Making of photo and status : ७. गोलुमोलु

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
19 Nov 2017 - 8:35 am

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.misalpav.com/node/41232

काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!

Making of photo and status :
कार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का? cute ना!! अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का? गोलुमोलू! हा! हा!! हा!!

हा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही!!!? आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले.

माझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल!! आता पहा! गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल? बरोबर!! आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना!!? इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, "काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? " हा! हा!! हा!!

आता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा! "येता का सोबतीला?" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं? तर "जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत." आणि ते पण कसं? तर जोडीनं!! म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय? तर दूध!! गोलुमोलुचं फेवरेट!! वर आपल्यालाच तो सांगतोय, "टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!" बघा ना! आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.

तर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला? मग!!?.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत? दूध आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

कला

प्रतिक्रिया

सचिन काळे's picture

19 Nov 2017 - 2:53 pm | सचिन काळे

@ स्पा, पुन्हा एक दणकुन जिलबी टाकलीय. या चाखायला! हा! हा!! हा!!

बाजीप्रभू's picture

19 Nov 2017 - 11:32 pm | बाजीप्रभू

गोलुमोलु थोडा मोठा होऊ द्यात मग जातो त्याच्या सोबतीने हलत-डुलत नाक्यापर्यंत? बाटली आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!

चामुंडराय's picture

19 Nov 2017 - 11:46 pm | चामुंडराय

येता बाटलीचा परिमळू
झिंगला गो गोळूमाळू
मी म्हणे सचिनाळू
फोटो आला गे मीपे.

सचिन काळे's picture

20 Nov 2017 - 7:25 am | सचिन काळे

@ चामुंडराय, फारच सुंदर रचना केलीय आपण. आवडली!

सचिन काळे's picture

20 Nov 2017 - 6:55 am | सचिन काळे

@ बाजीप्रभू, मग जातो त्याच्या सोबतीने हलत-डुलत नाक्यापर्यंत? बाटली आणायला हो!!! >>> हा! हा!! हा!! लई भारी!!

अनन्त्_यात्री's picture

20 Nov 2017 - 11:45 am | अनन्त्_यात्री

...हा आपल्या लिखाणाचा ट्रेडमार्क होतोय असं नाही वाटत?

सचिन काळे's picture

20 Nov 2017 - 12:10 pm | सचिन काळे

@ अनन्त_ यात्री, ...हा आपल्या लिखाणाचा ट्रेडमार्क होतोय असं नाही वाटत? >>> अरे खरंच की!!! हा! हा!! हा!!!

सचिन काळे's picture

20 Nov 2017 - 12:16 pm | सचिन काळे

गंमतच आहे नाही!!? यापुढे माझं नांव घेताना लोकं बोलतील "सचिन काळे म्हणजे ओ तेच हो! हा! हा!! हा!! वाले!!" हा! हा!! हा!!

काही जणांना लेखातील फोटो दिसत नाही म्हणून मी खाली पुन्हा तो फोटो टाकत आहे.