होम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार !!

Primary tabs

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in पाककृती
10 Apr 2017 - 3:23 pm

तर असं की मी (ज्याक), बाबा योगीराज अन डॉक श्रीहास राहतो या थर्ड वर्ल्ड मधल्या अत्यंत म्हणजे अत्यंतच पुढारलेल्या औरंगाबाद नामक शहरात. इथे खानपान अन इंटरमेंट ची ईतकी म्हणजे ईतकी फार-फार ठिकाणं असल्याने सारखं सारखं बाहेरचंच खाऊन घरी काय करता येईल याचा विचार चालला होता, अन तेव्हाच ठरलं, (म्हणजे मी ठरवलं अन बाकीच्यांनी अनुमोदन दिलं). की हो, घरी “वाईन” तयार करायची. सुरुवातीला शिलेदारांना हे जमेल की नाही वाटलं, पण जमेल, करून तर बघू, जमली तर वाईन नाहीतर सरबत, हाकानाका? (चाल : बनी तो बनी नई तो परभनी)

होम ब्र्यूड वाईन तयार करण्याचे ढोबळ मानाने टप्पे

  • मस्ट मेकिंग
  • यीस्ट कल्चर
  • १लं रॅकिंग
  • सायफनिंग
  • २रं रॅकिंग
  • बॉटलिंग

असे म्हणता येतील .

तर होम वाईन ब्र्युईन्ग ला सुरुवात करायची ठरलं, आणि सामानाची जमवा जमव केली.

दिवस पहिला

• द्राक्ष / अननस कोन्संट्रेट (किंवा २-३ किलो फळं) (द्राक्ष सिझन नसल्याने आम्ही अननसाची केली)
• २-२.५ कि साखर
• पाणी (५-६ लिटर)
• यीस्ट
• सोडीयम मेटाबायसल्फेट टॅब्स **
• सायफन
• मध (२-४ वाट्या) **
• फुडग्रेड सॅनेटायजर्स**
• रिकाम्या वाईन बाटल्या
• बाकी भांडी असतातच घरात
• एयर लॉक (घरगुती तयार केलं तरी चालतं)
• सुती/मलमल कापडाचा २x२ फुट चा तुकडा
** म्हणजे ऑप्शनल आहे.

(टीप : हे साहित्य साधारण ५ लिटर वाईन चं आहे)

मग अननसं सगळी व्यवस्थित साली काढून बारीक बारीक तुकड्यात कापून घेतली. ही सगळी अननस निट धुवून घेणं यासाठी महत्वाचं की त्यावरील असलेली रसायने वाईन ब्र्युईन्ग मध्ये अडथळा ठरू शकतात. बरेचदा या रसायनांमुळे यीस्ट मरायची शक्यता पण असते.

.

हे करत असतानाच एका बाजूला साधारण ४-५ लिटर पाण्यामध्ये २-२.५ किलो साखर टाकून ती विरघळून जाईपर्यंत उकळी आणली. पहिल्यांदा ब्र्युईन्ग करणाऱ्यांसाठी ही महत्वाची पायरी आहे. “जितकी जास्त साखर – तितकं जास्त अल्कोहोल कंटेंट” हे कायम लक्षात ठेवायचं. पण हे करत असताना पाणी कमी असलं तर वाईन गोड होते. पाणी बरोब्बर प्रमाणात असलं की वाईन जवळपास स्पार्कलिंग वाईन सारखी होणार.

आता कापून झालेलं अननस पाण्यात टाकायची वेळ झाली होती. हे अननस पाण्यात टाकून साधारण ४५ मिनिटं ढवळत राहावं लागेल हे नक्की होतं. कारण एकीकडे पाणी उकळल पाहिजे पण त्याचवेळेस अननसातला गोडवा सुद्धा पाण्यात उतरणं तितकंच गरजेचंय .
एकदा ४०-४५ मिनिटानंतर हे बेसिक मिश्रण तयार झालं की मग हे पूर्ण थंड होऊ दिलं. ( हे थंड होणं वाटतं तितकं सोपं नव्हत. तब्बल २-३ तास हे थंड होण्यात गेले.) तोवर आपल्या श्री डॉक नी मस्त चीज बटर म्यागी करून खाऊ घातलं. अन नंतर अती जड झाल्यामुळे झोपून गेला .

अननस टाकलेलं मिश्रण –
.

जड झाल्याने झोपी गेलेला डॉक
.

तर आता हे मिश्रण छान थंड झालं होतं. या स्टेप नंतर या मिश्रणाची चव घेणं टाळावं, मिश्रणाच्या मात्रेत अचानक घट होण्याची फार शक्यता असते. कारण हेच इतकं चविष्ट लागतं की ज्याचं नाव ते.

या नंतर यीस्टचं रेडी कल्चर तयार करायची वेळ होती. त्यासाठी एक वाटीभर पाणी घेऊन त्यात ३-४ चमचे ड्राय यीस्ट टाकलं . हे यीस्ट “शम्पेन यीस्ट” असलं तर आणखी उत्तम. पण ते काही आमच्या ईथे मिळालं नाही तर साधं (ड्राय)यीस्टच वापरलं. या दोन यीस्ट मधला फरक असा की अल्कोहोल यीस्ट मध्ये अल्कोहोल रेजीस्टेन्स जास्त असतो. त्यामुळे ब्र्युईन्ग जास्त छान होतं. पण साधं यीस्ट सुद्धा वापरू शकतो. याने अल्कोहोल कंटेंट मध्ये फार तर ४-५% फरक पडू शकतो.

आता मघाशी जे अननसाचं मिश्रण केलं होतं ते एका मोठ्या रिकाम्या बाटलीत ( आम्ही बिसलेरी ची १० लिटर ची बाटली वापरली) भरून घेतलं, आणि वरून कल्चर्ड यीस्ट त्यात टाकलं. आता जे मिश्रण तयार झालं त्याला “वाईन मस्ट” म्हणतात. एकदा हे तयार झालं की आपली खरी ब्र्युईन्ग प्रक्रिया सुरु होते.
या मस्त च्या बाटलीच तोंड आता एका तलम मलमल/सुती कापडाच्या तुकड्याने बांधून घेतलं. आपण जेव्हा कल्चर्ड यीस्ट मिश्रणात टाकतो तेव्हा ते लगेच साखरेशी आणि स्टार्च शी संयोग करायला सुरुवात करतं. पण त्याने नीट काम करावं यासाठी त्याला थोडं एरीयेट करणं गरजेचं आहे.

वाईन तयार होण्या आधीच “ मै नशे में हुं”. ( बाजूला एरीयेट करण्यासाठी ठेवलेली बाटली)

.

अश्या रीतीने बाटलीच तोंड बांधून साधारण १०-१२ तास ती साधारण तापमानामध्ये पुरेश्या उजेडात (उन्ह नाही, घरातच पुरेश्या उजेडात) ठेवली . त्याचबरोबर ही बाटली एका परातीत पाणी भरून त्यात ठेवायची काळजी घेतली. कारण बरेचदा मस्ट Reaction मुले फेस येतो बाटलीत अन त्याकडे मुंग्या किडे आकर्षित होतात. कारण तो गोड फेस जागे अभावी कापडातून बाहेर पडायची शक्यता असते.

दिवस दुसरा

आज मस्ट च्या बाटली जवळ गेल्यावरच बाटलीतून Fermentation चा वास आणि यीस्ट चे बुडबुडे दिसत होते. याचा अर्थ यीस्ट पुरेसं एरीएट झालं होतं. आता पाळी होती बाटली हवाबंद करण्याची. ब्र्युईन्ग मध्ये एकदा एरीएशन झालं की त्या मस्ट ला बिलकुल हवा न लागू देण्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. कारण यीस्ट ला ऑक्सिजन मिळाला तर तुमच्या हातात वाईन न लागता सरळ विनेगर येते. त्यामुळे “हवाबंद” हा जणू मंत्रच आहे ब्र्युईन्ग मधला.

तर मुख्य कंटेनर हवाबंद करण्यासाठी “एयर लॉक” लावलं. हे एयर लॉक विकत ही मिळतं . मात्र आमच्या येथे ते न मिळाल्याने ते पण मी घरीच तयार केलं.

एयर लॉक :
साहित्य -
• एक २५०/५०० मिली ची शीतपेयाची रिकामी बाटली
• पेट्रोल सायफन ला वापरतो तशी ५-६ फुट नळी.
• सर्जिकल ग्लव्स
• रबरबँड
• पॉलीथीन पिशवी (दोरी सारखा वापर करायला. गाठ घट्ट बसते, अन कापायला सोपी)
किंवा
आधी एका (पुण्याला असताना केलेल्या) प्रयोगात या सगळ्या ऐवजी सरळ एक “साधा नॉन लुब्रीकेटेड निरोध” (हो बरोबर वाचताय) बाटलीवर लावला होता. त्यामुळे, मी सांगतोय ते एयर लॉक किचकट वाटत असल्यास या पद्धतीचा उपयोग तुम्ही करू शकता. रिझल्ट सेमच येतो.

तर, बाटली व नळीच एयर लॉक –
मुख्य कंटेनरला आधी बांधलेलं कापड काढून टाकलं. त्याच्या नेकवर सर्जिकल ग्लव मनगटाच्या बाजूने घट्ट बांधून घेतला. मग त्याच्या करंगळीला बारीकसा (सायफन पाईप च्या जाडीपेक्षा कमी) काप देऊन त्यात सायफन नळीचं ( लॉक साठी १/२ फुट पुरते ) एक तोंड घातलं . हे करताना त्या बाजूचं नळीच तोंड मस्ट ला स्पर्श करता कामा नये. कारण तसं झाल्यास हवाबंद पोकळी निर्माण होते अन यीस्ट मारून जातं . आता करंगळी च्या ज्या कापामधून नळी घातलीये तो भाग रबर्स व पॉली पिशवी ने बांधून हवाबंद करून टाकला. आणि नळीच दुसरं टोक शीतपेयाच्या रिकाम्या बाटलीत सोडलं. ती नळी हलू नये म्हणून आम्ही कपड्यांच्या चिमट्याचा पण वापर केला. आता ती शीतपेयाची बाटली साधारण ३/४ पाण्याने भरून घेतली.

एयर लॉक केलेला मस्ट कंटेनर :
.

एवढ सगळं केल्यावर आता त्या बाटलीत त्या पाईप द्वारे बुडबुडे येताना दिसायला लागले. ही म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळं बरोब्बर केलंय याची पोचपावती.

हा अट्टाहास कशासाठी ? तर यीस्ट जेव्हा काम सुरु करतं तेव्हा २ गोष्टी मस्ट मध्ये तयार होतात. १) अल्कोहोल २ ) सीओ२ यामधील अल्कोहोल आपल्याला हवं असतं पण सीओ२ वाढला तर यीस्ट मरतं . म्हणून तो बाहेर निघावा यासाठी एयर लॉक चा प्रपंच. एयर लॉक न लावल्यास हवेतला ऑक्सिजन मस्ट मध्ये मिसळतो, आणि त्यानेही यीस्ट मरतं.

ईतक करून आता थांबायचं होतं . तब्बल १-१.५ महिना.


दिवस तिसरा ते दिवस वीस किंवा पंचवीस –

या दिवसात नित्यनेमाने दिवसातून ३ दा बुडबुडे येत आहेत न ? आणि बरोबर वेगाने येत आहेत न ? हे पाहणं महत्वाचं आहे. सुरुवातीस साधारण २-३ सेकंदाला १ बुडबुडा या वेगाने बुडबुडे येतात. कारण या दिवसात यीस्ट चा साखर आणि स्टार्च शी अत्यंत जोमाने संयोग चालू असतो.

थोडक्यात

नो बुडबुडे = हवाबंद कंटेनर = डेड यीस्ट = नो वाईन = विनेगर / कडू पाणी .

जसे जसे दिवस पुढे सरकतात, हा वेग कमी होऊ लागतो. आणखी एक या दिवसांत पाहणे महत्वाचे असते, की आपला वाईन मस्ट हळूहळू अपारदर्शक कडून पारदर्शक कडे प्रवास करायला लागलेला असतो. हे होत असेल तर नक्कीच आम्ही बरोबर मार्गाने जात आहोत.


दिवस तिसावा (साधारणतः) –

आता Fermentation जवळपास ८०% झालेलं होतं. बुडबुड्याचा वेग सुद्धा १०-१५ सेकंदास एक इथपर्यंत घसरला होता. कंटेनर च्या तळाशी पांढरा चिकट गाळ दिसायला लागला होता . ( हा गाळ म्हणजे डेड यीस्ट, डायजेष्ट झालेलं स्टार्च+साखर अन मृत अननस असतं). काळजी करू नये. हा गाळ टाकाऊ असला तरी धोकादायक नसतो.
तर साधारण ३०-३१ व्या दिवशी सुटीचा दिवस पाहून “Siphoning and Racking” चा मुहूर्त काढला. आता आज पहिल्या कंटेनर मधून अर्ध-तयार वाईन दुसऱ्या स्वच्छ अन निर्जंतुक केलेल्या कंटेनर मध्ये काढायची वेळ झालेली होती. हा जवळपास शेवटाकडे जाणारा प्रवास सुरु झालेला होता.

आता सावधतेने एयर लॉक काढून टाकलं. आणि सायफन ची उरलेली नळी स्वच्छ करून घेतली. दुसरा मोठा कंटेनर खालील पातळीवर ४५ अंशाचा कोण करून ठेवला. आणि हळू हळू सायफन करून मस्ट दुसऱ्या बाटलीत काढून घेतलं.

सायफन चालू असताना
.

४५ अंश यासाठी गरजेचं आहे की आपण एकदम नळीने ओतलं दुसऱ्या बाटलीत तर ओतताना धारेमुळे बुडबुडे (म्हणजेच हवा) तयार होते, अन ती उरलेल्या यीस्ट ला मारून टाकण्याची शक्यता असते. ४५ अंशात बाटली ठेवली की बाटलीच्या कडेवरून मिश्रण ओघळवून हळू हळू बाटलीत ओतता येते. हे करत असताना तुमच्या वाईन ची पहिली वहिली चव तुम्हाला चाखता येते. पण “बाबू मोशाय सब्र का फल और मिठा होगा”. ईती सायफनिंग
आता मिश्रण दुसऱ्या कंटेनर मध्ये ओतून झालं की परत एयर लॉक चे सोपस्कार करून बाटली ठेऊन द्यावी. ईती ऱ्याकिंग.

आधीच्या बाटलीत जमा झालेला गाळ :
.


दिवस ३२ ते ४५

• बुडबुड्याचा वेग
• बाटलीतील मिश्रणाची पारदर्शकता (मिश्रण पारदर्शक होत चाललं होतं)
• रंग ( हा पहिल्या पेक्षा खूप बदललेला एव्हाना लक्षात आलच होतं)
याकडे निट लक्ष ठेऊन राहावे.

दिवस ४५ ते ५० – “याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा स्वाद गोड व्हावा”

आता आज इतक्या दिवसाच्या प्रतीक्षे नंतर अन मेहनती नंतर “Organic Home Brewed Pineapple Wine” आमच्या पदरात (पक्षी टूलीप ग्लासात) पडणार होती.
आज दिवस होता बॉटलिंगचा. सायफन केलं होतं, तीच प्रक्रिया करून अन ४५ अंश सुद्धा पाळून सगळी वाईन एकेका बाटलीत भरून घेतली. कोर्किंग करणार होतो पण झाकणाच्या बाटल्या मिळाल्याने ते करायची गरज उरली नाही.

.

विजयी मुद्रा

.

बॉटलिंग

.

फायनल प्रोडक्ट – “कितना सुहाना लगता है !!”

.

अहो रुपम अहो ध्वनी:
.

अत्यंत सुंदर सुवास येतोय. आणि कधी एकदा “चीज,चेरी अन वाईन घेऊन राशीद-मेहदी-रफीजी ऐकतो” असं झालंय.

मकसूद है उस मय से,
दिल ही मी जो खिंचती है ...

- आता होम मेड लागर बनवायचा विचार आहे , बघू कधी जमून येतो योग.

विशेष उल्लेख -
रोज दिवसातून ३ वेळा सातत्याने बुडबुडे पाहून ते नुसते न पाहता त्याचे फोटो / विडीओ काढून मला कायम “Notified” ठेवणाऱ्या डॉक चे अन “हम है तुम लढो” असा पाठींबा देणाऱ्या बाबा योगीराज यांचे विशेष आभार.
अन “दाद्या, अरे लिही की वाईन चं !!” असा प्रेमळ हट्ट अन आग्रही भूमिका लाऊन धरणारे मोदक राव यांचे आभार.

डिस्क्लेमर व इतर :
--वरील कृती ही मी करून पाहिलेली आहे. अन आस्वाद ही घेतलेला आहे. पण त्याआधी बराच सराव अन सावधानता बाळगून पुढे सरकलोय. त्यामुळे फूड पॉयझनिंग किंवा इतर रीऍक्षन आपल्याला येत नाहीत ना ? याची जवाबदारी आपली आपण उचलायची आहे.

-- सोडियम मेटाबायसल्फेट हे काही जणांना ऍलर्जिक ठरू शकतं . त्यामुळे ते माहित असल्यासच वापरावं. ते वापरलं नाही तरी साध्या पद्धतीने म्हणजेच हवेशी संयोग होऊ दिल्याने ही यीस्ट मारता येऊ शकते.

- वरील नियम फूडग्रेड सॅनिटायझर ला पण लागू आहे.

-- आपलाच
आनंद”मयी” ज्याक ऑफ ऑल ....

वाईनपेय

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

10 Apr 2017 - 3:59 pm | डॉ श्रीहास

आता पुढे कोणतं फळ ....कोणती वाईन ?

काॅन्फिडन्स सातवे आसमां पे आहे सध्या !!

वेल्लाभट's picture

10 Apr 2017 - 4:50 pm | वेल्लाभट

आंब्याची वाईन करा की! सीझन आहे, रीझन आहे... एखाद लिटर मीही घेईन केलीत तर. :)

ज्याक ऑफ ऑल's picture

11 Apr 2017 - 12:03 pm | ज्याक ऑफ ऑल

आंब्यात स्टार्च अन साखर प्रचुर प्रमाणात असल्याने छान होईल असा कयास आहे ..

मोदक's picture

10 Apr 2017 - 4:10 pm | मोदक

फायनली लेख लिहिलास..!

फोटो भारी. वर्णनपण भारी. असेच प्रयोग करत र्‍हावा..!

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Apr 2017 - 4:20 pm | लॉरी टांगटूंगकर

बाकी धागा खतरनाक. मागे फोटो बघतांना फार फार तर दोनेक दिवसांत संपलं असेल सगळं असं वाटलेलं.
आता पुढे कोणतं फळ ....कोणती वाईन ?
स्ट्रॉबेरी?

स्ट्रॉबेरी पायजे का..? आपल्या दोस्ताचे शेत आहे.

तुमच्यासाठी कितीपन स्ट्रॉबेरी लोरी भौ...! =))

बघू कधी जमते ...

अभ्या..'s picture

10 Apr 2017 - 4:23 pm | अभ्या..

अरे काय काय करता बे. =)) =)) =))
कैपन .
ह्या उपक्रमाला प्राडाँचा आशिर्वाद असता तर अप्रतिम असे इंटर्न्याशनल पॅकेजिंग करुन देण्यात येईल याची टल्ली मंडळाने नोंद घ्यावी.

इरसाल कार्टं's picture

10 Apr 2017 - 4:30 pm | इरसाल कार्टं

या लेखातून प्रेरणा घेऊन मलाही अमच्याकडच्या रेसिपीची आठवण होऊ लागलीय,
म्हणून, मिपावर 'जांभळाची' आणि 'मोहाची' कशी बनवायची याची रेसिपी टाकली तर चालेल का म्हणतो?
आईशप्पत सांगतो, विज्ञानाच्या उर्ध्वपातनाची प्रक्रिया मी अशीच शिकलो होतो.

आता खरं सांगतो, छान लिहिलंय आणि मस्त जमून आलीय रेसिपी.
ता. क.
सायकलचं खूळ घातलं होतंत डोक्यात, आता हेही सुरु करायचं का आम्ही सभ्य माणसांनी?

एस's picture

10 Apr 2017 - 5:05 pm | एस

कधी टाकताय?

बाबा योगिराज's picture

10 Apr 2017 - 6:54 pm | बाबा योगिराज

जामुल अन मव्हाचि?
दोन दोन लिटरची आर्डर लिव भावा मही.

ज्याक ऑफ ऑल's picture

11 Apr 2017 - 1:57 pm | ज्याक ऑफ ऑल

सायकल वॉल डॉक मी नाय काई ..

जियो केदार! वाईन ती सुद्धा फ्रुट बेस्ड! माझी आवडती! नक्कीच भारी झाली असणार!

आधी एका (पुण्याला असताना केलेल्या) प्रयोगात या सगळ्या ऐवजी सरळ एक “साधा नॉन लुब्रीकेटेड निरोध” (हो बरोबर वाचताय) बाटलीवर लावला होता.

:-))

हे वाचून मागे मी मीड (हनी वाईन) चा प्रयोग केलेला तो आठवला! तेव्हा चक्क एक मोठा फुगा लावलेला बाटलीच्या तोंडाला..एक छोटं भोक पाडून!

wine

असेच प्रयोग करत राहा...आणि पुण्यात एखादी बाटली पाठव बाबा! :-))

ज्याक ऑफ ऑल's picture

11 Apr 2017 - 2:01 pm | ज्याक ऑफ ऑल

मागे आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे ट्राय केलं होतं पण शुद्ध मध नसल्याने फिआस्को झाला सगळा

क्या बात है! वाईन इज बॉटल्ड पोएट्री असं म्हणतात ते खोटं नाही. ;-)

डॉ श्रीहास's picture

21 Apr 2017 - 4:17 pm | डॉ श्रीहास

काय पर्फेक्ट वाक्य सांगितलं हो.... आता लेफ्ट राईट वापर केला जाईल ;))

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2017 - 6:14 pm | अप्पा जोगळेकर

भारी हो. आमच्या वडलांनी माठात बनवली होती काळ्या द्राक्षाची वाईन आणि यीस्ट ला खाद्य म्हणून अंड टाकल होत हे आठवतय.

जयंत कुलकर्णी's picture

10 Apr 2017 - 6:27 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटतं अंड त्यांनी यीस्ट खाली बसावे म्हणून टाकले असावे....:-)

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2017 - 6:30 pm | अप्पा जोगळेकर

आय डाउट. मला नक्की आठवत नाही आता. बरीच वर्षे झाली. पण त्यांनी आम्हा छोट्या मुलांसाठी द्राक्शासव आणि मोठ्यांसाठी वाईन बनवल्याचे आठवते.
ज्याक साहेबांची अननस वाईन लैच आवडली आहे.

ज्याक ऑफ ऑल's picture

11 Apr 2017 - 2:03 pm | ज्याक ऑफ ऑल

ये आयड्या भारी होनेका

डोके.डी.डी.'s picture

10 Apr 2017 - 6:37 pm | डोके.डी.डी.

भारीच अजून येउद्यात असे प्रयोग

अर्र, केवढा तो उपद्व्याप.

ज्याक ऑफ ऑल's picture

11 Apr 2017 - 2:05 pm | ज्याक ऑफ ऑल

करेसोच जमता ..

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2017 - 6:58 pm | पिलीयन रायडर

एक नंबर!!

मिपावर कुणी वाईनची पाकृ टाकेल असं जन्मात वाटलं नव्हतं!

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 4:58 pm | ज्याक ऑफ ऑल

तद्वत दारूबंदी होईल कधीतरी या भीतीने करून पाहावी म्हंटल झालं ... बाकी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला ..

बाबा योगिराज's picture

10 Apr 2017 - 7:18 pm | बाबा योगिराज

कशाला वाचला लेख, अस झालय बघ. त्या दिवशीची प्रसाद्ची प्रतिक्रिया आठ्वली.
एकच नंबर चव आणि एकदम कड्क होती. पहिला घोट घेतांना सर्व प्रथम एकदम कडू, नंतर थोड गोड, आणि सगळ्यात शेवटी(घोट गिळुन घेतल्यावर) अननसाची भारी चव लागत होती.

माझा अत्यंत कमी सह्भाग असुनही, वाईन दिल्याबद्द्ल धन्यवाद.
तू परत कधी बोलवतोयस ह्याकडेच लक्ष आहे बघ माझ.

बाबा योगिराज.

एकूणच दारू प्रकार कसा बनतो ही उत्सुकता होती मनात.. आणि हा साग्रसंगीत सोहळा असा शब्दबद्ध करून तुम्ही छानच काम केलत ..
छानच दिसते आहे वाईन

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 5:00 pm | ज्याक ऑफ ऑल

वाईन हो वाईन ... दारू म्हंटल की कससंच झालं ..

बाकी सोहळा हा शब्द बाकी भारी वापरलात ..

जयंत कुलकर्णी's picture

10 Apr 2017 - 8:49 pm | जयंत कुलकर्णी

मी पूर्वी जांभळाची व द्राक्षाची वाईन करायचो घरी. जास्त करुन जांभळाची. पण आता नाही करत एवढी. पण छंद म्हणून हे मस्त आहे..... एकदा आल्याची करायची आहे....बघूउया कधी जमते आहे ते...

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 5:02 pm | ज्याक ऑफ ऑल

जिंजर वाईन ही एक मजेशीर गोष्ट आहे ..

साखर कमी टाकल्यास प्रोबायोटिक पेय ..
जास्त टाकल्यास वाईन ...

त्यात ही यीस्ट न वापरता जिंजर कल्चर घरीच तय्यार केलंत तर "नॉन अल्कोहोलिक पेय " ...
साखर , आलं , पाणी - फक्त ३ गोष्टी लागतात त्यासाठी ..
करून पहा अन सांगा कशी झाली ..

अत्रन्गि पाउस's picture

10 Apr 2017 - 11:11 pm | अत्रन्गि पाउस

आवडेश

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 5:03 pm | ज्याक ऑफ ऑल

कधीतरी बसू ... तू मी वाईन अन गजल ..

वरुण मोहिते's picture

11 Apr 2017 - 10:05 am | वरुण मोहिते

प्रकार ..वेळखाऊ आहे पण शेवटी समाधान देणारा आहे . पुढचे फळ जांभूळ ठेवा आता .

कबीरा's picture

11 Apr 2017 - 10:59 am | कबीरा

मेड इन औरंगाबाद...जमलंय. बाकी औरंगाबादचे पाणी सोमरस बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे म्हणतात ते योग्य का हो?

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 5:05 pm | ज्याक ऑफ ऑल

हो , काही भूगर्भीय (बहुदा) कारणांमुळे येथील पाणी "लाईट" या सदरात मोडते . त्यामुळे कंपन्यांना कॉस्ट कमी पडते , वरून चव छान होते हे वेगळं . पण दुष्काळामुळे सध्या या कंपन्या फार त्रासात आहेत. बंदही होतील काही दिवसांनी कोणाला माहीत.

सविता००१'s picture

11 Apr 2017 - 11:31 am | सविता००१

इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी

म्हणजे ...

इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी ...

इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी

इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी

या पैकी नक्की काय कळेना ..

एकंदरीत .. मी काय केला गुन्हा ?

सविता००१'s picture

13 Apr 2017 - 4:53 pm | सविता००१

अस काही नाही. गुन्हा कसला? चांगली इथल्या मित्रांच्या हृदयाची तार छेडलीत की पहिल्या फटक्यात. एवढच म्हणायचं होतं की नेहमीसारखे काही वेगळे खाद्यपदार्थ वाचायची सवय झालेली. त्यात ज्याक भाउ अशी झ्याक वाईन ची पाककृती टाकतील असं वाटलं नाही हो. त्यामुळे इथे वाईनची पाककृती येइल असं वाटलंच नाही कधी असं वाचा.

बाकी तुमची कॉमेंट म्हणजे ते स्वामी समर्थांच्यावाक्याबद्दल वाचतो ना नेहमी -
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहेच..
याची आठवण करून देणारी आहे. :)

मठ कुठे उघडला आहे म्हणे..?

सविता००१'s picture

13 Apr 2017 - 5:31 pm | सविता००१

मोदक, तुलाच माहित मठ कुठे ते :))

अप्पा जोगळेकर's picture

11 Apr 2017 - 11:52 am | अप्पा जोगळेकर

यातला अल्कोहोल पर्सेंटेज मोजण्यासाठी एक अल्कोहोल मेजरिंग मीटर मिळतो असे वाचले आहे. तो वापरला का.
ही वाईन बनवण्यासाठी उन्हाळा हा योग्य ॠतू आहे का. असल्यास मी प्रयत्न करणार आहे.

ज्याक ऑफ ऑल's picture

12 Apr 2017 - 5:08 pm | ज्याक ऑफ ऑल

आप्पा , हायड्रोमीटर कोणत्याही वैज्ञानिक साहित्य दुकानांत मिळतो. त्यात डेन्सिटी लेव्हल इंडिकेटर सोबतच अल्कोहोल इंडीकेटर असलेलं व्हर्जन सुद्धा मिळतं. आम्ही ते वापरलं होतं. पण ते गरजेचं आहे असम नाही म्हणून लिहिलं नाही . २५०-३०० ला मीटर आणि फ्लास्क दोन्ही मिळेल.

बाकी सामिष पानाला विशिष्ट वातावरणच हवयं या मताचा मी नसल्याने त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण वाईन जनरली उन्हाळ्यात पितात असंच ऐकून आहे . करून पहा काही मदत लागल्यास सांगा ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Apr 2017 - 1:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला मिपावर वाईनची पाकॄ वाचायला मिळेल असे वाटले नव्हते.
भलतेच पेशन्स बाबा.... ४५ दिवस नुसते पहात बसणे जमणार नाही.
पैजारबुवा,

कलंत्री's picture

11 Apr 2017 - 1:53 pm | कलंत्री

एकंदरीतच प्रकार आवडला.

पुण्यात मदिरा कशी बनवावी हे सांगणारा / शिकवणारा कोणी आहे का?

कलंत्री

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:35 pm | ज्याक ऑफ ऑल

अट एकच ...

माश्याच सुग्रास जेवण ...
कोकणी आमटी भाट ..
अन सुक्कट घीन मानधन म्हणून ...

व्यतिरीक्त तुम्ही खाउ घालाल आवडीने ते पण ..

पैसा's picture

12 Apr 2017 - 8:38 am | पैसा

हातभट्टीची पाकृ आठवली या लेखामुळे!

शलभ's picture

12 Apr 2017 - 2:24 pm | शलभ

मस्तच..:)

नंदन's picture

12 Apr 2017 - 3:05 pm | नंदन

क्या बात है!

किसन शिंदे's picture

12 Apr 2017 - 4:38 pm | किसन शिंदे

प्रचंड पेशन्सचे काम आहे की राव हे. इतकी मेहनत घेऊन तयार झाल्यानंतरचा पहिला घोट म्हणजे स्वर्गीय चवच असणार यात वाद नाही.

nanaba's picture

12 Apr 2017 - 5:50 pm | nanaba

जबरा उत्साह!

Ranapratap's picture

14 Apr 2017 - 8:25 pm | Ranapratap

ज्याक भाऊ तुमि आमचे 500 मीटर वाचवले. घातलंय सगळं राअंधायला. आता 45 दिवस फक्त

टप्प्या टप्प्याने फोटो काढा आणि नंतर फर्मास धागा काढा.

ज्याक ऑफ ऑल's picture

15 Apr 2017 - 9:22 am | ज्याक ऑफ ऑल

भारी ...

सांगा कसं काय जमलं ते ..

बादवे "डिसक्लेमर" वाचलंयत ना ?
तेवढ्या काळज्या घ्या मात्र ...

बाकी रीपोर्टत ऱ्हावा ...

गरज पडल्यास संपर्क पण। करा .

नाटक्या's picture

14 Apr 2017 - 11:15 pm | नाटक्या

मागे एकदा मी केली होती हीच वाइन पण लयच किचकट काम असल्याने सरळ बाहेरची तोन्डाला लावणे चान्गले असे मत पडले.

- नाटक्या

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:27 pm | ज्याक ऑफ ऑल

तेही खरंय म्हणा ...

एमी's picture

20 Apr 2017 - 11:26 am | एमी

छान!!

आम्ही हार्ड लिकरवाले असल्याने वाईन कधी पिली नाही. अननस वगैरे सिट्रस फळंदेखील आवडत नाहीत. त्यामुळे हा प्रकार कितपत आवडेल शंका आहे.आयता समोर आला तर नक्की चव बघेन.

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:26 pm | ज्याक ऑफ ऑल

बसू कट्ट्यावर ... !!

ता.क. आम्ही पण स्कॉच वालेच आहोत. पण ती घरी करायला जमली नसती सध्या ...

म्हणून स्कॉच ची तहान वाईन वरे ... :P

मदनबाण's picture

21 Apr 2017 - 9:11 am | मदनबाण

झकास !
आता फळांच्या राजाचा नंबर लावा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)

आनंदी गोपाळ's picture

21 Apr 2017 - 7:54 pm | आनंदी गोपाळ

५०० मीटरवाली अघोषित दारूबंदी असण्याच्या काळात पाकृ टाकलीत हे बरे केले.

रच्याकने, फोटो असे गमतीदार रिसाईझ करून का टाकले आहेत?

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:24 pm | ज्याक ऑफ ऑल

अन गम्मत आम्ही करत नसतो , ती आमच्या कडून आपोआप होते ...

कारण आम्ही फार्फार फन्नीच आहोत ..

वाईन बनवायला परमिट लागते का हो?

खालची लिंक मिळाली पण त्यात "लिकर" जे म्हटले ते त्यात वाईन चा समावेश होतो का हे माहित नाही.
http://www.realityviews.in/2012/06/facts-know-about-bombay-prohibition-a...

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:22 pm | ज्याक ऑफ ऑल

पण इतकं सांगू शकतो की हे आम्ही "रीक्रीयेशनल" तत्वावर केलेलं असल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचे चान्सेस नाहीत.
१ आम्ही हे विकलं नाही
२ आम्ही हे वाटलं नाही
३ आमचा कोणाला त्रास झाला नाही
४ ४ भिंती आत काय केलं तो आमचा प्रश्नय.

सगळ्यात महत्वाचं वकिलांच्या ओळखी भरपूर असल्याने अन पोलीस अशील असल्याने फार भीती बाळगत नाही मी मनात.

तेजस आठवले's picture

22 Apr 2017 - 10:05 pm | तेजस आठवले

ह्यामध्ये अल्कोहोल चे प्रमाण किती होते ? (%)
तसेच विषारी दारू पिऊन लोक मरतात म्हणजे नक्की काय विषारी असते त्यात ? मिथाईल अल्कोहोल ? फेरमेंटेशन होत असताना असे काही वेगळे रसायन बनणार नाही ह्याची खात्री होती का?
तुमचा प्रयोग यशस्वी झाला हे चांगले आहे पण काळजी घ्या :)

ज्याक ऑफ ऑल's picture

5 May 2017 - 1:16 pm | ज्याक ऑफ ऑल

तसेच विषारी दारू पिऊन लोक मरतात म्हणजे नक्की काय विषारी असते त्यात ?

म्हाईत नै ... इतर तद्न्य जास्त निट सांगू शकतील ... पण मी यात यीस्ट सोडून ईतर काहीही टाकले नसल्याने फार फार तर strong अल्कोहोल तयार होईल इतकंच. हे माहित होत. बर हे सगळं श्री डॉक सोबत केलं सो बाकी काही झाल्यास ते होतेच.

फेरमेंटेशन होत असताना असे काही वेगळे रसायन बनणार नाही ह्याची खात्री होती का?
होय. तसा अभ्यास करूनच सगळी प्रक्रिया केली होती. २-३ तद्न्य लोकांना सुद्धा विचारून खात्री करून घेतली होती.

तुमचा प्रयोग यशस्वी झाला हे चांगले आहे पण काळजी घ्या
__/\__