अमेरिकेतील वंशिक हल्यांबद्दल भारत सरकारचं धोरण काय असाव?

अनुप ढेरे's picture
अनुप ढेरे in काथ्याकूट
7 Mar 2017 - 2:21 pm
गाभा: 

गेल्या काही दिवसांत अमेरिकेत भारतीयांवर काही हल्ले झालेत जे वंशभेदी म्हणता येतील. या हल्ल्यांबद्दल भारत सरकारचं काय धोरण असाव?

१. सरकारने फक्तं तात्पुरते गेलेल्या लोकांची (ह१ब, ल१ , विद्यार्थी,पर्यटक ,व्यवसायासाठी गेलेले ब१/ब२ वाले यांचीच काळजी करावी.
२. वरील सर्व अधिक ग्रीन कार्ड होल्डर यांचीच काळजी करावी.
३. वरील सर्व अधिक जे भारताचं नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिक झालेत त्यांची देखील काळजी करावी.
४. सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) यांची देखील काळजी करावी.

---

आता काळजी करणे बोले तो अशा हल्ल्यांचा निषेध करणे, तिथल्या लोकांची सुरक्षेसाठी दबाव आणणे वगैरे वगैरे एवढच असेल. त्याउपर भारतीय सरकार काही करू शकेल वाटत नाही.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

7 Mar 2017 - 2:54 pm | मराठी_माणूस

जे काही धोरण ठरवले जाईल त्याला गंभीरपणे घेतले जाण्याची शक्यता कीती ?

२. वरील सर्व अधिक ग्रीन कार्ड होल्डर यांचीच काळजी करावी.

ह्याला माझे मत असेल.
जे पुर्वाश्वमीचे भारतिय आता अमेरिकन नागरिक आहेत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकन संविधान घेते आहे, भारताने अमेरिकेच्या अंतर्गत व्यवहारात नाक खुपसू नये.

नगरीनिरंजन's picture

7 Mar 2017 - 5:10 pm | नगरीनिरंजन

सुरक्षेसाठी दबाव आणणे हे एनाराय व ग्रीनकार्ड होल्डर भारतीयांसाठी करावे.
हल्ल्यांचा निषेध सर्वांसाठी करावा. (अभारतीय काळे व ज्यू लोकांसाठीही केला तरी चालेल).

भारताने फक्त निषेध करावा.
बाकी कुणासाठी काहिही करु नये.

पिलीयन रायडर's picture

7 Mar 2017 - 8:00 pm | पिलीयन रायडर

एक निषेध सोडला तर भारत नक्की काय करु शकतो? इथे मुळात गन कंट्रोल अ‍ॅक्टचीच बोंब आहे. हे शुट ऑट्स सततच होत असतात. आता भारतीयांना टारगेट करण्याचे प्रमाण वाढते आहे. पण मुळात कायदाच बदलण्याची शक्यता नाही तर हे शुट ऑट थांबणार तरी कसे?

भारत सरकार व्हिजा प्रकरणात कदाचित बातचीत करु शकेल, किंवा राजकीय संबंध पहाता भारतीयांना इतर काही देशांच्या मानाने कमी अथवा अधिक त्रास होईल. त्यावर भारत सरकार कदाचित काही करु शकेल. पण अमेरिकन लोक जो गोळीबार करत आहेत त्यावर अमेरिका सरकार तरी नक्की काय करु शकते?

आनंदयात्री's picture

7 Mar 2017 - 8:58 pm | आनंदयात्री

पर्याय चार हा "भारतीय वंशाच्या लोकांची" या व्यापक अर्थाने उपलब्ध असलेला पर्याय आहे असे गृहीत धरून तसे धोरण असावे असे वैयक्तिक मत आहे.
"भारतीय वंशाच्या लोकांची" बोले तो NRI आणि भारतीय नागरिकत्व नसलेले लोक ज्यांना भारत सरकार "पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (PIO)" असे घटनादत्त स्टेटस देते त्यांची. ज्या अर्थी भारत सरकार भारतीय वंशाच्या लोकांना असे रिकग्निशन देते (आणि तेही त्यांच्या पुढच्या ४ पिढ्यांना) त्या अर्थी हि काळजी सरकारच्या जबाबदार्यांचाच एक भाग असावी असे वाटते (चूभूद्याघ्या).

जाता जाता "सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) " या वाक्यातून सरसकटीकरण डोकावतेय असे मत नोंदवतो.

अनुप ढेरे's picture

7 Mar 2017 - 9:10 pm | अनुप ढेरे

जाता जाता "सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) " या वाक्यातून सरसकटीकरण डोकावतेय असे मत नोंदवतो.

सरसकटीकरण /ऑफेंड करायची इच्छा नाही. केवळ ज्यांचे पालक इथून मायग्रेट झाले आणि ते तिथेच जन्मले असे 'भारतीय' एवढच म्हणायचं होतं.

आनंदयात्री's picture

7 Mar 2017 - 9:17 pm | आनंदयात्री

ओके, नन टेकन. म्हणूनच पर्याय चार हा सर्वसमावेशक आहे असे ग्राह्य धरून त्याला मत दिलेय.

धर्मराजमुटके's picture

7 Mar 2017 - 9:00 pm | धर्मराजमुटके

१. भारत इथुन अमेरीकेत जाऊ इच्छिणार्‍यांना रोखु शकत नाही.
२. तन भारतात पण मन अमेरीकेत असणार्‍यांचे मन भारत वळवू शकत नाही.
३. अमेरीकेत गेलेल्यांना भारत परत आणु शकत नाही.
४. भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसतो पण अमेरीकेच्या न्यायव्यवस्थेवर असतो अशांचे मतपरीवर्तन भारत करु शकत नाही.

जर अमेरीकेत राहणार्‍या भारतीयांना अती तातडीची परत यायची गरज निर्माण झाली त्यांना इकडे आणण्यासाठी एअर इंडियाचे चे स्पेशल विमान पाठवावे.

त्यामुळे भारताने निषेध करुन गप्प बसावे. जास्तच झाले तर कडक निषेध करावा. त्याहीपेक्षा जास्त झाले तर तीव्र निषेध करावा. यापेक्षा जास्त काही करता येऊ शकेल असे वाटत नाही.

एव्हरीथिंग इज पॉसीबल बट समथिंग्स आर नॉट पॉसीबल !

तुमच्या चारी पर्यायाशी मी सहमत आहे. अमेरिकेत राहणार्या सर्व भारतीयाना मला एक सान्गावेसे वाटते ते असे की त्या सर्वानी तेथील जनतेशी सम्बन्ध ठेवावेत त्यापासून अलग राहू नये.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Mar 2017 - 10:47 am | अनिरुद्ध.वैद्य

अजुन काय करु शकतो?

मृत्युन्जय's picture

8 Mar 2017 - 11:01 am | मृत्युन्जय

जर एखाद्या व्यक्तीवर तो भारतीय किंवा भारतीय वंशाचा आहे म्हणुन हल्ले होत असतील तर अश्या सर्वांची काळजे घेणे एक देश म्हणुन आपले कर्तव्य आहे.

'ते गेले ना तिकडे? त्यांना होता का भारताबद्दल कळवळा'? किंवा 'ते स्वतःला अमेरिकन म्हणवतात. भारतीय नाही. मग त्यांची काळजी आपण कशाला करावी?' किंवा 'ते एका स्वतंत्र लोकशाही देशाचे नागरिक आहेत. भारताचे नाहित. भारताने उगा जिकडे तिकडे नाक खुपसु नये'? किंवा 'गोर्‍यांच्या राज्यातली सगळी सुखे उपभोगली ना? स्वतःच्या मर्जीनेचे गेले ना तिकडे की कोणी जबरदस्ती केली जायची? मजा मारताना भारत अप्रगत म्हणायचे आणि वेळ आली की आपल्याकडे तोंड वेंगाडायचे, कशाला ब्वॉ?' वगैरे प्रश्न विचारण्याची ही वेळ अथवा संधी नाही.

माझ्यामते तरी हा एका देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. गोर्‍यांसाठी हे सगळे म्हणजे तात्पुरते, प्रवासी, इम्मिग्रंट्स, नागरिक होण्यास इच्छुक, नागरिक झालेले, फर्स्ट जेन, सेकंड जेन वगैरे वगैरे भारतीय आहेत. त्यामुळे हा एका देशाचा प्रश्न आहे आणी त्याला एक देश म्हणुनच सामोरे गेले पाहिजे. सध्याच्या ४-२ घटना काही अमेरिकी शासन पुरस्कृत नाहित. त्यामुळे स्थानिक सरकारकडे तक्रार करणे हा काही मार्ग होणार नाही. पण "आमचे लक्ष आहे" हे प्रत्यक्ष, अप्रतक्षरीत्या दाखवणे आणि प्रत्यक्ष लक्ष घालणे ही दोन कामे सरकार न्क्कीच करु शकते आणि ती आपण करावीत. उपरोल्लेखित सगळ्यांसाठीच.

अमेरिकेत गेलेले का गेले? त्यांचे वागणे योग्य की अयोग्य? ते स्वार्थी की देशप्रेमी? ते आपल्याकडे मदतीची याचना करताहेत का? वगैरे सगळे प्रश्न गौण आहेत असे मला वाटते.

जर एखाद्या व्यक्तीवर तो भारतीय किंवा भारतीय वंशाचा आहे म्हणुन हल्ले होत असतील तर अश्या सर्वांची काळजे घेणे एक देश म्हणुन आपले कर्तव्य आहे.

पण वांशीक हल्ले भरतिय वंशाचे आहेत म्हणून थोडेच होतात. गोरा, सोनेरी केसांचा कॉकेशियन वंशाचा नसलेल्या लोकांवर होताहेत हे हल्ले. आणि परवाचा कॅन्सासमधला हल्ला तर हल्लेखोराला व्हिक्टिम्स मध्य पुर्वेतले(पर्यायाने मुस्लिम) वाटल्याने केला.
माझ्या मते,

'ते एका स्वतंत्र लोकशाही देशाचे नागरिक आहेत. भारताचे नाहित. भारताने उगा जिकडे तिकडे नाक खुपसु नये'

हे सुयोग्यच आहे. जे भारतिय वंशाचे लोक अमेरिकेचे नागरिक झालेले आहेत त्या लोकांना संरक्षण पुरवण्यास अमेरिका व अमेरिकन संविधान बाध्य आहे. त्यांना भारताची गरज नाही व भारतानेदेखील त्यांच्यासाठी आपले राजनयिक चलन खर्च करू नये.

गामा पैलवान's picture

8 Mar 2017 - 6:32 pm | गामा पैलवान

अनुप ढेरे,

शासकीय धोरण काय असावं त्याबद्दल अनेकांनी मतं मांडली आहेत. आपण काय करू शकतो ते मांडण्याचा प्रयत्न करतो.

आज अमेरिकेत हिंदूंना नरभक्षक ठरवण्याचे कार्यक्रम सीएनेन नावाच्या वाहिनीवरून प्रसारित केला जात आहे. त्याविरुद्ध अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अर्जाचा दुवा येणेप्रमाणे : https://goo.gl/M22sMq

आपण या अर्जास अनुमोदन देऊ शकतो. किमान एव्हढं तरी करूया. या अर्जावर प्रतिसादांचा विभाग येथे आहे : https://www.change.org/p/stop-reza-aslan-s-hateful-show-against-hinduism...

माझा प्रतिसाद क्रमांक 599628806 आहे. (मात्र यावरून प्रतिसाद शोधता येईल का ते माहित नाही.)

आ.न.,
-गा.पै.

सहमत. मी या अर्जावर प्रतिसाद दिला आहे. आपण एव्हधे तरी करावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2017 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे

मीही प्रतिसाद दिला.

CNN च्या इतिहासात अर्थकारने झुकण्याची व विशेषत: अँटी-डेव्हलपिंग वर्ल्ड उदाहरणे आहेत.

विकास's picture

8 Mar 2017 - 11:06 pm | विकास

सर्वप्रथम - कन्सासचा हल्ला तसेच सिअ‍ॅटल मधील शिख तरूणावरील हा भारतीयांवर म्हणून झालेला नव्हता. याचा अर्थ तो इतर कुणावर झाला म्हणून गांभिर्य कमी होते असा नाही, पण भारतियांविरुद्ध म्हणून अमेरीकेत हिंसक हवा नाही असे वाटते.

जगभरच्या ज्यूं ना इस्त्रायल स्वतःचे मानते आणि परीणामी जगभरचे ज्यू पण इस्त्रायलला, स्वतः कुठेही राहत असले तरी स्वदेश समजतात, तसेच काहीसे भारत आणि अनिभांबद्दल होणे हे दोहोंसाठी चांगले आहे.

या वेळेस भारत सरकारने मला वाटते प्रत्यक्ष लक्ष घातले तसेच अप्रत्यक्षरीत्यापण आवाज उठवला असावा. म्हणूनच कन्सासच्या गव्हर्नरने मोदींना पत्र लिहून "We find wisdom and peace in the Sanskrit mantra 'Satyameva Jayate'," म्हणले असावे. ट्रंपनी देखील त्यांच्या सभागृहासमोर केलेल्या पहील्याच भाषणात, पहील्याच वाक्यात या दुर्घटनेचा उल्लेख करून निषेध नोंदवला.

भारत सरकारचे प्रतिनिधी हे इआन ला, ज्याच्यामुळे आलोक वाचला, जाऊन हॉस्पिटल मधे का तो घरी आल्यावर भेटले आणि त्याला भारतात येण्याचे निमंत्रण केले.

वरकरणी ह्या गोष्टी साध्या वाटू शकतात. पण त्याला आंतर्राष्ट्रीय राजकारणात महत्व नक्कीच आहे असे वाटते. अर्थात हे जर वृद्धींगत व्हावेसे वाटत असेल तर अनिभांनी पण भारताच्या बाजूने सक्रीय राहीले पाहीजे, कारण टाळी एका हाताने वाजत नसते, असे एक अनिभा म्हणून म्हणावेसे वाटते.

अनन्त अवधुत's picture

10 Mar 2017 - 12:20 am | अनन्त अवधुत

सिअ‍ॅटल मधील शिख तरूणावरील हल्ला हा भारतीयांवर म्हणून झालेला नव्हता .

ह्याचा कुठे संदर्भ मिळेल का? कारण सिअ‍ॅटल मधला हल्लेखोर अजून सापडला नाही

भारतियांविरुद्ध म्हणून अमेरीकेत हिंसक हवा नाही असे वाटते.

सध्यातरी हे खरे असावे. पण भारतीय (विशेषतः शीख समुदाय) "मिस्टेकन आयडेन्टिटी" मुळे हल्ल्याला बळी पडतात. कॅन्सास घटना पण "मिस्टेकन आयडेन्टिटी"चा परिणाम होती हे आपण पाहिले आहे. हल्ला कोणत्या का कारणामुळे होईना पण त्याचा परिणाम एक समुदाय (भारतीय) म्हणून सर्वांवर होतो. शिवाय आज भारतीयांविरुद्ध हवा नाही म्हणून उद्या तसेच असेल असे सांगता येत नाही.
बाकी प्रतिसादाला बाडीस.

अनिभांनी पण भारताच्या बाजूने सक्रीय राहीले पाहीजे

हे एकदम मान्य.

विकास's picture

10 Mar 2017 - 11:14 pm | विकास

ह्याचा कुठे संदर्भ मिळेल का? कारण सिअ‍ॅटल मधला हल्लेखोर अजून सापडला नाही

ह्याच्या बाजूने अथवा विरुद्ध असा कुठलाच संदर्भ नाही. पण ९/११ पासून ते आजतागायत जवळपास ३० च्या वर शिखसमुदायावर झालेल्या हल्ल्यांमधे, माझ्या माहितीप्रमाणे ते शिख म्हणून झालेले नाहीत. तुम्ही म्हणता तसेच mistaken identity म्हणून झालेले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील असाच असण्याची शक्यता अधिक आहे.

हल्ला कोणत्या का कारणामुळे होईना पण त्याचा परिणाम एक समुदाय (भारतीय) म्हणून सर्वांवर होतो. शिवाय आज भारतीयांविरुद्ध हवा नाही म्हणून उद्या तसेच असेल असे सांगता येत नाही.

ती काळजी नक्कीच आहे. त्यासाठी मेणबत्यांव्यतिरीक्त पण अनिभांनी जवळ येयला हवे. ते जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी अंमळ अवघडच आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते! :(