चिकन शाकुती (मराठीत सागुती) Xaukuti

ललिता's picture
ललिता in पाककृती
17 Oct 2008 - 4:53 pm

गोव्याला पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे शाकुती लॅटिनमध्ये 'X'ने लिहितात. काही बड्या पंचतारांकित हॉटेलात ही डिश Xaukuti नावाने मेन्युकार्डात मिरवताना पाहिली आहे, मागवली नाही... कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत. :''(
तुमचा काय अनुभव?

ही पाकृ. ओरिजिनल गोव्याची आहे असा माझा दावा आहे.... ;;)

१ किलो कोंबडी (तुकडे करुन)
१ लिंबाचा रस (कॅथलिक व्हिनेगर वापरतात)
- लिंबाचा रस चोळून कोंबडीचे तुकडे कमीत कमी अर्धा तास मुरवत ठेवा)

२ मोठे (tblsp) चमचे धने
१ लहान (tsp) जिरें
१ लहान (tsp) बडीशेप
२ मोठे चमचे खसखस
२ सेंमी दालचिनी
३ लवंगा
४ मिरे
पाव चमचा जायफळाची पूड
असल्यास अर्धा चमचा जायपत्री
१० सुक्या मिरच्या (लाल तिखट चालतं)
- हा मसाला मंद आचेवर तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजावा. अजिबात करपता कामा नये. सुक्या मिरच्यांऐवजी तिखट घेतले तर मसाला कुरकुरीत झाल्यावर तिखट तव्यावर घालून तवा लगेच आचेवरुन उतरवा, नाहीतर तिखट जळकट होतं. ग्राईंडरमधून पावडर करून घ्या.

अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे
२ मोठे कांदे (उभे पातळ चिरुन घ्या)
४ ते ६ लसूण पाकळ्या (ठेचून घ्या)
२ सेंमी आलं (बारीक चिरून)
तेल
- तळण्याइतपत तेल कढईत टाकून चिरलेला कांदा लाल तळून घ्या. त्यात लसूण व आलं परतून खोबरं घाला. खोबर्‍याचा रंग गुलाबी होईपर्यंत परतत रहा. निवल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना पाणी शक्यतो कमीच घाला.

- वरील मसाल्याची पावडर या वाटणात नीट मिक्स करा.

थोडी कढिलिंबाची पाने व किंचित हिंगाची तेलावर फोडणी करून त्यात मसाला मिश्रण तेल सुटेतो परतून घ्या, खमंग वास सुटला पाहिजे. तयार मसाल्यात चिकनचे तुकडे लिंबाच्या रसासकट घालून छान परतून घ्या. मीठ व गरम पाणी घालून (जसा रस्सा पाहिजे तेवढं) चिकन मध्यम आचेवर शिजवून घ्या.

टीपः शिळी (आदल्या दिवशीची) व मुरलेली शाकुती मस्तच लागते खायला. :)

प्रतिक्रिया

किट्टु's picture

17 Oct 2008 - 8:06 pm | किट्टु

मी कधीहि ही डीश खाल्ली नव्हती. पण उद्या नक्कि करुन पाहील आणी सर्वांना खाउ पण घालेल.

फोटो टाकला असता... तर अजुन मस्तच... असो..

रेसीपी बद्दल धन्यवाद.... ;;)

---
किट्टु

टारझन's picture

17 Oct 2008 - 8:17 pm | टारझन

जबरा !! भारतात आलो की गोव्याला जाणारच होतो .. पण आता गोवन चिकन पण चापु म्हणतो :)
अजुन एक चिकन रेसेपी ऍड झाली .. टारझनचे अभिनंदन :)

-- (सर्वचिकनचापी) टार्जू
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

प्राजु's picture

17 Oct 2008 - 8:22 pm | प्राजु

लईच भारी..
ललिताताई आपण रहात कुठे?? भारतात की आणखी कुठे?? नाही.... म्हणजे ही रेसिपि आणि अशा बर्‍याच तुमच्या घरी येऊन चापिन म्हणते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पांथस्थ's picture

17 Oct 2008 - 8:57 pm | पांथस्थ

एकदम मस्त. खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो.

रेसिपी साठी धन्यवाद!!!

(शुध्द मांसाहारी) पांथस्थ...

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 10:21 pm | विसोबा खेचर

व्वा! काय योगायोग आहे!

आत्ताच एका मित्राच्या घरी गेलो होतो तिथे याच पद्धतीने केलेली चिकन सागोती खाल्ली! पीटर्स स्कॉटचे सुरेखसे दोन पेग मारून त्यावर झक्कास कोंबडीचं जेवण आणि येऊन पाहतो तर ही पाकृ! :)

व्वा! मजा आ गया..

फक्त एकच चुटपुट लागून राहिली आहे. आमची श्यामराव कांबळे गेले...!

तात्या.

ललिता's picture

18 Oct 2008 - 9:45 pm | ललिता

आभारी आहे सर्वांची! :)

फोटो टाकला असता... तर अजुन मस्तच
किट्टु, मी घरी ही डिश बरेच दिवसात नाही केली. आता दिवाळीचे दिवस... तेव्हा चिकनला कमी चान्स! पुढच्या महिन्यात नक्की चिकन बनवून फोटो टाकीन.

पण आता गोवन चिकन पण चापु म्हणतो
अहो चिकनचापू, त्यासाठी थोडंच गोव्याला गेलं पाहिजे... आफ्रिकेत नाही का खाता येणार? रेसिपी कशाला दिलिय?

ललिताताई आपण रहात कुठे?? भारतात की आणखी कुठे?? नाही.... म्हणजे ही रेसिपि आणि अशा बर्‍याच तुमच्या घरी येऊन चापिन म्हणते.
प्रा़जुताई... ये ना! कधीही ये माझ्या घरी! मी कुठे राहाते ते माझ्या प्रोफाईलवर आहे बध. पार्ट्या करूया दणकून.... <:P

खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो.
पान्थस्थ.... वाट बघते तुमच्या रिपोर्टची! :)

व्वा! मजा आ गया..
तात्या (काय उपाधी लावू?) राव? - साहेब? समजत नाहीय, दडपण आलंय कसलंतरी :S
असो... धन्यवाद!
श्यामराव कांबळे म्हणजे हार्मोनियमवादक तर नव्हे! चु.भू.द्या.ध्या.

पांथस्थ's picture

19 Oct 2008 - 12:55 am | पांथस्थ

एकदम मस्त. खुप दिवस शाकुती खाईन म्हणत होतो. आता उद्याच करुन बघतो.

शाकुती करुन मस्त चापलेली आहे. हे घ्या फोटो -

१. शाकुती तयार आहे!

२. चला वाढलय!!

येतायना खायला :)

(खानपान शौकीन) पांथस्थ...

विसोबा खेचर's picture

19 Oct 2008 - 1:02 am | विसोबा खेचर

जीवघेणे फोटू..! :)

तात्या.

सहज's picture

19 Oct 2008 - 8:21 am | सहज

जीवघेणे फोटु व कातिल पाकृ

धन्यु ललीताजी, पांथस्थ.

ईश्वरी's picture

19 Oct 2008 - 2:22 am | ईश्वरी

वा मस्त रेसिपी. करून बघायलाच हवी. फोटो ही सुरेख.
ईश्वरी

मनीषा's picture

19 Oct 2008 - 8:07 am | मनीषा

पाककृती ...
इतक्या चविष्ट पाककृती देणार असाल तर त्या सर्व ओरिजिनल गोव्याच्याच आहेत हे सुद्धा मान्य ... बाकी गोव्याचे समुद्रकिनारे जितके सुंदर आहेत तितक्याच तिथल्या पाककृती .
आम्हाला दोन्हीही सारखेच प्रिय
कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत
१००% सहमत

आनंद's picture

19 Oct 2008 - 6:32 pm | आनंद

कारण बडी हाटिलं अस्स्ल पाकक्रियेला न्याय देत नाहीत

खरय हे हाटिल आणि संकेत स्थळ दोघानाही लागु पडत नाही का?
खाण्या साठी आणि वाचण्या साठी टपर्‍या आणि धाबेच बेश्ट.

ललिता's picture

19 Oct 2008 - 4:43 pm | ललिता

फोटो टाकल्याबद्दल शतशः धन्यवाद, पांथस्थ! मानलं तुम्हाला... :)

सरपंच's picture

19 Oct 2008 - 4:50 pm | सरपंच

मिपाचे मुखपृष्ठ पाहा आणि थोडसं आम्हालाही माना.. ;)

तात्या.

ललिता's picture

19 Oct 2008 - 5:09 pm | ललिता

आभारी आहे हो तात्या! एवढं कौतुक खरंच पहिल्यांदाच अनुभवतेय एखाद्या वेबसाईटवर! :)