सोलो ट्रेक करायचा आहे

विश्वजीत कदम's picture
विश्वजीत कदम in भटकंती
1 Sep 2017 - 5:35 pm

पुण्याजवळिल ए़खादे एकदिवसीय एकट्यासाठी ट्रेक सुचवा.

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

1 Sep 2017 - 7:31 pm | दुर्गविहारी

मि.पा. वर धागा काढण्यापुर्वी काही नियम पाळायचे असतात, ते तुम्ही वाचलेले दिसत नाहीत. एकोळी धागा असू नये असा संकेत आहे. हा प्रश्न तुम्ही व्य.नि. किंवा खरडफळ्यावर विचारू शकता.
बाकी तुमच्या धाग्याला प्रतिसाद म्हणून ईतकेच सांगेन कि शक्यतो सोलो ट्रेक करु नका. पुण्याच्या आसपास पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड्,विसापुर्,तुंग्,तिकोणा, शिवनेरी,जीवधन, राजमाची,कोरीगड,रायरेश्वर, रोहिडा असे अनेक ईतिहास प्रसिध्द किल्ले आहेत. ईंदोरे, बहादुरगड, बारामती असे भुईकोट आहेत. कावळ्या, जननीचा दुर्ग, कैलासगड, घनगड, हडसर्,चावंड्,निमगिरी, नारायणगड असे फारचे प्रसिध्द नसलेले किल्ले देखील आहेत. मात्र या बहुतेक गडांवर अनेक ट्रेकिंग ग्रुप रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ट्रेक नेत असतात, त्यांच्याबरोबर जाणे श्रेयस्कर. यांच्याबरोबर जाणे नको असल्यास पायथ्याच्या गावातून वाटाड्या नेउ शकता.
या शिवाय एक दिवसातच ट्रेक करायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील रायगड, सुधागड, सरसगड, मंगळगड, कोथळीगड्,पेब्,प्रबळगड तसेच सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, पांडवगड, वैराटगड, कमळ्गड, प्रतापगड, मधुमकरंदगड, सज्जनगड, केंजळगड, नांदगिरी, वारुगड्,संतोषगड असे अनेक किल्ले बघता येतील.

जरा आणखी माहिती घालून लेख वाढवा. कोणती पुस्तकं वाचली, ट्रेकमध्ये अगोदर कुठे गेलात? काय अनुभव आले? सोलो का करावासा वाटतो? गडच हवेत का इतरही ठिकाणं चालतील?

गामा पैलवान's picture

2 Sep 2017 - 10:22 pm | गामा पैलवान

पतंगराव कदमांचे चिरंजीव का तुम्ही? कुतूहल म्हणून विचारतोय.

-गा.पै.

दुर्गविहारी's picture

3 Sep 2017 - 10:11 am | दुर्गविहारी

ते हे नसावेत. बाकी सध्याचे वारे लक्षात घेता त्यांनी "कमळ" गड सर केला तर आश्चर्य वाटू नये. ;-)

गामा पैलवान's picture

3 Sep 2017 - 12:09 pm | गामा पैलवान

अरे वा ! सोलो ट्रेक करून कमळगड सर करायची कल्पना नामी आहे! :-)

-गा.पै.