BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
30 Mar 2017 - 6:52 pm

आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे.
त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो.
आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!!

होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते.
पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का?

तसेच कुठे किती सवलत आहे हे पण इथे सांगावे म्हणजे खरेदी करणाऱ्याला फायदा उठवता येईल.

होंडाकडून ‘बंपर’ ऑफर; BS-III प्रकारातील वाहनांवरील बंदीनंतर मोठी सवलत

तंत्रबातमी

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2017 - 7:19 pm | प्रसाद गोडबोले

उद्या ३१ तारीख आहे , एका दिवसात नोंदणी होणार का ?

नोंदणी होईलच. पैसे मिळणार म्हणून उद्या रात्री जागून करतील. डिलीवरी आरामात देतील.
२०२२ ला भारत ४ सक्तीचे झाल्यावर पुनः विक्री करता येणार नाहीत. अशी गाडी घेतानाच समस्या विकत घेतो आहोत हे लक्षात घ्यावे! भारत -४ वाहनांमुळे प्रदूषण कांही पटीने कमी होणार आहे.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 7:51 pm | संदीप डांगे

भारत ३ पेक्षा भारत ४ ची इंजिने ८०% कमी प्रदूषण करतात असे वाचले.

पण १ एप्रिल पासून बीएस३ बंद म्हणजे बीएस चार सक्तीचेच असेच समजायचे ना? कि काही वेगळे आहे ते?

मदनबाण's picture

30 Mar 2017 - 8:05 pm | मदनबाण

२०२२ ला भारत ४ सक्तीचे झाल्यावर पुनः विक्री करता येणार नाहीत. अशी गाडी घेतानाच समस्या विकत घेतो आहोत हे लक्षात घ्यावे! भारत -४ वाहनांमुळे प्रदूषण कांही पटीने कमी होणार आहे.
ज्यांनी आधीच दुचाक्या घेतल्या आहेत त्यांचे काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2017 - 7:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रॉयल एन्फ्लिड वर आहे का काही डिस्काउंट.

सतिश पाटील's picture

31 Mar 2017 - 11:18 am | सतिश पाटील

नवी मुंबई आणि ठाणे मधल्या ४ डीलरला मोठ्या अपेक्षेने काल चौकशी केली.
पैकी एका मालकाने जे सांगितले ते खालील प्रमाणे

जेव्हा तुम्ही आमची गाडी बुक करता त्यानंतरच आम्ही कंपनीला ऑर्डर देतो. त्यातही १ ते-३ महीने वोटिंग असते आमच्या गाड्यांना. त्यामुळ गाड्यां स्टॉक असण्याचा प्रश्नच नाही. अणि ज्या गाड्या तुम्ही शोरुम मधे बघता त्या कोणीतरी बुक केलेल्या आहेत म्हणून इथे उभ्या केल्यात.
त्यातही एखादी गाडी उरलीच तर नंतर आम्ही ती डिसलोकेट करुण स्पेर पार्ट्स विकू. काही नुकसान नाही आमचे. अणि आम्ही रॉयल एनफील्ड वले आहोत.इथे स्वस्त कही मिळत नाही.

जास्तीत जास्त मी तुम्हाला ३ वर्षांचा इन्शुरन्स मधे सवलत देऊ, तेही तुम्ही माझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या म्हणून. घेउन या १५६००० रुपये क्याश.
नाहीतर तुम्ही तिकडे होंडावाल्यांकड़े जा नावी घ्या ३५ हजारात देतायत, अस बोलुन अपमान देखील केला.

अजुन एक माहिती त्याने दिली, हिमालयन आणि क्लासिक मधे आता ABS पण येणार आहे लवकरच.

सुबोध खरे's picture

3 Apr 2017 - 7:10 pm | सुबोध खरे

इतका माज बरा नव्हे.
आज चलती आहे म्हणून ग्राहकांशी उर्मट पणे वागले तर उद्या पश्चात्तापाची पाळी येऊ शकते.

लोकांना प्रदूषणापेक्षा पैशांची थोडीशी बचत जास्त महत्त्वाची वाटते हे दुर्दैव. हेच लोक परत 'किती प्रदूषण झालंय' असं म्हणायला मोकळे.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 7:57 pm | संदीप डांगे

भ्रष्टाचारापासून स्वच्छ्तेपर्यंत सगळं असंच आहे, आता काय बोलायचे?

बाकी टेसला च्या इलेक्ट्रीक कार्सचे पेटंट एलन मस्कने २०१४ मध्येच खुले केले तरी अजून कोणी भारतीय वाहननिर्मात्याने काही पावले उचलल्याचे दिसले नाही.

मी तर आता टेस्लाच्या मॉडेल एस कारचेच स्वप्न बाळगून आहे. ०-६०किमीप्रतितास फक्त ५ सेकंदात, फुल्ल रिचार्जवर ३४० किमी. घरच्याघरी चार्जींग. सोलर पॅनेल लावले तर इंधनाचा खर्च शुन्य, बॅटरी असल्याने देखभालीचा खर्च प्रचंड कमी. तीनेक वर्षात हे स्वप्न साकार करायचा चंग बांधलाय.

सतिश गावडे's picture

30 Mar 2017 - 9:23 pm | सतिश गावडे

किती हजारात मिळते ही गाडी? :)

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 10:16 pm | संदीप डांगे

. (अमेरिकन डॉलरमध्ये) एकाहत्तर हजारात..
तुम्ही हजारात विचारलं म्हणून.... ;-)

कुंदन's picture

30 Mar 2017 - 10:56 pm | कुंदन

>> एकाहत्तर हजारात..
म्हणजे अजुन काहि वर्षे नोकरी करणे आले.
तोवर सदरा लांबुन्च बघायचा.

शब्दबम्बाळ's picture

30 Mar 2017 - 8:06 pm | शब्दबम्बाळ

मला सांगा, न्यायालयाने १एप्रिल पर्यंत वाहन विक्रीस मुदत दिली आहे त्यामुळे खरेदी करणे गैर आहे वगैरे वाटत नाही.
टप्प्या टप्प्याने निर्मितीच बंद केली असती तर अचानक बंद करावे लागले नसते.
या शिवाय जी वाहने १०-१५ वर्ष जुनी आहेत ती नवीन घेतलेल्या BS -III पेक्षा कित्येक पट जास्त प्रदूषण करतात याबाबत काय करावे??
BS -III आणि अगदी BS -IV देखील पहिले तर आपण या मान्यतांमध्ये मागेच आहोत हे दिसते त्यामुळे कदाचित BS -IV नंतर डायरेक्त्त BS -VI येणार अशी शक्यता आहे... याबाबत अधिक माहिती टाकेनच मिळेल तशी...

पण BS -IV हे BS -III पेक्षा ८०% कमी प्रदूषण करते हे सत्य वाटत नाही कारण मग त्यानुसार इंधन म्हणजेच पेट्रोल देखील तितकेच चांगले लागले असते आणि मग सगळेच गणित बदलले असते!

अकिलिज's picture

30 Mar 2017 - 9:23 pm | अकिलिज

भारत-चार २०१० पासून लागू झालंय. आणि १ एप्रिल पासून बंधनकारक असणार आहे.
आणि किती कार्बन वगैरे इथं वाचा.

शब्दबम्बाळ's picture

30 Mar 2017 - 10:06 pm | शब्दबम्बाळ

आपण तो टाकता नेट पाहिलात तर ध्यानात येईल कि 4-२०१० ला BS -III पूर्ण भारतभरात लागू झाला! त्याआधी ५ वर्ष तो १३ मोठ्या शहरात लागू होता.
आणि गेल्या वर्षी म्हणजेच ४-२०१६ ला BS -IV हा १३ मोठ्या शहरात लागू झाला.
आणि आता एका वर्षातच तो संपूर्ण देशात लागू होतोय.

इंजिन मॉडिफाय करणे हे लगेच होणारे काम नाही तसेच आधी तयार केलेल्या गाड्या एका वर्षात विकून संपवणे देखील सहज शक्य नाही!
१२ करोड रुपयांचा तोटा अपेक्षित आहे.

न्यायालयाने लोकांच्या आणि पर्यावरणाच्या हिताचा निर्णय घेतला असला तरी या गोष्टी त्यामुळे बदलत नाहीत.

शब्दबम्बाळ's picture

30 Mar 2017 - 10:09 pm | शब्दबम्बाळ

*१२ हजार करोड असे वाचावे!

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2017 - 8:09 pm | प्रसाद गोडबोले

ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण आणि पर्यावरणाची काळजी जास्त महत्वाची वाटते त्यांनी मला फंडिंग करावे मी कधी पासुन टेस्ला मॉडेल एस विकत घ्यायची स्वप्ने पहात आहे ;)

म्हणजे कसे की त्यांच्या पर्यावरणाचे प्रदुषण ही होणार नाही आणि माझ्या पैशाचीही बचत होईल !

एकदम विन विन !

खी खी खी

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 8:21 pm | संदीप डांगे

हैला! अशीच अमुची बुद्धी असती आम्हीपन मॉडेसएससंपन्न झालो असतो. :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2017 - 10:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इलेक्ट्रिक कार घेतलीस तरी तु तुझ्या गाडीतुन धुर सोडायच्या ऐवजी जिथे वीजनिर्मिती होतेय तिथे धुर निर्माण करणार आहेस. फक्तं तुझ्या लोकालिटीमधे दिसायला कार्बन फुटप्रिंट कमी दिसेल. प्रत्यक्षात मात्रं वीजनिर्मितीच्या जागी कार्बन उत्सर्जन होणारचं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल कार त्यातल्या त्यात निअर झिरो एमिशन असेल. त्यातही निअर झिरो अश्यासाठी म्हणतोय की गाडी बनवायसाठी परत उर्जा लागणारचं आहे.

वगिश's picture

31 Mar 2017 - 12:12 am | वगिश

Electricity can be created using renewable energy sources ( solar, wind etc).

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2017 - 6:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा मुद्दा रास्तं आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Electricity_sector_in_India

हा जो सर्व्हे आहे त्यानुसार सगळ्यात जास्तं वीजनिर्मिती आजही कोळश्यापासुन अर्थात कोल थर्मल पॉवर प्लांट मधुन होते. अश्या परिस्थितीमधे ही वीज वापरुन चालवलेली गाडी कार्बन फुटप्रिंट कमी करु शकणार नाही. सद्द्यपरिस्थितीमधे सोलर, विंड, बायोमास वगैरेंपासुनची उर्जानिर्मिती तुलनेनी अतिशय कमी आहे.

ह्या परिस्थितीमधे हायड्रोजन फ्युएल सेल कारच्या संशोधनावरती जास्तीत जास्तं भर दिला जायला हवाय. अर्थात हायड्रोजन फ्युएल सेल हि एक प्रचंड धोकादायक गोष्टं आहे. जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख टाकेन.

जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख टाकेन.

कृपया जमवा..

चिगो's picture

31 Mar 2017 - 4:47 pm | चिगो

ह्या परिस्थितीमधे हायड्रोजन फ्युएल सेल कारच्या संशोधनावरती जास्तीत जास्तं भर दिला जायला हवाय.

'हायड्रोजन इंजिन'वर भारतात काही संशोधन झालेले आहे का? मला २००७ कि २००८ च्या नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत ह्यावर एक प्रश्न आल्याचे आठवत आहे. तेव्हा टाटाच्या मदतीने भारत सरकारने ह्या विषयावर काही संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता वाटतं. पण मागच्या १० वर्षांमधे त्यात काय प्रगती झाली आहे, हे ठाऊक नाही..

पण (कोळसानिर्मित) विजेची आणी फॉसिल फ्युएलची एफिशियन्सी सारखीच असते का? कोळशाची एफि० जास्त असेल तर कार्बन फूटप्रिंट कमी असायला हवी.

नेत्रेश's picture

1 Apr 2017 - 12:26 am | नेत्रेश

कोळसा, ऑइल आणी गॅस हे ३ ही फॉसिल फ्युएल आहेत.

होंडा, टोयाटा आणी हुंडई या कंपन्यांच्या हायड्रोजन फ्युएलवर चालण्यार्‍या गाड्या गेली ३ - ४ वर्षे रस्त्यावर धावत आहेत, (Honda Clarity, Toyota Mirai, Hyundai ix35 FCEV ) तसा काही धोका दीसत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2017 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या फ्युएल सेल्स मधे प्रकार आहेत. जर का धातुचा टँक प्रेशराइझ्ड हायड्रोजन सेल म्हणुन वापरला जात असेल तर तो अपघाताच्या प्रसंगी प्रचंड धोकादायक ठरु शकतो. कारण हायड्रोजनची घनता पेट्रोल, डिझेल वगैरेंपेक्षा कमी असते त्यामुळे तो प्रचंड दाबाखाली टँकमधे भरावा लागतो. अपघात प्रसंगी जर का दुर्दैवानी फुएल टँक रप्चर झाला तर स्फोटाचा धोका असतो.

ह्यामधे आता सॉलिड स्टेट हायड्रोजन कंपोनंटही वापरतात. म्हणजे उष्णता वापरुन सॉलिड स्टेट मधल्या फ्युएल सोर्स मधुन हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करायचा आणि इंधन म्हणुन वापरायचा. ही तुलनेनी सोपी पद्धत आहे. आज उद्या वेळ मिळाला तर एक लेख टाकतो रेफरन्स जर्नल्स सकट.

बाकी येणार्‍या काही वर्षांमधे ह्या तंत्रज्ञानाला पर्याय नसेल असं वाटतं.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2017 - 8:18 pm | अत्रुप्त आत्मा

मंजी अता १ यप्रील पासूण सगळी माडेल णविण होनार???

BS III चे प्रदुषण म्हणजे काय? १०० किमीटरला किती पेट्रोल जळते किती कार्बन डाइओक्साइड,मॅानॅाक्साइड,नाइट्रोजन ओक्साइड बाहेर पडतो याची आकडेवारी ??

BS III चे प्रदुषण म्हणजे काय?

इथे चर्चा झालेय.. ( स्वतःच्या धाग्याची झैरात! )
त्यातल्या आलेखावरून स्पष्ट व्हावे.
भारत स्टेज-३ २००५ ते २०१० पर्यंत लागू होते. भारत स्टेज-४ डिसेंबरात लागू झालेय. स्टेज-५ रद्द करून २०२० मधे थेट स्टेज-६ सक्तीचे आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जागतिक टाईमलाईनच्या बरोबर आपण लवकर येऊ. (हे युरोपात १ जाने. २०१५ ला झाले)...म्हणजे आपण आता ५ वर्षेच मागे राहू. जे आधी १० वर्षे असायचो!
२०२१-२२ ला या सवलतीच्या गाड्या भंगारात काढण्याची सक्ती होऊ शकते. ज्यांनी आधीच घेतल्यात त्यांनी त्या आधीच एक-दोन वर्षे वापरल्या आहेत. आजपर्यंत लोकानुनयाचे अनेक निर्णय झाल्याने सगळे बेसावध होते.(जसे १९९५-२०००-२००५ आधीच्या झोपडया नियमित होणे इ.)
एकेकाळी मागे असलेल्या चीनने हा फरक आपल्याहून जलद पार केला.

त्या लेखात ती माहिती नाही. मला वाटतं अमुक एक इंधन जळल्यावर अमुकएक वायू बाहेर पडतात त्यात bs 2/3/4 एंजिनात फरक नसून त्या एंजिनाच्या पुढे जोडलेले उपकरण ते वायू कमी करते. मग ती उपकरणे प्रमाणित करून कोणत्याही एंजिनास जोडून प्रदुषण कमी करता आले तर कोणत्याच जुन्या गाड्या बाद होणार नाहीत ( डिस्काउंट जाइल हो तुमचं).

त्रिवेणी's picture

30 Mar 2017 - 9:13 pm | त्रिवेणी

२०२० ला बी एस ६ कंपलसरी करणार आहेत.

अभ्या, भारत ४चा स्टिकर छापूण देतो कं?

अभ्या..'s picture

31 Mar 2017 - 11:59 am | अभ्या..

देतो की, अरे लै शिंपल आहे. कारण तो लोगो काही आयएसआय टाईप गव्हरमेंट अ‍ॅप्रुव्हड वगैरे डिझाईनचा नाहीचे. कंपन्या अ‍ॅज अ ग्राफीक्स म्हणून ते करतात, प्रत्येक कंपनी वेगवेगळी डिझाईन वापरते. त्यात काही कंपन्या प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक, टोटल मेटल, मेटल प्लेटेड प्लास्टिक, युव्ही लॅमिनेटेड स्टीकर्स, व्हिनाईल स्टिकर्स अशा वेगवेगळ्या मिडियात करतात.
कार न बाईक ग्राफीक्स बनवणारी क्लासिक स्टिकर्स ही कंपनी मोस्टली व्हिइकलची कामे कर्रते.

खेडूत's picture

31 Mar 2017 - 12:09 pm | खेडूत

तयारच हाय की डिझाईन..!
.
.
m

अभ्या..'s picture

31 Mar 2017 - 12:28 pm | अभ्या..

हे कारवर असते
बाईक्सवर असे असते
IV

शब्दबम्बाळ's picture

30 Mar 2017 - 10:15 pm | शब्दबम्बाळ

BS म्हणजे भारत स्टेज. युरोपियन इमिशन नियमांप्रमाणेच हि भारतीय नियमन प्रणाली आहे.
१९९१ मध्ये प्रथम पेट्रोल वाहनांसाठी प्रदूषण नियम प्रणाली सुरु झाली. त्यानंतर मग BS -II , BS - III आणि आता BS -IV असा हा प्रवास सुरु आहे.
ज्यांना उत्सर्जनाचे प्रमाण आणि इतर तुलना जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी खाली एक pdf ची लिंक देतो. ARAI ची pdf आहे. संपूर्ण माहिती मिळेल त्यात!
Indian_Emission_Regulation_Booklet

कपिलमुनी's picture

31 Mar 2017 - 6:58 pm | कपिलमुनी

पुणे , पिंचि मधील डीलर्सनी स्टॉक संपला असे जाहीर केले . आज कंपनीमधील काही जणांनी सुट्टी काधून गाडी घ्यायचा प्रयत्न केला पण हवे ते मॉडेल मिळाले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2017 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
अभिजीत अवलिया's picture

2 Apr 2017 - 12:50 pm | अभिजीत अवलिया

माझ्या माहितीप्रमाणे केवळ गाडी BS- ४ असून उपयोग नाही. तर पेट्रोल डिझेल पण त्याच दर्जाचे असावे लागते. सध्या उत्तर भारतात BS -४ दर्जाचे इंधन मिळते तर महाराष्ट्र व दक्षिण भारतात BS -३. पेट्रोल कंपन्यांनी पूर्ण भारतात BS -४ दर्जाचे पेट्रोल डिझेल द्यावे ह्यासाठी न्यायालयाने काहीतरी टाइमलाईन आखून दिली आहे. तसेच BS -५ ही स्टेज न आणता २०२० साली BS -६ मानक येणार आहे त्यावेळी जुन्या गाड्या ( BS -१ व BS -२) भंगारात काढाव्या लागतील आणी BS -३ व BS -४ ला अजून थोडी मुदत दिली जाईल (२०२५ पर्यंत) असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे
डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे

या गाडी विक्रिसाठी लागलेल्या रांगांच्या संबंधी दोन रोचक मेसेजेस व्हॉट्सॅपवर फिरत आहेत...

१. एक एप्रिल पासून BS-III च्या विक्रीला बंदी आल्याने, गाड्यांच्या विक्रीला आलेल्या उधाणाची आणखी एक गोष्ट म्हणजे बहुतांश गाडया ह्या रोख रकमेने खरेदी झाल्या तेव्हा नोटबंदी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, वाढते तापमान काहीच नडले नाही. मुख्य म्हणजे त्या रांगात देशभरात एकही मृत्यू झाला नाही, इतकेच काय एकही जण चक्कर येऊन पडल्याची बातमी नाही !...... आहे की नाही मजेशीर !

२. दो पहिया वाहन मोटर साइकल में 15-20 हजार की छुट मिलने पर लोग काल नक्षत्र, चौघडिया और मुहूर्त सब भूल गये !!!
=> वास्तव में... लालच से बड़ा कोई धर्म नहीं !!!

शब्दबम्बाळ's picture

3 Apr 2017 - 9:00 am | शब्दबम्बाळ

व्हॉट्सॅपवर वरती काहीही फिरत असत हो! आपल्याला सोयीच्या असलेल्या गोष्टी रोचक वाटतात इतकंच काय ते!
सगळ्या मिळून ८ लाख गाड्या होत्या! १२५ कोटी लोकांच्या देशामध्ये... असो!
लोक किमतीचा प्रॅक्टिकली विचार करून फायदा बघून गाड्या घेत असतील आणि धर्म मुहूर्त अशा बिनकामाच्या गोष्टींना महत्व द्यायचे बंद करत असतील तर ते बरंच आहे म्हणायचं मग! रोचकच की! :)

फन फॅक्ट: भारतातल्या ६०% टक्के गाड्या PUC न करता बिनधास्त धावत आहेत! फक्त नव्या गाड्यांवर बंधने लावून प्रदूषण कमी होणार नाही, असलेल्या गाड्यांनी नियम पाळणे महत्वाचे आहे!
संदर्भ

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 12:59 am | संदीप डांगे

एक रोचक फेसबुकवरील पोस्टः

नोटाबंदीच्या रांगेत उभे राहणाऱ्यांची तुलना दुचाकी खरेदी करणाऱ्यांच्या रांगेशी करणाऱ्या महानुभावांच्या बुद्धीला विनम्र आदरांजली !!

ज्यांना सक्ती , अगतिकता आणि स्वेच्छा, स्वनिर्णय ह्यामधला फरकही समजत नसेल त्यांच्या बुद्धीला आदरांजली वाहण्याशिवाय काय करू शकतोय ?

विशुमित's picture

3 Apr 2017 - 12:39 pm | विशुमित

छान..!!

चांगले धोतरास हात घातला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

समतोलपणे चालूनच धोतराला हात घालता येतो. कोलांट्याउड्या मारून तसा प्रयत्न केल्यास, हात धोतराशी पोचण्याच्या अगोदर तोंडावर पडायला होते !

अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =))

बाकी चालूद्या !

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 8:17 pm | संदीप डांगे

अरेवा, माननीय महोदय! मस्त आहे की हे...?

आपल्याबाजूने लोक बोलले (नाही बोलले तरीही) तरीही ते जाणीव वगैरे असलेले, सूज्ञ मिपाकर वगैरे आणि आपल्याविरोधात बोलले की "कंपूबाजी करुन टाळ्या वाजवायला आणलेले लोक"

खुद्द माननीय संपादकच असा मिपासदस्यांचा घाऊक अपमान करायला लागलेत.. आता तक्रार कुणाकडे करावी ब्रे?
कि तुमच्याही प्रतिसादाला कोणी अनुमोदन दिले की ' टाळ्या वाजावयाला आणलेले भाडोत्री, कंपूबाज प्रतिसादक' म्हणावे अशी मुभा मिळेल...?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा विरोधाभास कधी जरासा विनोदाच्या, कधी स्पष्टपणे व्यक्त होतो. पण, त्यातून व्यक्त होणारे सत्य कधीकधी कटू असते, हे मात्र खरे. पण, त्यावरून इतका राग-राग आश्चर्यकारक आहे !

लेखन मराठीत असावे व मिपाच्या धोरणात बसणारे असावे, हे पथ्य पाळले तर कोणी काय लिहावे यावर काहीही बंधन नाही, हा तर मिपादंडक आहे. लेखक कोण असावा किंवा लेखकालेखका-प्रमाणे कोणाला कोणते मत व्यक्त करण्यावर इतर काही बंधने असल्याचे काही नियम असल्याचे माहीत नाही.

तसेच, एखाद्या लेखनावर कोणी उघडपणे प्रतिसाद दिला/न दिला तरी मिपाकर त्या मूळ लिखाणाचा व दिलेल्या प्रतिसादांचा योग्य तो उघड-गुप्त अर्थ जाणून घेण्यात समर्थ आहेत. तसे ते वेळोवेळी आपल्या लेखनातून व्यक्त करत असतातच. तेव्हा काळजी नसावी.

धन्यवाद !

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 9:30 pm | संदीप डांगे

व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा विरोधाभास कधी जरासा विनोदाच्या, कधी स्पष्टपणे व्यक्त होतो. पण, त्यातून व्यक्त होणारे सत्य कधीकधी कटू असते, हे मात्र खरे. पण, त्यावरून इतका राग-राग आश्चर्यकारक आहे !

>> हो, अगदी १००% सत्य... जसे खालच्या वाक्यांत आलेला इतका राग राग मलाही आश्चर्यकारकच वाटला बघा...

समतोलपणे चालूनच धोतराला हात घालता येतो. कोलांट्याउड्या मारून तसा प्रयत्न केल्यास, हात धोतराशी पोचण्याच्या अगोदर तोंडावर पडायला होते !
अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =))

असो. धन्यवाद! यावर जास्त चर्चा गरजेची नाही. जो होगया सो गया.. काय म्हणता तुम्ही ते बूंद से गयी वो हौदसे का कायतरी..

विशुमित's picture

4 Apr 2017 - 10:05 am | विशुमित

अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =))
==>> कुंपणच शेत खायला लागल्यावर आता पुढे काय बोलायचं.
मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का?
मिपा मालकांना विनंती असले वयक्तिक आरोप पचवण्याच्या पलीकडे आहेत. विशिष्ट कंपूलाच सोबत घेऊन जाणारे असे संपादक आम्हाला नको आहेत, असे खेदाने नमूद करू इच्छितो.

मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का?

हा नियम मिपावर आहे असे का वाटले म्हणे..?

अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते. झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते. पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात. नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.

विशुमित's picture

4 Apr 2017 - 12:07 pm | विशुमित

ज्यांना प्रतिवाद केला आहे त्यांनी प्रति उत्तर द्याच्या अगोदर तुम्ही यिमान घेऊन धावत का आलात?

<<<अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते.>>>
==>> कोणी ही बोळ्याने दूध पीत नाही. ठराविक कंपूत न राहता शिकवलेल्या पोपटासारखे बोलायला न येणे याला अडाणीपणा म्हणत असतील तर अडाणीच असलेले बरं.

<<<झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते.>>>
==>> पुण्यातला तो पुतळा बसला का परत? एक कुतूहल.

<<<पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात>>>
==>> ""कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले"" याला तुमच्याकडे आणि सन्मानीय सदस्याकडे विदा आहे का? नसेल तर दोघांनी माघार घ्या. (ते नाही जमणार बहुतेक कारण ७ महिने सदस्येत्व असणाऱ्या समोर माघार, शक्यच नाही.)

<<<नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.>>
==> ट्रक ची पंचर निघते बरका. नाहीतर टायर पण बदलू. काळजी नसावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 6:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

त्यावेळेस स्वनिर्णयाने रांगेत उभे राहिलेली सर्वसामान्य जनता हवामानाचा परिणाम, कष्ट, इत्यादीबद्दल तेव्हाही बोलत नव्हतीच आणि आजही बोलत नाही ! सर्वसामान्य जनतेच्या मनात नाराजी नव्हती हे तिने नोटाबंदीपासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणूकांत स्पष्टपणे दाखवून दिले आहे. पण, काही लोक कधीच शिकू शकत नाहीत, हे पण एक सत्य आहेच म्हणा !

त्यावेळेस, ज्यांना, आपण भूतकालात जमा केलेली माया आणि भविष्यात तेच उपाय वापरून माया जमा करण्यासाठी होणारा त्रास यांची काळजी वाटत होती, त्यांचा स्वतः एसी खोलीत बसून माध्यमातल्या आपल्या पित्त्यांतर्फे "मोले घातले रडाया"चा तोच जुना अयशस्वी प्रयोग चालला होता. आज तसा स्वार्थ नसल्याने त्यावेळेस बोंबा मारणार्‍यांना आज तिकडे ढुंकूनही पहावेसे वाटत नाही, इतकेच ! =)) =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Apr 2017 - 7:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्काकाका आता लोकं तुम्हाला भक्तं म्हणणार बरं का ;) ;) ;)!!!!

असं एकदम फटकन लॉगिकल पोस्टं टाकुन धाग्यातली हवा काढुन घेतल्याबद्दल णीषेद ;) ;) ;)!!!

संदीप डांगे's picture

3 Apr 2017 - 8:09 pm | संदीप डांगे

स्वनिर्णयाने..... व्हाट्टा जोक! अ‍ॅज इफ पीपल हॅड चॉइस नॉट टू चेंज द नोट्स... =)) =))

बाकी काय म्हणता...? झाला की नाही अजून नोटाबंदीचा हिशोब...?
फक्त शब्दजंबाल गाजरगफ्फा आणि केविलवाणे व्हॉट्सॅप मेसेजेस मिळत आहेत आजकाल म्हणून विचारलं...

निवडणुकांमध्ये विजय बघायचा आणि पराजय गुपचूप कारपेटखाली ढकलायचे अशी तर राजकारण्यांची रीत असते... बहुतेक पंजाबात नोटाबंदीचा फार त्रास झाला असेल जनतेला, म्हणून सत्ताधारी असून भाजप सपाटून आपटले.. गोव्यातही.. हेच तुम्ही उत्तरप्रदेशबद्दलही उलट्या बाजूने म्हणू शकताच. त्यामुळे मतदान हे नोटाबंदीवरचा जनतेचा मॅन्डेट समजायचा तर अडचण होते दोन्हीकडच्यांची... पण हे जे समतोल आणि तटस्थ असतात त्यांनाच दिसते बरे! आणि तसेही नोटाबंदीचे फायदे हा मुद्दा प्रचारात घेतलाच नाही प्रधानसेवकांनी, इतका फायदेशीर(?) होता तरी. ३१ डिसेंबरपासून तर बोलणेच बंद केले सगळ्यांनी... नोटाबंदीवर.

असो. अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते ते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2017 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते. ते

+१००

असेच* सरकार आणि नोटाबंदीच्या बाजूने बोलणारे लोक बोलत होते, असे माध्यमे व मिपावरचाही संवाद चाळल्यास दिसेल.

पण, विरोधकांचा फक्त "मला आत्ताच आईस्क्रीम पायजे, ऑsss ऑsss" टाईप धोशा चालू होता ना ! ;)

असो, देर आये, दुरुस्त आये !

ही फक्त आठवण करून दिली आहे. बाकी त्या विषयावर इथे चर्चा करण्यात रस नाही.

========================

* : नोटाबंदीचे व तिच्या मागच्या-पुढच्या संबंधीत कारवायांचे स्पष्ट परिणाम दिसून यायला १ वर्ष किंवा ३-४ तिमाह्या लागतील असे

अभिजीत अवलिया's picture

4 Apr 2017 - 9:04 am | अभिजीत अवलिया

सर्वसामान्य जनतेच्या मनात नाराजी नव्हती हे तिने नोटाबंदीपासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणूकांत स्पष्टपणे दाखवून दिले आहे
--- निवडणुका ह्या नोटाबंदी ह्या एकमेव मुद्द्यावर लढल्या गेल्या नाहीत. निवडणुकीत बरेच मुद्दे असतात. विकासाचा मुद्दा, भ्रष्टाचार, पाणी, वीज ह्यासारख्या पायाभूत सुविधा, विद्यमान सत्तेत असलेल्या लोकांची कामगिरी, रोजगार बरेच मुद्दे असतात. त्यामुळे नोटाबंदीमुळे जनतेच्या मनात नाराजी नव्हती आणी त्यामुळे भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या हा घाऊक निष्कर्ष फारच हास्यास्पद आहे.

शब्दबम्बाळ's picture

4 Apr 2017 - 9:54 am | शब्दबम्बाळ

अहो त्यांनी सांगितलं ना कि "स्वनिर्णयाने रांगेत उभे राहिलेली सर्वसामान्य जनता हवामानाचा परिणाम, कष्ट, इत्यादीबद्दल तेव्हाही बोलत नव्हतीच आणि आजही बोलत नाही"
हे सगळे डायरेक्त्त निष्कर्ष असतात मग! म्हणजे अप्रत्यक्षपणे असे म्हणायचे की जर कोणी नोटबंदीबद्दल तक्रार वगैरे करत असेल तर ते सामान्य जनतेत येत नाहीतच! असामान्य असावेत ते...
दुसर्याने अशी बेछूट विधान केली कि त्याला विदा संदर्भ यासाठी तगादा लावून आपण कसे बरोबर हे दाखवले जाते! पण काही सन्माननीय सदस्यांना हल्ली हे नियम लागू पडत नाहीत!

दुसऱ्याच्या विचाराला कोणी अनुमोदन दिले कि तो कंपू असतो (टाळ्या वाजवायला आणलेला ना?) पण आपल्याला मिळालेले "इल्लोजिकल" अनुमोदन मात्र अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेचे असते बहुतेक! =))

बाकी स्कोर सेटलिंग किती जोमात चालते मिपावर याची प्रचिती काही धागे पाहून येतच आहे, त्यामुळे कोणाच्या कंपूवर कोणाचे ओझे हे मिपावरच्या सर्वसामान्य, अभ्यासू इ इ जनतेला कळत आहे! =))

अभिजीत अवलिया's picture

4 Apr 2017 - 8:54 am | अभिजीत अवलिया

बाकी एक शंका आहे-
डीलर लोकांनी त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत जागून वाहने विकली हे एकवेळ ठीक आहे. पण आर.टी.ओ. (जो की शासकीय विभाग आहे आणी १०-५:३० ह्या वेळेत काम करत असावा) तो रात्री १२ वाजेपर्यंत चालू ठेवून वाहनांची एंट्री करण्याचे कारण काय? ते पण सर्वोच्च न्यायालयाने विक्रीस बंदी घातलेल्या गाड्यांची नोंदणी व्हावी म्हणून. ऑफिस रात्री १२ पर्यंत चालू ठेवण्याचा अधिकार आर.टी.ओ.ला आहे का?