पुस्तकदिनानिमित्त विडंबन- (बघ माझी आठवण येते का?)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
23 Apr 2017 - 9:25 pm

सौमित्र आणि शेक्सपिअर दोघांची क्षमा मागून :-

रात्री दिव्याखाली ’मॅकबेथ’ हाती घेऊन पहा
बघ माझी आठवण येते का?

पाने चाळ, पाचव्या ऍक्टचा पहा पाचवा प्रसंग
मॅकबेथची सॉलिलॉकि वाचून टाक
बघ माझी आठवण येते का?

डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द ऑक्सफ़र्डमध्ये बघ
डोके आपटून घे, वैतागून जा
नाहीच कळलं काही तर बंद कर ते,’सॉनेट्स’ घे
त्या डोक्यावरून जातीलच,शब्दांची जुळवाजुळव करून अर्थ लावून पहा
भंडावून जाशील तू, बघ माझी आठवण येते का?

मग सुरू हो, शेक्सपिअरची सगळे साहित्य चाळून घे
चाळत रहा पुस्तके संपेपर्यंत, काही कळणार नाहीच, शेवटी रडून घे
कपाट बंद करू नकोस, दिवा मालवू नकोस, पुन्हा तेच मॅकबेथ हाती घे
आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातला फोन घे, टाय तो स्वतःच फेकेल,
तो विचारेल तुझ्या रडण्याचं कारण, तू म्हण ’अमृता’ छळतेय
मग कॉफ़ी कर, त्यालाही दे,
तो तुला ’हॅरी पॉटर’ देईल, ते तू बाजूला सार
सार्त्रचे ’नो एक्झिट’ वाचायला घे, बघ माझी आठवण येते का?

मग मध्यरात्र उलटेल,तो बिनबॅगवर पसरेल, म्हणेल मला ’वपु’ आवडतात,
पण तूही तसंच म्हण
विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल
तो ’तप्तपदी’मोठ्याने वाचू लागेल, तू त्याच्या ’कलेक्शन’कडे पहा
बघ माझी आठवण येते का?

यानंतर जड डोळ्यांनी ’फ़ाउन्टनहेड’ वाचायला विसरू नकोस
यानंतर ग़ालिबच्या गझला नुसत्या आठवण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली ’पुशि’ घे, जागे राहण्याचा प्रयत्न कर
येत्या पुस्तकदिनी एक क्षण तरी, बघ माझी आठवण येते का?

- स्वामी संकेतानंद

भयानकपाकक्रिया

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Apr 2017 - 10:32 pm | पैसा

लै आवडले!

आईशप्पथ! खतरा लिहिलंय! आणि हे सगळं तुम्ही स्वतः वाचलं असेल तर एक _/\_

नीलमोहर's picture

25 Apr 2017 - 3:28 pm | नीलमोहर

:)

अनुप ढेरे's picture

25 Apr 2017 - 3:43 pm | अनुप ढेरे

मस्तं!

विनिता००२'s picture

26 Apr 2017 - 10:00 am | विनिता००२

मस्त :)