उच्चार आणि भाषा : GHOTI and FISH

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
14 Oct 2008 - 11:56 am
गाभा: 

इंग्रजी भाषेत उच्चाराचे अनेक नियम आहेत तसेच त्या प्रत्येक नियमाला अपवादही आहेत.
उदा वर्णाक्षर "G" नन्तर E I हे स्वर आले तर त्याचा उच्चार ग असा न होता ज असा करावा.
उदा General
आय पहिल्या अक्षरानन्तर आले तर तो उच्चार ई असा न करता आय असा करावा
Wine
तसेच TI हे जोडुन आले तर त्याचा उच्चार श असा होतो
उदा ट्युशन
GH हे अक्षराच्या शेवटी आले तर त्याचा उच्चार फ असा होतो
उदा Rough
या सगळ्या नियमांची माहिती घेउन मार्क ट्वेन ने एक गणीत/ तर्कट मांडले .
GHOTI
या शब्दाचा उच्चार फिश असा होऊ शकतो.
किंवा फिश हा शब्द GHOTI असा लिहीता येईल.

थोडे स्पष्टीकरण
GH = F
O = I ( as pronounced in women)
TI = SH ( as in question)
: GHOTI = FISH

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

14 Oct 2008 - 12:06 pm | आनंदयात्री

बादरायण डिस्कवरी !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 12:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> बादरायण डिस्कवरी !!
हा खूप जुना किस्सा पहिल्यांदा ऐकायला फारच धमाल येते. आणि मार्क ट्वेन असल्याच विनोदी किश्श्यांसाठी प्रसिद्ध होता.

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 12:19 pm | विजुभाऊ

तुम्हाला अशा बादरायण डिस्कव्हर्या माहित असतील तर लिहा.
त्या साठीच तर हा नारायणो अल बादरी सम्बन्धो
एक बरे आहे भारतीय भाषांमध्ये स्पेलिंग हा प्रकार नाही ते. नाहितर काय झाले असते कोण जाणे
तसेही व्हॅट चा उच्चार भैय्ये लोक भॅट असा करतात.
व्हेरीफिकेशन चा उच्चार भेरीफिकेशन असा होतो.
अवांतर: पुल विनोदाने म्हणतात की फ्रेंच मध्ये अलबुकर्क हे स्पेलिंग लिहुन त्याचा उच्चार गोडबोले असा होऊ शकतो

ऋचा's picture

14 Oct 2008 - 12:24 pm | ऋचा

:)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 12:26 pm | विजुभाऊ

Phoenix हाही असाच शब्द ज्यात स्पेलिंग आणि उच्चाराचा ताळमेळ बसत नाही

किस्सा खराच आहे पण तो मार्क ट्वेनचा नव्हे तर जॉर्ज बर्नार्ड शॉचा आहे.

अवांतर - शॉ स्वतः इंग्लीश नव्हे तर आयरीश होता!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

किस्सा खराच आहे पण तो मार्क ट्वेनचा नव्हे तर जॉर्ज बर्नार्ड शॉचा आहे.
अहो सुनीलभौ, नावात काय आहे, असं तो सॉमरसेट मॉम म्हणाला आहेच ना! ;-)

आनंदयात्री's picture

14 Oct 2008 - 2:08 pm | आनंदयात्री

शो मस्ट गो ऑन असे अँडी स्काउंड्रल नामक थोर, उच्चभ्रु वर्गातला साहित्यिक म्हणुन गेला.

अवलिया's picture

14 Oct 2008 - 2:15 pm | अवलिया

च्यायला ...विजुभावु तुम्ही पण ना ... छ्या!

अहो उच्चार शास्त्रावर काहीतरी विचार प्रवर्तक वाचायला मिळेल असे वाटले तर तुम्ही सुतळि च्या एवजी लवंगीच पेटवला.

असो. मागे पण तुम्ही के एल पी डी केला होता त्यानंतर आज. (नोंद घेतली गेली आहे)

बाकी माहीती छान

शिवा जमदाडे's picture

14 Oct 2008 - 2:53 pm | शिवा जमदाडे

या सगळ्या नियमांची माहिती घेउन मार्क ट्वेन ने एक गणीत/ तर्कट मांडले .
GH हे अक्षराच्या शेवटी आले तर त्याचा उच्चार फ असा होतो
उदा Rough

GH च्या नियमानुसार हे शेवटी असेल तरच 'फ' असा उच्चार होतो ना? मग GHOTI मधे GH आधि येतो ना राव......

- (मांजर आणि पिलांसाठी एकच भोक करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

GH च्या नियमानुसार हे शेवटी असेल तरच 'फ' असा उच्चार होतो ना?
असं काही नाही, high चं उदाहरण आहे ना, हाफ आणि हाय या दोन शब्दांची स्पेलिगं वेगळी आहेत.

शिवा जमदाडे's picture

14 Oct 2008 - 3:28 pm | शिवा जमदाडे

बरोब्बर.... तुम्हाला ९ गुण १० पैकी...
१ गुण शुद्द्लेकना साठि कापून घेतलेला हाय...................... ;-)

- (तुतीची योग्य वाढ होण्यासाठी काय करावे याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> १ गुण शुद्द्लेकना साठि कापून घेतलेला हाय......................
अवो शिवादादा, ये काय बरुबर नाय! मिपावर सुदलेकन चालत नाय तर्री तुमी माजा गुन का कापला

>> - (तुतीची योग्य वाढ होण्यासाठी काय करावे याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
आता तुमाले मी शाप देते, तुमच्या तुतीवर कापसावरची बोंड अळी पडनार! ;-)

अदिती (बाणेर खुर्द)

धमाल मुलगा's picture

14 Oct 2008 - 5:07 pm | धमाल मुलगा

शिवादादानी तुझा येक गुन कापला हाय तो सुद्द लिवलंस म्हनुन...
;)

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 3:11 pm | विजुभाऊ

जी एच हे एकत्र आले आणि ते सुट्टे विचारत घेतले आहेत

सुनील's picture

14 Oct 2008 - 3:42 pm | सुनील

Tell the tale of tail of Tail ह्या कधीकाळी ऐकलेल्या वाक्याची आठवण झाली. येथे शेवटचे टेल हे विशेषनाम आहे.

इंग्रजीत स्पेलिंगचे नियम फारसे कडक नाहीत. फ्रेन्चमध्ये तर नियमच नाहीत म्हणतात! जर्मन त्यामानाने बर्‍यापैकी उच्चारानुरूप लिहिली जाते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

Tell याचा उच्चार टेल् आणि Tale - Tail आणि या दोन्हीचा टेऽल असा होतो; असं माझं वैयक्तिक मत!
तीच गोष्ट pen आणि pain, pane यांची!

अवांतर: एक पोलिश मित्र एकदा याच विषयावरून तक्रार करत होता, त्यांच्या भाषेत म्हणे ह्रस्व-दीर्घ वगैरे प्रकार नसतात, त्यामुळे म्हणे गोंधळ होतो बोलताना. ship आणि sheep यांच्यातला फरक नाही दाखवला तर काय फरक पडतो, असा त्याचा प्रश्न!
माझं उत्तर होतं, ship आणि sheep यांच्यातला फरक नाही दाखवला तरी एक वेळ चालेल पण shit आणि sheet मधला दाखव! त्यानंतर या विषयातली तक्रार त्या घरात झाली नाही!

(हा माझ्या आईचा स्टॅन्डर्ड विनोद.)
इट इज अ पेन (pain) दॅट यू डु नॉट हॅव्ह अ पेन (pen). टेक द पेन बाय द विंडो पेन (pane).

मराठी मूळ भाषा असली, आणी इंग्रजी उशीरा शिकलेली असली, तर लोक साधारणपणे त्या तीन्ही शब्दांचा एकसारखा उच्चार करतात. त्यांनाच हा विनोद कळतो. अर्थात या तीन्ही शब्दांचा उच्चार इंग्रजीत वेगळा आहे ती गोष्ट ३_१३ निरीक्षक अदिती यांनी सांगितलीच आहे. त्यामुळे जे लोक लहानपणीच इंग्रजी शिकले आहेत त्यांना हा विनोद कळत नाही. मला सवयीमुळे (आईच्या तोंडूनही!) तीन वेगवेगळे उच्चार ऐकू येतात. (pain पेइन, pen पेन्न्, आणि pane पेऽन, असे काही.)

- - -
(येथपासून प्रतिसाद मूळ लेखाला, १_१३ अदितींना उपप्रतिसाद म्हणून नाही)

माझ्या एका अमेरिकन मित्राने मला हा विनोद ऐकवला.
ह्वॉट डझ द डॉली (Dalai) लामा थिंक अबाउट क्लोनिंग? ही इझ हॅपी - दे नेम्ड डॉली (Dolly) द शीप आफ्टर हिम.
What does the Dalai (डॉली) Lama think about cloning? He is happy - they named Dolly (डॉली) the sheep after him.
मला काही म्हणजे काही करून तो विनोद समजला नाही (त्याने समजावून सांगेपर्यंत). कारण तो दोन्ही शब्दांचा एकसारखा उच्चार करत असला तरी मला (त्याच्या तोंडूनही!) पहिला शब्द "दलाई", दुसरा "डॉली" असाच ऐकू येत होता.

मराठी मूळभाषा असणारे आपण (म्हणजे मीसुद्धा) v आणि w यांचा उच्चार वेगळाच काही करतो, याबाबत आपण कुप्रसिद्ध आहोत. (ही गोष्ट आपल्याला सांगणारा एक तरी प्रेमळ अन्यभाषक मित्र असला तर आपल्यालाही हे कळते, नाहीतर वर बिहार्‍यांची करतात, तशी आपल्या पाठीमागेच आपली टिंगल होते.)

आपण हिंदीतले अनेक शब्द वेगळेच उच्चारतो - म्हणजे अंत्, चंद्र् ऐवजी अंतऽ, चंद्रऽ वगैरे. "मैं"चा उच्चार मॅ/मए असा करण्याऐवजी "मई" असा विचित्र करतो. (लतादीदींनी खूप प्रयत्न करून योग्य हिंदी उच्चार शिकून घेतलेत - त्यांनी स्वतःच ही गोष्ट सांगितली आहे. व्ही शांताराम यांच्या हिरोईन संध्याबाईंचे हिंदी उच्चार फारच मराठमोळे असत. कोणाचे वागणे बरोबर आणि कोणाचे चूक, ते तुम्ही ठरवा. लतादीदींनी उत्तर भारतीय उच्चार शिकून मराठी अस्मितेशी गद्दारी केली असे मला मुळीच वाटत नाही. आणि संध्याबाईंनी हिंदीतही "मई" असा उच्चार करून मराठी भाषेचा मोठा गौरव केला असे मला वाटत नाही.)

माझ्या मते या सर्व गमती खेळीमेळीने विचारात घ्याव्यात. बहुतेक एकभाषिक लोक (मग ते बिहारी असावेत की मराठी) दुसरी भाषा बोलताना आपल्या भाषेतल्या खास लकबी वापरतात. त्या लकबी दुसर्‍या भाषेत ठीक वाटत नाहीत. या अभावित विनोदांना मनमुराद हसावे. पण त्यावरून माणसां-माणसांत किंवा समाजा-समाजांत ज्येष्ठ-कनिष्ठ ठरवू नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2008 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजयनी सांगितलेल्या किश्श्यावरून मलाही एक "विनोद" आठवला:

व्हॉट डू यू कॉल ऍन इंडीयन विथ पिंक हेअर?
-- गँडी फ्लॉस! (आपल्याकडे बुढ्ढी के बाल म्हणतात त्याला ब्रिटीश (का एकूणच इंग्लिशमधे?) कँडी फ्लॉस म्हणतात.)

यात "गांधी"चा उच्चार "गँडी" होतो हेच न समजल्यामुळे मलाही हा विनोद "गाईड"शिवाय समजला नाही. मला ते गांधीच ऐकायला येत होतं. अर्थात "तो" उच्चार ऐकून मी खुर्चीतून खाली पडले ही गोष्ट अलाहिदा! पण तो विनोद "त्या" लोकांना समजावून द्यायला लागला!

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 3:52 pm | विजुभाऊ

फ्रेन्चमध्ये तर नियमच नाहीत म्हणतात
बापरे...मग मुलाना परीक्षेत स्पेलिन्ग मिस्तेक्चे मार्क कापत नसणार
जर्मन उच्चारानुसार ल्हिली जाते पण स्पेल्लिन्ग आणि उच्चार वेगळे असतात
उदा : V चा उच्चार फ असा होतो
त्यात ज साठी कोणतेही वर्णाक्षर नाहिय्ये
जे चा उच्चार य सारखा होतो.
आपन फक्त इंग्लीश बद्दल बोलुया
read read read चे उच्चार वेगळे आहेत स्पेल्लिन्ग तेच
colour चे स्पेलिन्ग color असे चालते kolor हे चूक ठरते.
एक प्रश्न : TO आणि GO यांचे उच्चार कोणत्या नियमानुसार ठरवले आहेत

ऋचा's picture

14 Oct 2008 - 3:56 pm | ऋचा

wait
weight
wet
कीतीतरी वेगळी स्पेलींग्ज पण उच्चार तोच

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2008 - 4:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

wait आणि weight चा उच्चार होतो वेऽट आणि wet चा होतो वेट्!

थोडा, किंचित फरक असतो, आणि "पॉश" लोकं बोलतात तेव्हा तो समजतो.
ब्रिटीश लोकांच्या लेखी शिकलेला आणि राणीच्या पद्धतीचं इंग्लिश बोलणारा माणूस पॉश!

>> colour चे स्पेलिन्ग color असे चालते kolor हे चूक ठरते.
colour आणि color तर तुम्ही अटलांटिकच्या कोणत्या बाजूला आहात त्यावर अवलंबून असतं!

>> फ्रेन्चमध्ये तर नियमच नाहीत म्हणतात!
मला फ्रेंच येत नाही, पण अनेक फ्रेंच येणार्‍या लोकांच्या मते फ्रेंचमधे इंग्लिशपेक्षा खूपच जास्त नियम आहेत, अर्थात इंग्लिश बोलणार्‍यांना ते माहित नसतात एवढंच!

>> जर्मन उच्चारानुसार ल्हिली जाते पण स्पेल्लिन्ग आणि उच्चार वेगळे असतात. उदा : V चा उच्चार फ असा होतो
ते V या अक्षराचा उच्चार व्ही असाच करतात का?

>> जे चा उच्चार य सारखा होतो.
इंग्लिश सोडून इतर युरोपीय भाषांमधे J चा उच्चार "य"च होतो; अपवाद स्पॅनिश (पोर्तुगीज?), त्यांच्याकडे J चा उच्चार "ह" होतो.
आपल्याकडेही नाही का यमुनेलाच जमुना असंही नाव आहे?

अदिती (योशी, निन्टेंडोतली)

ईश्वरी's picture

14 Oct 2008 - 11:30 pm | ईश्वरी

हो, स्पॅनिश मध्ये J चा उच्चार "ह" होतो. उदा. Julio (July साठी शब्द) चा उच्चार हुल्यो.
सॅन होजे (San Jose ), हालापिनो (Jalapeno) ही नावे तर सर्वश्रुत आहेत.

अवांतर : मागे हवाई ला गेलो असताना तिथली रस्त्यांची वगैरे नावे खूप मजेशीर वाटली.
हवाई मध्ये हवाईअन (Hawaiian) आणि इंग्लीश या २ ऑफिशिअल भाषा आहेत. हवाईअन भाषेत फक्त १२ च अक्षरे आहेत. A, E, I, O, U हे स्वर आणि H, K, L, M, N, P, W ही व्यंजने. ह्या १२ अक्षरांमध्येच भाषेतील सर्व शब्द बसवलेले आहेत. शब्दात जिथे स्वर येतो तिथे त्याचा स्वतंत्र उच्चार होतो . उदा. PUUNENE हे नाव एका ठिकाणी वाचले..त्याचा उच्चार पुउनेने असा होतो. पू नेने हा चुकीचा उच्चार.
आणखी बरीच रस्त्यांची आणि ठिकाणांची मजेशीर नावे दिसली. Nene , kele , kane , alawai , hanauma (हानाउमा), punahou , kalakaua, molokini, halekala , halemau , lahaina , kanapali

ईश्वरी

भाग्यश्री's picture

14 Oct 2008 - 11:41 pm | भाग्यश्री

:)) :)))) नावं वाचून जाम हसू आलं!!

बाकी, फक्त बारा अक्षरं म्हणजे कमाल आहे..हवाईला गेल्यावर (हे पण) बघितलं पाहीजे..

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 4:22 pm | विजुभाऊ

ज चा उच्चार हा बहुतेक भाषांत य शी मिसळला जातो
उदा :यादव -जादव / यदुनाथ -जादुनाथ
तसेच पर्शीयन भाषेवरुन आलेल्या भाषात अजून एक होते तेथे "स चा ह "आणि "ह चा स" अशी सरमिसळ होते
उदा: सिन्धु - हिन्दु
जर्मन लोक V हे अक्षर "फाऊ" असे उच्चारतात
अवांतरः बहुतेक भाषांत अवतरण चिन्हे एकसारखी आहेत. ती कशी काय?

विकास's picture

15 Oct 2008 - 12:56 am | विकास

ज्यू लोक (हिब्रू बोलणारे), तसेच चायनीज, हे "थ" चा उच्चार "स" सारखा करतात. उ.दा. "थिसीस" च्या ऐवजी "सिसिस" असे बर्‍याचदा ऐकले आहे.

बंगाली भाषेत लिंगभेद नाही. परीणामी कधी कधी एखादा "हार्डकोअर" बंगाली माणूस जेंव्हा "बंगालीत" विचार करत (म्हणून न कळत भाषांतर करत असलेले) इंग्रजी बोलतो तेंव्हा गंमती जंमती होतात. आमचा एक मित्र इंदीरा गांधी, लता, आशा आदींबद्दल बद्दल इंग्रजीत बोलताता बर्‍याचदा she च्या ऐवजी he म्हणायचा... मग आम्ही स्वतःची समजूत करून घेतली की बंगालीत "she" मधील "s" सायलेंट असावा असे :-)

वर धनंजयने लताचे उदाहरण दिले आहेच. मी एकदा आशाच्या मुलाखतीत ऐकल्याचे आठवते की दिलीप कुमार या दोन्ही बहीणींच्या ऐन उमेदीच्या काळात म्हणाला होता की "ये घाटी लडकीयाँ क्या हिंदी गा सकेगी..." अर्थात पुढचा सगळा इतिहास आहे!

"देशपांडे" हा शब्द स्पेलींग वाचून कधी काळी, "देशपाँ" अथवा "देशपांडी" करणारे महाभाग मी येथे पाहीले आहेत.

मराठी_माणूस's picture

15 Oct 2008 - 9:30 am | मराठी_माणूस

ये घाटी लडकीयाँ क्या हिंदी गा सकेगी..."

त्या एस्.पी.बालसुब्र्....(हुशश थकलो ) आणि येसुदास (का जेसुदास ?) चे हिन्दी उच्चार बरे खपवुन घेतले जातात

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 9:38 am | विजुभाऊ

बर्‍याचदा T आणि D च्या उच्चारात सुद्धा एक सरमिसळ असते
उदा looked; booked ;hooked ; शेवटी ड आला तर त्याचा उच्चार ट सारखा करतात
किंवा : द दे देम देअर दॅट यातील ट चा उच्चार द असा केला आहे
इंग्रजी भाषेत आता त/ट (T ) शेवटी आला तर त्याचा उच्चार सालेन्ट करण्याची फॅशन रुजु होत आहे.
उदा Soft , Bracket यात मराठीत करतो तसा कठोर उच्चार न करता सॉफ्ट उच्चार केल जातो
हे नियम कोण ठरवतात

विसोबा खेचर's picture

15 Oct 2008 - 5:00 pm | विसोबा खेचर

आयला इजूभाऊ, तुमचा विंग्रजीचाही इतका अभ्यास आहे हे माहीत नव्हतं!

लै भारी माहिती...

येऊ द्या अजूनही...

आपला,
तात्या तर्खडकर.