लोकहो,
अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274
याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले?
याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/
मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं.
एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन.
जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
11 Mar 2018 - 5:25 am | manguu@mail.com
निवडणुकीआधी डरकाळ्या फोडणारे वाघ गादी मिळाली की मांजर होतात.
11 Mar 2018 - 11:56 am | माहितगार
सत्ता मिळवताना आणि नंतर ती चालवताना दोन्ही वेळी प्रॅक्टीकलही असावे लागते
11 Mar 2018 - 2:10 pm | गामा पैलवान
ट्रंपूबाबांनी अशी कोणती निवडणूक लढवली की जिच्यानंतर ते एकदम म्यावम्याव झाले? उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणांत आहेत तर पुतीन, ट्रंप व किम हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले भिडू आहेत.
-गा.पै.
12 Mar 2018 - 10:34 am | आलमगिर
बहुदा ट्रंपपण खिशात राजिनामे घेऊन हिंडतात.
13 Mar 2018 - 5:14 pm | arunjoshi123
हत्यारे, तानाशाही कम्यूनिस्ट होण्यापेक्षा बरं
11 Mar 2018 - 12:06 pm | manguu@mail.com
शब्द वाचून अणूरेणू शहारला
11 Mar 2018 - 1:21 pm | कपिलमुनी
अच्छे दिन' वास्तवात नसतात, मानण्यावर असतात: गडकरी
11 Mar 2018 - 7:25 pm | शलभ
मला तर ठीक वाटलं गडकरींच बोलणं. जे आहे त्यात समाधानी कुणीच नसतं.
11 Mar 2018 - 8:48 pm | बिटाकाका
वरीलप्रमाणे, या बातम्या नकारात्मक प्रचारासाठी वापरणाऱ्यांसाठीच तर गडकरीचं वक्तव्य आहे. चुकलंच भाजपचं, आधी नीट लिहून घ्यायचं ना अंधविरोधकांकडून कि नक्की काय मिळालं की अच्छे दिन म्हणणार.
11 Mar 2018 - 10:39 pm | रविकिरण फडके
पण एकंदरीत गडकरींचे बोलणे वावदूक असते असा माझा समज आहे.
कारणे?
आज (११ मार्च २०१८) ची बातमी आहे ती अशी: गडकरींनी (डोंबिवलीत बोलताना) म्हटले की डोंबिवली हे सर्वात जास्त घाणेरडे शहर आहे, आणि ते सुधारावयाचे असेल तर तेथील नागरिकांनी महापौर किंवा पालिकेकडे धरणे धरले पाहिजे! ते असेही म्हणाले की सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या स्वार्थासाठी शहराकडे दुर्लक्ष करतात म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे! अरे व्वा! ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आम्ही आमची कामे करणार नाही, पैसे खाणार, आणि लोकांनी आपले कामधंदे सोडून धरणे धरावयाचे, आम्ही कामे करावीत म्हणून!
ह्या महाशयांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत असे म्हटले की, भारतात खूप मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात व त्यात माणसे दगावतात. ते पुढे म्हणाले की चालक दुचाकी चालविताना हेल्मेट घालीत नाहीत त्यामुळे अपघात होतात. क्या बात है; किती सोपा उपाय आहे ना रस्ते अपघातातील बळींची संख्या कमी करण्याचा?
नेव्हीतील अधिकार्यांबद्दल ह्यांनी असेच गैरलागू उद्गार मुंबईत काही दिवसांपूर्वी काढले. खरे तर, आपल्या राजकारण्यांना नको तिथे, संबंध नसता, पिचकाऱ्या टाकण्याची सवय आहे. गडकरी त्यास अपवाद नाहीत.
11 Mar 2018 - 11:41 pm | बिटाकाका
काहीच्या काही, स्वतःच्या पक्षाचे प्रतिनिधी असतानाही त्याची तमा न बाळगता गडकरी त्यांचे कान टोचत होते हे उलट कौतुकास्पद आहे असे मला वाटते. स्वतःच्या 50 वर्षाच्या हुकलेल्या गोष्टींचे गोडवे गाणाऱ्यांपेक्षा हे बरे आहे.
---------------------------------
हेल्मेटबाबतीत पण तेच! विरोधाला विरोध म्हणून काहीही. काय चुकीचे आहे त्यांच्या वक्तव्यात? भारतात होणारे अपघात हे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे होतात या भ्रमात मी तरी नाही.
----------------------------------
नेव्हीचे प्रकरण जाणून घ्या. त्यांच्या खात्याच्या दृष्टीकोनातुन ते योग्यच बोलले.
12 Mar 2018 - 7:18 am | रविकिरण फडके
पण कुठेही जबाबदारीने बोलायला हवे. किती टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात? हेल्मेट (न घालणे) हे रस्ते अपघाती मृत्यूचे क्रमांक एकचे कारण आहे काय? आणि मुदलात, हेल्मेट न घालून अपघात टळत नाही; फक्त संभाव्य मृत्यू टळतो. तुम्हाला अपघात कमी करावयाचे आहेत, की अपघात झाले तरी चालतील पण माणसे मरता काम नयेत असे तुमचे म्हणणे आहे?
तीच गोष्ट डोंबिवलीतील भाषणाची. जर KDMC चे कर्मचारी कामे करीत नसतील, ते आणि लोकप्रतिनिधी मिळून जनतेला लुबाडीत असतील, तर तुमच्या monitoring systems काय करताहेत? लोकांनी दबाव टाकायचा म्हणजे काय करावयाचे? गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य केले तरी, त्यांची systems या विषयाची एकूण समज कमी आहे असेच त्यांचे बोलणे असते. कारण, कोणत्याही सिस्टिममध्ये leadership महत्वाची असते. त्या सिस्टिमच्या आत काम करणारे घटक त्यांची कितीही इच्छा असली तरी काहीही बदल घडवून आणू शकत नाहीत हे सत्य त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही - जसे ते अनेक इतरांपर्यंत पोहोचलेले नाही.
म्हणून वावदूक म्हटले.System Thinking या विषयावर स्वत्रंतपणे लिहिणार आहे.
12 Mar 2018 - 7:22 am | manguu@mail.com
सहमत
12 Mar 2018 - 10:27 am | बिटाकाका
तुम्ही त्यांचे अपघातावरचे भाषण पूर्ण ऐकले होते का? नसावे असे मला वाटते, खालील लिंकवर पाहू/ऐकू शकता. ते स्वतःचे मत सांगत नसून आकडे सांगत आहेत. माझ्या अतिसामान्य आकलनशक्तीला त्यांचा मतितार्थ - हेल्मेट न घालण्यामुळे अपघात नाही तर मृत्यू होतात - लक्षात आला. टिकाच करायची असेल तर - शुभेच्छा!
https://youtu.be/pJcxMGwLMCQ
======================
सिस्टमची पूर्ण जाण असल्यामुळेच त्यांनी डोंबिवलीतील वक्तव्य केले आहे असे माझे मत आहे. जर अधिकारी सजग असते लीडर चांगले असते तर शहरे अशी बकाल झाली नसती. नागरिक सजग असतील तर सिस्टिमवर दबाव असेल नाहीतर गेली अनेक वर्षे काय चालले आहे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचे डोंबिवली बद्दलचे पूर्ण भाषण ऐकण्याचीही विनंती!
======================
कर्मचारी अधिकारी वर्ग हा समान्य जनतेतच मोडतो असे मला वाटते.
======================
माध्यमांनी त्यांचा २४X७ वेळ काढण्यासाठी संदर्भविराहित काढलेले एक वाक्य ऐकून मते बनवण्यात काहीच अर्थ नाही, त्यामुळे असे काही चालू असेल तर मी संपूर्ण भाषण ऐकतो. मग ते कोणाचेही असो.
12 Mar 2018 - 1:11 pm | रविकिरण फडके
धन्यवाद, तुम्ही दिलेल्या लिंकवरील भाषण ऐकले. आपणही पुन्हा एकदा नीट ऐकावे ही विनंती.
गडकरी म्हणतात (१:०८ मिनिटे), "मॅडम, करीबन ६८% ऍक्सिडंट्स जो होते है वो हेल्मेट न पेहननेके कारण बाईकपर से होते है". ते लगेच पुढे असेही म्हणतात की हेल्मेटके बारेमे जैसा हमने कहा, हम लगातार उसके लिये प्रचार कर रहे है.
(हिंदी लिहिताना झालेल्या चुका कृपया माफ कराव्यात.)
म्हणजेच, हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले एक वाक्य नाही. आता, हेल्मेट न घातल्यामुळे अपघात कसे होतात मी समजलो नाही.
बाकी, डोंबिवलीबद्दल बोलायचे झाले तर, KDMC मधील २७ गांवे का वगळली, नंतर ती पुन्हा कशासाठी अंतर्भूत केली गेली, आणि ह्या मधल्या काळात तेथे काय झाले, हे सर्वज्ञात आहे. त्यात (जागरूक वगैरे) नागरिक काय करू शकले असते हे तुम्हीच सांगावे.
त्यांच्या वक्तव्यानंतर आता जो शिमगा सुरु झाला आहे - आजच्या वर्तमानपत्रातील शिवसेनेच्या प्रतिक्रिया वाचाव्यात - तीच फलश्रुती त्यांना अभिप्रेत होती का? प्रॉब्लेम हा आहे की सगळ्यांनाच फक्त brownie point स्कोअर करण्यात रस आहे.
12 Mar 2018 - 1:22 pm | बिटाकाका
गडकरी अपघातांची नाही तर मृत्यूंची आकडेवारी सांगत आहेत हा मुद्दा लक्षात घ्यावा एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो.
12 Mar 2018 - 2:01 pm | रविकिरण फडके
विडिओमधील वाक्य मी चुकीचे कोट केले आहे, की वाक्य बरोबर आहे पण मी त्याचा अर्थ चुकीचा लावला आहे, ते कृपया सांगावे.
12 Mar 2018 - 2:50 pm | बिटाकाका
१. विडिओमधील वाक्य तुम्ही बरोबर कोट केले आहे.
२. गडकरी मृत्यूंचीआकडेवारी सांगत आहेत त्यामुळे त्यातील ६८% मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे हे संयुक्तिक आहे, ६८% अपघात नाही. गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले असे माझे मत आहे. यातून तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे तो तुम्ही काढू शकता.
३. हेल्मेट घातल्याने अपघात थांबतील असं गडकरी म्हणतील किंवा त्यांना म्हणायचे असेल हे अजिबात पटत नाही. अपघात झाला आणि हेल्मेट नसेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असा सरळ सरळ अर्थ मलातरी लागतो.
12 Mar 2018 - 5:47 pm | रविकिरण फडके
"गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले..."
प्रत्येक बाईकच्या अपघातात काही बाईकस्वार मृत्युमुखी पडत नाही. मला अनेक अपघात माहीत आहेत - आणि तुम्हालाही माहीत असतील - ज्यात स्वाराला गंभीर दुखापत झाली, हाडे मोडली, पण तो जीवानिशी बचावला. असे मानले की बाईकच्या दोन अपघातात एक मृत्यू होतो तर बाईकच्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या १३६ टक्के भरते असा तुमच्या अर्थाचा अनर्थ होतो. अपघात व मृत्यूंचे प्रमाण गडकरींनी दिल्याप्रमाणे साधारण ४:१ असे पडते. म्हणजे बाईकचे अपघात एकूण अपघातांच्या ३००% होतात.
ह्यालाच मी 'वावदूकपणे' (म्हणजे बेजबाबदारीने) बोलणे म्हटले होते.
मजा अशी की लोकसभेतही कुणी फारसे गाम्भीर्यने घेत नाही कुणाचेच भाषण. त्यामुळे सगळे चालून जाते. असो!
12 Mar 2018 - 10:28 pm | बिटाकाका
तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा अर्थ लावण्याआधी त्यांचे आकडे इथे टाकाल का? मीही आकडे कुठून मिळाले तर टाकतो. उगाच वांझोटी चर्चा नको.
12 Mar 2018 - 10:39 pm | रविकिरण फडके
गडकरींच्याच भाषणात त्यानी दिले आहेत.
13 Mar 2018 - 5:16 pm | arunjoshi123
आपला टोटल पास.
13 Mar 2018 - 5:20 pm | arunjoshi123
मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का?
=========
हे मान्य केले तरी मंजे काय?
13 Mar 2018 - 10:53 pm | रविकिरण फडके
"मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का?"
माफ करा, मी नाही वाचलेली. कृपया संदर्भ दिलेत तर अवश्य वाचीन.
11 Mar 2018 - 8:28 pm | manguu@mail.com
नाशिकमधून मंगळवारी ६ मार्च निघालेला किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मोर्चात शेतकऱ्यांची असलेली संख्या वाढत असल्याचा दावा मोर्चेकरी करत असून मोर्चाला भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. हा लाँग मार्च सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मोर्चा सोमय्या मैदानातच अडवण्याचे प्रयत्न सरकारकडून होणार असून परिस्थितीचा अंदाज घेत हा मोर्चा आझाद मैदानाकडे जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दक्षिण मुंबईत हा मोर्चा आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मोर्चेकरी विधान भवनाकडे जाणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पोलीस यंत्रणांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. आज शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाहूरजवळ आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याच बरोबर किसान सभेच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेचे निमंत्रण दिले. तर, दुसरीकडे चर्चा आणि मोर्चा सुरू राहणार असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले. सरकारने चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे स्वागत असून मागण्या मान्य होईपर्यंत विधानसभेला घेराव घालणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
11 Mar 2018 - 9:55 pm | सर टोबी
विद्यमान सरकारला महागात पडू शकते. मी सरकारचा हितचिंतक नाही, पण जे आहेत त्यांच्या माहितीसाठी हा प्रतिसाद.
11 Mar 2018 - 10:30 pm | श्रीगुरुजी
शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.
12 Mar 2018 - 11:42 am | विशुमित
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>
==>> अगदी सहमत. काही मिळणार नाही. गाजरच दाखवले जाईल.
<<<मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.>>>
==>> ह्यात चातुर्य वगैरे काही दिसत नाही. मागील जे काय मोर्चे (मराठा मोर्च्यापासून सुरु झालेले) होते हे अहिंसक, शिस्तबद्ध, सामान्यांना कमीत कमी त्रासदायक ठरतील असे झाले आहेत. प्रत्येक वेळेस फडणवीसांनी तकलादू आश्वासने देऊन वेळ मारून नेली आहे. पुढे त्याचे काहीच झाले नाही, तो भाग सोडून द्या.
फक्त एक काळजी वाटते जर असे मोर्चे हिंसक प्रकारावर उतरले तर फडणवीसांची कसोटी लागेल. याची चुणूक कोरेगाव भीमा मध्ये पाहायला मिळाली आहे. यामध्ये सुद्धा दोन्ही समाजांनी समजूतदारपणा दाखवला म्हणून २-३ दिवसात सगळे आटोक्यात आले. राज्य सरकारचे यात कोणतेच कर्तृत्व नाही.
संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे.
बाय द वे चातुर्य दाखवणे म्हणजे गाजरच दाखवणार ना. खालील बातमी मध्ये धावपळ कशी चालू आहे स्पष्ट दिसत आहे. "अभ्यासाचं" कारण देऊन वेळ नक्की मारून नेतील, यात काय वादच नाही.
https://www.loksatta.com/mumbai-news/akhil-bhartiya-kisan-morcha-long-ma...
12 Mar 2018 - 1:40 pm | श्रीगुरुजी
सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते.
>>> संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे.
LLRC
12 Mar 2018 - 1:41 pm | श्रीगुरुजी
समजूत
12 Mar 2018 - 8:12 pm | विशुमित
<<<सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते.>>>
==>> अव्यवहारी जुमल्यांसारख्या का ??
12 Mar 2018 - 9:23 pm | श्रीगुरुजी
अव्यवहारी जुमले?
12 Mar 2018 - 10:32 pm | विशुमित
अडचणीचा प्रश्न विचारला की लगेच स्मृतिभ्रंश होतो.
12 Mar 2018 - 10:40 pm | श्रीगुरुजी
आमची कसलीही अडचण नाही व आम्हाला स्मृतिभ्रंश झालेला नाही. अव्यावहारिक जुमले हे शब्द ऐकिवात नसल्याने विचारलंय. माहिती नसेल तर तसं सांगा.
13 Mar 2018 - 12:44 am | कुंदन
https://en.wikipedia.org/wiki/1994_Gowari_stampede
13 Mar 2018 - 1:40 am | कपिलमुनी
114 मृत्यू ??
शरद पवारांच्या कारकिर्द मधल्या बऱ्याच डागांपैकी हा खूप मोठा आहे. लिंक बद्दल धन्यवाद ! हे पूर्वी वाचले नव्हते.
कोणी ऑफिशियल येऊन मोर्चाच्या मागण्या ऐकून घेणे आणि आश्वासन देणे ही एक साधी कृती असते. ज्यातून असंतोषाची दखल घेतली आहे हा मेसेज जातो.
एवढी अक्कल पवारांना नव्हती की मुद्दाम दुर्लक्ष केले ??
हा कसला डोंबलचा जाणता राजा आणि महाराष्ट्राचा नेता
13 Mar 2018 - 10:44 am | शलभ
पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे statement दिलं, ते तर अजून असंवेदनशील होतं. "मोर्चेकर्यांना अनुभव नाही. त्यांनी मुले महिला व वृद्धांना आघाडीवर ठेवण्याची चुक केली म्हणून इतके बळी गेले".
13 Mar 2018 - 10:50 am | पुंबा
आणि तरीही हा माणूस पुरोगामी, शेतकर्यांचा तारणहार, जाणता राजा..!
13 Mar 2018 - 5:22 pm | arunjoshi123
तुम्हाला कोणता तरी नेता आवडतो का?
13 Mar 2018 - 6:44 pm | कपिलमुनी
कोणिही नेता आवडत नाही . व्यक्तीपूजक नाही. चांगले काम केले तर चांगले म्हणायचे नैतर हाणायचे
12 Mar 2018 - 10:40 am | आलमगिर
आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची पद्धत आल्ये. मूळात कर्जमाफी ही करदात्यांच्या जिवावर झाली. आमच्याकडून पैसे उकळायचे आणी व्यर्थ द्यायचे हेच चालले आहे.
बर कर्जाचे पैसे शेतकरी कुठे वापरतो ते तपासायला याःचा विरोध. अन्नदाता वगैरे म्हणून डोक्यावर बसवणे नकौ.
12 Mar 2018 - 11:45 am | विशुमित
आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक टॅक्स किती भरता, कृपया सांगू शकाल का ?
म्हणजे माझे म्हणणे मी मांडतो.
12 Mar 2018 - 3:40 pm | आनन्दा
मी 5 लाख भरतो. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा.
12 Mar 2018 - 8:10 pm | विशुमित
हे आलमगीर यांच्यासाठी होते. कृपया तुम्ही लोड घेऊ नका.
12 Mar 2018 - 12:17 pm | विशुमित
ऑ 'तेरी .. तुम्ही 'सकाळ'वरील स्मिता पटवर्धनचे फॅन आहात तर. तरीच म्हंटले कुठं तरी वाचल्या होत्या या ओळी.
चालू द्या चालू द्या...
11 Mar 2018 - 10:25 pm | श्रीगुरुजी
खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त कुमार केतकर यांना अखेर आपल्या अनेक दशकांच्या गांधी घराण्याच्या निस्वार्थ सेवेचं फळ मिळालं आहे.
12 Mar 2018 - 12:23 am | कपिलमुनी
राणेंनी भाजपाची अशी काय सेवा केली की निष्ठवंताना डावलून त्यांना तिकीट दिले ?
एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तरी द्यायचे
12 Mar 2018 - 11:50 am | विशुमित
भाजप मध्ये ग्रामपंचायतीला देखील (बाटग्यांची मदत घेतल्याशिवाय) निवडून येऊ शकत नाहीत असे दस्तूरखुद्द गडकरी मागे म्हणाले होते.
12 Mar 2018 - 1:34 pm | श्रीगुरुजी
संदर्भ द्यावा ही नम्र विनंती.
12 Mar 2018 - 2:36 pm | विशुमित
https://www.youtube.com/watch?v=thA6BpyCnNU
12 Mar 2018 - 2:58 pm | श्रीगुरुजी
गडकरींनी तुमच्या साहेबांना हसतहसत अनेक उपरोधिक टोमणे मारले. तुमच्या साहेबांना कसनुसं हसण्यापलिकडे काहीही करता येत नव्हते.
12 Mar 2018 - 8:00 pm | विशुमित
तुम्हाला संदर्भ पाहिजे होता तो मी दिला पुढचे उरकायला नव्हते सांगितले.
त्यावर काही टिपणी असेल त्यावर चर्चा अपेक्षित आहे.
12 Mar 2018 - 9:25 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला अर्थ समजलेला दिसत नाही. तो तुमच्या साहेबांना मारलेला टोमणा होता.
13 Mar 2018 - 5:27 pm | arunjoshi123
या माणसाचा या क्षणापर्यंत आदर होता. हा तर पुरता नीच* आहे.
===================
* या शब्दाचा एक गैरजातीभेदवादी अर्थ पण असतो. त्या अय्यरनं इतकं थोबाड वाकडं करत हा शब्द उच्चारला होता कि या शब्दाच्या घाणेरडेपणाला एक उच्च दर्जा प्राप्त झाला. अय्यरीय नीचतेशी इथे संबंध अपेक्षित नाही.
14 Mar 2018 - 7:34 am | जेम्स वांड
जोशी, तुम्ही इथे हे लिहिताना थोबाड (तुमचंच) वाकडं केलं का नाही हे आता आणि आम्हाला कसं हो कळणार? नाही म्हणजे अय्यरीय नीच जर बेंचमार्क पकडलं तर तुमचं थोबाड किती वाकडं झालं होतं (त्या विविक्षित क्षणी) हे पाहून On a scale on अय्यरीय नीच, तुमचं विधान किती टक्के जातीयवादी होतं अन किती टक्के जातिभेदोत्तर होतं हे कळायला बरं पडलं असतं, सेल्फी टाकायला हवी होती तुम्ही =))
11 Mar 2018 - 10:31 pm | Nitin Palkar
केवळ भाजप विरोध हा भाजपेतर सर्व पक्षियांचा एकमेव अजेंडा असल्याने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होई पर्यंत हे प्रकार अधिक जोर धरतील.
12 Mar 2018 - 11:48 am | विशुमित
सर्वपक्षीय विरोध असला तरी भाजप सगळ्या ठिकाणी निवडणूक जिंकत आहेत ना! हे कसे काय बुवा??
हे सर्व शेतकरी राजकीय हेतू ने आलेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
12 Mar 2018 - 10:50 pm | श्रीगुरुजी
शेतक-यांना हे नेते फसवित आहेत.
12 Mar 2018 - 10:37 am | sagarpdy
https://www.ndtv.com/india-news/narayan-rane-among-bjps-18-rajya-sabha-c...
अच्छे दिन आले हो !
12 Mar 2018 - 5:47 pm | जेम्स वांड
तुमच्या इथल्या कॉमेंटचा संदर्भ घेऊन विचारतोय,
१. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का?
२. राणेंना आमदारकी होती, त्यांना मंत्रिपद मिळणे ह्याने ब्राह्मण समाज दुखावला असता अन त्यांना (ब्राह्मण समाजाला) भाजप अव्हेरू शकत नाही असे आपले म्हणणे होते, इथे तर थेट खासदारकी अन राज्यसभेचे वारे वाहतेय, म्हणजे मी म्हणलेलं ब्राह्मणांना भाजपची गरज आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाही हे खरे मानावे का? की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल.
३. ब्राह्मण समाज ही एकगठ्ठा मतपेढी नसल्यामुळे भाजपला त्यांच्यात रस नाही, शिवाय भाजपच्या नव्या ओबीसी/ वेगवेगळ्या जातीय केंद्रित राजकारणाला अनुसरून खेळ सुरू आहेत का? मुळात मला वाटतंय तसं हे राजकारण जातीय मतपेढीवर आधारित आहे का? उत्तर हो असले किंवा नसले तरी ह्यावर ब्राह्मण समाजाची प्रतिक्रिया काय असावी? पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी?
12 Mar 2018 - 6:25 pm | श्रीगुरुजी
>>> १. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का?
राणेला भाजपत घेतलेले नाही
>>> की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल.
राणेला भाजपत घेतलेले नाही
>>> पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी?
खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी सद्यपरिस्थितीत भाजपलाच पाठिंबा सुरू ठेवावा. भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा.
12 Mar 2018 - 6:40 pm | कपिलमुनी
भाजपाने नारायण राणे यांना तिकिट देवून खासदार करणे तुम्हाला पटले का ??
12 Mar 2018 - 7:04 pm | श्रीगुरुजी
नाही
12 Mar 2018 - 8:21 pm | जेम्स वांड
नारायण राणे ह्यांना पक्षात घेतलेले नाही असे तुम्ही म्हणता आहात, पण राणेंना भाजपकडून राज्यसभेचे तिकीट मिळालेलं आवडलं नाही असेही म्हणताय, मला पडलेला प्रश्न असा की
पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो? जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे?
दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी?
(मुळात माझा तुमच्याइतका अभ्यास अन व्यासंग नाही, चार लोक जेव्हा मला विचारतील भाजपने असे का केले, तर त्याला द्यावयाचे उत्तर मला तुमच्या उत्तरातून मिळेल ही आशा मात्र पक्की आहे)
12 Mar 2018 - 9:32 pm | श्रीगुरुजी
>>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो?
राणे भाजपचा उमेदवार नसून भाजपच्या पाठिंब्यावर उभा आहे.
>>> जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे?
कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे.
>>> दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी?
राणे भाजपचा उमेदवार नाही. भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवार आहे.
12 Mar 2018 - 9:52 pm | जेम्स वांड
कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे.
हे असंच असावं असे मनापासून वाटतंय!
13 Mar 2018 - 4:02 pm | sagarpdy
आजारापेक्षा औषध वाईट अशी काहीशी म्हण आहे ना ?
12 Mar 2018 - 8:02 pm | विशुमित
यांना काय वाटते हे भाजप वाले हिंग लावून पण पुसत नाही?
12 Mar 2018 - 7:57 pm | विशुमित
भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा.
LLRC
12 Mar 2018 - 8:03 pm | विशुमित
<<<खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत>>
==>> म्हणजे भाजप शेठजी-भटजी समर्थक आहे तर.
12 Mar 2018 - 10:43 pm | श्रीगुरुजी
हेही समजलं नाही असं दिसतंय. भाजप ब्राह्मणद्वेष्टा नाही असा याचा अर्थ आहे.
13 Mar 2018 - 5:35 pm | arunjoshi123
शेठजी, भटजी भारताचे नागरिक नाहीत का रे बाबा? त्यांचं समर्थन केलेलं "देशद्रोह" कसा?
12 Mar 2018 - 12:01 pm | प्रचेतस
हा कालच्या वर्तमानपत्रात आलेला लेख. त्यांनी बोटचेपेपणा करुन काढून घेतला तरी इतर ठिकाणी मिळालाच.
12 Mar 2018 - 12:08 pm | जानु
शेतकरी मोर्चातली बहुसंख्य जनता ही पेठ आणि सुरागण्यातील आदिवासी आहे. यांची सर्वात जुनी मागणी म्हणजे ज्या वन जमिनी कसतात त्या नावावर करून द्या. मुळात ही मागणी ६० च्या दशकापासून आहे.
12 Mar 2018 - 12:22 pm | प्रचेतस
मुंबई :
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर अद्याप त्यांच्या मुंबईतल्या नव्या घरात शिफ्ट झालेले नाहीत. सध्या त्यांनी भाड्याच्या घरातच संसार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विराटने वरळीतील एका इमारतीत ४० व्या मजल्यावर घर भाड्याने घेतले आहे. या घराचे महिन्याचे भाडे १५ लाख रुपये आहे.
२०१६ मध्ये विराटने वरळीतील 'स्काय बंगलो' या प्रकल्पात ८ हजार रुपये चौरस फुटांचा फ्लॅट बुक केला होता. हा फ्लॅट अद्याप तयार होत आहे. याची किंमत ३४ कोटी रुपये आहे. या फ्लॅटचा ताबा विराट-अनुष्काला २०१९ पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी २४ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घर घेतलं आहे. या फ्लॅटचं डिपॉझिट १.५ कोटी रुपये आहे. २,६७५ चौरस फुटांचं हे घर वरळीच्या अॅनी बेझंट रोडवरील 'लिजंड' इमारतीत ४० व्या मजल्यावर आहे.
या फ्लॅटसाठी १ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. विराट कोहलीने टि्वटरवर या फ्लॅटमधून बाहेर दिसणाऱ्या दृश्याचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने म्हटलंय की 'जर तुमच्या घरातून असं सुंदर दृश्य दिसत असेल तर तुम्हाला आणखी काय हवं?'
(सौजन्यः मटा)
12 Mar 2018 - 12:23 pm | प्रचेतस
सुपरस्टार रजनीकांत यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही आता चालू झालंय. इन्स्टावर त्यांची एंट्री होताच तिथे त्यांच्या चाहत्यांची संख्या झटपट लाखोंच्या घरात पोहोचली. या थलैवानं त्याच्या चित्रपटामधला एक झकास फोटो त्यानं शेअर केला. अनेक चाहत्यांनी तो ठिकठिकाणी शेअर केला. आपल्या लाडक्या कलाकाराचा फोटो लाइक करत त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं.

(सौजन्य : मटा)
12 Mar 2018 - 12:25 pm | प्रचेतस
शिवणे (पुणे) : येथे औद्योगिक क्षेत्र परिसरात 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) रस्त्यावर पडल्याने जाणाऱ्या वाहन चालकांना शॉक बसला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
शिवणे गावातील कालव्याच्या रस्त्याने खान वस्तीकडे रस्त्या जातो. त्या रस्त्याच्या वरून औद्योगिक क्षेत्र परिसराला 11 हजार किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी (लाईटची तार) जाते. आवाज होऊन ती वीज वाहिनी या रस्त्यावर अचानक खाली पडली. घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर शिर्के दुचाकीवरून तेथून जात होते. तू व्हीलर थांबा पुढे जाऊ नका. असे काही लोक त्यांना ओरडत होते. ते थांबले त्यांनी पाहिले असता. वीज वाहिनी रस्त्यावर पडली होती. त्यावेळी टेम्पो व दुचाकी चालक तेथून जात होते. त्यांना शॉक लागल्याची माहिती यावेळी नागरिकांनी सांगितल्याचे शिर्के यांनी 'सकाळ' शी बोलताना ही माहिती दिली.
(सौजन्यः सकाळ)
12 Mar 2018 - 12:29 pm | विशुमित
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>
==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..
12 Mar 2018 - 1:03 pm | शलभ
सहमत आहे.
अशा बोलण्यामुळे सरकारविरूद्धचा रोष वाढत जातो.
12 Mar 2018 - 1:32 pm | बिटाकाका
तो वाढावा अशीच तर अंध विरोधकांची इच्छा आहे, नाही का? मग उलट अशा वक्तव्याना समर्थन द्यायला नको का?
===============================
हा राजकीय मोर्चा नाही म्हणणार्यांनी त्या सिपीआयच्या झेंड्याबद्दलही दोन शब्द व्यक्त करावेत. अशानेच सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या संवेदनांना छेद जात नाही का? सामान्य शेतकऱ्यांच्या मागे सामान्य माणूस नेहमी उभा राहतो असं इतिहास सांगतो.
12 Mar 2018 - 1:33 pm | श्रीगुरुजी
यात काय असंवेदनाशील आहे? ही वस्तुस्थिती आहे.
12 Mar 2018 - 8:06 pm | विशुमित
तुम्हाला माणसांपेक्षा बैलं प्रिय आहेत हे मागेच समजले आहे.
12 Mar 2018 - 10:46 pm | श्रीगुरुजी
माझ्या दृष्टीने सर्व सजीवांच्या जीवाला किंमत आहे. मुक्या जनावरांवर क्रूर अत्याचार करण्यास माझा विरोध आहे.
13 Mar 2018 - 8:01 am | आनन्दा
माणसांच्या करामणुकीपेक्षा बैलांचा जीव मलादेखील नक्कीच प्रिय आहे.
आय सेकंड.
14 Mar 2018 - 7:37 am | जेम्स वांड
फक्त बैलांच्या *करमणुकीत* माणसांचेही जीव जायला नको म्हणून बैल *पाळीव* करण्याला उगाच अंधविरोध नसावा
12 Mar 2018 - 1:52 pm | मराठी_माणूस
सहमत. अतिशय खेदजनक.
हे पण नेहमीचेच का ?
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MumbaiMirror/
--------------------------------------
ह्याच चालीवर , "लोकल ची बेसुमार गर्दी, त्यातुन पडणारे लोक", "पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे, तुंबणारे रस्ते" इत्यादी इत्यादी हे पण नेहमीचेच असेही म्हणता येईल
12 Mar 2018 - 9:46 pm | सर टोबी
अनेक चांगले आय डी इथे धारातीर्थी पडलेत. तेंव्हा जमेल तेव्हडा विरोध करायचा बाकी सोडून द्यायचे.
13 Mar 2018 - 5:40 pm | arunjoshi123
हो ना.
वर १ लाख लाल टोप्या, १ एक लाख लाल झेंडे.
६ तारखेपासून ३ वेळेसचं जेवण.
परतीचा प्रवास.
कित्ती तो खर्च्च.
आणि ७ दिवसाचं उत्पन्नाचं नुसकान!
बिचारे गरीब शेतकरी इतका खर्च कसा उचलणार?
14 Mar 2018 - 7:26 am | श्रीगुरुजी
<<<शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>>
==> अशा असंवेदनशील वाक्याला मिपावर कोणीच निषेद नोंदवला नाही, याचे सखेद दुःख वाटले. असो..
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-farmers-will-...
आणखी एक आंदोलन!
___________________
किसान सभेच्या यशस्वी मोर्चानंतर आता राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. किसान सभेचा मोर्चा हा त्या पक्षाचा होता, त्या मोर्चाशी आमचा संबंध नाही. सभेचा मोर्चा यशस्वी झाला पण काही प्रश्नांची पूर्ण तड लागलेली नाही. त्यामुळे विविध प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली आहे, असा युक्तिवाद समितीने केला आहे.
मंगळवारी यासदंर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार झाला. शेतकरी सभेच्या मोर्चाला तुम्ही पाठिंबा का नाही दिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन मोर्चे का काढता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांमध्ये एकी नाही का, तुमच्यातच फूट पडली आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर समितीने भूमिका मांडली. यावेळी रघुनाथदादा पाटील, सिद्धप्पा कलशेट्टी, सुशीला मोरोळे, किशोर ढमाले आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार सभेचे अजित नवले मात्र अनुपस्थित होते.
___________________________________
हे शेतकरी नेते अत्यंत निर्लज्ज आहेत. अजित नवलेला महत्त्व मिळाल्याने या इतर नेत्यांना मिरची लागलेली दिसते. यांना शेतक-यांविषयी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविणे, जनतेला उपद्रव देणे एवढेच यांना जमते.
14 Mar 2018 - 9:38 am | श्रीगुरुजी
फडणविसांसारखे संवेदनाशील व कार्यक्शम मुख्यमंत्री मिळण्याची शेतक-यांची पात्रताच नाही. त्यांना काहीही न देता पार्श्वभागावर लाथा घालणारी खांग्रेस/भ्रष्टव्याधीच हवी.
14 Mar 2018 - 9:44 am | विशुमित
LLRC
14 Mar 2018 - 9:50 am | श्रीगुरुजी
तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.
12 Mar 2018 - 2:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.
२०१९ साली २००४ ची पुनरावृत्ती होणार असे दिसू लागले आहे. त्यावेळी शायनिंग इंडिया चालू होते.नितिन गडकरींबद्दल काय बोलणार ?हसत हसत वेळ मारून नेणे म्हणजे चातुर्य असे त्यांचा समज.
12 Mar 2018 - 2:40 pm | कपिलमुनी
स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही.
बाकी कम्युनिस्ट लोकांना शिव्या देण्याची किंवा प्रवाहा बाहेर ठेवणार्यांचि गंमत वाटते . नाहि रे वर्गातले लोक नेहमी कम्युनिझम कडे आकर्शित होतात , आणि आहे रे वाले भांडवल शाहि कडे !
१०० % भांडवल शाही आणि १०० % कम्युनिझम दोन्हि प्रॅक्टिकल नाहि.
12 Mar 2018 - 2:53 pm | प्रचेतस
भांडवलशाहीने (सामान्य लोकांचही, सर्वांचं नव्हे) भलं झालेलं अनेक देश दाखवू शकतो, कम्युनिझमनं भलं झालेले कुठले देश आहेत?
12 Mar 2018 - 5:05 pm | कपिलमुनी
शेतकर्यांचे हक्क, कामगारांचे हक्क , सोयि , मेडिकल , पेन्शन , हक्काच्या रजा अशा अनेक गोष्टी या तून उदयास आल्या आहेत.
मी १०० % कम्युनिझमचा समर्थक नाहि. पण भांडवल शाहि मध्ये आहे रे आणि नाहि रे यातील दरी वाढत जाते ,
13 Mar 2018 - 5:44 pm | arunjoshi123
आणि अस्तालाही पावलं आहे.
12 Mar 2018 - 2:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी बरोबर. हे समजणे पूनम महाजनच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून मोर्च्यामागे नक्षल्वाद्यांचा हात असे तर्कट मांडून ती मोकळी झाली.
12 Mar 2018 - 3:47 pm | माहितगार
जी गोष्ट करून पाहिली नाही त्याचे आकर्षण वाटत असणेही शक्य आहे. कम्युनीझमचे नुसतेच समर्थन करण्यापेक्षा काही काळ कम्युनीझमचा अनुभव घेऊन पहाण्यास काय हरकत आहे आणि ते कम्युनीस्ट पक्षानेच केले पाहीजे असे नाही इतर पक्षांनी सुद्धा काही काळासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करून पहाण्यास काय हरकत आहे. शेतकर्ञांच्या मुलांना त्यांच्याच शेतात नौकर्याही देता येतील . कर्ज काढण्याचे , पुन्हा माफ करण्यासाठी आंदोलनांचे आत्महत्या इत्यादींचे चक्रही रहाणार नाही. आत्महत्या टळल्याने आणि आंदोलने थांबल्याने उत्पादकताही वाढेल.
***
मी नेता झालोतर शेतीचे राष्त्रीयीकरण कधीही करणार नाही, मला माझ्या हातचे आंदोलनाचे काम जाऊन शेतात कष्ट करणे जमणारे नाही !
:)
12 Mar 2018 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
घराला आग लागली तर काय होईल याचा अंदाज येण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावायची गरज नाही. इतरांच्या घराला लागलेल्या आगीने काय झाले हे अभ्यासले तर जास्त चांगले होईल :)
उदा: कम्युनिझम प्रेरित "सुधारणांचा" चीन, रशियाचा, कंबोडिया, येमेन आणि अनेक आफ्रिकन देश यांच्यातील अनुभव कानठळ्या बसतील इतका बोलका आहे !
आज कम्युनिझमने शंभरी गाठूनही, सर्वसामान्य नागरिकाचे जिणे आनंदी तर सोडाच, पण कमीत कमी स्वतंत्र आणि सुसह्य झालेला एकही कम्युनिस्ट देश दाखवणे शक्य झालेले नाही. हे पुरेसे बोलके नाही का ? कम्युनिझमचे सगळे तथाकथित युटोपियन वायदे, केवळ भोळ्या पुस्तकी संकल्पना राहिल्या आहेत आणि प्रत्यक्षात गरीब-शेतकरी-कामकरी यांना खोटी प्रलोभने दाखवून, वर वर "पिपल्स हे, पिपल्स ते" असे फसवे पांघरूण घालून त्याखाली प्रत्यक्षात सरंजामी-लष्करी हुकुमशाह्या तयार केल्या गेल्या आहेत. आणि त्याला होणारा जरासाही विरोध हिंसेने/हत्येने नष्ट केला गेला आहे. हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे ! :(
12 Mar 2018 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे... लेखनावरून तुम्ही विचारी दिसता. कम्युनिस्ट राजवटीत सर्वात प्रथम, विचारी माणसांची रवानगी शेतावर किंवा गुलागमध्ये किंवा रशियामध्ये सायबेरियात केली जाते. तेव्हा, असा काही विचार करताना सांभाळून असा ! ;) =))
13 Mar 2018 - 8:58 pm | माहितगार
असे काही झाले आप, अशा काही निमीत्ताने तरी आपल्या दोघांच्या भेटीचा योग येईल. मेहनतीने तब्येत बरी रहाते असे तुम्ही डॉक्टर लोकच सांगताना :) पण ज्या कम्यूनीस्ट मिपाकरांना जरा बदल म्हणून त्यांच्या बाजूने प्रतिसाद लिहिला तर त्यांच्या पैकी शेती च्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ कुणीच कसे पुढे आलेले नाही . तोट्यातील शेती सरकारला देऊन सरकारकडे नौकरी करण्यासारखी खरेतर ला जवाब कम्यूनीस्ट आयडीया दुसरी कोणती नाही . प्रतिसादापुरते कम्युनीस्ट होऊन पाहीले तरी कुणी कम्युनीस्ट समर्थनार्थ अद्याप पुढे कसा आला नाही बरे ! ;)
13 Mar 2018 - 9:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
कम्युनिस्ट राजवटीतील उद्योग आणि शेतीच्या राष्ट्रियिकरणाचे परिणाम संक्षिप्त स्वरुपात इथे पाहता येतील.
12 Mar 2018 - 8:08 pm | विशुमित
<<स्मिता पटवर्धनांच्या लेखाचा प्रतिवाद करता येइल , पण त्या इथे नाहीत त्यामुळे त्यांच्या पर्यंत पोचणार नाही.>>>
==>> स्मिता पटवर्धन व्यक्ती नाही वृत्ती आहे, इथून आरामशीर पोहचेल त्यांच्या पर्यंत.
13 Mar 2018 - 5:42 pm | arunjoshi123
मग काय, आपला शिक्का - पंजावर पक्का?
13 Mar 2018 - 5:46 pm | arunjoshi123
सहमत आहे.
प्रत्येक विचारधारेचा आदर झाला पाहिजे.
शेवटी विचारधारा इ सर्व बकवास असतं, माणसं कशी आहेत हे महत्त्वाचं.
12 Mar 2018 - 9:25 pm | कपिलमुनी
ट्रोल धाड --भाजपाच्या सायबर सैनिकांचं अमित शाहनी घेतलं बौद्धिक
13 Mar 2018 - 5:53 pm | arunjoshi123
तुमच्यासारख्या लोकांमुळं भाजपचा सायबर सैनिक बनायला अनेकांना प्रेरणा मिळते.
==============
आणि हो, अगदी खरंच, निरव मोदीच्या मॅटरमधे पडती बाजू घ्यायचं कारण नाही. संपूर्ण केसमधे मोदी पळाला हेच्च नि एवढ्ढंच पाहणारे गाढव असतील तर त्यांचं निर्गाढवीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
12 Mar 2018 - 10:12 pm | गामा पैलवान
माईसाहेब,
त्याचं काय आहे की ग्रामीण व मागास भागांतून नक्षलवाद्यांची पीछेहाट चालू आहे. म्हणून त्यांनी शहरांवर लक्ष केंद्रित केलंय. कोरेगाव भीमा निमित्ताने झालेली सणसवाडी इथली दंगल हे या नव्या व्यूहरचनेचंच अपत्य आहे.
मुंबईत साधारणत: मोर्चाचा मुख्य घोळका निघून गेल्यावर शांतता असते. यंदा मात्र एकापाठोपाठ एक असे घोळके हिंडत होते. हे कशाचं लक्षण आहे ते आम्हांस चांगलं समजतं. तेंव्हा जरा वस्तुस्थितीवर भाष्य केलंत तर बरं पडेल.
आ.न.,
-गा.पै.
12 Mar 2018 - 10:24 pm | विशुमित
राणीच्या गावात राहून कोरेगाव भीमा बद्दल तुमच्याकडे असणारी माहिती वाखाणण्याजोगी आहे. (हा. घ्या )
12 Mar 2018 - 11:46 pm | गामा पैलवान
विशुमित,
अहो जग जवळ आलंय : https://www.bbc.com/marathi/42541030
मुंबईत ९० बशी आणि राज्यभरात १६७ फोडण्याची प्रकाश आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाची ताकद वा नियोजन आहे का? साधा प्रश्न आहे. याउलट नक्षलवादी पद्धतशीरपणे हिंसाचार करतात. प्रकाश आंबेडकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चाप ओढतोय ना?
आ.न.,
-गा.पै.
12 Mar 2018 - 11:56 pm | विशुमित
बातमीनुसार भिडे आणि एकबोटेंवरच निशाणा साधला तर चाप ओढणाऱ्यांनी?? बरोबर ना ??
13 Mar 2018 - 12:39 am | manguu@mail.com
इंजिनवाल्यानीही मुंबईत बशी फोडल्या होत्या की . त्याना शिकवायला नक्षली आले होते का ?
किंबहुना , बहुजनांची आधी कुरापत काढून नंतर त्यांच्या reaction चा गवगवा करून त्याना नक्षली ठरवण्याचा प्लॅन तर नसेल ?
13 Mar 2018 - 2:38 am | गामा पैलवान
अहो मंगू, इंजिनवाल्यांची ताकद किती? प्रकाश आंबेडकरांची ताकद किती? जरा तुलना करून पाहता का!
आ.न.,
-गा.पै.
12 Mar 2018 - 10:25 pm | कपिलमुनी
नवपरिणीत भाजपा नेत्याची खास लिंक तुमच्यासाठी
नरेश अगरवाल !
काही मतासाठी भाजपने नुकतेच पावन केलेत. सर्व हिंदू लोकांनी ऐकावी .
12 Mar 2018 - 11:11 pm | श्रीगुरुजी
नरेश आगरवालला प्रवेश देणे हा चुकीचा निर्णय आहे.
12 Mar 2018 - 11:18 pm | बिटाकाका
नुसताच चुकीचा निर्णय नाही तर बाद कॅटेगरीतील निर्णय! भाजप जर कधी रसातळाला गेलंच तर ते असल्या बाद निर्णयांमुळेच!!
12 Mar 2018 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१,००,०००
भाजपा इतकी अगतिक का झाली आहे हे अनाकलनिय आहे !
12 Mar 2018 - 11:20 pm | विशुमित
LLRC
13 Mar 2018 - 2:42 am | गामा पैलवान
कपिलमुनी,
दुव्याबद्दल धन्यवाद! जेटलींनी चांगलाच समाचार घेतलाय. असेच छानछान चलचित्रं पाठवीत चला.
आ.न.,
-गा.पै.
13 Mar 2018 - 8:16 am | जेम्स वांड
आपण ह्यावर श्रीगुरुजींचे विश्लेषण घेऊया, नारायण राणे भाजपात आला नाहीये तर भाजपने राणेंना फक्त पाठिंबा दिलाय हे त्यांनी मला कालच नीट समजवले आहे (अन मला ते पटलेले ही आहे) , फक्त पाठिंबा देणे म्हणजे पक्षात घेणे नसते (मग तो पाठिंबा राज्यसभेवर जायला असला तरीही) , आता काल त्यांनी इतकं उत्तम विश्लेषण दिल्यावर मला तरी अजून काही प्रश्न नाहीयेत, तुम्ही पण वाट पहा ही विनंती.
13 Mar 2018 - 5:58 pm | arunjoshi123
सगळी घाण प्रमुख राष्ट्रिय राजकीय पक्षांत असायला हवी. हे लोक पक्षाच्या रोलवर नसताना समाजासाठी खूप जास्त खतरनाक असतात. ज्यांना जेल मधे टाकता येत नाही त्यांना राष्ट्रीय पक्षांत टाकावे. उदा. केजरीवाल काँग्रेसमधे असता तर खूप बरं राहिलं असतं. त्याचा सवता सुभा असल्यानं त्यानं केलेली घाण अतीच आहे.
14 Mar 2018 - 7:46 am | जेम्स वांड
हे तुम्ही भाजप ,काँग्रेस इत्यादींच्या राष्ट्रीय कार्यकारणीना समजावून सांगा न प्लीज, म्हणजे त्यांनी उजळ माथ्याने राष्ट्रीय कारणांनी राष्ट्रहितासाठी आम्ही ही घाण पार्टीत घेत आहोत असे एकदाचे (काहींच्या मते कोडगेपणाने) सांगून टाकले की भेंडी डोक्याला शॉटच नाही लागणार मीडियाचा, आज काय दिवसभर नारायण राणे पहा, उद्या काय दिवसभर नरेश अग्रवाल पहा असले आयटमच नको तेज्यायला. इथे निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन घाण पवित्र करून घेतली जातेय तिला नैतिक अधिष्ठान पण मिळेल,
मी तर म्हणतो गंगा स्वच्छ करण्यावर करोडो कश्याला खर्च करा! गंगा नदीच भाजप मध्ये घेऊन टाका! राणे अग्रवाल प्रमाणे ती पण 'साफ' होऊन जाईल.
14 Mar 2018 - 10:09 am | arunjoshi123
हेच चूक आहे. घाण ९९% केसेसमधे पवित्र होत नाही. ती राष्ट्रीय पक्षात असलेले इष्ट.
14 Mar 2018 - 10:50 am | बिटाकाका
नाही पण मी काय म्हणतो, हे पवित्र करणे, साफ करणे म्हणजे नेमके काय? म्हणजे भाजप मध्ये कोणी प्रवेश केला कि पवित्र करून घेतले वगैरे का म्हणतात?
==============================
ते नवज्योतसिंग सिद्धू, नाना पटोले वगैरे पवित्र होतात कि घाण?
15 Mar 2018 - 8:43 am | जेम्स वांड
नवज्योतसिंह सिद्धू किंवा नाना पटोलेंपैकी कोणी प्रभू रामचंद्राबद्दल अक्षरशः हीन वक्तव्य केलंय काय? नरेश अग्रवालचा इतिहास तुम्हाला माहिती नाही का? प्रत्यक्ष सदनात तो काय बोललाय हे मी तरी एक धर्माभिमानी हिंदू म्हणून मी अवाक्षरही परत लिहू बोलू चर्चा करू इच्छित नाही, तुम्हांस गरज असल्यास तुम्ही ते शोधून पहा.
तुम्हाला भाजप प्यारी असेल अन तिच्या उडत्या पडत्या बाजूनेही वाद घालायचाच असेल तर निरुपाय, पण मी तुम्हाला माझ्याप्रमाणेच धर्माभिमानी गृहस्थ मानत होतो. तुमच्यासाठी भाजप पहिला असेल माझ्यासाठी रामलल्ला आहे. इतकेच :)
15 Mar 2018 - 9:27 am | श्रीगुरुजी
सहमत आहे. नरेश आगरवालला प्रवेश देणे ही चूक आहे.
15 Mar 2018 - 10:26 am | बिटाकाका
वांड साहेब, गल्लत होतीय साहेब! माझा प्रश्न नरेश अग्रवालबद्दल नाही तर कोणीही भाजप मध्ये आलं (उदा. आख्खी पिंपरी चिंचवड वगैरे) कि तेच तुणतुणं वाजवलं जातं त्याबद्दल आहे. माझं नरेश अग्रवालला घेण्याबद्दलचं मत वरच मांडलं आहे, तुमच्या वाचनसोयीसाठी खाली लिंक देतो.
http://www.misalpav.com/comment/986470#comment-986470
=========================
या स्पष्टीकरणासह परत तोच प्रश्न विचारतो - भाजपमध्ये घेऊन पवित्र करणे म्हणजे नेमके काय करणे?
15 Mar 2018 - 10:49 am | जेम्स वांड
तर पवित्र करणे ह्यावर माझा टेक मांडतो, पटला तर बघा काही वेगळं वाटत असेल तर निःशंकपणे सांगा मी माझे विचार बदलून घेईन.
पवित्र करून घेणे म्हणजे, समजा क्ष ह्या मतदारसंघात भाजपला जिंकायचा चान्स कमी आहे, पण तिथला विरोधीपक्ष सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्ट आहे, तिथे त्यांनी (विरोधकांनी) जिंकू शकणारा उमेदवार सोडून तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिलंय तर अश्या उमेदवाराला भाजप मध्ये घेऊन , स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून, ह्या आयात उमेदवाराला तिकीट देणे. बऱ्याचवेळी हे उमेदवार भूतकाळात भाजपवर घणाघाती टीका करून चुकलेले असतात, किंवा त्यांच्या पूर्वपक्षात त्यांनी केलेल्या काही भ्रष्टाचार, अनैतिक वक्तव्यावर भाजपने ही (भूतकाळात) यथेच्छ टीका केलेली असते, पण ते सगळे विसरून फक्त ती सीट मिळवायला भाजपने त्या बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक प्रामाणिक कार्यकर्ते डावलून फक्त जिंकायचे म्हणून तिकीट दिले की त्याला पवित्र करून घेणे म्हणले जात असावे.
15 Mar 2018 - 11:39 am | बिटाकाका
हम्म ओके, मी या (टाईपच्या) पवित्र करण्याला मग राजकारण असेच म्हणेन.
---------------------------------------
मला वाटतं हि भाजपला अनेक निवडणुका हरल्यानंतर आलेली उपरती असावी. सत्तेत येण्यासाठी नुसती नैतिकता ठेऊन चालत नाही. वाजपेयींच्या बाजूने सर्वसाधारण मत असताना (वाजपेयींच्या वेळी) देखील फक्त प्रत्येक दोलायमान मतदारसंघ टार्गेट एरिया ठरवून तिथे जिंकणारे उमेदवार दिल्याने काँग्रेस सत्तेत येऊ शकली असे मला वाटते. भाजपची आताची स्ट्रॅटेजीहि अशीच दिसतेय.
--------------------------------------
पण तरीही स्थानिकांना, निष्ठवंतांना डावलून वगैरे मुद्दा मला पटत नाही. अशी टिका टाळायची असेल तर १००% निष्ठावंतांना तिकीट देणे हा एकच मार्ग उरतो. हि अशी निष्ठावंतांना डावलल्याची टिका करताना त्या डावलण्याचे प्रमाण काय हे पूर्णपणे विसरून हवेत गोळीबार केला जातो असे मला वाटते.
15 Mar 2018 - 11:45 am | जेम्स वांड
इत्यादींवर मी ताज्या घडामोडी -२६ वर कॉमेंट केलीये काका, त्याची इथे द्विरुक्ती टाळतो, तिकडे ह्या उपरतीवर माझे विचार मी मांडले आहेत. :)
14 Mar 2018 - 10:47 am | चिर्कुट
निर्लज्ज पक्षाचं महानिर्लज्ज समर्थन..
14 Mar 2018 - 3:29 pm | arunjoshi123
भाजप निर्लज्ज असेल. पण मी केलेलं विधान फक्त भाजपसाठी नाही.
===================
अ चे ८ मुले आहेत. त्यात एक गुंड आहे. तर तो देखील एकत्र कुटुंबात राहावा असं जनरल म्हटलंय. त्या कुटुंबाला इज्जत सांभाळायची असते नि गुंड मुलगा कुणाचं ना कुणाचं काही ना काही ऐकत असतो. तो शहरातल्या खोलीवर राहून सुसाट सुटल्यापेक्षा बरं.
===================
बाकी सलज्ज पक्ष कोणते ते आम्हालाही सांगा. मतदानासाठी माहीती कामी येईल.
13 Mar 2018 - 6:00 pm | arunjoshi123
नास्तिक बीजेपीत आल्यानं कपिलमुनींना थोडं बरं वाटायला हवं.
12 Mar 2018 - 10:56 pm | श्रीगुरुजी
मोर्चातील एक शेतकरी
12 Mar 2018 - 11:22 pm | श्रीगुरुजी
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या गरीब शेतक-याकडे बराच मोठा चतुर भ्रमणध्वनी संच दिसतोय.
12 Mar 2018 - 11:31 pm | विशुमित
कोणाचा आहे ?
कोणत्या कंपनीचा आहे ?
कधी घेतला आहे ?
13 Mar 2018 - 12:28 am | विशुमित
बरं झाले म्हणायचं शेतकऱ्यांनी ४०-४० हजाराची बैलं आणली नाहीत मोर्च्याबरोबर नाही.
13 Mar 2018 - 6:11 pm | श्रीगुरुजी
म्हणजे बैलांनी गरीब बिच्चा-या शेतक-यांसाठी अपार यातना सहन करून खच्चीकरण करून घ्यायचे, नाकात वेसण घालून घेऊन भर उन्हात नांगर ओढायचा, प्रचंड ओझे लादलेली गाडी ओढायची, प्रचंड अत्याचार व छळ सहन करीत शर्यतीत तोंडाला फेस येईपर्यंत उरापाड धावून गरीब बिच्चा-या गांजलेल्या कर्जबाजारी शेतक-यांचे मनोरंजन करायचे, वय झाल्यावर खाटकाची सुरी मानेवर फिरवून घ्यायची आणि गरीब बिच्चा-या गांजलेल्या शेतक-यांच्या मोर्चातही तंगडतोड करायची. वा!
14 Mar 2018 - 8:27 am | विशुमित
तुम्हाला मुद्दा समजला नाही...
प्रतिसादाची Sequence बघा.
14 Mar 2018 - 8:30 am | विशुमित
तुम्हाला मुद्दा समजला नाही...
प्रतिसादाची Sequence बघा.
13 Mar 2018 - 10:24 am | शलभ
जरा मोर्च्या बद्दल सगळ्या बातम्या बघितल्या तरी कळेल कि हे आलेले नक्कि कोण आहेत, बहुसंख्यांच्या मागण्या किती साध्या आहेत. उगाच फोटो मधे एखादा फोन दिसला, टाय दिसली तर बोंब मारायची. उन्हातानात चालणारे अनवाणी पाय नाही दिसले, त्या पायांना पडलेल्या भेगा नाही दिसल्या.
तुमच्यासारख्या समर्थकांमुळे सरकार बदनाम होतंय, तुम्ही लोकांनी अशा बाबतीत आपली तोंडं बंद ठेवली तरी सरकारवर उपकार होतील.
----------------------------------
फडणवीस सरकारने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फक्त आयत्या मोर्च्यावर आपला फायदा उचलायला बघत होते, ते पण जेव्हा मोर्चा मुंबईत आला तेव्हा. त्याआधी झोपलेले. मोर्च्या, आंदोलनांचे प्रमाण ह्या सरकारच्या काळात वाढलंय, कारण हे सरकार काहीतरी करेल असं वाटतंय लोकांना. एकही आंदोलन असं दिसलं नाही के जे ह्या सरकारमुळे झालंय, आधीचे प्रश्नच सोडवताहेत फडणवीस.
13 Mar 2018 - 11:38 am | बिटाकाका
मुळात हा मोर्चा त्याच मागच्यावेळी संप आंदोलन केलेल्या शेतकरयांचा त्याच मागण्यासाठी परत काढलेला मोर्चा आहे हे दाखविण्याची केविलवाणी धडपड चालली आहे. आणि त्यामुळेच कर्जमाफी फसवी होती वगैरे मुद्दे पुढे ढकलायचा प्रयत्न दिसतोय.
--------------------------------------------
वर्तमानपत्रे वाचून मला जे समजले ते असे कि या मोर्च्यातील बहुतांशी शेतकरी हे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांची मुख्य मागणी ते कसत असलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर कराव्यात अशी आहे. जे आदिवासी जमले ते या मुख्य मागणीसाठी असे मला वाटते. बाकी सिपीआयच्या झेंड्याखाली हा मोर्चा काढल्याने याला राजकीय रंग लागला नसता तरच नवल होते. हा राजकीय मोर्चा नाही म्हणणे अजिबात योग्य वाटत नाही. जर एक सामान्य निरपेक्ष शेतकरी मोर्चा रास्त मागण्यांसाठी काढायचा असेल तर त्यांनी राजकीय पक्षांपासून निराळे राहायलाच हवे (जसे मागच्या वेळी संपाच्या बहुतांश काळ झाले).
-------------------------------------------
राज्यातील शेतकरी इतका हवालदिल झाला आहे का कि इथले शेतकरी माकप वगैरे लोकांचा आधार घेऊन मोर्चे काढतील आणि इथले मुख्य विरोधी पक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी वगैरे मोर्चा मुंबईत आल्यावर त्यांच्या स्वागताला जाऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणण्यापुरतेच राहतील? यापुढची निवडणूक भाजप वि. माकप अशी समजावी का असा एक प्रश्न उगाच मनात डोकावून गेला.
13 Mar 2018 - 12:48 pm | manguu@mail.com
मशीद पाडणे , मंदिर बांधणे , कसायाला ठेचणे हे करायला राजकीय पक्ष पुढे सरसावले तर कौतुक होते.
शेतकरी आण्दोलनाला कुणी भाकरी पुरवली तर लगेच चौकश्या सुरु - शेतकरी अन ह्या पक्षाचा काय संबंध ? ह्याना राजकीय फायदा हवा आहे का ? किती लोक अन किती भाकरी लागल्या ? किती खर्च आला ?
13 Mar 2018 - 1:57 pm | बिटाकाका
वरील वक्तव्यांचे संदर्भ देणे, उगाच सवयीप्रमाणे हव्यात गोळ्या मारू नका.
13 Mar 2018 - 11:44 am | मराठी_माणूस
सहमत.
नेहमीचेच म्हणणार्यांनी हे ही फोटो पहावेत
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1644054/kisan-long-march-...
13 Mar 2018 - 12:14 pm | श्रीगुरुजी
>>> बहुसंख्यांच्या मागण्या किती साध्या आहेत
LLRC
12 Mar 2018 - 11:30 pm | manguu@mail.com
शेतकरी दरिद्री आहे , याचे क्रेडिट काँग्रेसला द्यायचे .
तळागाळात मोबाइल व सौर पॅनेल पोचले याचे क्रेडिट मोदीना द्यायचे.
भक्तलोकहो , बरोबर ना ?
13 Mar 2018 - 6:56 am | श्रीगुरुजी
मोठठा चतुर भ्रमणध्वनी वापरणारे दरिद्री असतात?
13 Mar 2018 - 7:40 am | manguu@mail.com
आमच्या गरीब पेशंटची आम्ही NGO ना यादी देतो , त्याना मदत मिळावी म्हणून. .. ते home visit करतात आणि नंतर रिमार्क टाकतात .. घरात फ्रीज आहे , गरीब नाही.
घरात टी व्ही आहे , गरीब नाही.
घर ४०० फुटाचे आहे , गरीब नाही.
लाइट बिल ८०० रु येते , गरीब नाही.
दुधाचा चहा दिला , गरीब नाही .
शेवटी ते कुणालाच मदत देत नाहीत. यादी तशीच.
( घरातल्या त्या वस्तू जेंव्हा कर्ता पुरुष धडधाकट होता , तेंव्हाच्या असतात , आता तो सिरियस आहे किंवा कैलासवासी झाला आहे , तर केवळ त्या वस्तूंच्या दर्शनाने family ची आर्थिक कंडिशन समजेल काय ? )