म्युच्युअल फंड आणि शेअर्स काही निरिक्षणे

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
8 Oct 2008 - 3:48 pm
गाभा: 

माझ्या पोर्टफोलीओ आज (घाबरत, घाबरत) बघितला त्यावर आधारीत काही निरीक्षणे -

जेव्हा सेन्सेक्स २१००० होता, तेव्हा मला जवळजवळ ४५-५०% नफा होता शेअर्स मधे तर म्युच्युअल फंडात ३५% नफा होता. आज सेन्सेक्स 10800 आहे तेव्हा मला शेअर्स मधे ५०-५५% तोटा आहे तर म्युच्युअल फंडात २५% तोटा -- त्यातील SBI MAGNUM BALANCED FUND सिप मधे केवळ ८.५% तोटा.

माझा निश्चय -- म्युच्युअल फंडात जास्त पैसे टाकणार! शेअर्स मधे फक्त मोजके काही चांगले शेअर्स ह्या तोट्यात उचलणार. तुमचे काय मत आहे?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Oct 2008 - 3:51 pm | अवलिया

म्युच्यअल फंडांकडे भरपुर पैसा असल्याने ते विविध शेअर्समधे गुंतवतात त्यामुळे नुकसान खुप होत नाही कारण सगळेच शेअर्स काही सारख्याच प्रमाणात चढत वा उतरत नाहीत.
शेअर्सची गुंतवणुक फायदा जास्त देत असली तरी जोखीम पण जास्त असते.
सामान्य गुंतवणुकदारांनी आपला सगळा पैसा शेअर्स मधे न टाकता वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणुक करावी.

मिसंदीप's picture

8 Oct 2008 - 4:13 pm | मिसंदीप

म्युच्यअल फंड मधील गुंतवणुक हि नेहेमीच फायदेशीर ठरते.पण हि गुंतवणुक कमीत कमी २-३ वर्षे सलग करायला हवी. कारण म्युच्यअल फंडचे NAV हे शेअर बाजार निर्देशांकाच्या चढ-उताराप्रमाणे बदलत असतात. शेअर्स मध्ये सुद्धा, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेण्याची उत्तम संधी आहे.

जनोबा रेगे's picture

8 Oct 2008 - 4:25 pm | जनोबा रेगे

म्युच्युअल फ॑डसुद्धा शेअरबाजारातच पैसे गु॑तवतात. तेव्हा सध्याच्या काळात शेअर मार्केट रिलेटेड कुठलीही गु॑तवणूक धोक्याची आहे असे आमचे मत आहे. पीपीएफ मध्येच पैसे टाकणे श्रेयस्कर.
बाजार खाली-वर होतच असतो पण सध्या मात्र खरोखरच ग॑भीर परिस्थिती आहे. ही नेहमीची तेजी-म॑दी नाही. अमेरिकेचा योजनाबद्ध डाव आहे.
माझा बालमित्र कॅप जेमीनीत खूप हाय पोस्टला आहे ल॑डनला. त्याने परवाच त्या॑च्या पुणे ब्रॅ॑चच्या ३५० कर्मचार्‍या॑ना नारळ दिला आहे. त्याच्या मते पुढचे अठरा महीने फारच वाईट असतील. शेअर बाजार वा स॑बधित व्यवहारापासून दूर राहण्याचा सल्ला त्याने मला दिला आहे.

मनिष's picture

8 Oct 2008 - 4:36 pm | मनिष

फक्त म्युचुअल फंडाचे मॅनेजर तज्ञ असल्यामुळे तोटा मर्यादीत राहतो. येणारी ३-५ वर्षे वाईट आस्तील कदाचित, पण जर दीर्घ काळ (१०-१५ वर्षे) गुंतवणूक करायची असेल तर रिटायरमेंट फंडासाठी इतकी उत्तम संधी परत मिळणार नाही!

धूप मे निकलो, घटाओं मे नहाके देखो; जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो!