मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींग असावं का?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
18 Oct 2017 - 11:07 am
गाभा: 

सर्वप्रथम सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!

मिपावर रोज बरेचसे धागे काढले जातात.काही वाचनीय असतात तर काही धागे स्कोअर सेटलिंगसाठी,सहज काही वाटलं म्हणूनही काढले जातात.यामुळे होतं काय की चांगला वाचनीय धागा कुठेतरी तळाशी जातो.किंवा असा वाचनीय नसलेला धागा वाचनीय नाही हे सांगण्यासाठी म्हणून प्रतिसाद दिले जातात आणि स्कोअर वाढतो.मग कोणीतरी एवढे प्रतिसाद? म्हणून उत्सुकतेने धागा उघडतं आणि पदरी निराशा पडते. मग 'पूर्वीसारखं मिपा राहिलं नाही आता' हे पालुपद सुरु होतं.

हे सगळं टाळण्यासाठी मिपावरच्या धाग्यांसाठी रेटींगची किंवा लाईक/डिसलाईकचं टूल उपलब्ध करुन दिलं जावं का? उत्तम,चांगला,बरा,बिनमहत्वाचा अशी श्रेणी दिली जावी का? भटकंती, तंत्रविषयक, पाककला आणि कला प्रकारातल्या धाग्यांसाठी याची गरज नाही पण चर्चा,काथ्याकूट,जे न देखे रवी,जनातलं-मनातलं या प्रकारच्या धाग्यांसाठी हे का असू नये?

हे करायचं ठरवलं तर ते कशा प्रकारे करावं? म्हणजे आवडला/नाही आवडला या सुविधेसोबतच रेटींगचीही सोय असावी की दोन्हीपैकी एकच सोय असावी?

रेटींग द्यायचं ठरलंच तर ते कोणी द्यावं? सरसकट सर्वांनाच हा अधिकार असावा? की मिपाने त्यासाठी चांगली टीम निवडून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी? कारण WhatsApp वरुन gm/gn , J1 झालं का? याच्या पलिकडे न लिहिणारा माणूस मिपाचा सदस्य असू शकतो.

जी टीम बनवली जाईल त्यातील सदस्यही बायस्ड नसणं गरजेचं आहे.अन्यथा 'मागचे उट्टे काढण्यासाठी,सूड उगवण्यासाठी' आयतं हत्यार मिळायला नको.

ज्यांच्या धाग्याला बरा किंवा अगदी बिनमहत्वाचा असं रेटींग मिळेल त्यांनी निराश होण्याचं कारण नाही.पुढील धाग्यासाठी सुधारणा काय कराव्यात याच्या मार्गदर्शक सूचनाही त्याच 'बर्‍या किंवा बिनमहत्वाच्या' धाग्यावर दिल्या जाव्यात.जेणेकरुन पुढील धागा वाचनीय व्हावा.

काय वाटतं मिपाकरांना?

प्रतिक्रिया

मोदक's picture

18 Oct 2017 - 11:19 am | मोदक

आहे ते चांगले आहे. उगाच रेटींग बिटींग देऊन लक्तरे नकोत लोळवायला.

आनन्दा's picture

18 Oct 2017 - 11:20 am | आनन्दा

याहीपेक्षाअजून एक आयडिया डोक्यात आली.
मिपावर इतर सदऱ्यांसारखे ब्लॉग म्हणून देखील एक सदर असावे. आणि ब्लॉग्सदृश लिखाण तेथे हलवावे.

बराचसा भार कमी होईल.
काय शुक्लभौ?

मी लिहतो ते मला वाटते कि संवाद साधावा म्हणून. मी आहे एक सामान्य वाचक ... माझी मराठी चांगली राहावी व तसेच मराठीतुन अधिकाधिक माहिती मिळत राहावी असे मला वाटते. जर रेटिंग पद्धत आणली तर त्या रेटिंगच्या ओझ्याखाली मी स्वाभाविकपणे (naturally ) (कधी वाटले तरी) लिहू शकणार नाही. मी आहे तसा व्यक्त होणार नाही. केवळ उच्च बुद्धिमत्ता वा प्रतिभा वा 'एक्सपर्टीस' असणारे लेखन करतील.
मात्र तुम्ही म्हणताय तसे एखादयाला केवळ काही विशिष्ट लेख पाहिजे असतील तर विषयानुरूप वर्गीकरण हवे.

गॅरी ट्रुमन's picture

18 Oct 2017 - 12:56 pm | गॅरी ट्रुमन

याच धाग्याला वजा एक रेटिंग द्यावेसे वाटत आहे :) :)

धन किंवा ऋण श्रेणीचा अर्थ काय? एखादा धागा खरोखरच चांगला आहे की त्यातील मते आपल्याला आवडतात की लेखनशैली चांगली आहे की अन्य काही? हे ठरवायचे कोणी आणि कोणत्या आधारावर? एन.डी.टी.व्ही वर बरखा दत्त बुरहान वाणीचे तो 'शाळाशिक्षकाचा मुलगा' म्हणून गोडवे गात होती (अगदी सौम्य, सभ्य आणि सुसंकृत शब्दात) त्याला धन श्रेणी द्यायची की ऋण श्रेणी द्यायची? अरणब गोस्वामी बर्‍याचदा (माझ्या मते) योग्य भूमिका मांडत असला तरी तो आरडाओरडा करतो मग त्याला धन श्रेणी द्यायची की ऋण? समजा एखाद्याचे विचार आपल्या मताविरूध्द असले तरी त्यातून काहीतरी नवा दृष्टीकोन मिळू शकतो. अशावेळी मग तो लेख/प्रतिसाद ऋण श्रेणीचा धनी की धन श्रेणीचा धनी? आणि जरी आपल्या मताविरूध्द मत मांडले असले तरी त्यातही काहीतरी घेण्यासारखे असू शकते हे मान्य करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी माणूस तेवढा प्रगल्भ हवा. श्रेणी देणारे असा प्रगल्भपणा दाखवू शकतील हे एक गृहितक झाले. प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेलच असे नाही. निदान माझ्यात तरी तसा प्रगल्भपणा नाही म्हणून मी बहुदा 'एक्स्ट्रापोलेट' करत आहे.

मिपाचे ऐसीकरण टाळायचे असेल तर अजिबात श्रेणी पध्दत नको. पुरोगामी, डावे, विज्ञानवादी इत्यादी इत्यादी मंडळींनी ऐसीची सुरवात केली. तेव्हापासून झाले असे की तिथे त्याच विचारांच्या मंडळींचा घोळका झाला. अशा मंडळींच्या विरोधी मत मांडले की ताबडतोब त्याला ऋण श्रेणींचे धनी बनविले जायची सुरवात झाली. चार विरोधी प्रतिसाद आले तरी त्यापेक्षा ऋण १ (कैच्याकै, खोडसाळ इत्यादी) श्रेणी मिळायचा परिणाम बहुसंख्यांवर जास्त होतो कारण तो आकड्यात दिसतो. सगळ्यांकडे त्या सगळ्याला न जुमानायची गेंड्याची कातडी असेलच असे नाही. म्हणूनच तिकडे डाव्यांची बहुसंख्या झाली. मग असे चित्र उभे राहिले की श्रेणीपध्दतीचा वापर कंपूबाजीसाठी होतो. प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेलच असे नाही. पण आपल्याला पटले नाही म्हणून एखाद्या लेखाला/प्रतिसादाला ऋण श्रेणी दिली आणि बहुसंख्य श्रेणी देणारे जर एकाच विचाराचे असतील तर श्रेणीचा वापर करून ही मंडळी आपलाच कंपू बनवत आहेत असे चित्र उभे राहिल्यास त्यात चुकीचे काय?

मिपावर श्रेणीपध्दत आल्यास मला (आणि माझ्यासारखेच वाटणार्‍या) कोणालाही श्रेणी द्यायचा अधिकार नको आणि माझ्या लेख/प्रतिसादांनाही कोणी श्रेणी देऊ नये अशी काहीतरी व्यवस्था करावी ही विनंती.

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2017 - 6:10 pm | चौथा कोनाडा

अगदी माझ्या मनातलेच मुद्दे !

पर्फेक्ट.. हेच म्हणायचे होते..
श्रेणी म्हणजे एलिटांचा तळतळाट असतो सामान्य लोक हिहू लागल्यामुळे होणारा..

mayu4u's picture

18 Oct 2017 - 2:27 pm | mayu4u

एखादा धागा खरोखरच चांगला आहे की त्यातील मते आपल्याला आवडतात की लेखनशैली चांगली आहे की अन्य काही? हे ठरवायचे कोणी आणि कोणत्या आधारावर?

पटले. मात्र सध्या प्रतिसादसंख्येमुळे काही धागे भरपूर अपेक्षेने उघडले जातात आणि मग भ्रमनिरास होतो, त्यामुळे लाईक आणि डिसलाईक असे दोन पर्याय ठेवावेत असं वाटतं.

उपयोजक's picture

18 Oct 2017 - 2:49 pm | उपयोजक

श्रेणीमुळे एवढा त्रास होणार असेल तर लाईक/डिसलाईकच्या पर्यायाचा तरी विचार करण्यास हरकत नसावी.

श्रीगुरुजी's picture

18 Oct 2017 - 2:37 pm | श्रीगुरुजी

मिपाचे ऐसी मध्ये रूपांतर करायचे असल्यास श्रेणी पद्धत सुरू करावी.

उपयोजक's picture

18 Oct 2017 - 2:46 pm | उपयोजक

विस्तारीत प्रतिसादाबद्दल आभार गॅरीजी!!

एस's picture

18 Oct 2017 - 3:03 pm | एस

अजिबात नको!

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Oct 2017 - 5:39 pm | अमरेंद्र बाहुबली

एखादा "तुंबलेला" कुठेतरी "मोकळा" व्हायला नको का?

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2017 - 6:07 pm | चौथा कोनाडा

नको.

आधीच बाहेरच्या स्पर्धात्मक जगात धावून धावून दमछाक होतेय, इथं कश्याला परत स्पर्धा ?
आहे असं मोकळं ढाकळं मिपा हेच या मिपाचं बलस्थान आहे !

रोज मिपा वाचा, तणावमुक्त जीवन जगा !

गामा पैलवान's picture

18 Oct 2017 - 6:49 pm | गामा पैलवान

मिपाच्या श्रेणीकरणाबाबत ग्यारी ट्रुमन यांच्याशी सहमत. श्रेणीदान फारंच सरसकटीकरण आहे.
-गा.पै.

भाते's picture

18 Oct 2017 - 8:51 pm | भाते

मी चेपूवर मराठीत लिहिलेले कोणी वाचत नाही, जर चुकून वाचलेच तर त्याच्याखाली असलेल्या 'आवडले' वर टिचकी मारायची कोणी तसदी घेत नाही. त्यामुळे मी चेपूवर मराठीत लिहिण्याची कधीच तसदी घेत नाही. माझ्यामध्ये असलेली मराठीत लिहिण्याची खुमखुमी काही केल्या जात नाही. म्हणून मी मिपावर हक्काने माझे मत एखाद्या धाग्यावर किंवा माझ्या स्वतंत्र धाग्यावर व्यक्त करतो. धागा काढताना मी प्रतिसाद आणि वाचने (वाचनसंख्या) याचा विचार करत नाही. तेव्हा माझ्या धाग्यावर तरी मला रेटींग नको आहे.

थॉर माणूस's picture

18 Oct 2017 - 11:48 pm | थॉर माणूस

>>>काही धागे स्कोअर सेटलिंगसाठी,सहज काही वाटलं म्हणूनही काढले जातात.

स्कोअर सेटलिंगसाठी धागे काढण्याचे कष्ट घेतले जात असतील तर मग डिसलाईकसारख्या सोप्या पर्यायाचा स्कोअर सेटलिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो.

आहे ते बरे आहे, आणायचेच असेल तर फक्त अपवोट/लाईक पद्धती आणणे योग्य ठरेल.

पॉपकॉर्न's picture

19 Oct 2017 - 8:41 am | पॉपकॉर्न

मिपा वरील लेख आणि प्रतिसादमधील चर्चा वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात पण बऱ्याचदा काही सदस्य त्याच्या प्रतिसादातून चर्चा हायजॅक करायचा प्रयत्न करतात किंवा काही सदस्य/ग्रुप्स भलेमोठ्ठे खोडसाळ प्रतिसाद देतात आणि ते वाचताना अडथळ्यांची शर्यत पार करत चर्चा वाचाव्या लागतात. म्हणून निदान प्रतिसादाला तरी रेटिंग देण्याची आणि नको असेल तर hide करण्याची सोय असावी.

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2017 - 12:16 pm | बोका-ए-आझम

अनावश्यक आहे कारण मिपा हे खाजगी मालकीचं संस्थळ आहे. मालकांना जे हवं ते मालक करतील. इथे दिलेल्या सूचना पाळण्याचं किंवा न पाळण्याचं कुठलंही बंधन मालकांवर नसल्यामुळे आणि ते कोणालाही उत्तरदायी नसल्यामुळे ही सर्व चर्चा काही कामाची नाही. जर मालकांना मिपाचं ऐसीकरण करायचं असेल किंवा मिपा बंद करायचं असेल (या दोन्ही गोष्टी एकच वाटू शकतात काही जणांना ;) ) तरी तसं करण्यापासून आपण कोणी थांबवू शकतो का? मग उगाचच चर्चा करुन वेळ वाया का घालवायचा?

मोदक's picture

19 Oct 2017 - 12:52 pm | मोदक

वजा एक

(प्रतिसादाला) फालतू श्रेणी.

:D

Nitin Palkar's picture

19 Oct 2017 - 2:05 pm | Nitin Palkar

रेटिंग नसावे. लाईक/ डीसलाईकचा थोडा उपयोग होऊ शकेल पण ते देखिल सापेक्ष आहे.

मराठी_माणूस's picture

19 Oct 2017 - 5:25 pm | मराठी_माणूस

रेटींग/लाईक/ डीसलाईक हे स्कोअर सेटलिंगसाठी वापरले जाणार नाही ह्याची काय खात्री ?

सोमनाथ खांदवे's picture

19 Oct 2017 - 6:51 pm | सोमनाथ खांदवे

फोटू टाकन्या साठी कायतरी सोप्पी पद्धत काढा ना राव .

स्थितप्रज्ञ's picture

20 Oct 2017 - 2:55 pm | स्थितप्रज्ञ

१. वैयक्तिक आकसापोटी कोणी कोणाला खराब रेटिंग दिले किंवा आपलाच माणूस आहे म्हणून बळंच चांगले रेटिंग दिले तर त्यातली सत्यता निघून जाईल.
२. वाचनीय धाग्यांना चांगले रेटिंग मिळाल्यामुळे ते वर राहतील. समजा पुढचे बरेच दिवस त्या तोडीचे चांगले धागे आलेच नाहीत (आणि जे आले ते comparatively खालच्या रेटिंगचे असल्यामुळे highlight झाले नाहीत) तर तेच तेच जुने धागे बघून लोक्स बोअर होतील.
३. एखादा होतकरू लेखक सुरुवातीला कमी रेटिंग मिळाले आणि त्याला योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर इथे धागे काढणे बंद करू शकतो.

त्यापेक्षा असे सुचवेन कि एक लाईक बटन सुरु करावे (चेपू सारखे भारामभार चिंध्या बटणे नको). धागा चांगला वाटला तर तर वाचक लाईक करतील नाहीतर सोडून देतील. मग विविध काळात (जसे मागील एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, मिपा सुरु झाल्यापासून, इ.) most liked लेखांची यादी फ्लोटिंग ठेवावी जे प्रत्येक लाईकनुसार (तेवढा इम्पॅक्टइंग बदल असल्यास) बदलत राहील. मागील किती काळातील most liked धागे पाहायचे आहेत याचा त्या यादीला ड्रॉपडाऊन असावा. म्हणजे ज्यांना दर्जेदार धागे शोधायचे आहेत त्यांना भटकावं लागणार नाही. जे त्या तोडीचे धागे नसतील ते आपसूक मागे पडतील.

उपयोजक's picture

21 Oct 2017 - 3:33 pm | उपयोजक

छान उपाय!

वामन देशमुख's picture

2 Jan 2024 - 12:22 pm | वामन देशमुख

मिपावर like बटन असायला हवे आहे.

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2024 - 1:44 pm | कर्नलतपस्वी

नाहीतर आमच्या सारखे जन्माने मराठी पण कर्माने अमराठी पळून जातील.

विवेकपटाईत's picture

2 Jan 2024 - 1:53 pm | विवेकपटाईत

हत्तीला ज्या नजरेने पाहाल तसा दिसेल. रेटिंग देणाऱ्या त्याच्या नजरेने पाहिल. गरज नाही.

धर्मराजमुटके's picture

2 Jan 2024 - 2:06 pm | धर्मराजमुटके

मिपाचे सध्याचे मालक फार शांत आणि सुस्वभावी आहेत. ते अशा सुचना वाचून हसून सोडून देत असावेत (याला मराठीत फाट्यावर मारणे म्हणतात).
पुर्वीचे मालक अधिक प्रेमळ होते. ते फाट्यावर तर मारायचेच मात्र समोरच्याला अनवाणी जाऊ देत नव्हते. चपला घालून जायला सांगत असत याची आठवण आली :)

मालक हा प्रतिसाद (वाचत असतील तर) हसून सोडून द्यावा.

आता अवांतर प्रतिसाद : मिपा हे पुर्णपणे मोफत वापरायला मिळणारे संस्थळ आहे. स्वतःच्या पोटापाण्याच्या व्यवसायातून वेळ काढून पदरमोड करुन ते आपल्याला उपलब्ध करुन दिले आहे. आपल्या सुचना / अपेक्षा योग्य आहेत पण हे सगळे व्याप सांभाळायला वेळ / पैसा इच्छाशक्ती लागते ती प्रत्येकवेळी मालकांकडे उपलब्ध असेलच असे नाही तस्मात सुचना करुया पण आहे त्यात देखील समाधानी राहूया.

लेखकांनी (आमच्यासारख्या किंचित लेखकांनी) मग कुठे जावे बरे?