----- वारं --------

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
13 Dec 2007 - 9:12 pm

खट्याळ वारं केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होत
माझ मन मात्र
उगाचच जळत होत

* ब्लोग वर आहे

चारोळ्या

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Dec 2007 - 7:23 am | सहज

मनोज हलके घे. पण जरा खूपच कविता झाल्या मग काही स्वस्थ बसवल नाही.

नाठाळ हरामखोर केव्हापासुन
टक लावून बघत होत
तिच मन मात्र
त्याला जिंवत जाळत होत

मनोज's picture

14 Dec 2007 - 7:43 am | मनोज

विडंबन मूळ चारोळी पे़क्षा छान जमल्य !!
आपलाच,
मन्या

जुना अभिजित's picture

14 Dec 2007 - 12:01 pm | जुना अभिजित

वार ऐवजी वारं हवं होतं बहुतेक. विंड विंड की वो.

च्यायला मी ५ मिनिटे विचार करत होतो की साला खट्याळ वार केसांशी खेळत होता म्हणजे नेमकं काय करत होता. वार म्हणजे तलवारीचा की नजरेचा की आठवड्याचा. एका टिंबाने लोच्या केलान.

की मला अजून कळालेली नाहीये चारोळी?

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

एकदम सही बोला तु अभिजीत.
वारं च मंगता है ऊधर..........

च्यायला जर "वार" पकडून कविता वाचली तर पार "डोक्याची मंडई " होते पण कविता काही भेज्यात घूसत नाही..... सही है भीडू.....

मनोज's picture

14 Dec 2007 - 9:03 pm | मनोज

अभिजित, छोटा डॉन मनापासुना आभार. (मराठी कच्चा आहे माझ :( )

केशवसुमार's picture

14 Dec 2007 - 10:08 pm | केशवसुमार

चारोळि आवडली..
आमचा अजून एक प्रतिसाद

खट्याळ वारं केव्हा पासुन
माझ्या केसांशी खेळत होत
माझ मन मात्र
विग उडायला भित होत

केशवसुमार.

मनोज's picture

14 Dec 2007 - 11:38 pm | मनोज

केशवसुमार, सहज या चारोळीची एक गंमत आठ्वली - मझ्या एक मैत्रीने हिन्दि भाषीकांसाठी translation आसे केले होते:

बेशर्म हवा तेरे जुल्फोसे
खेल रहा था
मेरा दिल फल्तू मे
जल रहा था

प्राजु's picture

14 Dec 2007 - 11:44 pm | प्राजु

छान आहे चारोळी..

खाली आणखी एक...

खट्याळ वारं केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होत
माझ्या नाकांत मात्र त्यामुळे
किती हुळहुळत होतं..

आंक्शी... आलीच शिंक...!

- प्राजु.