प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी. पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!
Making of photo and status :
वरच्या फोटोत काय दिसतंय ते पहा बरं!!? त्यात एक जोडपं दिसतंय ना? त्यांच्या गळ्यात असलेल्या हारावरून आणि एकंदर पेहरावावरून त्यांचं नुकतंच लग्न झालेलं वाटतंय ना? जोडपं जरा गावकडचं असावं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अभिर्भाव तर किती मजेदार दिसतायत नाही!!? डोक्यावर पदर घेतलेली नवरी कित्ती नाजूक साजूक वाटतेय. तिचे टपोरे डोळे नववधूसारखे बावरलेले वाटतायत. ओठांचा केलेला चंबु तर खासच दिसतोय. आणि चेहऱ्यावर रुळणार्या बटेने तर नागिणीसारखे वेटोळे घेतलेत. तसेच डोक्याला मुंडासे बांधलेल्या नवरदेवाच्या जाड भुवया, सुपासारखे कान, आणि फुगीर नाक त्याच्यातील राकटपणा दर्शवितोय.
हा फोटो पाहून मला असं वाटलं, की नुकतेच लग्न झालेले त्यातील नवरा नवरी हनिमूनला जाताना कोणाचातरी निरोप घ्यायला दोन क्षण थांबलेत. बस्! मी ठरवलं की आपण ह्या त्यांच्या निरोप घेण्याच्या प्रसंगावरचंच स्टेटस लिहावं. दोघेही गावाकडचे वाटत असल्यामुळे स्टेटसची भाषा मी मुद्दाम गावरान निवडली आणि स्टेट्सच्या सुरवातीलाच पहिलं वाक्य लिहिलं "येऊ का आता?" आपण निरोप घेताना म्हणतो ना अगदी तसं! पुढे लिहिलं "लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी." या वाक्यावरून वाचकांना मी कन्फर्म करून दिलं, की या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ते खंडाळ्याला हनिमूनला जायला निघताना आपला निरोप घ्यायला थांबलेत.
आता मी त्या जोडप्यांकरिता 'खंडाळा' हेच हनिमूनचं ठिकाण का निवडलं असावं? कारण मला स्टेटसमध्ये जराशी गंमत आणायची होती. खंडाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं बरं? अगदी बरोब्बर!! आपल्याला 'आमिर खान'चं तुफान गाजलेलं 'आती क्या खंडाला?' हे गाणं आठवतं. बस् ! मी त्या गाण्याचा आणि आपल्या स्टेटसचा संबंध लावून टाकला. आणि नवरदेवाच्या तोंडी उपहासाने एक वाक्य टाकून दिले, की "पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!" म्हणजे पहा! नवरदेव किती खोडकर आहे ते!! त्यालाही माहितेय ते आमिर खानचं गाणं आणि त्यातील गंमत.
इथे झालं की मग आपलं फोटोवरून स्टेटस तयार! फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश लिहिलेले नसतानाही मी त्या फोटोला अजूनच मजेदार करून टाकलं. प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तुम्हीही तुमची कल्पनाशक्ती वापरून ह्याच फोटोवर एक संपुर्ण वेगळं स्टेटस लिहू शकता. बघा बरं प्रयत्न करून. पण ते मला कळवायला विसरू नका हं!
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
प्रतिक्रिया
4 Dec 2017 - 7:31 pm | सिद्धार्थ ४
लै भारि
4 Dec 2017 - 8:28 pm | सचिन काळे
@ सिद्धार्थ ४, धन्यवाद!
4 Dec 2017 - 8:43 pm | प्रसाद_१९८२
239 वाचने होऊनही फक्त एकच प्रतिक्रिया?
तीही माझी व लेखकाची सोडून याचा अर्थ तुमच्या ह्या "जिलब्यां"ना इथले सदस्य वैतागलेले दिसतायत. :))
4 Dec 2017 - 10:00 pm | सचिन काळे
@ प्रसाद १९८२,
@ प्रसादजी, पुडीत जिलबी आहे हे माहीत असूनही 239 लोकांनी पुडी खोलून पाहिली, यातच सर्व आले नाही का?
खाली वाचा, सतीश गावडेजी किती आवडीने जिलबीचा आस्वाद घेतायत ते!!
4 Dec 2017 - 9:07 pm | सतिश गावडे
खडकी दापोडी वाकड बोपोडी
तळेगांव कान्हे की रावेतला
कुटं कुटं जायाचं हनिमुनला
राया कुटं कुटं जायाचं हनिमुनला
4 Dec 2017 - 10:03 pm | सचिन काळे
@ सतीश गावडेजी, झक्कास गाणे आठवले तुम्हाला! हा! हा!! हा!!
5 Dec 2017 - 11:41 am | अनन्त्_यात्री
यापुढे माझं नांव घेताना लोकं बोलतील "सचिन काळे म्हणजे ओ तेच हो! हा! हा!! हा!! वाले!!
5 Dec 2017 - 12:33 pm | सचिन काळे
अगदी बरोबर!! हा! हा!! हा!!
5 Dec 2017 - 3:25 pm | विनिता००२
भारी :)
5 Dec 2017 - 7:45 pm | सचिन काळे
@ विनिता००२, प्रतिक्रियेकरिता धन्यवाद!
6 Dec 2017 - 3:45 pm | नितीन पाठक
मस्त. मजा आली.
अजून येउ द्या.
6 Dec 2017 - 4:26 pm | सचिन काळे
@ नितीन पाठकजी, आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता आपले फार फार आभार!
6 Dec 2017 - 4:37 pm | कपिलमुनी
तुम्ही आधी फोटो टाकून वाचकांकडून स्टेट्स मागवू शकता आणि नन्तर तुमचे स्टेट्स टाका
6 Dec 2017 - 6:37 pm | सचिन काळे
@ कपिलमुनीजी, माय फ्रेंड!! आपणांस खूप सारे धन्यवाद!
आपण खूप छान कल्पना मांडलीत. हा एक फारच सुंदर उपक्रम होईल. पण आपला आदर राखून आपणांस सांगावेसे वाटते, की असा उपक्रम माननीय संयोजकांनीच राबविणे योग्य राहील.
6 Dec 2017 - 6:51 pm | सूड
हगणदारीमुक्त गाव वैगरे चा फोटो आहे का?
6 Dec 2017 - 6:57 pm | सचिन काळे
@ सूड, नाही हो!
8 Dec 2017 - 2:32 pm | सिद्धार्थ ४
आता अजिबात धीर धरवत नाही. काय असेल बरे ह्या वेळी?