गाभा:
विजयनगर (राजधानी, नवे आंध्रप्रदेश. पुण्यापासुन ९०० किमी) येथे एका मिटींगमध्ये २ प्राध्यापक होते, जे पन्नाशीत असावेत. त्या दोघांनी कानात बाळी घातलेली होती ... अगदी आपल्या पुण्यातील सध्याच्या फॅशनसारखी ! कुतूहल चाळवले व त्यांना नंतर सांगितले की, पुण्यात पेशव्याच्या आभूषणांत अशी बाळी घालण्याची पद्धत होती व सध्या तरुणांत ही फॅशन जोरदार आहे.
त्यांनी सांगितले की, "आमचे पुर्वज १०० वर्षांहूनही आधी पुण्यातुनच इकडे आल्याचे आम्हाला सांगितले जाते. आमची नाळ पुणे आणि पेशव्याशीच जोडली गेली आहे व ही बाळी घालणे आमच्याकडे अभिमानाचे व अनिवार्य मानले जाते".
साहजिकच ही माहिती अत्यंत रोचक आहे. कुणी अधिक प्रकाश टाकेल का?
प्रतिक्रिया
23 Mar 2017 - 6:01 pm | पैसा
त्याना मराठी बोलता येत होते का
23 Mar 2017 - 6:16 pm | अजय भागवत
माझे संभाषण इंग्रजीत झाले त्यामुळे पुढीलवेळी विचारेन की, खाजगीतील संभाषणात ते जी तेलुगू वापरतात त्यात मराठी शब्द आहेत का की जे इतर तेलुगूभाषिक वापरत नाहीत.
23 Mar 2017 - 6:10 pm | सूड
हापिसातला एक आंध्रातला कलिग पण एकदा बोलून गेला होता त्यांच्याकडे घालतात काही लोक.
23 Mar 2017 - 6:18 pm | अजय भागवत
त्याला "त्या" लोकांच्या चालीरीती -सणवार -भाषा ह्यात काही वेगळेपण जाणवतं का ते विचारता आले तर पहा
23 Mar 2017 - 7:18 pm | सूड
ह्या हापिसात नसतो तो आता, आणि लोकांना आपले सणवार माहीत असायची बोंब असते हल्ली; लोकांचे कुठून माहीत असायला!!
23 Mar 2017 - 8:11 pm | अजय भागवत
ह्म्म ! खरे आहे...
23 Mar 2017 - 7:42 pm | कंजूस
१) शिवाजीचे कुळ मूळचे राजस्थानातले. तिकडे राजस्थानात बाळी घालतात.
२) शिवाजीने शेवटी गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध वाढवले त्यासाठी पिंगुळी नावाच्या वकिलाने पत्रव्यवहार केला आणि नंतर ते आणि त्याचेबरोबर काहीजण तिकडेच राहिले. बाळीची प्रथा अशी पसरली असेल???
23 Mar 2017 - 8:09 pm | अजय भागवत
रोचक माहिती आहे !
23 Mar 2017 - 9:13 pm | धर्मराजमुटके
शिवाजी महाराज मुळचे रजपुत नव्हते असे संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. मागच्या आठवड्यात पेप्रात बातम्या वाचल्याचे स्मरते.
23 Mar 2017 - 9:16 pm | धर्मराजमुटके
खरे खोटे संशोधक जाणे ! ही पुस्ती जोडायला विसरलो.
24 Mar 2017 - 4:31 pm | माहितगार
मुटके साहेब, छोट्या छोट्यागोष्टीवरुनही भावना दुखावतात. नेमके संदर्भ न देता, असे वरवरचे माहिती देणे टाळलेले अधिक बरे असे सुचवावेसे वाटते.