधूनिक तंत्राच्या वापराची नैतीक बाजू हे प्रश्न या विषयावर वातावरण गरम होण्याची कारणे असावीत.
प्रत्येक देशात माहिती गोपनीयता संबंधाने कायदे वेगवेगळे आहेत, जगाच्या अनेक भागात गोपनीयता विषयक कायदेच नाहीत ऑस्ट्रेलियात माहितीची गोपनीयता जपावी लागते पण राजकीय पक्षांना गोपनीय माहिती वापरण्याची अधिकृत अनुमती उपलब्ध असते युरोप आणि आमेरीकेत वेगवेगळे नियम आहेत. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा आहे पण त्याला खासगीपणाच्या घटनात्मकतेची जोड नव्हती ती सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निर्णयामुळे खासगीपणाचा आधिकार पब्लिक प्लेस मध्येही उपलब्ध होण्याबद्दल भारतीय न्यायालय सकारात्मक विचार करण्याची शक्यता दिसते म्हणजे फेसबुक अथवा मिपासारख्या ठिकाणी सुद्धा तुमचा खासगीपणा जपला जाणे अभिप्रेत आहे का ? तर होय कदाचित पण नेमका तो किती जपता येईल या बाबत भारतीय कायदे आणि न्यायदानातून प्रगती होण्यास अजून काही वर्षे नक्कीच जातील.
असो मी हे ढोबळ माहितीसाठी मिपावर चर्चा सुरु व्हावी म्हणून लिहीले पूर्ण आहे असे म्हणता येत नाही . चर्चेसाठी तुम्हीही काही प्रश्न उपस्थित करा केवळ चर्चा सुरु व्हावी म्हणून काही प्रश्न विचारतो आहे.
* त्यापुर्वी चर्चा आपापल्या राजकीय भूमिकात अडकून हायजॅक होणार नाही याची काळजी घ्या.
१) नैतीकतेचे आणि योग्यायोग्यतेचे मापदंड काही क्षण बाजूला ठेऊन सॉफ्टवेअर तज्ञांनी केंब्रिज अॅनालिटीकाने कोणते संगणक प्रणाली कशा प्रकारे बनवली कशा प्रकारे वापरली आणि भारतात अशा प्रकारचे तंत्र्ज्ञान कशा कशात आणि कोण कोणती तंत्रे आणि प्रणाली वापरुन वापरले जाऊ शकते याची माहिती द्यावी.
२) केंब्रीज अॅनालिटीका प्रकरणात काय घडल ?
३) केंब्रीज अॅनालिटीकावर घेतले जाणारे आक्षेप काय आहेत ? ते योग्य आहेत असे तुम्हाला वाटते का की उगाचच बाऊ केला जातो आहे असे वाटते ?
४) माहिती मिळवण्यात आणि वापरण्यात नैतीकतेचे आणि योग्यायोग्यतेचे कोणते मापदंड खासकरून भारतीय परिपेक्षात असावेत ?
५) ट्रंप इलेक्शन रशियाने खोट्या बातम्या पेरुन आणि त्या शिवाय या केंब्रिज अॅनालिटीका च्या प्रभावाने झाले असे म्हणतात. रशिया आणि आमेरीका तसा भाषेचा फरक मोठा आहे आपण भारत आणि पाकीस्तान या दोन राष्ट्रांचा विचार केला तर केवळ लिपी बदलली तर एकमेकांची भाषा एकमेकांना वापरता येते उपरोक्त बाबी भारत आणि पाकीस्तान एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सहज करु शकतील का ? कसे आणि या माहिती तंत्रज्ञान युद्धात भारतीयांनी स्वतःला वाचवून पाकीस्तानच्यावर वरचढ होण्याचे कोणते मार्ग अमलात आणले जाऊ शकतात
ज्यांना काहीच माहिती नाही आणि अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना सुरवात म्हणून काही
बातम्यांचे दुवे
*http://www.newindianexpress.com/world/2018/mar/22/how-facebook-likes-cou...
* https://www.theguardian.com/news/2018/mar/17/cambridge-analytica-faceboo...
* https://www.vox.com/policy-and-politics/2018/3/21/17141428/cambridge-ana...
* https://www.nytimes.com/2018/03/17/us/politics/cambridge-analytica-trump...
* https://www.theguardian.com/australia-news/2018/mar/22/australias-politi...
* http://www.bbc.com/news/world-asia-india-43482391
* https://qz.com/1234364/cambridge-analytica-worked-for-mercer-backed-ted-...
* https://www.politico.eu/article/cambridge-analytica-academic-who-mined-f...
* https://www.reuters.com/article/us-facebook-cambridge-analytica-leave-eu...
* https://www.pbs.org/wgbh/frontline/article/i-was-just-flabbergasted-disc...
* https://www.washingtonpost.com/world/europe/the-latest-cambridge-analyti...
प्रतिक्रिया
22 Mar 2018 - 11:19 am | sagarpdy
याच निमित्ताने हा टेड
22 Mar 2018 - 11:29 am | माहितगार
याला मराठीत काय म्हणता ञेऊ शकेल ?
22 Mar 2018 - 8:43 pm | कंजूस
फेसबुक अथवा इतर स्टोरवरती अॅप टाकताना डेवलपर दिलल्या अटी मान्य करतो आणि डेटा,व्यक्तिगत माहिती मिळवतो. आता त्या डिवेलपरने अटींचा भंग करून माहिती बाहेरच्या कुणास दिली विकली तर साइट कायद्याच्या कचाट्यात कशी येणार? डेटा देणारा गुन्हेगार.
23 Mar 2018 - 6:31 am | राजाभाऊ
>>आता त्या डिवेलपरने अटींचा भंग करून माहिती बाहेरच्या कुणास दिली विकली तर साइट कायद्याच्या कचाट्यात कशी येणार? डेटा देणारा गुन्हेगार.<<
तसं नसतं हो. उदाहरणादाखल बच्चन साहेबांच्या दोस्ताना मधला हा सीन बघा.... :)
थर्ड पार्टी डेवलपर्सना त्यांचे अॅप्स तुमच्या (रीड फेसबुक) प्रॉडक्ट (वेब्साइट, डिवाइस इ.) वर चालण्याकरता किंवा त्यांनी तुमच्या इकोसिस्टम मध्ये सामील करण्याआधी त्यांच्यावर बरीच बंधनं घालावी लागतात. त्यांचं अॅप, प्लगइन तुमच्या आर्किटेक्चर फ्रेमवर्क मध्ये बसतं कि नाहि, डेवलपमेंटचे बेसीक नियम पाळतं कि नाहि, मेमरी, इतर सिस्स्टम रिसोर्सेसचा वापर व्यवस्थित करतं कि नाहि, ठरवलेलं काम सोडुन उगाच कुठे नाक खुपसतं (मालवेर) का? वगैरे बाबी तपासणं हे फेसबुकचं काम आहे. कुठ्लंहि अॅप प्रॉडक्शन मध्ये रिलीज करण्यापुर्वि हे सगळे घटक क्युए/टेस्ट या स्टेजमध्ये पकडले जाउन त्यावर योग्य ती कारवाइ होणं गरजेचं असतं. जाहिर आहे फेसबुकने यात गलथानपणा केलेला आहे. या घटनेला धरुन फेसबुक विरोधात एखादा क्लासअॅक्शन सुट फाइल केला जाउ शकतो...
23 Mar 2018 - 6:45 am | राजाभाऊ
आता सारवासारव करताना झकरबर्ग म्हणतोय कि त्यांनी विश्वासघात (ब्रीच ऑफ ट्रस्ट) केलेला आहे पण हे सगळं होत असताना फेसबुक झोपा काढत होतं, त्याचं काय?..
22 Mar 2018 - 10:35 pm | मदनबाण
***
इंटरनेटवर वावरताना / कनेक्टेड असताना / माहिती डाउनलोड- अपलोड करताना कायम लक्षात ठेवायचे नियम !
१} जेव्हा कोणताही प्रकारचा डेटा तुम्ही नेटवर टाकता त्याच क्षणी तुम्ही तुमच्या त्या डेटावरील नियंत्रण कायमचे घालवुन बसता.
२} एकदा नेटवर गेलेली माहिती ही कायम स्वरुपी नेटवर राहते, अगदी सर्व ट्रेस पुसले गेले तरी ती माहिती बॅकअप केली गेलेली असु शकते / कोणीतरी ती डाउनलोड करुन ठेवलेली असु शकते.
३} नेटवरचा / नेटशी कनेक्टेड असलेल्या नेटवर्क मधील डेटा हा तो पर्यंतच सुरक्षित असतो जो पर्यंत तो हॅक केला जात नाही. फेसबुकचेच उदा. ध्यायचे झाले तर मार्क चे स्वतःचे अकांउट हॅक झाले होते, नव्हे त्याची इतर सोशल मिडियावरील अकांउट्स सुद्धा हॅक झाली आहेत.
४} इंटरनेट जायंट्स तुम्हाला डेटा नोड प्रमाणेच वापरतात आणि त्यांच्या प्रयोगांसाठी तुम्ही एक गिनीपिग असतात. तुमचा वापर करुन ते त्यांची मूल्यवॄद्धी करत असतात.
५} नियम पहिला कायमचा टाळक्यात फिट करुन ठेवा. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan
22 Mar 2018 - 10:45 pm | अस्वस्थामा
हे प्रचंड खरं आहे. ज्या पातळीवर हे होतं ते तर खरंच भितीदायक आहे.
दॅट्स इट.!
23 Mar 2018 - 7:51 am | मारवा
४} इंटरनेट जायंट्स तुम्हाला डेटा नोड प्रमाणेच वापरतात आणि त्यांच्या प्रयोगांसाठी तुम्ही एक गिनीपिग असतात. तुमचा वापर करुन ते त्यांची मूल्यवॄद्धी करत असतात.
हा विषय फारच गंभीर आहे आपण यातील जाणकार दिसता कृपया एखादे सविस्तर उदाहरण देऊन यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती
23 Mar 2018 - 8:54 pm | मदनबाण
हा विषय फारच गंभीर आहे आपण यातील जाणकार दिसता कृपया एखादे सविस्तर उदाहरण देऊन यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती
मी यातला जाणकार नाही, परंतु नेटस्केप नेव्हिगेटर ते मायक्रोसॉफ्ट एज आणि ५६ केबीपीएस डायलअप मॉडेम कनेक्टिव्हीटी ते १६ एमबीपीएस वायफाय असा इंटरनेटचा प्रवास अनुभवला आहे. मी अश्या नेटिझन पिढीतला आहे, ज्यात पहिले मेल अकांउट याहु आणि हॉटमेल मध्ये क्रिएट केले गेले.
फेसबुक किंवा इतर कोणतेही सोशल मिडिया फोरम / साईट / अॅप यांचे डिझाइन तुमचे प्रोफाइलिंग करण्यासाठी वापरले जाते, मग ते बिहेविअर प्रोफायलिंग असो किंवा इमोशल प्रोफायलिंग असो वा तुमच्या आवडी-निवडी / तुमची खरेदी इ. असो याचे प्रोफायलिंग. जाहिराती पासुन इतर अनेक गोष्टींसाठी हा डेटा वापरला जातो.
जालावर याला अत्यंत सोप्या पद्धतीत असं सांगितल जात :- If You're Not Paying For It, You Become The Product किंवा If you're not paying for something, you're not the customer; you're the product being sold.
जालावर वावरणार्यांचा ट्रेंड हा सातत्याने बदलत असतो... नविन येणार्या टेक्नॉलॉजी आणि नेटचा वाढता स्पीड यांचा या ट्रेंडवर परिणाम होत असतो... मग ते ICQ instant messaging client पासुन Myspace आणि ऑरकुट पासुन फेसबुक गुगल प्लस ते अगदी वॉट्स अॅप पर्यंत. प्रत्येक वेळी एक गोष्ट हमखास पाहिली जाते ते म्हणजे डेटा फ्लो आणि डेटा जनरेशन. युझरबेस वाढला कि डेटा फ्लो वाढतो आणि त्याच बरोबर डेटा जनरेशन देखील वाढले जाते,म्हणुनच प्रत्येक साईट त्यांच्या डिझाइन आणि फिचर्स मध्ये सातत्याने बदल आणि भर घालत जाते,युझरला काय हवयं हे अर्थातच प्रामुख्याने पाहिलं जात आणि त्यांना रिटेन करण्यासाठीच हे केलं जात. युझर्स डेटा फ्लो करतात आणि सातत्याने त्या डेटा मध्ये भर घालतात.
इंटरनेट जायंट्स तुम्हाला सातत्याने आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि माध्यमांचा वापर करुन ट्रॅक करत राहतात. हे किती मोठ्या प्रमाणात केलं जात ते खालील दुवे वाचुन तुम्हाला कळेल :-
Google collects Android users’ locations even when location services are disabled
Google is tracking Android users, even through disabled location services
Your Android Phone Has Been Sending Location Data to Google, Even If You Opted Out
सध्या फेसबुकमुळे ही चर्चा अचानक सगळ्यांना मोठ्या प्रमाणात वाचायला / ऐकायला मिळत आहे.याच फेसबुक ने त्यांच्या युझर्सवर इमोशल मॅनिप्युलेशन करण्यासाठी एक सिक्रेट सायकॉलॉजिकल प्रयोग केला होता... सो यु आर व्हच्युअल गिनिपिग फॉर इंटरनेट जायंट्स.
संदर्भ :-
Experimental evidence of massive-scale emotional contagion through social networks
Facebook Manipulated User News Feeds To Create Emotional Responses
Facebook Tinkers With Users’ Emotions in News Feed Experiment, Stirring Outcry
Facebook sorry – almost – for secret psychological experiment on users
After reading this, you'll probably NEVER trust Facebook again
जाता जाता :- बॉडी इंप्लांट ट्रॅकिंग इज ऑन द वे...
*** मी फेसबुक वापरत नाही.
१०+ वर्ष मी मिपा वापरलं आहे, इतकं मात्र नक्की ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... :- Saajan Chale Sasural
23 Mar 2018 - 8:02 am | चामुंडराय
.
23 Mar 2018 - 9:38 am | कंजूस
तुमचा डेटा कुठे कोणी वापरला तर आम्ही जबाबदार नाही ही अट साइनइन करताना टाकली तरी फेसबुक वापरण्याचं कोणी सोडणार नाही. म्हणजे मी म्हऩतो ही अट टाकावीच त्यांनी. होऊ दे राडा.
24 Mar 2018 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमचा डेटा कुठे कोणी वापरला तर आम्ही जबाबदार नाही ही अट साइनइन करताना टाकली तरी फेसबुक वापरण्याचं कोणी सोडणार नाही. म्हणजे मी म्हऩतो ही अट टाकावीच त्यांनी.
अशी बेजबाबदार अट बहुदा कायद्यात बसणार नाही !
होऊ दे राडा.
=)) =)) =))23 Mar 2018 - 9:59 am | पगला गजोधर
ही आपली वरील सुचना, व
"मिपावर काय लिहिलंय, यापेक्षा कोणी लिहिलंय, यावरच, प्रतिक्रिया अवलंबून असतात " अशी एकंदरीत आढळून आलेली सध्याची परिस्थिती, यामुळे मी सध्या तरी काठावर वा मा आसनात असेल.
24 Mar 2018 - 12:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वॉट्स अॅपवाले पण डेटा विकतात का? आता ती कंपनी फेसबूकनेच विकत घेतली आहे म्हणा.
माहितीचा 'आधार' सर्वानाच हवा आहे. चित्र भयावह दिसतेय.
24 Mar 2018 - 12:35 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles
25 Mar 2018 - 6:03 am | मदनबाण
इ लॉ न म स्क ने त्यां च्या कं प नी चे फे स बु क पे ज डि लि ट के ले. . .
Elon Musk deletes Facebook pages of Tesla, SpaceX after Twitter challenge
Elon Musk Just Stunned Facebook, Deleting The SpaceX and Tesla Pages--Here's Why That's Awesome
व्हॉट्सअॅप ला टेलिग्राम किंवा सिग्नल पर्याय ठरु शकेल काय ?
Telegram hits 200M MAUs
WhatsApp Co-Founder Puts $50M Into Signal To Supercharge Encrypted Messaging
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M Pai
10 Jan 2021 - 12:29 am | मदनबाण
जालावर याला अत्यंत सोप्या पद्धतीत असं सांगितल जात :- If You're Not Paying For It, You Become The Product किंवा If you're not paying for something, you're not the customer; you're the product being sold.
व्हॉट्सअॅप ला टेलिग्राम किंवा सिग्नल पर्याय ठरु शकेल काय ?
हे दोन्ही पर्याय व्हॉट्सअॅपला किंवा मी म्हणेन व्हॉट्सअॅप पेक्षा उत्तम पर्याय आहेत आणि आता व्हॉट्सअॅप बाय बाय करायची वेळ आली आहे.
जाता जाता :- ट्रप्म तात्यांची [ स्वतःच्याच अध्यक्षांची] त्यांच्याच देशातील टेक कंपन्यांनी केलेली मुस्कटदाबी हा आपल्यासाठी वेकअप कॉल आहे ! अमेरिकेतील First Amendment guarantees freedoms concerning religion, expression, assembly, and the right to petition. या Amendment चा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी मला वाटते / दिसते. [ खरेच तसे म्हणता येइल का ? म्हणजे freedom of expression, not freedom of speech ? ] आपण देखील आता डिजिटल स्ल्वेव्हरी मधुन बाहेर पडण्यासाठी जोर लावला पाहिजे !
Pompeo, Cruz and other Trump allies condemn Twitter's ban on president
Donald Trump Jr. says 'the world is laughing at America' as he rails against his dad's Twitter ban, saying 'free speech is dead'
Kentucky congressmen angrily react to Twitter banning Trump account
The war between Silicon Valley and Washington takes a new turn
US is Not China, Say Republicans Condemning Twitter for Permanently Suspending Trump's Account
Donald Trump’s Digital Downfall: Banned From Facebook, Twitter, Snapchat; Parler Suspended From Google Play
'Big announcement soon': Trump hints at creating own platform after Twitter ban
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यार बिना चैन कहाँ रे... [ साहेब (1985) ]
25 Mar 2018 - 12:02 pm | पैसा
ही कंपनी राहुल गांधी यांना सध्या मदत करत आहे असे कोणीतरी ढकल पत्र पाठवले होते.
मदनबाण यांच्या पहिल्या प्रतिक्रियेशी अत्यंत सहमत आहे.
अन्य धाग्यावर लिहिले त्याप्रमाणे भारतातले १०० एक कोटी लोक न - डिजिटल जगात असावेत. तसेच प्रचार ऐकुन कोणी मते बदलत नाहीत. पैसा, जाती, धर्म ई गोष्टी मतदानाचा कल ठरवतात. त्यामुळे भारतात असा काही परिणाम निवडणुकांवर कोणी बाहेरून करू शकेल असे वाटत नाही.
डाटा अनधिकृत रित्या वापरणे वगैरे गोष्टी आहेतच. पण आपण कुठे कुठे पुरे पडणार? रस्त्यावर गाड्यांना अपघात होतात म्हणून घरात गादीवर झोपून राहिले तर मरण चुकणार आहे का?
26 Mar 2018 - 2:36 am | अर्धवटराव
:)
26 Mar 2018 - 11:03 am | sagarpdy
बहुतांशी बरोबर. पण मतांची तीव्रता बदलते. मतदान करायला जावे असे वाटणाऱ्यांची संख्या बदलते. उदा. मोदींच्या बाजूने पण तीव्र पाठिंबा नसलेला एखादा मतदार
१. मोदी काहीच विशेष करत नाहीयेत - अच्छे दिन वगैरे स्वप्न होत , या आशयाच्या बातम्या पाहत असेल तर मत द्यायला जाण्याची तसदी घेईलच असं नाही.
२. चीन आक्रमक होतोय आणि रागा कसे काही दिवसापूर्वी चीनच्या राजदूतांना तथाकथित गुप्तपणे भेटले होते, या आशयाच्या बातम्या पाहत असेल तर मोदींना मत द्यायला गेलं पाहिजे असे त्याला वाटू शकते.
या टार्गेटेड पोस्टचा उपयोग स्विंग व्होट्स फिरवायलाच झाला असे ऐकले.
25 Mar 2018 - 12:37 pm | सतिश गावडे
स्वतःच आपल्या वैयक्तीक बाबी चव्हाट्यावर मिरवण्यासाठी सांगायच्या आणि कुणी त्या माहितीचा वापर केला तर बोंब ठोकायची याला काय अर्थ आहे राव.
लोकांनी सोशल मिडीयावर "आज कमोडवर बराच वेळ बसलो पण झालीच नाही" एव्हढंच टाकणं बाकी ठेवलंय.
25 Mar 2018 - 2:05 pm | धर्मराजमुटके
आजकाल बऱ्याच कर्ज देणाऱ्या कंपन्या तुमचा सोशल मिडियावरचा वावर पण तपासतात म्हणे, माझे फेसबुकवर किंवा लिन्क इनवर अकाऊंट नाहिये. मग आता मला १८५७ चे मॉडेल समजुन कर्ज दिले जाणार नाही काय ?
26 Mar 2018 - 11:21 am | माईसाहेब कुरसूंदीकर
हल्ली तुम्ही फेसबूक्,लिंक-इन्,वॉट्स अॅप वा ट्वीटरवर नसाल तर तुम्ही अस्तित्वात नाही असे हे विनोदाने म्हणतात.
27 Mar 2018 - 8:17 pm | श्रीगुरुजी
https://www.indiatoday.in/technology/news/story/facebook-data-leak-cambr...
________________________
Cambridge Analytica insider says it worked extensively in India, names Congress.
24 Dec 2018 - 2:51 pm | माहितगार
अलिकडे युट्युबर एका पाकिस्तानी सोशल मिडिया अॅक्टीव्हीस्टची मुलाखत पाहिली. पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय च्या सोशल मिडिया पाक अंतर्गत सोशल मिडिया सेंसॉर करण्यासाठी आणि पाक बाह्य सोशल मिडिया प्रभावित करण्यासाठी विशेष यंत्रणेच्या कार्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
दुसर्या देशाच्या नागरीकांच्या विचारधारा प्रभावीत करण्यासाठी पुर्वी फक्त शॉर्टवेव्ह रेडिओ असत त्याची जागा आता सोशल मिडियाने घेतली आहे. आमेरीकन सोशल मिडियावर रशियाचा नेमका प्रभाव किती या बद्दल दोन परस्पर विरोधी वृत्ते आली आहेत दोन्हीच्या युट्यूब खाली जोडतोय. डिजीटल मिडियाचा डाटाकलेक्शन मशिन लर्नींग आणि आर्तीफिशीअल इंटेलींजन्सचा उपयोग आता नवा नाही पण याचाच सोशल बिहेवीअर स्कोर कॅल्कुलेट करून माणसाचे सामाजिक जीवन कंट्रोल करण्याचा चिनी प्रयोगही स्तंभीत करणारा आहे. हे तिन्ही युटूब खाली जोडतोय.
* Russia's social influence operation "worse" than originally thought
* Democratic operatives created fake Russian bots to link Russia to Roy Moore
* Exposing China's Digital Dystopian Dictatorship
हे सगळे बघितले की भारतीय डिजीटल यूगातील माहिती युद्धा बाबत किती अनभिज्ञ, उदास आणि गाफील आहेत हे लक्षात येते.
27 Jan 2021 - 11:31 am | मदनबाण
CBI books Cambridge Analytica and GSRL for illegal data harvesting of FB users
युजरच्या संमती शिवाय / त्यांच्या नकळत त्यांचा डेटा हार्व्हेस्ट केला गेला.
5.62 लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी : सीबीआयने Cambridge Analytica विरोधात दाखल केला गुन्हा
Exclusive: The inside story of what Cambridge Analytica actually did in India
फेसबुकची सिक्रेट डील :-
Facebook’s secret settlement on Cambridge Analytica gags UK data watchdog
अतिरेक्यांनी देखील केले व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरला टाटा बाय बाय :-
'No WhatsApp, FB messenger': Terror groups in Pak switch to new messaging apps
व्हॉट्सअॅपची नविन प्रायव्हसी पॉलिसी आणि इतर अपडेट्स :-
WhatsApp is treating Indian users differently from Europeans in terms of updated privacy policy: Centre to Delhi HC
WhatsApp's new Privacy Policy is a looming threat: ADIF
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google faces two fresh antitrust lawsuits in the EU over its data gathering and advertising practices