उद्या पासून म्हणजे दिनांक १ एप्रिल पासून पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बंकेत होत आहे. देशपातळीवर याचे काय परिणाम होतील वगैरे या भानगडीत न पडता एक सामान्य ग्राहक म्हणून मला काय अडचणी येतील किंवा येवू शकतील या बाबत शंका वाटते. स्टेट बँकेतील कर्मचारी आधीच वैतागलेले असतात. त्यात अजून नवीन शाखांची व ग्राहकांची भर त्यामुळे सोय होण्यापेक्षा ग्राहकांची अडचणच अधिक होईल असे वाटते. इतर बँकांचा विचार करता जेथे गर्दी कमी तेथे सेवा चांगली असा अनुभव आहे. किमान आलेल्या खातेदाराला बसा असे जरी म्हणले तरी खूप झाले. माझ्या मित्राचे एक online बिल भरताना ७०० रुपये खात्यातून वजा झाले मात्र बिल काही भरले गेले नाही. त्याचे खाते स्टेट बँकेत होते. तक्रार करून काहीच फायदा नाही.उलट तुम्हाला नको त्या भानगडी कशाला करता असे ऐकावे लागले. त्याउलट माझे हैदराबाद बँकेत खाते आहे. माझे देखील अनेकदा ONLINE व्यवहारात पैसे खात्यातुन वजा झाले मात्र तक्रार केल्यानंतर ३-४ दिवसात ते परत देखील आले. आता मला काळजी वाटत आहे की, हैदराबाद बँक विलीन झाल्यानंतर स्टेट बँकेत मला चांगली सेवा मिळेल का ? आतापर्यंत सगळे चांगले चालले होते हि उगाचच काहीतरी भानगड झाली असे वाटते. मिपावरील मंडळीना देखील असे वाटते का?
प्रतिक्रिया
31 Mar 2017 - 3:11 pm | पैसा
त्या बँकांचे कर्मचारीदेखील स्टेट बँकेत जातील त्यामुळे ग्राहकाला तत्त्वतः काही फरक पडणार नाही. मात्र अशा खूप मोठाल्या बँक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने वाईट असल्याने विलीनीकरणाला कर्मचारी unions चा जोरदार विरोध राहिला आहे.
31 Mar 2017 - 4:09 pm | कंजूस
>>स्टेट बँकेतील कर्मचारी आधीच वैतागलेले असतात. >>
पाचसहा वर्षांपुर्वी विआरेसमध्ये कर्मचारी गेले पण नवीन शाखा उघडतच आहेत. जुन्या लोकांना ५२-५५ वाल्यांना या बँकेतच नव्हे तर इतर सर्वच ठिकाणी कंम्प्युटर जमत नाही पण जुने महणून संभाळून घेतले जायचे.
31 Mar 2017 - 6:24 pm | अभ्या..
कुनीतरी सांगा ना राव, कशे होणार? युवे जशी आयडीबीआय बनली तशेच का?
2 Apr 2017 - 12:03 pm | सतिश गावडे
आमच्या गावी युवे होती. सगळा आराम का मामला होता. आता तिची आयडीबीआय झाली आहे. बरीच सुधारणा झाली आहे.
31 Mar 2017 - 6:55 pm | कपिलमुनी
शेअर्स वर काय परीणाम होइल ?
सहयोगी बँकाचे एन पी ए ची सेटलमेंट कशी होणार ई. वाचला पाहिजे .
1 Apr 2017 - 10:03 pm | अत्रे
माझे पण SBH मधे अकाउंट आहे. हैदराबाद बँकेचे स्वतःचे OTP generation ऍप नाही. SBI चे आहे. पण आज SBI च्या OTP generation ऍप वर हैदराबाद बँकेचे लॉगिन करायला गेलो असता लॉगिन झालं नाही.
कोणाचा काय अनुभव आहे?
2 Apr 2017 - 8:44 am | अभिजीत अवलिया
ह्यामुळे स्टेट बँक जगातील ५० सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाईल. ज्यादा ब्रॅंचेस बंद केल्या जातील. उदा - आमच्या गावी (कणकवली येथे) एकाच रस्त्यावर अवघ्या ५०० मीटर अंतरात स्टेट बँकेच्या २ आणी स्टेट बँक ऑफ हैदराबादची एक ब्रांच आहे. ह्यातल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या ब्रांचच्या जागी स्टेट बँकेची ब्रांच काढली जाणार नाही असे वाटते. कारण ५०० मीटर अंतरात अशा ३-३ ब्रॅंचेसची गरज नसेल. अशा ज्यादा पण आता कदाचित गरजेच्या नसलेल्या ब्रॅंचेस बंद केल्याने बँकेची ऑपरेटिंग कॉस्ट कमी होऊन फायदा वाढेल असे वाटते.
2 Apr 2017 - 9:17 am | चौथा कोनाडा
.
नक्कीच ! असे विलिनीकरण करून दाखवणे हे उच्चव्यवस्थापनाला कागदावर सोपे असते, पण त्याचे सर्व त्रास हे मधल्या व्यवस्थापनाला व ग्राहकाना सोसावे लागतात.
कागदी विलिनीकरणात सर्व बाबींचा विचार केलेला असतोच असे नाही (पण प्रेझेण्टेशन मधे असले रिझल्टस आवाजी स्लाइडसनी परीणामकारकपणे भासवता येतात)
पण या केस मध्ये एसबीआयचं सभासद होणे फायदेशीर होइल असे वाटते. त्रास व विलंब सहन करावाच लागणार.
विविध कारणांसाठी इतर बँकेच्या ग्राहकांना एसबीआय मध्ये खाते उघडताना पाहिले आहे.
या बाबतीत योग्य ठिकाणी तक्रारी व इ-मेल याने समस्या सुटू शकते. माझ्या अश्याच एका प्रॉब्लेम फॉलो-अप नंतर सुटलेला आहे.
आता हा सरकारी निर्णय आहे, भानगड होणारच ना ! जमेल तेव्हढा त्रास सहन करायचा नाही तर पकडायची दुसरी बँक !
या सगळ्यात ग्राहक हा भिकारी आहे हे पक्के समजुन-उमजुन रहायचे, काही समस्या झाल्यातर त्रागा न करता चिकाटीने धडका मारत रहायच्या.
त्रास करून घ्यायचा नाही.
2 Apr 2017 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्वच लहानमोठ्या राष्ट्रियिकृत बँकाचे एकामागोमाग एक विलिनिकरण होऊन सहा मोठ्या बँका होणार आहेत...
2 Apr 2017 - 8:29 pm | अभिजीत अवलिया
काहीतरी चुकलंय ह्या तक्त्यात. स्टेट बँकेची ऍसेट स्ट्रेंथ सगळ्यात जास्त व्हायला हवी बाकीच्या बँकांपेक्षा. तसेच महिला बँक स्टेट बँकेत विलीन होणार आहे.
2 Apr 2017 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझी माहीती, http://www.zeebiz.com/companies/news-after-sbi-6-more-public-sector-bank... या स्त्रोतावरून दिलेली होती.
पण, खाली स्त्रोतातील माहितीवरून तुमचे वरील मुद्दे बरोबर आहेत असे दिसते...
http://www.business-standard.com/article/companies/sbi-associate-banks-m...