अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या कुटुंबातील हत्याकांड

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
7 Oct 2008 - 7:19 am
गाभा: 

सीएनएन मधील बातमी :

http://www.cnn.com/2008/CRIME/10/06/california.murder.suicide/index.html

बातमीतील महत्त्वाची वाक्ये :

महिनोन् महिने नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून लॉस एन्जल्स भागातल्या "सान फर्नांडो" या सधन लोकवस्तीत रहाणार्‍या माणसाने आपली सासू , पत्नी व तीन मुले यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने आत्महत्या केली.
.....
......
कार्थिक राजाराम या ४५ वर्षे वयाच्या माणसाचे हे कृत्य आहे असे सकृद्दर्शनी दिसते. ...
....

मृतांमधे एका १९ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे. अतिशय अभिमानस्पद , थोड्याच जणाना मिळणारी फुलब्राईट शिष्यवृती त्याला होती.

प्रतिक्रिया

सहज's picture

7 Oct 2008 - 7:57 am | सहज

अश्या घटना परत एकदा "आर्थीक नियोजन" या आयुष्यातील महत्वाच्या भागाचे महत्व अधोरेखीत करुन जातात.

असे घडायला नको पाहीजे होते.

प्राजु's picture

7 Oct 2008 - 8:01 am | प्राजु

वाचल्यावर धक्का बसला. आर्थिक घडामोडी इतक्या खालच्या थराला जाईपर्यंत वाट का पहायची?? हाकनाक एका उत्तुंग भविष्य असलेल्या मुलाचा बळी गेला यात.. आणि बाकीच्यांची तरी काय चूक??
असं व्हायला नको होतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अभिजीत's picture

7 Oct 2008 - 8:02 am | अभिजीत

Unfortunate end of an Amrican dream!!!

सखाराम_गटणे™'s picture

7 Oct 2008 - 8:24 am | सखाराम_गटणे™

>>अश्या घटना परत एकदा "आर्थीक नियोजन" या आयुष्यातील महत्वाच्या भागाचे महत्व अधोरेखीत करुन जातात.
सहमत

हत्याकांड
हा शब्द बरोबर आहे का? आत्महत्या हा शव्द अधिक योग्य आहे.
हत्याकांड काही तरी वेगळेच ध्वनित करतो.

-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2008 - 8:32 am | प्रकाश घाटपांडे


हा शब्द बरोबर आहे का? आत्महत्या हा शव्द अधिक योग्य आहे.


आत्महत्या हा फक्त स्वतःशी निगडीत असतो. इथे इतरांची हत्या करुन मग आत्महत्या असा प्रकार आहे. इतरांची हत्या करुन स्वतः जिवंत राहिले तरच हत्याकांड असा अर्थ नाही.

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

7 Oct 2008 - 11:28 am | विसोबा खेचर

हे सगळे भोग आहेत..!

दुसरं काय?

अवलिया's picture

7 Oct 2008 - 12:55 pm | अवलिया

अतिशय दुर्देवी घटना...
दैव कुणीच जाणु शकत नाही हेच खरे.

रेवती's picture

7 Oct 2008 - 9:09 pm | रेवती

असे घडायला नको होते.
सहज यांचा प्रतिसाद पटला.
मागच्या पिढीतील ज्येष्ठ नेहमी सांगायचे कि आपल्या गरजा कमीतकमी ठेवा. अंथरूण पाहून पाय पसरा.
आपण त्यातले कायकाय करतोय हे अश्या प्रसंगामुळे पुन्हा तपासून पाहिले जाते.

रेवती

धनंजय's picture

7 Oct 2008 - 9:56 pm | धनंजय

वाईट घटना. कुटुंब मूळ भारतीय होते, म्हणून घरची शोकांतिका असल्यासारखे वाटते.

यशोधरा's picture

7 Oct 2008 - 9:58 pm | यशोधरा

आई गं... :(

mina's picture

7 Oct 2008 - 10:01 pm | mina

आजच्या धावपळीच्या काळात माणुस माणसापासुन दुरावला आहे.आपलं मन कोणाकडे मोकळे करावं म्हटलं तर समोरच्याला वेळ नसतो. पूर्वी अडचणीत असलेल्या माणसाला मदत करण्याची व्रूत्ती होती आज मदत करणारे हात खुप कमी उरले आहेत्.मदत ही केवळ पैशाचीच नसते.अडचणीत असलेल्या व्यक्तीला धीर दिला तरि त्याला जगण्याचं बळ येते. कार्थिक राजाराम ला कुणीतरी मार्ग दाखविणारा मिळाला असता तर ही घटना घडली नसती. खरचं वाईट वाटलं बातमी वाचुन.

त्यामुळे इतका टोकाचा निर्णय त्या कुटुंब प्रमुखाला घ्यावा लागला. त्याला दुसरा कोणताही रोजगार मिळाला असता. हे त्याने उचललेले पाउल निदान मला तरी चुकीचे व दुर्दैवी वाटते. ईश्वर मृतात्म्याना शांती देवो.
वेताळ