नील कशकरी

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
8 Oct 2008 - 5:16 am
गाभा: 

http://www.treas.gov/organization/bios/kashkari-e.html
http://blogs.wsj.com/deals/2008/10/06/meet-neel-kashkari-the-man-with-th...

अमेरिकी सरकारच्या ७०० बिलियन डॉलर बँक बेल-आउट प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी भारतीय वंशाचे नील कशकरी यांची नेमणूक झाली आहे.
अमेरीकी अर्थ खात्यात ते गेल्या २ वर्षापासून कार्यरत आहेत.
नील कशकरी हे ३५ वर्षाचे असून त्यांनी यापूर्वी गोल्डमन-सॅख या कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट पदावर काम केले आहे.

आपल्या सर्वांसाठी ही बातमी नक्कीच अभिमानास्पद आहे.

नील कशकरी यांना शुभेच्छा.

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

8 Oct 2008 - 5:44 am | बेसनलाडू

नील यांचे अभिनंदन आणि यशस्वी उपाययोजनेसाठी शुभेच्छा!
विक्रम पंडित, नील कश्करी आणि यांच्यासारखेच आणखीही अनेक भारतीय वंशाचे लोक, जे अमेरिकेतच नव्हे तर जागतिक स्तरावर या ना त्या कारणाने भारताचे नाव रोशन करतात. याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. पण 'भारतीय' आणि 'मूळ भारतीय वंशाचे' यांतला सूक्ष्म फरक लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे, असे व्यक्तिशः वाटते. म्हणजे 'भारतीय' आणि 'वंशाने भारतीय' या दोन बिरुदांमध्ये मला व्यक्तिशः पहिले बिरूद मिरवायला अधिक आवडते/आवडेल.
(भारतीय)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे's picture

8 Oct 2008 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे

भारतीय असणे व भारतीय वंशाचा असणे हे दोन्ही आपल्या हातात नाही. पहिले बिरुद कुणीतरी मिरवल्या शिवाय दुसरे बिरुद वंशजाला मिळत नाही. आम्हाला दोन्ही गोष्टीत आनंद वाटतो. कुठेतरी प्रथितयश व्यक्तीची भारताशी संबंध आहे ही बाब सुखावुन जाते. भारतीय वंशाच्या संबंधीत व्यक्तीला कदाचित भारताविषयी आत्मियता नसेल ही. पण आम्हाला वाटते. बेलाशी सहमत आहे
प्रकाश घाटपांडे