शंभर प्रश्न हवे आहेत.

रामदास's picture
रामदास in काथ्याकूट
22 Oct 2008 - 9:46 pm
गाभा: 

कोजागीरी या विषयावर मी आणि माझे शास्त्री स्नेही बोलत होतो.
रात्री लक्ष्मी येते आणि को जागर्ती ? असा प्रश्न विचारते आणि जे लोक जागे असतील त्यांचे घरी येते वगैरे माहीती होतीच पण मी शास्त्रींना विचारले यापेक्षा काहीतरी वेगळे कारण असावे असं वाटतं मला , तुम्ही काही माहिती सांगू शकाल का?
शास्त्री हसले आणि म्हणाले होय . मनाला पटेल अशी एक कारण परंपरा या कोजागीरीच्या पाठीमागे आहे.त्यांनी सांगीतलेली माहीती अशी:
शरदात दोन पौर्णीमा येतात. आश्वीनी नक्षत्रात कोजागीरी आणि कृत्तीका नक्षत्रावर कार्तीकी पौर्णीमा.
आश्वीनी नक्षत्राचे स्वामी अश्वीनीकुमार .देवांचे वैद्य.
कृत्तीकेचे स्वामी अग्नी.
नक्षत्रस्वामींच्या कारकत्वानुसार त्या त्या पौर्णीमा साजर्‍या केल्या जातात.उदा; कार्तीकी पौर्णीमेला त्रिपूर जाळतात.स्वामी अग्नी आहे.
कोजागीरीचे मालक अश्वीनीकुमार. चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून सोमाचा वर्षाव त्या रात्री ते करतात. सोम आयुष्यमानाचे आणि आरोग्याचे औषध. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी दूध चांदण्यात तापवून चार तास चांदण्यात ठेवून प्राशन केल्यास सोमाचा लाभ मानवाला होतो. कारणक्रम मला आवडला. पटला.
शास्त्रींना आणखी काही प्रश्न विचारणार एव्हढ्यात त्यांनी मला थांबवले. बघा तुम्ही आणि मी बोलून फक्त दोघांचा फायदा होणार आहे.सगळ्यांचा फायदा होऊ द्या . प्रत्येकाच्या मनात काहीना काही प्रश्न असेलच.मलाही ते प्रतीपादन पटले.
मिपाकर मित्रहो, कृपया हिंदू धर्मशास्त्र, पंचांग, पंचागीय गणित, नक्षत्र,कुळाचार, परंपरा. रुढी, दिन विशेष, या आणि इतर विषयावर प्रश्न विचारा. सुमारे शंभर प्रश्नांची उत्तरं रा. रा. विद्याधर शास्त्री करंदीकर स्वतः सभासद होऊन देतील.
किती प्रश्न विचारावे याला मर्यादा नाहीत. शक्यतो विषयाला धरून प्रश्न विचारावे.
आपल्या प्रश्नांची वाट पहातो आहे.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

22 Oct 2008 - 9:56 pm | लिखाळ

आपण कमाल आहत.. अनेक चांगल्या लोकांना आपण मिपावर आणत आहात.

कोजागिरीची माहिती आवडली. तसेच कोजागिरीचा अधुनिक-वैज्ञानिक संबंध जोडला नाही ते सुद्धा आवडले.

--लिखाळ.
धर्मशास्त्रात प्रश्न विचारलेले चालतात का? असाच पहिला प्रश्न आहे :) ह. घ्या.

भाग्यश्री's picture

23 Oct 2008 - 12:04 am | भाग्यश्री

सहमत..! एकट्या रामदास(काकां) मुळे कितीतरी चांगली लोकं आली मिपावर..

मलाही कारण पटले कोजागिरीचे..

माझा पहीला प्रश्न फार बाळबोध आहे.. कोजागरी की कोजागिरी ??

अनामिक's picture

23 Oct 2008 - 12:30 am | अनामिक

कोणत्याही स्तोत्राच्या शेवटी (किंवा अथर्वशिषाच्या शेवटी) लोक 'फलशृती' का म्हणतात? मला स्वतःला हे पटत नाही कारण देवाला खुश करुन काहीतरी मागायचे /किंवा काहीतरी मिळते अशी लालूच माणसाला लावायची... हा तर सरळ सरळ व्यवहार आहे. जर तुमचा देवावर विश्वास आहे तर मग त्याला माहित आहेच कि तुम्हाला काय आणि किती द्यायचे ते. असो, मी बर्‍याच जणांना फलशृती म्हणन्यामागे ह्या व्यतीरिक्त काही कारण आहे का ते विचारले पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अन जोपर्यंत मिळत नाही आणि फलशृतीचे महत्व पटत नाही तोपर्यंत माझा फलशृती म्हणायला नकार राहिल.

(मिपावरच्या इतर लोकांना माहिती असली तर जरूर लिहा)

अनामिक

भास्कर केन्डे's picture

23 Oct 2008 - 1:23 am | भास्कर केन्डे

माझाही प्रश्न याच रोखाने आहे.

देवळात गेल्यावर देवासमोर धन (पैसे, धान्य) टाकन्याची प्रथा का व कशी सुरु झाली? देवळाच्या डागडुगीसाठी देणग्या वगैरे गोळा करायच्या असतील तर त्या एका कोपर्‍यात गोळा करण्याची प्रथा का नाही. चार आण्यात सगळी सुखे विकत घ्यायला तो काय सुखांचा वाणी आहे की काय?

आपला,
(प्रश्नांकित) भास्कर

चिंतामणराव's picture

23 Oct 2008 - 10:44 am | चिंतामणराव

"मला स्वतःला हे पटत नाही कारण देवाला खुश करुन काहीतरी मागायचे /किंवा काहीतरी मिळते अशी लालूच माणसाला लावायची... हा तर सरळ सरळ व्यवहार आहे. जर तुमचा देवावर विश्वास आहे तर मग त्याला माहित आहेच कि तुम्हाला काय आणि किती द्यायचे ते."

एकदम सहमत. मीही फलश्रुती म्हणत नाही.

भास्कर केन्डे's picture

23 Oct 2008 - 1:27 am | भास्कर केन्डे

आपल्या पूर्वजांना चंद्र-सूर्याच्या परिक्रमेचा चांगलाच अभ्यास होता. मग त्यांनी चंद्राधारित कालगणनेची सुरुवात का केली? ल्युनार ऐवजी सोलार कॅलेंडर असले असते तर विक्रम संवत (जे की पाच हजार वर्षांच्या पेक्षा जुने असून वापरात आहे) कदाचित ग्रेगेरियन कँलेडराऐवजी जगभरात वापरात आले असते. मग आपल्या पुर्वाजांनी याचा विचार का नाही केला?

आपला,
(कालातीत) भास्कर

प्रकाश घाटपांडे's picture

23 Oct 2008 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

पंचांगा बद्द्ल माहिती आपल्याला इथे पहाता येईल
प्रकाश घाटपांडे

बैल्र रिकामा's picture

23 Oct 2008 - 3:45 am | बैल्र रिकामा

१. देवळात घंटा कशासाठी असते? (देवाला जागवण्यासाठी वगैरे उत्तरे बालिश आणि निरर्थक वाटतात).....
२. मुळात देवविषयक कल्पना का आणि कश्या निर्माण झाल्या ?
३. पाश्चात्य लोकांनी काही नवीन शोध लावले, की हे वेदात आहे, असे वेदाभिमानी म्हणत आले आहेत, तर वेदात खरोखर एकूण कोणकोणते शोध आहेत? हे एकदा कळले, की खरोखर नवीन शोध कोणते, हे तरी कळेल.

ऍडीजोशी's picture

23 Oct 2008 - 11:06 am | ऍडीजोशी (not verified)

१. देवळात घंटा कशासाठी असते?

घंटा वाजवल्याचा मला झालेला उपयोग - एकदा दुपारी असाच गणपतीच्या देवळात बसलो होतो. एक माणूस घंटा वाजवत होता. सहज घंटानादाकडे लक्ष गेलं. हळू हळू विरत जाणारा तो घंटानाद जेव्हा लक्ष देऊन ऐकू लागलो तस तसं मन एकाग्र होऊ लागलं. कल्पना केल्यास हे तुम्हालाही जाणवू शकेल.

ऍडीजोशी's picture

23 Oct 2008 - 11:06 am | ऍडीजोशी (not verified)

१. देवळात घंटा कशासाठी असते?

घंटा वाजवल्याचा मला झालेला उपयोग - एकदा दुपारी असाच गणपतीच्या देवळात बसलो होतो. एक माणूस घंटा वाजवत होता. सहज घंटानादाकडे लक्ष गेलं. हळू हळू विरत जाणारा तो घंटानाद जेव्हा लक्ष देऊन ऐकू लागलो तस तसं मन एकाग्र होऊ लागलं. कल्पना केल्यास हे तुम्हालाही जाणवू शकेल.

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:32 pm | अवलिया

१. देवळात घंटा कशासाठी असते? (देवाला जागवण्यासाठी वगैरे उत्तरे बालिश आणि निरर्थक वाटतात).....

नादातुन एकाग्रता मिळवण्यासाठी

२. मुळात देवविषयक कल्पना का आणि कश्या निर्माण झाल्या ?

भितीतुन

३. पाश्चात्य लोकांनी काही नवीन शोध लावले, की हे वेदात आहे, असे वेदाभिमानी म्हणत आले आहेत, तर वेदात खरोखर एकूण कोणकोणते शोध आहेत? हे एकदा कळले, की खरोखर नवीन शोध कोणते, हे तरी कळेल.

एकुण वेदांच्या ११०० शाखा होत्या. कालौघात आज केवळ ४-५ शिल्लक आहेत. तेच चारभागात करुन आपण त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या नावाने ओळखतो. हे अत्यंत क्लीष्ट व जुन्या काळातील वाङमय असल्याने दुर्बोध आहे. परंतु हे मात्र नक्की की ब-याच गोष्टी वेदात आहेत.

सुक्या's picture

23 Oct 2008 - 4:50 am | सुक्या

मला पडलेले काही प्रश्न...

१. चातुर्मासात बर्‍याच गोष्टी स्वयंपाकात वर्ज्य असतात याला काही आधार आहे का?
२. सोवळे वगेरे नक्की कशासाठी ?
३. उजव्या सोंडेचा गणपती अन डाव्या सोंडेचा गणपती यांच्या पुजा विधीत काही फरक असतो का. उजव्या सोंडेच्या गणपतीची पुजा अधीक कठीण व शास्रोक्त असावी असे बरेच ऐकुन आहे.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

१. चातुर्मासात बर्‍याच गोष्टी स्वयंपाकात वर्ज्य असतात याला काही आधार आहे का?

चातुर्मास येतो ते दिवस पावसाळ्याच्या सुमाराचे असतात. कांदा आणि इतर वातूळ पदार्थ वर्ज्य असतात ह्याला कारण आहे.
पावसाळ्याच्या सर्द आणि दमट हवेमधे कांद्यावर सर्रास बुरशी असते त्याने तब्बेत बिघडू शकते. शिवाय अशा हवेत भूक मंद झालेली असल्याने वातूळ पदार्थ पचायला जड जातात.
ह्यामुळे बरेच पदार्थ वर्ज्य केलेले असतात. नुसते आरोग्याचे कारण सांगितले तर लोक ऐकत नाहीत त्यामुळे देवाधर्माचे कारण पुढे करुन लोकांकडून बंधने पाळून घेतली जातात!

चतुरंग

सुक्या's picture

24 Oct 2008 - 6:46 am | सुक्या

धन्यवाद!!

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विसोबा खेचर's picture

23 Oct 2008 - 7:42 am | विसोबा खेचर

धन्यवाद रामदासराव!

शास्त्रीबुवांना अगदी अवश्य येऊ द्यात मिपावर. हो, परंतु मिपाकर अत्यंत चोखंदळ, खोडकर, व टपल्या मारणारे आहेत याचीही शास्त्रीबुवांना कल्पना देऊन ठेवा बरं! :)

तात्या.

प्रमोद देव's picture

23 Oct 2008 - 8:28 am | प्रमोद देव

गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देव वास करून असतात असे ऐकलंय? एका गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी तर जगातल्या समस्त गाईंच्या पोटात मिळून किती देव? रे बेंबट्या मोड बोटे! :)
ह्या समस्त देवांची नावे सांगता येतील काय? ;)

ऍडीजोशी's picture

23 Oct 2008 - 11:00 am | ऍडीजोशी (not verified)

सगळ्या गाइंच्या पोटात वेग वेगळे ३३ कोटी देव आहेत अशी कल्पना नाहिये. समस्त देव गाईच्या पोटात वास करतात अशी कल्पना आहे. अशी कल्पना करण्या मागचा उद्देश अतीशय सोपा आहे. गाय हा अत्यंत उपयूक्त पशू असल्याने त्याचे यथायोग्य पालन पोषण / संवर्धन व्हावे. तसंच वापरून फेकून देणे ह्या स्वार्थी मनुष्य स्वभावापासून गाईला वाचवणे हा ही हेतू आहे. अथवा आयुष्यभर दूध काढून नंतर वय झालं तिला क्रुतघ्नपणे खाटकाकडे पाठवायला माणूस कमी करणार नाही.

चिंतामणराव

वीस वर्षांपुर्वी एका अभ्यासात असं आढळल कि ओल्या कचरयाचे खत बनविण्यासाठी उपयोगी पडणारे जिवाणु गायीच्या शेणात इतर प्राण्यांपेक्षा खुप जास्त प्रमाणांत आहेत. तेंव्हापासुन मी त्यानाच ३३ कोटी देव मानतो.

मराठी_माणूस's picture

23 Oct 2008 - 9:33 am | मराठी_माणूस

१)आपण जर त्या परम्यात्म्याचे अंश असू तर काहींच्यात वाईट प्रवृत्ती का दीसुन येतात
२)पुर्व जन्मीचे पाप म्हणून काही भोग वाट्याला येतात असे समजले जाते. पण जर मागच्या जन्मीचे काही आठवतच नसेल तर हे कशामुळे आहे ते समजणार नाही आणि ह्या जन्मी चांगले कृत्य करण्याची प्रवृत्ती कशी निर्माण होईल

दुधांतच त्याला नासवु शकणारे जिवाणु असतांत. शिवाय वातावरणात अशा जिवाणुंना मदत करणारे इतर जिवाणु असतांत.
दुध मधुन मधुन तापविलं कि नासत नाही.

आपल मन, आपले विचार, यांत पुर्व संस्कार (यांत पुर्वजन्म धरायचा काय..हा माझ्यासाठीही अभ्यासाचा विषय आहे), पुर्वग्रह, अपुरी माहिती असे अनेक आपल्याला सन्मार्गापासुन दुर नेणारे "जिवाणु" असु शकतात. शिवाय यांना मदत करणारे अनेक "जिवाणु" आपल्या समाजांत वावरण्यामुळे सतत आपल्या मनावर परिणाम करतांत.

एकाग्रतेने प्रार्थना, ध्यान, आत्मपरिक्षण, अभ्यास, हे करुन आपल्या मनाच दुध मधुन मधुन तापविलं कि नासत नाही. परम्यात्म्याचा अंश असलेला प्रत्येक जीव हे करु शकतो.

सध्यातरी मी ह्या मताचा आहे कि माझ्या चांगल्या वाइट वागण्याचा परिणाम माझ्या ह्यांच जन्मांत मला अनुभवायचा आहे.

मराठी_माणूस's picture

23 Oct 2008 - 1:02 pm | मराठी_माणूस

जर दुध ही सुध्दा 'त्याची" च निर्मिती असेल तर ते बिघडवणार्‍या जीवाणूं च्या निर्मीतीचे प्रयोजन काय ?

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 10:06 am | विजुभाऊ

माझे काही प्रश्न
१)जर देव परमत्मा एकच असेल तर हिंदु धर्मात इतके देव कशाला?
२)तेहेत्तीस कोटी ही देवांची संख्य असेल तर किमान पुजल्या जाणार्‍या १०० स्वतंत्र ( विष्णु /शंकर/पार्वती यांच्या अवतारां पैकी नव्हे) नावे काय.
३)वेतोबा विरोबा भैरोबा खंडोबा हे अनार्य ( देशी /स्थानीक) उपदेवांबद्दल थोडी माहिती द्या
४) जानवे घालण्याचे फायदे काय? ते स्त्रियानी वापरावे का?
५) कर्माच्या सिद्धान्तानुसार माझे या जन्मीचे कर्म जर पूर्वीच ठरलेले असेल तर या जन्मी माझ्याकडून झालेल्या कर्माना आणि त्याच्या कर्मफळाना मी जबाबदार कसा ठरतो
६) विद्यार्जन ही सरस्वतीची उपासना आहे तर उपासनेचा प्रत्येकाला असलेला अधिकार नाकारण्याचा हक्क कोणाला कसा पोहोचतो. ( उदा : रामाने शम्बुकाच्या कानात शिसे ओतुन त्याची हत्या केली होती.)
७) जैन शिख बौद्ध हे हिन्दु पन्थ आहेत की वेगळे धर्म आहेत? जैन/शीख धर्मात कित्येक वैदीक्/हिन्दु देवता आहेत.

ऍडीजोशी's picture

23 Oct 2008 - 10:46 am | ऍडीजोशी (not verified)

४) जानवे घालण्याचे फायदे काय? ते स्त्रियानी वापरावे का?

- जानवे डाव्या खांद्यावरून पाठीवरून कमरेवर उजवीकडे जाते. जानवे ज्या पोझीशन मधे असते त्याच्या खाली मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्या आणि ऍक्यूप्रेशर मधले पॉइंट्स आहेत. जानवे घातल्याने त्यावर मधून मधून दाब पडतो. म्हणून जानवे घालावे.
तसंच, शौचाच्या वेळी / लघवीच्या वेळी जानवे उजव्या कानावर अडकवतात. बरोबर त्या पोझीशनला सुलभ होण्यासाठीचा पॉइंट आहे. जानवे अडकवल्याने त्यावर आपसूकच दाब येऊन शौचास साफ होते.

स्त्रीयांनी घालावे की घालू नये ह्याची माहिती नाही.

अवांतर पण निगडीत - असाच एक दुसरा पॉइंट आहे हनुवटीच्या मधल्या खळग्यात. तिथे थोडावेळ हलका दाब दिल्यास कुंथावे लागत नाही / रेचक घ्यावे लागत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2008 - 9:58 am | प्रकाश घाटपांडे

१) पाठ खाजवण्यासाठी
२) सुरक्षित किल्लि स्टँड
३) लघवीच्या वेळी जानव्याचे एक टोक कानावर अडकवलेले असते तर दुसरे टोक आपोआप वरती येते. मग याला नेमके काय जोडले असते यावर आमच्या शंकर्‍या लव्हार नेहमी कुतर्क करीत असे.
जानव घालताना अर्धी लांबी करावी तर आखूड होते. फुल्ल लांबी करावी तर मांडी पर्यंत जाते अशा परिस्थितीत आखुडच ठेवावे लागे. आजोबा भिंतीतील कपाट ज्यात दागदागिने, कागद पत्रे ठेवली असायची त्याचे कुलुप उघडताना जानव्याच्या किल्लीने उघडत असत. मग मी ही माझ्या जानव्याला एक किल्ली लावुन घेतली . त्याचा उपयोग करता यावा म्हणून गरज नसताना चांदोबा व इतर गोष्टीची पुस्तके एका लाकडी चारपाय असलेल्या पेटीत ठेउन त्याला कुलुप लावुन ठेवले होते. पण जानव्याच्या लांबी मुळे मला कसरत करावी लागे.
श्रावणीच्या वेळी पंचगव्य (गाईचे शेण तुप दुध गोमुत्र इ. चे मिश्रण) प्राशन करावे लागे . त्या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करुन "शास्त्रोक्त" पद्धतीने नवे जानवे घातले जाई. तो सामुहिक कार्यक्रम असे. आमच्या राममंदिरात मी या गोष्टी भक्तीभावाने करित असे.
जानव्यात "पॉवर" असल्याने भुत खेत आपल्या वाट्याला जात नाहीत अशी ही समजूत होती. राम मंदिर हा घराचाच भाग असला तरी तो घराला लागुन होता. मला तिथे जायला जाम भिती वाटायची रामराम म्हणत मी तिथे वाळत घातलेले कपडे पटकन गोळा करुन पळ काढत असे.
अवांतर - हे राममंदिर प्रकरण कोर्टात दोन पिढ्या चालले होते.

अतिअवांतर- सरकारी नोकरीत कागदपत्रांमुळे आम्ही केव्हाच त्याग केलेले जानवे काही लोकांना दिसु लागले आन त्याचा गळफास आम्हाला शेवटी बसला
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

23 Oct 2008 - 12:52 pm | अवलिया

१)जर देव परमत्मा एकच असेल तर हिंदु धर्मात इतके देव कशाला?

देव व परमात्मा यांची गल्लत करु नका.
परमात्मा, ब्रह्म हे सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासुन आहेत. नव्हे त्यांच्यापासुनच सृष्टी निर्माण झाली.
देव किंवा देवतांची निर्मिती केवळ मानव निर्मित आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण राहु शकत नाही.
त्यांची फक्त विभागणी होवु शकते. नित्य देवता, इष्ट देवता व काम्य देवता.

२)तेहेत्तीस कोटी ही देवांची संख्य असेल तर किमान पुजल्या जाणार्‍या १०० स्वतंत्र ( विष्णु /शंकर/पार्वती यांच्या अवतारां पैकी नव्हे) नावे काय.

नाव आपण देवु ते.... मी माझ्या देवाला विजुभावु पण म्हणू शकतो. परमेश्वर सुद्धा मला अडवु शकत नाही.

३)वेतोबा विरोबा भैरोबा खंडोबा हे अनार्य ( देशी /स्थानीक) उपदेवांबद्दल थोडी माहिती द्या

असंबद्ध प्रश्न. कारण त्याची उपासना पद्धती आपल्याला करणे तितके आवश्यक नाही.

४) जानवे घालण्याचे फायदे काय? ते स्त्रियानी वापरावे का?

जानव्याचा मुख्य फायदा किल्ली अडकवता येते. स्रियांचा आजचा पोशाख (साडी + पोलके ) हा जानवे पुरुष ज्यापद्धतीने घालतात त्याला अनुकुल नाही. त्यांनी गळ्यात माळेसारखे घातल्यास हरकत नाही. पण मुळात मंगळसुत्र पण घालणार नाही अशी भुमिका असलेले भगिनी मंडळ जानवे घालतीलच याची खात्री नाही.

५) कर्माच्या सिद्धान्तानुसार माझे या जन्मीचे कर्म जर पूर्वीच ठरलेले असेल तर या जन्मी माझ्याकडून झालेल्या कर्माना आणि त्याच्या कर्मफळाना मी जबाबदार कसा ठरतो

कर्म सिद्धांत तुम्ही चुकीचा समजला आहात.

६) विद्यार्जन ही सरस्वतीची उपासना आहे तर उपासनेचा प्रत्येकाला असलेला अधिकार नाकारण्याचा हक्क कोणाला कसा पोहोचतो. ( उदा : रामाने शम्बुकाच्या कानात शिसे ओतुन त्याची हत्या केली होती.)
हा भाग वाल्मिकी रामायणाच्या प्रमाणित प्रती मधे आहे का?
कदाचित हा भाग नंतर घुसवला असण्याची शक्यता नाही का?
किंवा शंबुक नक्की कशाची साधना करत होता आपल्याला सांगता येईल काय?
त्याच्या पासुन काही धोका असल्यानेच रामाने त्याला मारले असेल असे असु शकत नाही काय?

७) जैन शिख बौद्ध हे हिन्दु पन्थ आहेत की वेगळे धर्म आहेत? जैन/शीख धर्मात कित्येक वैदीक्/हिन्दु देवता आहेत.
हा निर्णय त्यानी घ्यायचा आहे. ते वेगळे आहेत की अंग आहेत. मी तरी त्यांना वेगळे मानत नाही.
फक्त तीनही वेदांना प्रमाण मानत नाहित म्हणून त्यांना नास्तिक दर्शने असे मानले जाते.

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 1:49 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>>>जैन शिख बौद्ध हे हिन्दु पन्थ आहेत की वेगळे धर्म आहेत

जेवढे माझ्या पाहण्यातील जैन व बौद्ध आहेत ते जैन- हिंदू अथवा हिंदू जैन असेच लिहतात :)
व मी स्वतः देखील !
जैनांचे २४ तिर्थंकर सोडले की बाकी सगळे देव/ देवी तुमच्या आमच्या सेमच .... ल़क्ष्मी पुजन जैनाच्या घरी हिंदू घरा पेक्षा जास्त होतं ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:56 pm | अवलिया

ल़क्ष्मी पुजन जैनाच्या घरी हिंदू घरा पेक्षा जास्त होतं

अगदी खरे बोललास राजा...
अरे माझे जेवढे जैन मारवाडी मित्र आहेत ना ते इतकी व्यवस्थित लक्ष्मीची पुजा करतात लक्ष्मी पुजनाला की क्षणभर मला कळत नाही की मी जैना कडे आहे की ब्राह्मणाकडे...
आणि काही अगदी ब्राह्मण पण पुरोगामी (?) या दिवशी एकत्र कुटुंबासह रहायचे व साजरा करायचा सण तर.. जावु द्या. न बोललेलेच बरे अशांबद्दल...

शिप्रा's picture

23 Oct 2008 - 10:06 am | शिप्रा

श्रादधाच्या वेळिस आपण गुरु़जींना जेवायला घालतो कारण त्याचा अर्थ आपण आपल्या पितरांना जेवायला देत असतो..एवढे ठिकाणी जेवुन पोट भरलेल्या गुरुजींना अजुन जेवायला देण्याऍवजी जर अनाथआश्रमातील मुलांना जेवायला दिले तर ते पितरांपर्यत पोचणार नाहि का? काय शास्त्र आहे त्यामागे?

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

ऍडीजोशी's picture

23 Oct 2008 - 10:54 am | ऍडीजोशी (not verified)

आपण किती विनोदी आणि पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी क्रुपया इथे मांडलेल्या विचारांची खिल्ली उडवू नये. (पटत नसेल तर गप्प बसावे) चर्चा भरकटेल नी ज्यांना खरोखर माहिती आहे अशी लोकं वाचक उथळ आहेत म्हणून मते मांडणार नाहित आणि बाकिच्यांना माहिती मिळणार नाही.

लक्ष देणारं कुणी नसेल तर आपण लगेच कसे बेधुंद नी बेलगाम पणे वागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पुराणातल्या गोष्टींच्या मागे काही ना काही शास्त्रीय कारण नक्कीच आहे. लोकांनी त्या आचरणात आणून त्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून देवाची भिती घालण्यात पुर्वज चुकलेत असं मला अजीबात वाटत नाही.

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:01 pm | अवलिया

पुर्णपणे सहमत आहे.
एक ध्यानात घ्या की एखादा माणुस एखादी गोष्ट त्याच्या आयुष्यात सतत करत असेल तर कदाचित तो वेडा असेल.
एखादी गोष्ट संपुर्ण समाज एकावेळेस करत असेल ... (जसे गणपतीला दुध) तर तो कदाचित समाजाला आलेला झटका असेल.
पण... हा पण फार महत्वाचा आहे...
एखादी गोष्ट पिढ्यान पिढ्या केली जात असेल तर तिच्यामागे नक्कीच काहितरी कारण असेल. आणि जर ते समजुन न घेता तुम्ही खिल्ली उडवत असाल तर... तुम्ही चुक असण्याचीच शक्यता जास्त आहे.

(पारंपारिक) नाना

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 1:43 pm | विजुभाऊ

एखादी गोष्ट पिढ्यान पिढ्या केली जात असेल तर तिच्यामागे नक्कीच काहितरी कारण असेल. आणि जर ते समजुन न घेता तुम्ही खिल्ली उडवत असाल तर... तुम्ही चुक असण्याचीच शक्यता जास्त आहे.

परंपरा प्रत्येक वेळीस बरोबरच असतील असे नाही.
१)पृथ्वी गोल आहे असे मानण्याची परंपरा होती.
२)कृष्णाने जेंव्हा परंपरेने चालत आलेली इंद्राची पूजा बंद करुन चारा आन्न देणार्‍या डोंगराची पूजा सुरु केली
३) परंपरेने चालत आलेली समजूत "पुत्र पालथा जन्मणे हे अशूभ असते" शिवाजी ने जेंव्हा ऐकले की पुत्र पालथा जन्मला तेंव्हा शिवबा म्हणाले पुत्र पालथा जन्मला पातशाही पालथी घालेल"
४) समुद्र ओलांडु नये त्यामुळे पातक लागते. ही पारम्पारीक समजूत आहे.
परंपरेने चालत आलेल्या समजुती नव्या ज्ञानाने दूर होतात्.
परंपरा या नेहमी नकारात्मक असतात?

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:49 pm | अवलिया

१)पृथ्वी गोल आहे असे मानण्याची परंपरा होती.
ती बरोबर नाही काय?

२)कृष्णाने जेंव्हा परंपरेने चालत आलेली इंद्राची पूजा बंद करुन चारा आन्न देणार्‍या डोंगराची पूजा सुरु केली
यावर आपली मागे चर्चा झाली आहे.

३) परंपरेने चालत आलेली समजूत "पुत्र पालथा जन्मणे हे अशूभ असते" शिवाजी ने जेंव्हा ऐकले की पुत्र पालथा जन्मला तेंव्हा शिवबा म्हणाले पुत्र पालथा जन्मला पातशाही पालथी घालेल"

मी तरी असे कधी ऐकले नाही.

४) समुद्र ओलांडु नये त्यामुळे पातक लागते. ही पारम्पारीक समजूत आहे.
समुद्र ओलांडु नये ही नवव्या शतकात हबशांच्या आक्रमणामुळे रुढ झालेली प्रथा होती.

पारंपारीक समजुत आणी परंपरा यात भेद आहे. त्यात तारतम्य वापरावेच लागते.

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 2:49 pm | विजुभाऊ

पृथ्वी सपात आहे ही समजूत होते.
सपाट ऐवजी चुकुन गोल असे टंकले गेले

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 1:49 pm | अभिरत भिरभि-या

१)पृथ्वी गोल आहे असे मानण्याची परंपरा होती.

पृथ्वी सपाट होती असे मानण्याची परंपरा होती.

असो पण एक प्रकारे तुम्हीही बरोबर आहात. आपण सध्या थॉमस फ्राईडमनच्या काळात जगतोय ज्यात "वर्ल्ड इज फ्ल्याट" असे मानले जाते :)

---
छत्रपतींना एकेरी संबोधु नये असे सुचवावेसे वाटते

विसुनाना's picture

23 Oct 2008 - 12:01 pm | विसुनाना

वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र (जसे - शाहू महाराजांच्या काळातील वाद) यात नक्की काय फरक आहे?
मुळात वेदात यज्ञाव्यतिरिक्त इतर कर्मकांड आहे काय? असले तर ते कसे आले?
वेदोक्त मंत्र / कर्मकांड ते श्रेष्ठ आणि पुराणोक्त ते कनिष्ठ अशी मान्यता असेल तर हिंदू धर्माने समस्त पुराणांना
स्पष्टपणे नाकारावे काय?

उत्तरे केवळ धर्मशास्त्रावर आधारलेली असण्याऐवजी इतिहासाधारित, ससंदर्भ आणि वेगवेगळ्या उदाहरणांसह मिळाल्यास समजण्यास सोपे जाईल.

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 12:34 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
हा प्रष्न मी खूप जणाना विचारला. समाधानकारक उत्तर अजुनही मिळाले नाही. लग्नामध्ये नवर्याने नवरीला सोललेल्या केळ्याचाच घास भरव्ण्यामागे काय शास्त्र आहे.

अवलिया's picture

23 Oct 2008 - 12:36 pm | अवलिया

ठ्य =))

अहो ते फार मोठे शास्त्र आहे. व्यनी करतो तुम्हाला... ;)

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 1:53 pm | अभिरत भिरभि-या

कामशास्त्रावर एक लेख टाकणार होतात असे तुम्ही पूर्वीही सूचित केले होते .. ;)

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:59 pm | अवलिया

प्रतिक्रिया देण्यास नम्र नकार. [(

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Oct 2008 - 3:28 pm | llपुण्याचे पेशवेll

मला पण व्यनि करा. :)

(व्यनीच्या प्रतिक्षेत)
पुण्याचे पेशवे

अवलिया's picture

23 Oct 2008 - 3:35 pm | अवलिया

तुम्ही पण... :O
काय बोलु ... शब्दच संपले आता! :?
परमेश्वरा... मानवाचे अस्तित्वच धोक्यात येतेय रे आता... लवकर अवतार घे. ;)

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 3:44 pm | अभिरत भिरभि-या

मानवाचे अस्तित्वच धोक्यात येतेय रे आता
अहो याने मानव "अस्तित्वात" येतो; त्याचे अस्तित्व धोक्यात येत नाही =))

अवलिया's picture

23 Oct 2008 - 3:47 pm | अवलिया

अहो त्यांनी व्य नी करुन खुलासा मागितला म्हणुन मी तसे म्हणालो.

नीट वाचा हो... असे का करता तुम्ही शिकलेली माणसे. टमाट्यावर बटाटे ठेवता पिशवीत?

मनीषा's picture

23 Oct 2008 - 12:48 pm | मनीषा

रा. रा. विद्याधर शास्त्री करंदीकर व श्री रामदास यांना प्रथम धन्यवाद !!

प्रश्न --
१) लग्न , मुंज आदी धार्मिकविधी अग्नीला साक्षी ठेऊन करण्याची प्रथा का रूढ झाली ?
२) हिंदू धार्मिक/मंगल कार्यां मधे काळा रंग हा अशुभ मानतात, मग मंगळसूत्रा मधे काळे मणी का असतात ?
३) हिंदू धर्मामधे गंध, हळद, कुंकु यांचे महत्व का आहे ?

अवलिया's picture

23 Oct 2008 - 1:51 pm | अवलिया

१) लग्न , मुंज आदी धार्मिकविधी अग्नीला साक्षी ठेऊन करण्याची प्रथा का रूढ झाली ?

मनुष्य शिकारी अवस्थेतुन समाज अवस्थेत येण्यास अग्नीचा फार मोठा हातभार आहे. पुर्वी शिकार करुन कच्चे मांस खाल्ले जायचे. हळुहळू अचानक केव्हातरी आगीमुळे मांस भाजले जाते. ते रुचकर लागते असा शोध लागला. हळुहळु धान्य वगैरेचा शोध लागुन काहि प्रमाणार मांसाहार कमी झाला पण शाकाहारासाठी सुद्धा अग्नीची गरज लागतच असे. आज जसे लायटर किंवा काडेपेटी ने आपण लगेच आग तयार करु शकतो तसे पुर्वी नव्हते. त्यामुळे घरात अग्नी सदोदित तेवत असे. ह्या अग्नीला अत्यंत पवित्र मानले जात असे. वेदकाळात यज्ञकर्म पवित्र मानुन यज्ञवेदीच्या सभोवतीच अग्नीसाक्ष मानुन सर्व विधी केले जात. त्याचेच फलस्वरुप आजही हे विधी अग्नीसाक्ष मानुन केले जातात.

२) हिंदू धार्मिक/मंगल कार्यां मधे काळा रंग हा अशुभ मानतात, मग मंगळसूत्रा मधे काळे मणी का असतात ?

नव्या नवरीला अगर संसाराला कोणाची नजर लागु नये या भावनेने.

३) हिंदू धर्मामधे गंध, हळद, कुंकु यांचे महत्व का आहे ?

जेव्हा वैदिक कालातील लोकांनी देवतांना बळी वाहणे कमी केले तेव्हा जेव्हा बळी नसेल तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून हळद कुंकु वाहीले जाते. गंध म्हणजे बळीच्या रक्ताचा टीळा. हळद कुंकु म्हणजे मांस व रक्ताचा सडा.

नितीनमहाजन's picture

23 Oct 2008 - 2:24 pm | नितीनमहाजन

नमस्कार,

आपण आपले सर्व सण पंचांगानुसार साजरे करतो. आपली कालगणना पध्द्ती १२ चांद्रमास व १ सौरवर्ष अशी आहे. त्यामुळे दर महिन्यात होणारी सूर्य संक्रांत (सूर्याचा पुढील राशीत प्रवेश) जी निश्चित त्याच दिवशी होणार याला पंचांगात मह्त्व आहे. म्हणून फक्त मकर संक्रांत आपण ग्रेगोरियन पध्द्तीने साजरा करतो कारण सूर्य त्या दिवशी मकर राशीत प्रवेश करणार हे नक्की असते(१४ जानेवारी).

असाच एक सण आपण ग्रेगोरियन पध्द्तीने साजरा करतो. तोम्हणजे "विश्वकर्मा दिन". एखाद्या कारखान्यात काम करणारे कामगार अथवा सुतार वगैरे लोक (जे लोक काही नवनिर्मिती करतात)हा सण भक्तीभावाने साजरा करतात. हा दिवस असतो १७ सप्टेंबर. जर आपण या दिवसाची माहिती पंचांगात पाहिली तर या दिवशी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश असा उल्लेख दिसेल.

ब्रह्मा, ज्याने हे सर्व विश्व निर्माण केले त्यालाच विश्वकर्मा असेही म्हणतात. आपल्या पुराणात एका विश्व व्यापून राहिलेल्या ब्रह्माचे वर्णन केलेले आहे. याचे आकाशातील रूप १२ राशी किंवा २७ नक्षत्रे यांत मिळून दाखविले आहे. हा ब्रह्मा या २७ नक्षत्रांमध्ये कसा दर्शवायचा व त्याचा (ब्रह्माचा ) या विश्वकर्मा दिनाचा काही संबंध लावता येईल का?

नितीन

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 2:44 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
लग्नामध्ये नातिचरामी ची शपथ घेतली जाते.
त्याचा अर्थ काय?
माझ्या महिती प्रमाणे बरेच पुरुष सोयिस्कर अर्थ लावतात.
नतिचरामी= न+ अतिचरामी.
थोडेफार चरले तर चालते.
योग्य बदल होणे शक्य आहे काय?

अभिज्ञ's picture

23 Oct 2008 - 3:21 pm | अभिज्ञ

सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाना चेंगटच देणार????????

:)
अभिज्ञ.

मिसंदीप's picture

23 Oct 2008 - 3:55 pm | मिसंदीप

देवळाच्या प्रवेशद्वराजवळ घंटा बांधण्याचे अजुन एक कारण पुढीलप्रमाणे,
पुर्वी मंदीरामध्ये लाईटची सोय नव्हती व पर्यायाने गाभार्‍या मध्ये अंधार असायचा. आसपास असलेल्या वनराईतुन सरपटणारे प्राणी गाभार्‍यात यायचे.(साप, सरडे, पाल इ.)
त्यामुळे आपण मंदीरात जाताना हा घंटानाद करुन जायचो, या घंटानादाने उत्पन होणार्‍या ध्वनी लहरी, या प्राण्यांना सावधानतेचा इशारा द्यायच्या. पर्यायाने माणसांचा या प्राण्यांच्या दंशापासुन वचाव व्हायचा.

महेश हतोळकर's picture

23 Oct 2008 - 5:10 pm | महेश हतोळकर

सरपटणार्‍या प्राण्यांना (साप, सरडे, पाल इ.) हवेतून ध्वनी लहरी ग्रहण करता येत नाहीत. ते फक्त खाली असलेल्या पृष्ठभागातून येणार्‍या लहरी ग्रहण करू शकतात. म्हणून शेतातून चालताना आवाज करणारी वहाण वापरतात किंवा काठी आपटत चालतात.

आता देवळात एकांतात बसलेल्या इतर प्राण्यांना सावध करण्यासाठी या आवाजाचा उपयोग होऊ शकतो. :$

सुमीत भातखंडे's picture

23 Oct 2008 - 4:55 pm | सुमीत भातखंडे

आपण देवळात गेल्यावर दर्शन घेऊन झाल्यावर देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. त्यामागचे कारण काय?
शिवाय शंकराच्या देवळात प्रदक्षिणा थोडी वेगळ्या प्रकारे घातली जाते. त्याबद्दल जणून घ्यायला आवडेल.

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 5:57 pm | विजुभाऊ

शंकराच्या पिंडीचे वर्णन काही मानवी लोक योनी आणि लिंग यांचे प्रतीक आहे असे सांगतात.
शंकराच्या पिंडीला शिवलिंग असेही म्हणतात.
देवत्व आणि जननेंद्रीय (योनी /लिंग) पूजा याचा संबन्ध काय
झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अवलिया's picture

23 Oct 2008 - 6:00 pm | अवलिया

विजुभावु सांख्ययोगाचे अध्ययन केले तर तुम्हाला कळेल विस्तृतपणे.
प्रकृति व पुरुष यांचे एकत्रित प्रतिक म्हणून शिवलिंग मानले जाते.

सुचेल तसं's picture

24 Oct 2008 - 8:10 pm | सुचेल तसं

ह्यासंदर्भातील पौराणिक कथा अशी आहे:

एकदा विष्णू आणि ब्रह्मा ह्यांच्यामधे कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद सुरु झाले. काही केल्या वादाचा निकाल लागेना तेव्हा त्यांनी असं ठरवलं की शंकराकडे जाऊन त्यांना विचारुया. जेव्हा ते शंकराकडे गेले तेव्हा शंकर आणि पार्वती समागम करीत होते. ते समागमामधे एवढे तल्लीन झाले होते की त्यांना कोणी आलय ह्याची कल्पनादेखील आली नाही. बराच वेळ ताटकळून सुद्धा लक्ष गेलं नाही म्हणून विष्णूनी (किंवा ब्रम्हानी) त्यांना शाप दिला की इथून पुढे कायम तुमच्या लिंगाच्या प्रतिकृतीचीच पूजा केली जाईल.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

बैल्र रिकामा's picture

24 Oct 2008 - 1:20 am | बैल्र रिकामा

.......परमात्मा, ब्रह्म हे सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासुन आहेत. नव्हे त्यांच्यापासुनच सृष्टी निर्माण झाली......इति नाना चेंगट.

........हे तुम्हास कसे कळले बुवा?
म्हणजे ही ऐकीव माहिती आहे, की अनुमान आहे, की प्रत्यक्ष ज्ञान आहे?
......प्रत्यक्षानुमानागत् प्रमाणानी....इति पतंजली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2008 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंदिराबाहेर फरशीवर ब-याचदा कासवाची प्रतिमा कोरलेली असते, ते कशासाठी असते ?

भिंगरि's picture

24 Oct 2008 - 8:27 am | भिंगरि

देवळात किंवा एखाद्या मंगल प्रसंगि नारळ फोडण्यामागे नक्कि काय उद्देश होता?

विजुभाऊ's picture

24 Oct 2008 - 9:37 am | विजुभाऊ

नारळ हे नरमुंडाचे प्रतीक आहे
नारळ फोडणे हे वस्तुतः नरबळी देणे या अर्थाने वापरले जाते.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मिसंदीप's picture

24 Oct 2008 - 12:09 pm | मिसंदीप

मी साहेब,
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाबद्द्ल धन्यवाद. माझे पण गैरसमज दुर झाले.

भिंगरि's picture

25 Oct 2008 - 4:04 am | भिंगरि

<<<नारळ फोडणे हे वस्तुतः नरबळी देणे या अर्थाने वापरले जा<<<>>>

हो मी ऐकलय हे पण मग मुहुर्ताचा नारळ फोडणे वगैरे कसे आणि बळिचि प्रथा फक्त काहि देवतांच्या बाबतित च असते ना उदा. तुळजाभवानि. गणपतिच्या मंदिरातहि नारळ फोडले जाते ते का? आणि जर नारळ बळि साठि रिल्पेसमेंट असेल तर मग सरसकट ती प्रथा निकालात का नाहि निघालि? अजुन अस्तित्वात का आहे? काहि ठिकाणि नारळ आणि काहि ठिकाणि बळि अस का?

धमाल नावाचा बैल's picture

25 Oct 2008 - 5:15 am | धमाल नावाचा बैल

पारंपारिक (बुरसटलेल्या विचारांचा नाही हं) नाना चेंगटाने दिलेले उत्तर वाचले नाहिस का? एखादी गोष्ट पिढ्यान पिढ्या केली जात असेल तर तिच्यामागे नक्कीच काहितरी कारण असेल. आणि जर ते समजुन न घेता तुम्ही खिल्ली उडवत असाल तर... तुम्ही चुक असण्याचीच शक्यता जास्त आहे.

नरबळी वगैरे पिढ्यान पिढ्या चालू असलेले प्रकार बंद करुन नारळ फोडणे वगैरे पानचट प्रकार सुरू करणार्‍यांचा मी निषेध करतो.

आपला
बैलोबा

भिंगरि's picture

30 Oct 2008 - 9:57 pm | भिंगरि

:D