उत्सव - वाटेवरील रंग

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in कलादालन
22 Oct 2008 - 1:46 am

सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो.

वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली. पहा तुम्हाला भावतात का....

या गर्द झाडीने आमच्या घराच्या परिसराला खुलवलेले आहे...

पुढे हमरस्त्याला लागल्यावर दोहोबाजूंच्या सौंदर्याची जणू स्पर्धाच चाललेली असते.

चौकात रस्त्यांची नावे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला निसर्गा येवढे बक्षीस कोण बरे देऊ शकेल?

हा सुंदर रस्ता संपावा असे कोणाला बरे वाटेल!!

सिग्नल लागलेला आहे?... जरा बाजूला पहा... जराही कंटाळवाने होणार नाही!

अशी लालबुंद झाडे गावच्या गुलमोहराची आठवण करुन देतात, नाही का?

असा सजला आहे हा टॅलकॉट डोंगर...

चला आता आम्ही कार्यालयाच्या वाहनतळात वळत आहोत. स्वागताला हे ताम्र-तरु सज्ज आहेत... धन्यवाद मित्रांनो!

हा छोटासा वृक्ष उगाच मला हिनवत असतो, "तुम्ही मानव करु शकता का अशी सुंदर निर्मिती?".. . नाही बा, आम्ही नतमस्तक आहोत तुझ्या सौंदर्यासमोर अन आपल्या त्या विधात्या समोर!

त्या विधात्याने सर्वांना वाटून दिलं आहे. अगदी या खुरट्या झुडुपाला सुद्धा किती मनमोहक बनवलं आहे पहा ना...

आणी ही लिची सदृश्य झाडे पहा ना... टपोरी लाल-लाल फळे कशी खुलून दिसताहेत.

चला आता कामावर जातो...

संध्याकाळी परतताना...

मावळतीच्या उन्हात न्हाऊन निघालेला हा टॅल्कॉट डोंगर व त्याच्यावर असणारा मनोरा... खुनावतो आहे. गड्य येतो तुला भेटायला शनि-रविवारी.

कार्यालयातून बाहेर पडताना... गड्यांनो दिवसाचा सगळा शीन घालवलात.

तोच टॅलकॉट डोंगर विरुद्ध बाजूने... तळ्यामागे...

"चढन रस्त्याचे असो वा जीवनाचे... उगवत्या सुर्याच्या तेजातले वा मावळतीच्या मंद पोक्तीचे... रंगीबेरंगी असल्याने चढताना दम लागत नाही हेच खरे... फक्त डोळे अन मन उघडे हवे"... हेच तर सांगत नाहीत ना या चढनावरची ही झाडे?

जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे दोन्ही जुळती.

कलादेशांतरछायाचित्रण

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

22 Oct 2008 - 4:59 am | भाग्यश्री

सुंदर चित्रे..

सहज's picture

22 Oct 2008 - 5:43 am | सहज

भास्करराव छान फोटो.

मला देखील हे फॉल कलर्स खूप आवडतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Oct 2008 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला देखील हे फॉल कलर्स खूप आवडतात.
मलाही! आता फक्त फोटो बघून समाधान करुन घेते.
थोडे मोठे टाकता येतील का फोटो, भास्करराव?

विकास's picture

22 Oct 2008 - 6:44 am | विकास

छान चित्रे आली आहेत भास्करराव! खाली आमची काही या वर्षीची फॉल कलर्स, ऍपल पिकींग आणि इतर चित्रे (दगडी स्टेट पार्कमधील ).

थोडी माहीती: अमेरिकेतील न्यू इंग्लंड भागात सप्टेंबरच्या अखेरीपासून ते ऑक्टॉबरच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत झाडे रंगीबेरंगी होतात. त्या व्यतिरीक्त याच काळात सफरचंदेपण झाडावर आलेली असतात.

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2008 - 9:10 pm | भास्कर केन्डे

"थोडी माहिती" दिल्याबद्दल धन्यवाद! खरे तर मीच ती द्यायला हवी होती.

बाकी तुम्ही काढलेली छायाचित्रे पण सुंदर आहेत. इकडे सफरचंदांच्या बागा अंमळ जास्तीच आहेत असे वाटते. आमचा पण तो फावल्या वेळातला उद्योग होऊन बसला आहे... बागांमध्ये फिरायला जायचा.

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2008 - 9:10 pm | भास्कर केन्डे

"थोडी माहिती" दिल्याबद्दल धन्यवाद! खरे तर मीच ती द्यायला हवी होती.

बाकी तुम्ही काढलेली छायाचित्रे पण सुंदर आहेत. इकडे सफरचंदांच्या बागा अंमळ जास्तीच आहेत असे वाटते. आमचा पण तो फावल्या वेळातला उद्योग होऊन बसला आहे... बागांमध्ये फिरायला जायचा.

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

खरा डॉन's picture

22 Oct 2008 - 6:59 am | खरा डॉन

अहो केंडॅ उत्सव कसले साजरे करताय? इकडच्या चर्चा जरा वाचा. महारास्ट्र पेटलाय!

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2008 - 9:14 pm | भास्कर केन्डे

होय डॉन महाशय, मी त्या चर्चांमध्ये पण सहभागी आहे. प्रत्येक चर्चेत प्रतिसाद दिले आहेत. जरा एक बदल म्हणून ही माहिती टाकली. बाकी चंद्रायानाची गोड बातमी पण आली आहेच.

तसेही तात्यांनी मनसे आंदोलनाशी संलग्न सगळ्याच चर्चा बंद केल्या आहेत तेव्हा या बहुविध विषयांवरील लेखांमुळे मिपाचा प्रवाह चालू आहे. त्यामुळे वेगळ्या विषयांवरील लेखनही येऊ द्यात.

आपला,
(सर्ववेधी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विनायक प्रभू's picture

22 Oct 2008 - 1:23 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/ आवड्ली बाबा तुम्ची चित्रे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 6:34 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर छायाचित्रे.
पण मोठ्या आकारात जास्त चांगली आस्वादता आली असती.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2008 - 9:18 pm | भास्कर केन्डे

पंत,

चित्रांवर टिचकी मारल्यावर ती मोठ्या आकारात दिसतील.

स्-स्नेह,
भास्कर

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 9:26 pm | प्रभाकर पेठकर

चित्रांवर टिचकी मारल्यावर ती मोठ्या आकारात दिसतील.
त्यात मजा नाही. टिचक्या मारून 'मोठे' करण्यात नेहमीच मजा येत नाही.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

भास्कर केन्डे's picture

17 Dec 2008 - 10:53 pm | भास्कर केन्डे

आदरणीय पंत,
आपल्या इच्छेला मान देत चित्रे मोठी केली आहेत.

आपला,
(चाहता) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मानस's picture

22 Oct 2008 - 11:27 pm | मानस

त्यात मजा नाही. टिचक्या मारून 'मोठे' करण्यात नेहमीच मजा येत नाही.

जबरा!!

धनंजय's picture

23 Oct 2008 - 12:02 am | धनंजय

अजून येथे दक्षिणेकडे (मध्य-ऍटलांटिक-किनार्‍याकडे) रंग फारसे बदललेले नाहीत.

सुंदर रंग दिसत आहेत नव्या इंलंडात.

भास्कर केन्डे's picture

23 Oct 2008 - 12:49 am | भास्कर केन्डे

पण त्या भागात रंग बदलतात का?

अजून दक्षिणेला बदलत नाहीत पण मधल्या भागाबद्दलच्या पानगळती बद्द्ल जास्त माहिती नाही.

आपला,
(अज्ञानी) भास्कर

विसोबा खेचर's picture

23 Oct 2008 - 7:36 am | विसोबा खेचर

सुंदर चित्र..!

चतुरंग's picture

23 Oct 2008 - 9:15 am | चतुरंग

निसर्ग पानगळीच्या दिवसात रंगपंचमी करत असतो ते फारच छान दिसते.
सुरेख चित्रे (अजून मोठी द्यायला हवी होतीत हे नक्की!)
चतुरंग