मला आवडणारे काही podcasts.

बार्नी's picture
बार्नी in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 3:31 pm

ऑफिस मधून घरी येताना फोनवर podcasts ऐकणे हा माझा आवडता छंद आहे . दोन वर्षाआधी अचानक मला podcasts चा आंतरजालावर शोध लागला आणि तेव्हापासून मी नियमित podcasts ऐकत आहे. गेल्या दोन वर्षात मला गवसलेले आणि माझ्या आवडीचे काही podcasts खाली देत आहे . आपणही आपल्या आवडीचे podcasts सुचवू शकता.

Dan carlin's Hardcore History
जर आपणास इतिहासाची आवड असेल तर आपणास हा podcast आवडेल. जागतिक इतिहासातील महत्त्वाचे विषय घेऊन त्यावर ४ ते ५ तासांचा एक एपिसोड असतो. जगातील सर्वात जास्त लोकप्रिय podcasts पैकी हा एक आहे.

History of Rome
Mike Duncan चा आणखी एक लोकप्रिय podcast. रोमन इतिहासाचे १५ ते ३० मिनिटांत सुंदर विवेचन ह्यात केलेले आहे.

Welcome to Night Vale
Nightvale ह्या काल्पनिक गावातील लोकांसाठी हा रेडीओ शो आहे. ह्या गावातील होणार्या चमत्कारीत घटना ह्या शो द्वारे आपल्यास सांगितल्या जातात. आपणास काल्पनिक रहस्यकथा मध्ये रुची असल्यास नक्की ऐका.

Freakonomics radio:

Freakonomics ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या सह लेखकाचा हा शो. दैनंदिन जीवनातील गोष्टींच्या मागील अर्थशास्त्र उलगडून सांगणारा हा कार्यक्रम.

Lore
आपल्या आयुष्यातील भूतखेतांच्या कथा, चालीरीती, अंधश्रद्धा मागच्या इतिहासाचा मागोवा घेणारा भन्नाट शो.

Bill Burr’s Monday Morning Podcast:
बिल बर ह्या माझ्या सर्वात आवडीच्या विनोदवीराचा शो. त्याच्या आसपास घडणार्या गोष्टींच्या हसून हसून पोट दुखावणार्या कथा.

The bugle Podcast:
Andy zaltzman ह्या विनोदवीराचा जगप्रसिद्ध शो.

वरील सर्व podcasts आपण Pocket casts किंवा Stitcher ह्या app वर ऐकू शकता.

तंत्रआस्वाद

प्रतिक्रिया

माजा मराठी असा तंजावर मराठीचा पॉडकास्ट आहे तो ही जरूर ऐका.

https://www.podomatic.com/podcasts/tanjavurmarathi

'माजा अस्तित्त्व' म्हणून पॉडकास्ट आहे. जरूर ऐका. सतरा भाग आहेत आत्तापर्यंत. रोचक आहे. शहाजीराजेंचे सुपुत्र आणि शिवरायांचे सावत्रभाऊ व्यंकोजीराजे ह्यांच्यापासून तामिळनाडूतील तंजावर संस्थानात मराठी भाषिकांनी त्या काळची मराठी जपून ठेवली आहे. अवश्य ऐका.

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2017 - 7:11 pm | पिलीयन रायडर

पॉडकास्ट म्हणजे रेडिओ सारखं असतं का? ऑडिओ ब्लॉग असल्या सारखं?

कधी तरी ऐकायल पाहिजे. ह्या निमित्ताने इथे लिस्ट तयार होऊ देत!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2017 - 9:23 pm | अत्रुप्त आत्मा

पॉडकास्ट म्हणजे रेडिओ सारखं असतं का? ऑडिओ ब्लॉग असल्या सारखं?

››› प्लस वण.
काय अस्तया ह्ये पॉडकास्ट? हुच्च वाटू ह्रायलय कैतरी.

राघवेंद्र's picture

13 Mar 2017 - 3:59 am | राघवेंद्र

पॉडकास्टस या नावाचे फोन वर App असेल किंवा तसे अँप डाउनलोड करता येईल. बऱ्याच गाण्याचा अँप मध्ये पॉडकास्ट असा पर्याय असतो.

रेडिओ स्टेशन सारखी पॉडकास्ट स्टेशन असतात उदारणार्थ Planet Money. ती शोधुन त्या स्टेशनला subscribe करायचे. स्टेशनने नवा भाग (epsisode ) प्रसारीत केला की तो आपल्या फोन मध्ये आपोआप दिसतो आणि ऐकलं की दिसायचा बंद होतो.

रोज खूप प्रवास असलेल्या लोकांना खूप सोयीचा आहे.

आनंदयात्री's picture

10 Mar 2017 - 8:07 pm | आनंदयात्री

धन्यवाद. संकलन आवडले. डॅन कार्लीनचा पॉडकास्ट ऐकेन.

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Mar 2017 - 10:46 pm | लॉरी टांगटूंगकर

फ्रीकनॉमिक्स आवडतं आहे म्हणल्यावर रसेल रॉबर्ट्सचा ईकॉनटॉक्सपण आवडू शकेल.
लिंक , मी फिल्टरसाठी ट्विटर वापरतो. लै भारी असेल तर लोक्स शेअर करतात. शोधणे, ऐकणे ठरवून होत नाही.

इतिहासाच्या पाउलखुणांचे पॉडकास्ट मात्र ठरवून ऐकतो. पोरं लै कमाल आहेत.

या खेरीस शास्त्रीय गाणं आवडत असल्यास हाच्यानल कमाल आहे. याचे बहुतांशवेळा इथे व्हीडीओ नसला तरी काम चालून जाते म्हणून पॉडकास्ट लेबल खाली ढकलतो आहे.

इतिहासाच्या पाउलखुणा बद्दल माहिती नव्हते , लिस्ट मधे टाकला आहे , धन्यवाद!

स्रुजा's picture

10 Mar 2017 - 11:05 pm | स्रुजा

झकास ! छान लिस्ट तयार होईल. मध्ये सावन ने पण त्यांचे "पॉडकास्ट - लाईक " सुरु केले होते पण आता ते पूर्ण अ‍ॅप पेड झालंय त्यामुळे मला त्यांचा भयंकर राग आलेला आहे.

अशीच चर्चा ऑडिओ बुक्स वर पण व्हायला हवी.

बार्नी's picture

11 Mar 2017 - 12:14 pm | बार्नी

मी पोकेट कास्ट (९९रु) चे अॅप वापरत असल्याने सावन बद्दल माहिती नाही. भारतात आता बरेच नवीन पॉडकास्ट यायला सुरुवात झालेली आहे , जसे

अवर लास्ट वीक : अनुवब पाल आणि कुणाल रॉय कपूर चा विनोदी पॉडकास्ट.

हिस्ट्री ऑफ इंडिया :

न्यूसलौंड्री हफ्ता : भारतातील गेल्या आठवड्यात झालेल्या बातम्यांवर ची चर्चा. अभिनंदन सेख्री, मधू त्रेहान , दिपंजना पाल , मनीषा पांडे , आनंद रंगनाथन ह्यांचा शो. हा पॉडकास्ट आधी फ्री होता पण आता पेड झाला आहे .

दी रियल फूड पॉडकास्ट:

मेड इन इंडिया: भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताबद्दल चा भारी पॉडकास्ट

डॅन कार्लिनबद्दलच लिहायला आलो होतो. त्यातही 'रॅथ ऑफ द खान्स' ही सिरीज सर्वात उच्च आहे.

राघवेंद्र's picture

13 Mar 2017 - 3:46 am | राघवेंद्र

मला Planet Money प्रचंड आवडते. प्रत्येक भाग १५-२० मिनिटाचा असतो आणि सध्या चालु असलेल्या अमेरिकेतील आणि जगातील महत्वाच्या गोष्टीवर भाष्य असते.

TED Radio Hour हा एका ठरविक विषयाला वाहलेल्या ६-७TEDTalks चा संग्रह असतो.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 4:40 am | पिलीयन रायडर

मला कल्पनाच नव्हती हे इतकं काही तरी भारी प्रकरण असेल. नक्कीच एकेन.

सुमीत's picture

15 Mar 2017 - 10:05 pm | सुमीत

खूप उपयुक्त माहिती मिळाली,

अमेरिकास्थित मराठी माणसांनी चालू केलेले उपक्रम पॉडकास्टवर -

१. मराठी वैभव (http://www.marathivaibhav.com/) : जुन्या-नव्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम. दर शनिवारी न्यू यॉर्क वेळ सकाळी १० ते ११ (भा.प्र.वे. संध्या. ७:३० वाजता) Radio Zindagi/ Radio Dilवर थेट ऐकता येणारा कार्यक्रम. पॉडकास्ट पत्ता : www.imusti.com.

२. मंदार कुलकर्णी यांच्या 'विश्वसंवाद' या उपक्रमांतर्गत मुलाखतींचे कार्यक्रम http://www.vishwasamwaad.com/ आणि http://www.stitcher.com/podcast/vishwasamwaad/ या पॉडकास्ट्सवर ऐकता येतील.
इथलं लेटेस्ट पॉडकास्ट : भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचा जनक, माझा मित्र जयवंत उत्पात यांच्या मुलाखतीचे दोन भाग जरूर ऐका.

मी मोबाइलवर स्टिचर डाउनलोड करून त्यावर फ्रीकॉनॉमिक्स आणि इतर कार्यक्रम ऐकले. खूप छान. पण मोबाइलची बॅटरी झरझर उतरायला लागली, म्हणून नाइलाजाने स्टिचर अनइन्स्टॉल केलं.

धन्यवाद, सुधांशु नूलकर!

माझ्या "विश्वसंवाद" या पॉडकास्टचे एपिसोडस आता "मिसळपाव" वरही उपलब्ध आहेत. जरूर एका आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

- मन्दार कुलकर्णी

सही रे सई's picture

17 Mar 2017 - 12:54 am | सही रे सई

मस्तच संकलन.. या धाग्यावर लक्ष ठेवून राहायला पाहिजे आता.

बबलु's picture

18 Mar 2017 - 8:58 am | बबलु

माझे आवडते:

  • Death, Sex & Money.
  • Tell me something I don't know.
  • Science Friday.
  • Hidden Brain.
  • 60-second Science.
  • Snap Judgement.
  • The people's pharmacy.
  • RadioLab.
  • No such thing as Fish.
  • Myths & Legends.
  • Atomic Trivia War.