देवाधिदेव महादेव स्मशानात बसलेले असतात...
त्यांचे गण बेभान होऊन ॐ नम: शिवाय म्हणत नाचतं असतात..
शिवरात्र असते...महादेव आपल्या भक्ता समवेत,,शिवरात्रीचा आनंद लुटत असतात..अनेक भक्त महादेवाच्या भेटीस येत असतात..
त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात..
असाच एक बुद्धिवादी भक्त महादेवाच्या भेटीला आला...
उघडे नागडे भस्म चर्चित अनेक गण बेभान होऊन नाचत होते..
ते पहाताच तो महादेवास म्हणाला स्वामी आपण ब्रह्मांड निर्मिते..सा-या तंत्र विद्ये चे आपण जनक.. अन अश्या उघड्या नागड्या गांजेशस गणात आपण कसे रमता? ॐ नम: शिवाय चा अर्थ तरी याना माहीत असेल का?
यावर महारुद्राने स्मित हास्य केले व त्या भक्तास म्हणाले..
जमिनीवर पान पडले आहे ते उचल...
भक्ताने ते पान उचलले ..पाहिले तर त्यावर एक सूक्ष्म आळी वळवळत होती..
त्यावर देवाधिदेव अंबरीश,म्हणाले...आता त्या अळी कडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्ताने तसे केले अन आळी क्षणार्धात मरुन खाली पडली..अन भक्त चकित झाला..
त्याच वेळी एक फुल पाखरांचा थवा गुंजारव करत होता..
भगवान योगेश्वर, त्या थव्या कडे बघत भक्तास म्हणाले आता त्या थव्याकडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्ताने त्या थव्याकडे पाहिले अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हणाला..
सारी फुलपाखरे मारून जमिनीवर पडली..भक्त आता मात्र भय चकित झाला.
एक हरणाचा जथ्था बागडत जात होता ..
भगवान विषकंठ, त्या जथ्या कडे बघत भक्तास म्हणाले आता त्या जथ्या कडे बघ अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
भक्त घाबरलेला होता ..पण भगवान कालभैरव, चा आदेश होता..
भक्ताने त्या जथ्या कडे पाहिले अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हणाला.
अन तो हरणांच जथ्था मरुन जमिनीवर पडला
भक्त हैराण झाला होता..
त्याच सुमारास एक स्त्री आपल्या नवजात अर्भकास भगवान नंदिकेश्वरा चा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली होति..
त्या नवजात अर्भकाकडे बघत भगवान त्रिचक्षु भक्तास म्हणाले...
हे भक्ता आता या अर्भका कडे बघ अन अन ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..
हे ऐकताच त्या भक्ताची भीतीने गाळण उडाली ..व तो भगवान प्रलयंकरास म्हणाला स्वामी माझ्याच्यान हे होणार नाही..क्षमा असावी..
हे ऐकताच ते नवजात अर्भक भक्तास म्हणाले "अरे मूढ..भगवान शंभो सांगतात त्या प्रमाणे कर..आळी पासून फुलपाखरू त्या पासून हरण अश्या ८४ लाख योन्या पार करत मला हा जन्म मिळाला आहे... ॐ नम: शिवाय हा मंत्र म्हण..अन मला या जन्म मृत्यू च्या फे-या पासून मुक्ती दे..."
तो भक्त मनोमन उमगला.......
ॐ नम: शिवाय हा मंत्र हा जन्म मृत्यू च्या फे-या पासून मुक्ती देणारा मंत्र आहे...
ॐ नम: शिवाय भगवान पिंगलाक्ष तुला नमन...
ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय ॐ नम: शिवाय
( सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या पोस्ट्चा भावानुवाद)
प्रतिक्रिया
28 Apr 2017 - 11:09 am | नेत्रेश
=/\=
28 Apr 2017 - 12:03 pm | चित्रगुप्त
हा एकादा तूनळीवरील व्हिडियो आहे का ? असल्यास दुवा देता का ?
28 Apr 2017 - 4:05 pm | कंजूस
हाच आहे मिपामुक्तीचा मार्ग. राहिला तरी आनंद नाही राहिला तरी आनंद.
29 Apr 2017 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा
जिल्ब्याधिदेव अकुदेव मिपासनात बसलेले असतात...
काहि अकुगण बेभान होऊन "ॐधागा जिल्ब्याश्: शिवायं" म्हणत धाग्यातले अकु कण वेचत असतात..
टू बी जिल्बीडिन्यू... ! ;)
29 Apr 2017 - 10:42 am | टवाळ कार्टा
जितके पुराणे घर सहाशे के होते हय वो...
29 Apr 2017 - 12:45 pm | सतिश गावडे
>>सदगुरु जग्गी वासुदेव यांच्या पोस्ट्चा भावानुवाद
लोक उगाचच त्यांना अध्यात्मिक गुरु मानतात म्हणजे.
30 Apr 2017 - 11:48 pm | गामा पैलवान
अविनाश कुलकर्णी,
हा संवाद महर्षी नारद आणि भगवान विष्णू यांच्यात झडला होता. त्यात महर्षींनी सत्संगाचे फायदे विचारले होते. तेंव्हा भगवंतांनी त्यांना एक नवजात किड्याकडे पाठवलं. नारदांनी प्रश्न विचारताच तो किडा मेला. मग विष्णूने त्यांना एका नवजात वासराकडे पाठवलं. तेही असंच मेलं. शेवटी एका नवजात राजकुमाराकडे पाठवलं. नारदांनी भीतभीत प्रश्न केला तर तो राजकुमार आश्चर्यचकित झाला. म्हणाला की तुम्ही मला ओळखलं नाही. नारदांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिह्न. तर राजकुमाराने सांगितलं की तो एक किडा होता. सत्संगाच्या प्रभावाने वासरू झाला. तरीही सत्संग चालूच राहिल्याने आता राजकुमार म्हणून जन्मला आहे. अशा रीतीनं नारदांचं शंकासमाधान झालं.
आ.न.,
-गा.पै.