सचिन तेँडूलकर

व्यंकु's picture
व्यंकु in काथ्याकूट
20 Oct 2008 - 5:55 pm
गाभा: 

नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे.
मध्यंतरीच्या काळात शुमाकरकडून मिळालेली गाडी विलायतेतून भारतात आणताना त्यावरील कर माफ करावा अशी याचना त्याने सरकारकडे केली असता त्याच्यावर टीकेची झोड उठवली गेली मात्र लगेचच त्याने आपण दोनशे मुलांचा सगळा खर्च(जणू दत्तक घेतल्याप्रमाणे) करत आहोत असे सांगितले, पण त्याआधीच ही गोष्ट सिनेतारकांप्रमाणे किंवा नेत्याप्रमाणे जाहीर करुन त्याने आपला टेंबा कधी मिरवला नाही.
ऑस्ट्रेलियातील भज्जी आणि सायमंडस् प्रकरणाच्या वेळी भज्जीची चूक नसल्याचा सचिनचा एक ईमेल शरद पवारांना गेला आणि केवळ तेच नव्हे तर अख्खं मंडळ भज्जीच्या बाजूने गेलं. सिनिअर संघात नको असं सांगणारा ढोणी; पण जेव्हा त्याला कळलं कि कर्णधारपदासाठी आपलं नाव सचिननेच सुचवलं आहे तेव्हा मात्र तो पुरता लज्जित झाला असणार आणि त्यानंतरच हा ज्युनिअर सिनिअर वाद थांबला.
एकदिवसीय सामन्यात 42 शतके आणि 89 अर्धशतके काढून त्याने भल्या भल्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन त्रेधातिरपीट उडवली आहे कसोटी सामन्यातही 39 शतके आणि 50 अर्धशतके असा त्याचा वरचष्मा आहे.
अशा या महान व्यक्तीवर टिका करायची माझ्यासारख्या(अनेक) क्षुद्रांची लायकी नाही. सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम!

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

20 Oct 2008 - 5:58 pm | व्यंकु

वरील लिखाणात काही चुका झाल्या असल्यास कृपया समजून घ्यावे ही विनंती

टारझन's picture

20 Oct 2008 - 6:06 pm | टारझन

वरील लिखाणात काही चुका झाल्या असल्यास कृपया समजून घ्यावे ही विनंती
वाचलात .. मिपावर सुदलेकनावं कोण लक्ष देत नाय .. पण "तेँडूलकर" हे मला प्रयत्न करून पण नाही लिहीता आलं .. शेवटी कॉपी पेस्ट केलं ...

सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम!

असहमत ... तेंडूलकरचा मी ही फॅन आहे .. पण काळ माणसाला बदलवत जातोच ... सर्व मान्य आहे १९९६ मधे खेळणारा तेंडूलकर आणि २००६ मधला तेंडूलकर यात जमिन आसमानाचा फरक आहे ... त्यामुळे .. तेंडल्याने आता लवकरात लवकर जागा मोकळी करावी ... नवोदितांना चान्स द्या !!!

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

घाटावरचे भट's picture

20 Oct 2008 - 6:38 pm | घाटावरचे भट

नवोदितांना सध्या तरी माफ करावे आणि तेंडुलकरला संघात राहू द्यावे. तेंडुलकर मध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. शिवाय नवोदित खेळाडू संघात आले की दुसर्‍या दिवशी आपला संघ जगज्जेता बनेल अशा भ्रमात कोणी राहू नये (चप्पल गुरुजींचा फसलेला प्रयत्न आठवा). संघाची धुरा जुन्याजाणत्यांकडून नवोदितांकडे जाणे ही एक स्लो प्रोसेस आहे. ज्याकरता अजून काही काळ तरी तेंडुलकरादि ज्येष्ठ खेळाडू संघात हवेतच.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

टारझन's picture

20 Oct 2008 - 6:50 pm | टारझन

नवोदितांना सध्या तरी माफ करावे आणि तेंडुलकरला संघात राहू द्यावे.
असहमत ...

तेंडुलकर मध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे.
१ वर्षात निवृत्त व्हावे .. मी त्याला उद्या राजिनामा दे असं म्हंटलेलं नाहीये

शिवाय नवोदित खेळाडू संघात आले की दुसर्‍या दिवशी आपला संघ जगज्जेता बनेल अशा भ्रमात कोणी राहू नये (चप्पल गुरुजींचा फसलेला प्रयत्न आठवा).
मग १० वर्षांनी नवोदित आले तर तेंव्हा लगेच भारत जगज्जेता बनेल काय ? काय राव बाता करता... नवोदितांना आत्ता चान्स दिला तर येत्या काळात चांगलं की नाही ?

संघाची धुरा जुन्याजाणत्यांकडून नवोदितांकडे जाणे ही एक स्लो प्रोसेस आहे. ज्याकरता अजून काही काळ तरी तेंडुलकरादि ज्येष्ठ खेळाडू संघात हवेतच.
हे मान्य आहे .. ही फारच स्लो प्रोसेस आहे बुआ .. भारतात तर लैच !! जर अशीच जुणी खोडं संघात ठेवली तर मग मिळाला नवोदितांना चान्स !!!

लक्षात ठेवा , मीही टेंडल्याचा मोठ्ठा फॅन आहे .. पण आता तो नाइंटीज सारखा खेळत नाही हो .. तेंव्हा आम्ही शाळा बुडवून मार खाऊन मॅची पहायचो !! पण संघहित लक्षात घेतलेच पाहिजे. तेंडूलकरला कोच करा जर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन हवं असेल तर
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

डोमकावळा's picture

24 Oct 2008 - 7:13 am | डोमकावळा

>> पण आता तो नाइंटीज सारखा खेळत नाही हो
तू तरी शाळेत असल्यासारखा पोरकट पणा करतोस का आता? ;)

स्वगत : आता मरतंय बघ. ते पैलवान डोक फोडतय बघ

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

टारझन's picture

20 Oct 2008 - 6:54 pm | टारझन

.

mina's picture

20 Oct 2008 - 9:11 pm | mina

सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम!

आमचाही सलाम !!

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

भडकमकर मास्तर's picture

21 Oct 2008 - 4:11 am | भडकमकर मास्तर

सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...
....त्याने कायम खेळत रहावे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2008 - 4:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...
हरकत नाही, सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा! ;-)
(किंवा मल्लेश्वरीकडे बघून वेटलिफ्टींगही सुरू करायला हरकत नाही)

संताजी धनाजी's picture

23 Oct 2008 - 1:57 pm | संताजी धनाजी

सानिया टेनिसहि खेळते की काय? हि मात्र कमाल झाली बुवा! एकट्या माणसाने काय काय करावे ह्याला काहि सीमा आहेत कि नाही? :)

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 2:11 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>>सायना नेहवालकडे

सुंदर कन्या आहे ;)
पण हिची सर्विस जरा कमजोर आहे ... नवीन आहे शिकेल !

***

पण सचिन शिवाय क्रिकेट नाय बॉ !
जो क्रेझ सचीन साठी आहे ती जागा दुसरा कोणि ढोल भरु शकेल की नाही माहीत नाही सध्या तरी !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 2:20 pm | आनंदयात्री

>>सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा!

हो त्या वळतांनाच आम्ही बघतो !!
;)

-
(आंबटशौकिन)

आंद्या कदम

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 2:28 pm | छोटा डॉन

आम्ही तर केव्हापासुन " सानिया मिर्झाने " विंम्ब्लडन व "नेहवालने " इंटरनॅशनल बॅडमिटन चँपिअनशीप जिंकावी याकडे डोळे लाऊन बसलो आहे.
आम्ही आहोच चिअर करायला ...

इंग्लंडात भारताने "नॅटवेस्ट सिरीज" जिंकल्यानंतर पुन्हा काही दुसरा आनंदाचा क्षण नाही आला.
त्याचीच वाट पहात आहोत ...

अति आंबटशौकीन - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 2:46 pm | विजुभाऊ

भारतात चॅलेन्ज आहे.जुने लोक जागा सोडत नाहीत हे खरे. तेंडुलकर बद्दल बोलत असतान त्या व्हेरी व्हेरी व्हेरी स्पेश्यल लक्षमणाबद्दल कोणीच बोलत नाही.
नॅटवेस्ट सीरीज मध्ये सौरव ने ज्या मस्तीत शर्ट फिरवला होता. त्याच्या त्या वेळच्या कॉन्फिडन्स ला लाख सलाम
सानिया टेनीस खेळते तिच्या कडेही हा आत्मविष्वास आहे.पण लोक तिला उगाचच नको त्या गोष्टीत अडकवतात
ती मुस्लीम मुलगी आहे आणि तीने कसे वागावे हे टेनीस म्हणजे काय हे ही माहित नसलेले मौलवी सांगत असतात. त्यावेळी तिच्या घरातल्या लोकानाही त्याचे दडपण येत असते.
खेलाडुना मनमोकळे खेळू द्यावे.
तेंडुलकरला / राजवर्धन राठोडला त्यानी भारताचा झेंडा खांद्यावर घेतला त्यावर टीकेची झोड उठवली जाते.

::::::::::::अती आम्बट खाउन घसा बसलेला विजुभाऊ

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 2:47 pm | आनंदयात्री

>>नॅटवेस्ट सीरीज मध्ये सौरव ने ज्या मस्तीत शर्ट फिरवला होता. त्याच्या त्या वेळच्या कॉन्फिडन्स ला लाख सलाम
>>सानिया टेनीस खेळते तिच्या कडेही हा आत्मविष्वास आहे.पण लोक तिला उगाचच नको त्या गोष्टीत अडकवतात

अच्छा मग सानियाला कॉन्फिडन्स वाढवायला काय करायला पाहिजे असे तुमचे मत आहे ??

सखाराम_गटणे™'s picture

23 Oct 2008 - 2:49 pm | सखाराम_गटणे™

आता आमचा आंडु आला आला.
येलकम बेक आंदु

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 2:51 pm | आनंदयात्री

>>आता आमचा आंडु आला आला.

कुठे आला काय आला आम्हाला काय करायचे रे .. घाणेरडा कुठला ?

सखाराम_गटणे™'s picture

23 Oct 2008 - 2:52 pm | सखाराम_गटणे™

सॉरी,

>>आता आमचा आंडु आला आला.
आंडु = आंदु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आता आमचा आंडु आला आला.
आंडु = आंदु

तुम्हाला आंद्या पेस म्हणायचं आहे का?

अदिती (भूपति)

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 2:56 pm | आनंदयात्री

गटणे भाड्या तुझी संपादक मंडळाकडे तक्रार करीन हां !! काहीशे किलोच्या माणसाला काही ग्रॅमची उपमा देतो म्हणुन !!

अन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा मला वेलकम बॅक म्हटल्याबद्दल. मी कुठे गेलो होतो रे सुरनळ्या !

सखाराम_गटणे™'s picture

23 Oct 2008 - 2:57 pm | सखाराम_गटणे™

>>गटणे भाड्या तुझी संपादक मंडळाकडे तक्रार करीन हां
म्हणजे तु संपादक नाही

आता आठव, पु ल. म्हैस मधील आर्डली चा सीन

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 3:27 pm | छोटा डॉन

भाईकाकांचे नाव काढले की आम्हाला रावसाहेबांची लगेच आठवण होते. तर आता त्याच्याच शब्दात उत्तर ...

" अरे गटण्या भाड्या *&($§/)& , लेका व्यवस्थीत लेखन वगैरे शीक की रे, चांगला एखादा मुद्द्याला अनुसरुन लिहणारा गुरुगिरु कर, थोडे लेखन शिक.
बाकी लोक पण टाकतात ना कौल, लिहतात अवांतर पण त्यांना का म्हणुन विचारायची आमच्या बापाची तरी टाप होती का ?
उगाच ते जमत नाय जमत नाय म्हणुन अवांतर लेखन करुन व कौल टाकुन उंटाच्या **** मुका कशाला घ्यायला जातो.
लेका लेखनाचे कुळाचार पाळ की, नस्ता हुंबापणा कशाला म्हणतो मी."

( गटाणे भावा, ह. घे रे ... राहवलं नाही म्हणुन टाकलं ?

रावसाहेब - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 3:35 pm | आनंदयात्री

गटणे आणी उंट अशी इसापनीती श्टाईल कथा लिहण्याचा अतिव मोह होत आहे :)
पण असो, जाउद्या.

>>लेखन करुन व कौल टाकुन उंटाच्या **** मुका कशाला घ्यायला जातो.

हा लै मोठा शिन असेल कथेतला =))

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 3:41 pm | बिपिन कार्यकर्ते

तू लिहीच आंद्या... नवबोधकथेचा जनक म्हणून तुझंच नाव घेऊ आम्ही.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

23 Oct 2008 - 2:57 pm | विजुभाऊ

सानिया कडे कॉन्फिडन्स आहेच. फक्त तिला खेळु द्या/ इतर भानगडीत निष्कारण अडकवु नका.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> सानिया कडे कॉन्फिडन्स आहेच. फक्त तिला खेळु द्या/ इतर भानगडीत निष्कारण अडकवु नका.
आम्ही पण तेच म्हणतोय हो ... सानिया (/सायना) ला खेळू द्या, मल्लेश्वरीला वजनं उचलू द्या! त्यांना प्रोत्साहन द्या, कसं? ;-)

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 3:00 pm | आनंदयात्री

ओक्के बॉस्स, शब्द म्हणजे शब्द !! तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का विजुभाउ ?
आजपासनं तिला खेळु देणार आपण .. आम्ही पुढच्या गल्लीत जाउन गोट्या खेळु !

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 3:02 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आनंदा अगदी आनंदी आनंद झाला.
वाहवा,
सॉरव्,टी शर्ट्,सानिया, कॉन्फिडंस, काय मस्त लींक लावली>

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 3:04 pm | आनंदयात्री

बॅट, रॅकेट, बॉल, गोट्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 3:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सचिन कुठे गेला पण येवढ्या गोंधळात, "सचिन, ए सचिन? कुठे लपलास रे?"

अवांतरसम्राज्ञी अदिती

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 3:12 pm | छोटा डॉन

सचिनशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...

सहमत आहे.
अवांतर गप्पांशिवाय कुठल्याही धाग्याची कल्पना सुद्धा करवत नाही ...

अजुन एक अवांतर : च्यायला भारतात ह्यांची दिवाळी सुट्टी सुरु झालेली दिसतेय. कोनाही काम करत नाहीये ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 3:13 pm | छोटा डॉन

सॉरव्,टी शर्ट्,सानिया, कॉन्फिडंस, काय मस्त लींक लावली>

प्रभुजी, तुम चंदन हम पानी !!!
आप गुरु हो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रभुजी, तुम चंदन हम पानी !!!

डॉन्या, जरा जपून लेका... प्रभूवाणीत चंदन, पाणी काय म्हणशील त्या शब्दाचा काय अर्थ असेल माहित नाही... तू मारे म्हणशील तुम चंदन हम पानी आणि लगेच तुला व्य. नि. येईल.... ;)

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 3:26 pm | आनंदयात्री

ठ्याssssssssss !!
=)) ज ब ह र्‍या कार्यकर्ते ..

(बिपिनजी तुम कार्यकर्ते हम नेता)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(बिपिनजी तुम कार्यकर्ते हम नेता)

बिपीनकाका, हा आंद्या कदम तुम्हाला काम करायला लावणार तर! ;-)

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 3:37 pm | आनंदयात्री

म्हणजे बिपिनराव काम नाही करत की काय ?

छोटा डॉन's picture

23 Oct 2008 - 3:42 pm | छोटा डॉन

सध्या कार्यरत असलेले "काही निष्क्रीय कार्यकर्ते व त्यांचे त्याहुन निष्क्रीय नेते" ह्यांना उखडुन टाकण्याची वेळ आली आहे.
फार झाला प्रजेवर अन्याय, एवढे दिवस शांत बसलो होतो ...
पण संयम पाळतो म्हणजे काय *** अवलाद समजु नये ह्यांनी, कुठुन वाचत असतील तिथुन वाचत असतील ...

लवकरच एका पत्रकारपरिषदेत पक्षाच्या नव्या नावाची, झेंड्याची व धोरणांची घोषणा करीन ...
बाकी आपण जे माझ्यावर प्रेम करता त्याबद्दल आभारी आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते

लवकरच एका पत्रकारपरिषदेत पक्षाच्या नव्या नावाची, झेंड्याची व धोरणांची घोषणा करीन ...
बाकी आपण जे माझ्यावर प्रेम करता त्याबद्दल आभारी आहे.

कुठे तरी ऐकलंय वाटतं हे आधी... कोण बरं बोललं होतं? :)

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

यमे, मला काका म्हणल्याबद्दल तुला 'गेट वेल सून' च्या शुभेच्छा. आणि आंद्या तू लेका 'नेता' काय? नेतोच तुला आता बारा गडगड्याच्या विहिरीत.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 4:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यमे, मला काका म्हणल्याबद्दल तुला 'गेट वेल सून' च्या शुभेच्छा.
थ्यँक्यू, काका! :p

आणि आंद्या तू लेका 'नेता' काय? नेतोच तुला आता बारा गडगड्याच्या विहिरीत.
म्हणजे काय हो काका? काका, ही बारा गडगड्याची विहिर कुठे हो असते, काका?

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 4:39 pm | आनंदयात्री

काका जेव्हा छोटे होते ना तेव्हा त्या विहरीचे पाणी प्यायचे ! अन त्यांच्या लहाणपणी तिथे एक मुका उंटवाला पण बसायचा म्हणे, त्याची पण एक रम्य कथा काकांनी मला सांगितली होती !!

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Oct 2008 - 4:53 pm | ब्रिटिश टिंग्या

>> काका जेव्हा छोटे होते ना तेव्हा त्या विहरीचे पाणी प्यायचे !

काय हो काका? हे काय ऐकतोय मी :O

तुम्ही 'त्या' विहीरीचं 'पाणी' प्यायचा :O

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे बाबा, त्या विहीरीचं पाणी मानव फार पूर्वीपासून पीत आलाय... त्यात एवढं काय आश्चर्य वाटलं तुला? तुमच्या कडे पाण्याचे काही दुसरे स्त्रोत आहेत का? आम्हालाही कळू दे अंमळ.

प्रभूकृपाशिर्वादप्रार्थी बालक बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

23 Oct 2008 - 5:04 pm | आनंदयात्री

=))
हा हा हा .. टींग्या तिच्यामारी कोणत्याही आडाचे पाणी पितो !!

कदाचित टिंग्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर असावी !!
=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते

नाही नाही...

इकडे आड आणि तिकडे आडवा.... =))

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 5:08 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
प्रभुबाबांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतील.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 5:10 pm | बिपिन कार्यकर्ते

आयला, म्हणजे इतकावेळ, गुरुदेव सुप्तावस्थेत राहून चूपचाप निरीक्षण करत होते वाटतं.... आता जागृत झाले बहुतेक.

जय गुरुदेव. हा आमचा 'प्रभूवाणी' चा एक सुमार प्रयत्न.

बिपिन कार्यकर्ते

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Oct 2008 - 2:09 pm | घाशीराम कोतवाल १.२

त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...
हरकत नाही, सायना नेहवालकडे बघत-बघत बॅडमिंटनकडे किंवा सानियाकडे बघत टेनिसकडे वळा!
(किंवा मल्लेश्वरीकडे बघून वेटलिफ्टींगही सुरू करायला हरकत नाही)

=)) =)) =))
मल्लेश्वरी वेटलिफ्टींग अगागा
हाहाहाहा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

मिंटी's picture

23 Oct 2008 - 2:23 pm | मिंटी

त्याच्याशिवाय क्रिकेट ही कल्पनासुद्धा करवत नाही...

सहमत....:)

अवलिया's picture

23 Oct 2008 - 3:23 pm | अवलिया

आपण कशावर चर्चा करत होतो बरे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 3:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गाईड मागा प्रभुदेवा उर्फ विप्रकाकांकडे! ;-)

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Oct 2008 - 3:53 pm | ब्रिटिश टिंग्या

वरील अवांतरकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अनिल हटेला's picture

23 Oct 2008 - 4:12 pm | अनिल हटेला

>>>> वरील अवांतरकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मूळ विषय काय होता बॉ!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

डोमकावळा's picture

24 Oct 2008 - 7:06 am | डोमकावळा

क्रीडा पुरस्कार -
१. अर्जून पुरस्कार १९९४
२. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर - १९९७
३. राजीव गांधी खेल्ररत्न पुरस्कार - १९९७-९८
४. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट - वर्ल्ड कप २००३
५. आय.सी.सी. वर्ल्ड एलेव्हन - २००४, २००७

इतर पुरस्कार -
१. पद्मश्री - १९९९
२. पद्मविभूषण - २००८

आणि रेकॉर्डसाठी बहूतेक एक पूर्ण लेखच द्यावा लागेल. ज्यांना कूणाला शंका असेल त्यांनी इथे शहानिशा करावी

त्यामूळे त्यावर टीका करणे आपल्यासारख्यांना पटत नाही. किंवा आपली ती कुवत नाही. निदान माझी तर नक्कीच नाही.

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.