हा धागा यना आणि त्यांच्या समविचारी श्रद्धा संकल्पना मुदलातूनच नाकारणार्यांसाठी नाही.
यनां आणि त्यांच्या मित्र परिवारा कडून मिपावर 'श्रद्धा' संकल्पनेवर बराच वैचारीक मार्याच्या धाग्यांचा रतीब पडतो आहे. श्रद्धा' या संकल्पनेच्या मर्यादा आहेत असतील नाही असे नाही, पण बाळाला न्हाउ घालताना घाण पाणी तेवढे काढले जात आहे की आपले बाळही घाण पाण्याचा विसर्ग करण्यापुर्वी कोणताही सुद्ज्ञ व्यक्ती विचार करेल. त्यामुळे श्रद्धा ही संकल्पना सरसकट नाकारण्या पुर्वी श्रद्धा या संकल्पनेची खरेच गरज शिल्लक राहीलेली नाही का ? की श्रद्धा या संकल्पनेस काही प्रयोजन , उद्दीष्ट्ये उपयोजनांच्या शक्यता शिल्लक रहातात याचा मागोवा या चर्चेतून घेणे असा उद्देश्य आहे.
( बाळाला न्हाऊ घातलेले घाण पाण्याचा विसर्ग न होऊ देणे असाही ह्या धाग्याचा उद्देश नाही हेही लक्षात घ्यावे)
चर्चा चालू करण्यासाठी काही प्रश्न
१.१) या पहिल्या प्रश्नापुरता काही क्षणासाठी इश्वर आणि धर्म या संकल्पना बाजूस ठेऊन द्या आणि श्रद्धा या संकल्पनेचे मानवी जिवनात काही सकारात्मक प्रयोजन अथवा उपयोजन आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर शक्य असल्यास अनुभव आणि उदाहरणे .
१.१) समजा तुम्हाला सकारात्मक प्रयोजन आहे असे वाटते , - यनांच्या मते काही प्रयोजने / उपयोजने ' विश्वास' या संकल्पनेवर धकवता येतात - विश्वासाच्या आधाराला श्रद्धेच्या मुलाम्याची गरज शिल्लक रहाते असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर फायदे सोदाहरण स्पष्ट करा.
* विश्वास डळमळीत होणे शक्य असते श्रद्धा डळमळीत होण्यास वेळ लागतो हे आपणास पटते का ? पटत असेल तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपले मत सोदाहरण स्पस्।ट करा
२) नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरणात (म्हणजे सकारात्मक निती,मुल्ये,निय्मम, नियम, आणि कायद्याच्या अभिसरणात समाजातील बहुसंख्यकांकडून अनुकरण करवून घेण्यात ) श्रद्धेची संकल्पना काही विशेष योगदान देऊ शकते का ? कि ज्यामुळे नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरण सुलभ होईल . सोदाहरण स्पष्ट करा.
३) श्रद्धेचे विश्वास आणि निष्ठा या प्रति नेमके योगदान कोणते ?
४) जोखीमीचे निर्णय घेताना विश्वास हि संकल्पना तुम्हाला पुरेशी वाटते का की श्रद्धेमुळे जोखीमीचे निर्णय घेणे सुकर होते ?
५.१) मानसिक सुरक्षीततेची भावना निर्मितीत श्रद्धा संकल्पनेचे योगदान आहे का असेल तर कोणते ?
५.२) मानवी नात्यात आपण एकटे पडलो तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी आहे हि भावना कितपत गरजेची सुखकर अथवा ऊपयूक्त वाटते ?
५.३) आपण जे करतोय ते योग्यच करतोय हे इतरांचे किती गैरसमज झाले, कायदाही आपल्या काठीशी नाही तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी राहणार आहे हा विश्वास पुरेसा आहे की इथे विश्वास आणि श्रद्धेची गरज असते ?
५.४) काही अन्याय्य शक्ती विरुद्ध काहीच करता येत नाही , अशा हतबल वाटणार्या क्षणी , पृथ्वीवर मानवी जिवन न्याय देण्यास असमर्थ ठरले तरी एक अदृस्ष्य शक्ती वरील विश्वास आणि श्रद्धा , अन्याय्य शक्तींना मृत्यु ऊपरांत शिक्षा करून न्याय देईल हा विचार मनातील रागाचा निचरा होण्यास आणि स्वतःच्या हतबलतेच्या मनस्थितीतून बाहेर येण्यास ऊपयूक्त वाटतो का ?
५.५) सकारात्मक निती आणि मुल्यांचे अंगिकरण श्रद्धे शिवाय सुद्धा होऊ शकते असेही बर्याच विद्वानांचे मत असते ? सकारात्मक निती आणि मुल्यांचे अंगिकरणार्थ श्रद्धेचे फायदे उपयोजन आहे असे तुम्हाला गरज वाटते का ? श्रद्धे शिवाय शक्य नाही अशी काही उदाहरणे असतील तर त्यासह स्पष्ट करा ?
६) श्रद्धा आणि मांगल्य व पावित्र्य या संकल्पनांचा बरेच जण संबंध लावू इच्छितात तो तुम्हाला पटतो का ? पटत असेल तर सोदाहरण स्पष्ट करा
७) स्वतःच्या श्रद्धा जोपासतानाच, तर्क सुसंगत विज्ञान निष्ठ नसलेल्या अथवा काल बाह्य श्रद्धांचा त्याग करण्याची वेळ आल्यास आपण आपल्या मनाची समजूत घालु शकता का ? असाल तर कशी ? एखाद्या श्रद्धेचे प्रयोजन अथवा उपयोजन स्वतःसाठी होते पण आता संपले आहे असे वाटते अशी उदाहरणे द्या. एखाद्या श्रद्धेचे प्रयोजन अथवा उपयोजन नेमके केव्हा संपले समजावे (हा प्रश्न अर्थातच श्रद्धा बाळगणार्यांसाठी आहे हे वेसानल)
८) श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन आहे असा आपला विश्वास/ श्रद्धा असल्यास वरील प्रश्नोत्तरे आणि अनुषंगिक मुद्द्यांच्या आधारे ' श्रद्धा संकल्पनेच्या' सकारात्मक व्याख्येत प्रयोजन आणि उपयोजन स्पष्ट करून आपल्या स्वतःच्या शब्दात आपली श्रद्धा संकल्पनेची आपली स्वतःची व्याख्या मांडा.
* यना आणि प्रभृती ज्यांना 'श्रद्धा' संकल्पना मूळातूनच नकोशी झालेली आहे त्यांनी या धागा चर्चे पुरते संयम पाळून किमान पहिल्या दोनशे प्रतिसादात चर्चा घसरवू नये अशी विनंती आहे कारण त्यांचे धागे आणि म्हणणे आपण इतर धागा चर्चातून पहातच आहोत. या धागा लेखाचा उद्द्देश 'श्रद्धा संकल्पने च्या उजव्या बाजू शोधणार्यांना मांडणी करण्याची संधी देणे असा आहे.
अर्थात श्रद्धा संकल्पनेच्या उजव्या बाजू मांडणार्यांनी आपल्या स्वतःच्या आणि इतर समविचारींच्या मांडणीची चिकित्सा करु नये असे नाही.
चर्चा सहभाग आणि अनुशंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आभार.
***नाण्याची दुसरी बाजू ***
प्रतिक्रिया
8 Mar 2018 - 3:52 pm | प्रचेतस
एकतर आधीच इथे अशा धाग्यांचे आणि प्रतिसादांचे रतीब पडलेत त्यात तुमच्या एका धाग्याची भर :)
8 Mar 2018 - 3:55 pm | माहितगार
पण हा उपविषय सुस्पष्ट स्वरुपात चर्चीला गेला असण्याची शक्यता कमी वाटते , म्हणून रतीबात दुसर्या बाजूने भर :)
8 Mar 2018 - 3:57 pm | प्रचेतस
:)
8 Mar 2018 - 4:01 pm | गवि
तुमची तळमळ कळते. पण,
कृपया जरा साधं संक्षिप्त पाच वाक्यात साररूप करुन देईल का कोणी या वरील प्रस्तावाचं..?
%-(
8 Mar 2018 - 5:22 pm | आनन्दा
तुमचा विषय आणि त्याचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे आपला पास
क्षमस्व
8 Mar 2018 - 7:15 pm | मारवा
वरील गवि आणि प्रचेतस यांच्या विचारांशी सहमत आहे.
आपण कृपया समरी दिली तर बरे होइल. आपले धागे अधिकाधिक क्लिष्ट होत आहेत असे माझेही मत आहे.
कृपया माझ्यासारख्या सामान्य लोकांना समरी व सोपेपणा गरजेचा असतो. वरील धागा वाचता वाचता मध्येच माझा ट्रॅक दोन दा सुटला.
मुद्देबाहुल्य हे एक कारण असावे असे माझे प्राथमिक मत आहे.
आपल्या प्रामाणिक भावनेचा नेहमीच आदर वाटतो म्हणुन हे सुचवीत आहे.
थोडे लाइटली असे ही म्हणतो की
माहीतीच्या धबधब्यात मंदाकिनी च वाहुन गेली असे होउ नये असे मनापासुन वाटते इतकेच म्हणायचे आहे.
वरील लाइन हलक्यात घ्या कृपया
आपला जुना चर्चक
मारवा
8 Mar 2018 - 7:51 pm | माहितगार
श्रद्धा, संकल्पना, मानवी जीवन , सकारात्मकता, प्रयोजन, उपयोजन या शब्दातला न कळणारा शब्द कोणता आहे. इंग्रजी माध्यमाच्या मराठी विद्यार्थ्यांना प्रयोजन, उपयोजन हे शब्द औघड जातील हे मान्य आहे. , इतरांनाही कदाचित बोजड वाटेल पण शब्दार्थ न समजण्यासारखे काही नसावे असे वाटते.
सबंध केक एकदम खाण्याचा प्रयास कठीण असू शकतो. एक एक प्रश्न विचारात घेऊन चर्चा केल्यास बाकी प्रश्न कुठून आले हे समजणे कठीणही नसावे असे वाटते.
चर्चेची सुरवात करणार्या " श्रद्धा या संकल्पनेचे मानवी जिवनात काही सकारात्मक प्रयोजन अथवा उपयोजन आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर शक्य असल्यास अनुभव आणि उदाहरणे द्या. " या प्रश्नात श्रद्धावंतांसाठी अवघड काय आहे .
धागा मुख्यत्वे श्रद्धावंतांसाठी आहे. श्रद्धावंतांनी चर्चेची सुरवात तर करावी.
8 Mar 2018 - 8:07 pm | माहितगार
बाकी विनोद पोहोचला :)
8 Mar 2018 - 7:50 pm | अर्धवटराव
राग, प्रेम, पॅशन, भिती, संशय... यांचं प्रयोजन आणि उपयोजन काय ? माणसाचं शरीर डेव्हलप होत गेलं तसं ते टिकवण्यासाठी भावनांचं फ्रेमवर्क तयार झालं. हेच त्याचं प्रयोजन आणि उपयोजन. श्रद्धा म्हणजे काहि आर्टीफिशिअली तयार केलेली लस नाहि. प्राण्याचं शरीर विशिष्ट कर्म करायला तयार करणे हे भावनेचं प्रयोजन. तेच उपयोजन.
8 Mar 2018 - 7:53 pm | माहितगार
चर्चेस सुरवात करणार्या प्रतिसादासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
8 Mar 2018 - 7:59 pm | माहितगार
थोडक्यात आपल्यामते 'श्रद्धा ही एक नैसर्गिक भावना आहे. प्राण्याचं शरीर विशिष्ट कर्म करायला तयार करणे हे भावनेचं प्रयोजन. तेच उपयोजन. ' असे आपल्याला म्हणावयाचे आहे.
विद्वानांचा एक गट श्रद्धेची भावना सहजी सोडा असा आग्रह करताना दिसतो. श्रद्धा ही नैसर्गीक भावना असेल तर सोडता येत असेल पण सोड म्हटले आणि सोडले असे होऊ शकते का .
8 Mar 2018 - 9:33 pm | अर्धवटराव
त्या विद्वानांना श्रद्धा म्हणजे काय हेच कळलं नाहि. असो.
मनात प्रेम नसताना आणि नुसतच व्हॅलेन्टाईन डे टाईप आय लव यु करत गावभर फिरणं, धैर्याचा लवलेश नसताना उत्तरासारखं बायकामाजी बडबडणं, ज्ञानाची अजीबात तहान नसताना उगाच घरात ग्रंथांचा पसारा करणं.... हे जसं इतर भावनांच्या बाबतीत होतं तसच अवडंबर श्रद्धेच्या बाबतीत देखील होतं. त्यात चुक श्रद्धेची नसुन माणसाच्या खोटेपणाची आहे.
8 Mar 2018 - 9:35 pm | अर्धवटराव
"श्रद्धा सोडा" असं म्हणणारे "श्रद्धा सोडता येते" या श्रद्धेवर जगत असतात.
10 Mar 2018 - 2:41 pm | arunjoshi123
क्या बखुबी कहा है।
8 Mar 2018 - 8:19 pm | प्रकाश घाटपांडे
जोपर्यंत जगण्यासाठी त्याचा उपयोग आहे तोपर्यंत श्रद्धा ही मानवी जीवनात राहणार आहे. मानसिक आरोग्य चांगले रहाण्यास त्याचा उपयोग होतो.
8 Mar 2018 - 10:19 pm | सतिश गावडे
(त्रिकोणाची) निसटलेली बाजू: श्रद्धेचे समायोजन
9 Mar 2018 - 12:04 am | मामाजी
“श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन”
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत दिलेल्या एका व्याख्यानातील श्रद्धेविषयी काही अंश.
Swami Vivekananda/ Complete-Works / Volume 1 / Lectures and Discourses /
STEPS TO REALISATION
(A class-lecture delivered in America)
.................... The next qualification required is Shraddhâ, faith. One must have tremendous faith in religion and God. Until one has it, one cannot aspire to be a Jnâni. A great sage once told me that not one in twenty millions in this world believed in God. I asked him why, and he told me, "Suppose there is a thief in this room, and he gets to know that there is a mass of gold in the next room, and only a very thin partition between the two rooms; what will be the condition of that thief?" I answered, "He will not be able to sleep at all; his brain will be actively thinking of some means of getting at the gold, and he will think of nothing else." Then he replied, "Do you believe that a man could believe in God and not go mad to get him? If a man sincerely believes that there is that immense, infinite mine of Bliss, and that It can be reached, would not that man go mad in his struggle to reach it ?" Strong faith in God and the consequent eagerness to reach Him constitute Shraddha.......
Complete-Works / Volume 1 ची लिंक https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYgdhTDlZu7dkKaWBQNQ
10 Mar 2018 - 2:44 pm | arunjoshi123
बहुतांश माणसे नि विवेकानंद यांना बेसिक अक्कल नसू शकते अशी श्रद्धा असणारांचे काय?
9 Mar 2018 - 11:01 am | नाखु
त्या विद्वानांना श्रद्धा म्हणजे काय हेच कळलं नाहि. असो.
मनात प्रेम नसताना आणि नुसतच व्हॅलेन्टाईन डे टाईप आय लव यु करत गावभर फिरणं, धैर्याचा लवलेश नसताना उत्तरासारखं बायकामाजी बडबडणं, ज्ञानाची अजीबात तहान नसताना उगाच घरात ग्रंथांचा पसारा करणं.... हे जसं इतर भावनांच्या बाबतीत होतं तसच अवडंबर श्रद्धेच्या बाबतीत देखील होतं. त्यात चुक श्रद्धेची नसुन माणसाच्या खोटेपणाची आहे.
हा प्रतिसाद मी खवत चिटकवीन म्हणतोय चालेल ना
एकदम चाबूक आहे
9 Mar 2018 - 10:39 pm | अर्धवटराव
:)
9 Mar 2018 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
असले धागे पडतात म्हणूनच पांडू मिपावर येत नाही. ;)
9 Mar 2018 - 7:48 pm | माहितगार
सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या ऑस्ट्रीअन पत्नीस (Schenkl) लिहिलेला संदेश वाचनात आला :
सुभाषचंद्र बोसांचे देशावरचे प्रेम पहिले आहे पण सोबतच Schenkl वरही त्यांनी प्रेम केले. एका ध्येयासाठी आयुष्य पणाला लावताना आयुष्यातील दुसरे प्रेम अधुरे रहाण्याची शक्यता आणि झालेही तसेच पत्नीस एकटे सोडून ते कायमचे चालते झाले , तेव्हा ते पुढच्या जन्मात भेटण्याचा हवाला देतात. मृत्यू नंतर आयुष्य आहे की नाही माहित नाही पण ते तसे शक्य असण्याची श्रद्धा सुभाषचंद्र बोसांची आकांक्षा जिवंत ठेवताना दिसते . माणूस आशा आणि आकांक्षावरही जगत नाही का ? जे या जन्मी नाही जमले ते मृत्यू नंतर कदाचित शक्यही नसेल पण आशा आकांक्षांवर पूर्ण पाणी फिरवून समोर जायचे की आशा आकांक्षा शिल्लक ठेऊन पुढे जाणे श्रेयस्कर असावे ?
आशा आकां़षांना काल्पनिक का असेना रुप देऊन जोपासण्याचे प्रयोजन श्रद्धेने साध्य होऊ शकते असे वाटते का ?
या नाण्यास नास्तिक मताची दुसरी बाजूही आहे पण ह्या धाग्याचा उद्देश आस्तीक मताची बाजू बघणे असा ठेवला आहे.
9 Mar 2018 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१.१) या पहिल्या प्रश्नापुरता काही क्षणासाठी इश्वर आणि धर्म या संकल्पना बाजूस ठेऊन द्या आणि श्रद्धा या संकल्पनेचे मानवी जिवनात काही सकारात्मक प्रयोजन अथवा उपयोजन आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर शक्य असल्यास अनुभव आणि उदाहरणे .श्रद्धेचं माणसाच्या आयुष्यात मोठं स्थान असतं. कधी तरी फायदा आणि कधीतरी नुकसानही होत असतं. उदा. आपल्या श्रद्धा जोपर्यंत बिनबोभाटाच्या आणि अपेक्षारहित असतात तो पर्यंत श्रद्धेमुळे नुकसान होत नाही असे वाटते, म्हणजेच तेव्हा आपण श्रद्धेला सकारात्मक घेतलेले असते. १.१) समजा तुम्हाला सकारात्मक प्रयोजन आहे असे वाटते , - यनांच्या मते काही प्रयोजने / उपयोजने ' विश्वास' या संकल्पनेवर धकवता येतात - विश्वासाच्या आधाराला श्रद्धेच्या मुलाम्याची गरज शिल्लक रहाते असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर फायदे सोदाहरण स्पष्ट करा.अवघड प्रश्न आहे, पण, यनासर म्हणताहेत म्हणजे बरोबरच असेल असे वाटते....श्रद्धेच्या आधाराला विश्वास असावाच लागतो. अबक भेटल्यावर चहा नक्की पाजेल. श्रद्धा आणि विश्वास. * विश्वास डळमळीत होणे शक्य असते श्रद्धा डळमळीत होण्यास वेळ लागतो हे आपणास पटते का ? पटत असेल तर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपले मत सोदाहरण स्पस्।ट करा. श्रद्धेचं काही खरं नसतं. श्रद्धा ही फुलावर बसणार्या फुलपाखरासारखी असते. श्रद्धा लवकर डळमळीत होते असे माझं मत आहे. गेली पाच वर्ष महादेवाचे सोमवार निरंकार उपवास केले, एक चांगल्या पॅकेजची नोकरी आणि एक सुंदर छोकरी मिळेल अशा प्रस्तावाने हे सर्व केले. पण, आजही बेकारच आहे. आता महादेव सोडला. आता महालक्ष्मीचे शुक्रवार सुरु करणार आहे. श्रद्धा अशी डळमळीत होते. २) नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरणात (म्हणजे सकारात्मक निती,मुल्ये,निय्मम, नियम, आणि कायद्याच्या अभिसरणात समाजातील बहुसंख्यकांकडून अनुकरण करवून घेण्यात ) श्रद्धेची संकल्पना काही विशेष योगदान देऊ शकते का ? कि ज्यामुळे नितीमुल्यांच्या , संकेतांच्या नियमांच्या आणि कायद्यांच्या सामाजिकीकरण सुलभ होईल . सोदाहरण स्पष्ट करा.नितीमुल्य आणि श्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धाळु नितीमान असेलच असे काही नसते. नितीमुल्य आणि संकेत पाळणारे सामाजिक आयुष्यात अधिक आनंदी राहू शकतात, असे वाटते. ३) श्रद्धेचे विश्वास आणि निष्ठा या प्रति नेमके योगदान कोणते ?श्रद्धेचं विश्वासाशी काहीही संबंध नाही असे वाटते. निष्ठेशी संबंध आहे. ४) जोखीमीचे निर्णय घेताना विश्वास हि संकल्पना तुम्हाला पुरेशी वाटते का की श्रद्धेमुळे जोखीमीचे निर्णय घेणे सुकर होते ?विश्वासाच्या पाठीमागे एक लॉजीक असतं, म्हणून ती संकल्पना पुरेशी वाटते. श्रद्धा हीच जोखीम आहे. ५.१) मानसिक सुरक्षीततेची भावना निर्मितीत श्रद्धा संकल्पनेचे योगदान आहे का असेल तर कोणते ?नै नै, श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा काहीही संबंध नाही. श्रद्धा ही भावनिक गुंतागुंतीचा एक मानसिक खेळ आहे. ५.२) मानवी नात्यात आपण एकटे पडलो तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी आहे हि भावना कितपत गरजेची सुखकर अथवा ऊपयूक्त वाटते ?तात्पुरता आराम म्हणून श्रद्धायुक्त शक्ती बरी आहे. पण त्यातून माणसाने सावरले पाहिजे. नाही तर मानसिक स्थैर्य गमावण्याची शक्यता असते. ५.३) आपण जे करतोय ते योग्यच करतोय हे इतरांचे किती गैरसमज झाले, कायदाही आपल्या काठीशी नाही तरी इतर श्रद्धायूक्त असलेली शक्ती आपल्या पाठीशी राहणार आहे हा विश्वास पुरेसा आहे की इथे विश्वास आणि श्रद्धेची गरज असते ?श्रध्दायुक्त शक्ती पाठीशी आहे, हे खूळ काढून टाकले पाहिजे. ५.४) काही अन्याय्य शक्ती विरुद्ध काहीच करता येत नाही , अशा हतबल वाटणार्या क्षणी , पृथ्वीवर मानवी जिवन न्याय देण्यास असमर्थ ठरले तरी एक अदृस्ष्य शक्ती वरील विश्वास आणि श्रद्धा , अन्याय्य शक्तींना मृत्यु ऊपरांत शिक्षा करून न्याय देईल हा विचार मनातील रागाचा निचरा होण्यास आणि स्वतःच्या हतबलतेच्या मनस्थितीतून बाहेर येण्यास ऊपयूक्त वाटतो का ?मनाचा निचरा होण्यासाठी कामात रमवून घ्यावे असे वाटते. अन्याय्य शक्तींना मृत्यु उपुरांत शिक्षा मिळेल वगैरे हे मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न आहे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे नंतर देतो.
अरे शाम, देव-बीव काय नसतो, तो नुसता वेळेचा अपव्यय आहे, डबा घे आणि कामावर जा. - शामचे काका या संग्रहातून. ;)
-दिलीप बिरुटे
12 Mar 2018 - 9:43 am | माहितगार
मतांतराबद्दल जरा सवडीने लिहितो, पण मुख्य म्हणजे प्रतिसाद बर्यापैकी आवडला अर्थात मी कुंपणाच्या दोन्ही बाजूला असल्याने मला ते सुलभ जात असावे.
आपण 'श्रद्धा अशी डळमळीत होते.' चे उदाहरण दिले आहेत , यात अपेक्षेसहीत श्रद्धा आणि अपेक्षा विरहीत श्रद्धा ह्याने फरक पडतो का ? संत एकनाथ आणि इतर काही संत काम्य उपासनेचा निषेध करतात ते कदाचित याच मुळे असेल का असा प्रश्न पडला. शिरडीचे साईबाबा श्रद्धे सोबत सबुरीची गरज सांगतात सबुरी हा आवश्यक भाग असेल का ? साधू वासवानी श्रध्द्धेचे तुलना पोस्टाच्या तिकिटाला लावलेल्या गोंदाशी करतात हे आठवले.