गाभा:
आज करवा चौथ आहे. अश्वीन महिन्यातील संकश्टी चतुर्थी म्हणजे करवा चौथ.
समस्त उत्तर भारतात अतीशय श्रध्देने साजरा होणारा सण.
कोणी जाणकार या करवा चौथ बद्दल अधिक माहिती देईल काय?
सर्व हिंदी मालिका, सिनेमांमध्ये हा सण अतीशय विस्ताराने दाखविला जातो. घरातील सुवाशीण दिवसभर उपवास करून रात्री आपल्या पतीदेवासह चंद्र दर्शन घेतल्याशिवाय अन्न भक्षण करीत नाही. पती पत्नी एकत्र करवा चौथ चे जाळीतून (चाळणीतून) दर्शन घेतात व पतीदेव आपल्या पत्नीला भरवितात.
या सर्व सोहोळ्यात मान्यवर दिग्दर्शक एक महत्त्वाची वस्तुस्थिती विसरतात ती "करवा चौथ" हा दिवस संकश्टी चतुर्थी चा असतो, या दिवशी जाळीतून दिसणारा चंद्र पौर्णिमेसारखा कसा दिसेल?
अवांतरः
अशा अनेक प्रथा ज्या चुकीच्या पध्दतीने हिंदी मालिका, सिनेमा मध्ये सादर केल्या जातात त्याबद्दल सदस्यांकडून भर टाकावी.