डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;)
२. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे.
३. नाही हो.. संपलं सगळं सांगून.
राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली.
नागपूर कडची पाककृती असल्याने मस्त झणझणीत करा
तुम्हीही पहा:
साहित्य: आवरणासाठी : १ कप बेसन, १ कप मैदा, मीठ, १ छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, २ चमचे तेल आणि पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतला आणि १ तास झाकून ठेवला. हा असा.
सारण: २ १/२ (अडीच कप ) धुवून , कोरडी करून मग बारीक चिरलेली कोथिंबीर, १ कप सुके खोबरे किसून, १ मोठा चमचा खसखस, १ मोठा चमचा तीळ, ८-१० हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आलं, मीठ, साखर, १/२ छोटा चमचा तिखट, धने-जिरे पूड १ छोटा चमचा, १ लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
हे असं दिसत होतं.
पोळीवर लावण्यासाठी : २ टी -स्पून तेल आणि २ चमचे गोडा मसाला एकत्र करून.
तळण्यासाठी तेल.
कृती: नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात तीळ आणि खसखस घातली. मिरच्या, आलं-लसूण पेस्ट करून त्यात परतून घेतली. नंतर त्यात किसलेलं खोबरं घातलं. छान परतल्यावर त्यात थोडं तिखट, मीठ, साखर, धने-जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून एकत्र केलं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर घातली.
मग मळलेल्या पिठाचा लिम्बाएवढा गोळा घेऊन तांदळाच्या पिठीवर लंबगोल लाटला. त्यावर तेल आणि गोड्या मसाल्याचे मिश्रण लावले आणि सारण बाजूच्या थोड्या कडा सोडून पसरले. चारी बाजूंनी एखादा पुडा बांधतो त्याप्रमाणे एकावर एक घेऊन चिकटवली. (मी थोडा पाण्याचा हात घेतला होता. सगळ्या वड्या करून झाल्यावर तेल तापवून घेऊन मंदाग्नीवर तळल्या. आणि टोमेटो सॉस बरोबर मटकावल्या.
प्रतिक्रिया
4 Mar 2017 - 3:27 pm | सस्नेह
खूप खमंग लागतात या वड्या !
बादवे,
एवढा तपशील वाचून अंमळ ड्वाले पाणावले !
4 Mar 2017 - 3:29 pm | पद्मावति
क्या बात मस्तच!
4 Mar 2017 - 4:16 pm | तुषार काळभोर
हे तर मासवडीसारखं प्रकरण दिसतंय!
4 Mar 2017 - 4:22 pm | मोदक
तळलेल्या वड्या... ह्म्म्म...
शॅलो फ्राय करुन जमेल का..?
4 Mar 2017 - 6:52 pm | मनिमौ
किती दिवसांनी. बादवे वडी खमंग दिसतेय. सेनापती बापट रस्त्याला भेट देणे आले
4 Mar 2017 - 7:42 pm | राधी
मासवड्या?
तसाच काहीचा प्रकार दिसतोय. आमच्याकडे घाटावर अगदी अशाच पद्धतीच्या वड्या बनवल्या जातात. त्यात फक्त बेसन पीठ वापरतात, मैदा वापरत नाही. बाकी सारणही थोड्या फार फरकाने असेच असते. माझ्या साबा अतिशय सुरेख बनवतात या मासवड्या. मला बै नै जमत त्यांच्यासारख्या.
5 Mar 2017 - 3:05 pm | त्रिवेणी
नाही मासवड्या वेगळ्या.
बेसन पिठ घेरुन वाफ काढून मग थापतात आणि सारण भरतात.
4 Mar 2017 - 9:55 pm | रेवती
आईग्गं! द्या बाबा या वड्या आता! फोटू चांगला आलाय. बेसिकच फोटू हवे असतात. भारीतले दिले तरी खाता येत नाहीतच ना!
4 Mar 2017 - 10:27 pm | पैसा
छान पाकृ!
4 Mar 2017 - 11:07 pm | इशा१२३
मस्तच ख मं ग!
5 Mar 2017 - 12:56 am | पिलीयन रायडर
अहाहा!!!!! आता हे पण सांग की तळण्याला पर्याय आहे का?
मला वाटतं मासवडीला तळत नाहीत. साधारण अशीच असते ती.
5 Mar 2017 - 10:38 am | एस
वॉटरमार्कसाठी कुठलं साहित्य वापरलंत? ;-)
5 Mar 2017 - 10:59 am | सविता००१
साठी साहित्य आम्ही नाही सांगणार ज्जा....
इथे फक्त पाकृचं साहित्य ;)
5 Mar 2017 - 11:24 am | सविता००१
मोदक आणि पिरा,
माझ्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार मावे मध्ये ५ मिनिट ग्रिल करून ही वडी करता येते. ती म्हणाली थोडसं तेलाचं ब्रशिंग करून ठेवायच्या मावेत.
पण माझ्याकडे मावे नाही. त्यामुळे आपापल्या जबाबदारीवर करणे. ;)
5 Mar 2017 - 11:24 am | यशोधरा
काहीतरी उपयोग आहे का इथे फोटो टाकून आणि साहित्य वगैरे देऊन.
खायला बोलावलंस तर खरं तरी मानता येईल.
.
.
.
पळाऽऽऽ!!
5 Mar 2017 - 6:17 pm | रॉजरमूर
एअर फ्रायर मध्ये तळता येतील की या वड्या.....
के डी भाऊ घ्या मनावर .
6 Mar 2017 - 1:03 pm | केडी
अगदी हाच विचार आला, मागच्या वर्षी नागपुरात जाऊन सांबर वडी खाल्लेली, तेव्हाच वाटलेलं, आता करतो एकदा प्रयत्न.

बाकी पाकृ मस्त आहे, सविता! एकदा दोन्ही पद्धतीने करून बघतो!
6 Mar 2017 - 3:53 pm | सविता००१
कर कर. लगेच कर. तू तर आणखीन छान करशील. शिवाय मस्त फोटो ..
बादवे- वरच्या फोटोतलं तेल केवढं काळं आहे... बापरे.. पण वडी मस्त दिसतेय. इतकी मोठी कढईभर नाही केली मी.
6 Mar 2017 - 4:09 pm | केडी
हो, नागपुरात भर बाजारात एका टपरी वजा जागेत तळताना दिसला, आणि मोह आवरला नाही, पण चवीला खमंग होती! :)
आता मी करतो प्रयत्न ...तसं मटार करंजी एअर फ्रायर मध्ये केली होती, पण त्याला फार तळल्या पेक्षा बेक्ड चव आलेली. बहुदा तेल स्प्रेने मारण्यापेक्षा ब्रश ने लावून बघतो यंदा (थोडं जास्ती तेल लावलं तर होतील तळल्या सारख्या)
16 Mar 2017 - 5:49 pm | खादाड
If I am not wrong ha badhkar square rambhau kadla photo aahe
16 Mar 2017 - 5:53 pm | खादाड
??
16 Mar 2017 - 5:54 pm | खादाड
??
17 Mar 2017 - 10:58 am | केडी
तुम्ही म्हणताय त्याच एरियात होतो, नक्की रामभाऊ का कोणी दुसरा ते मात्र आठवत नाहीये
5 Mar 2017 - 7:03 pm | नूतन सावंत
मस्त मस्त.
5 Mar 2017 - 7:32 pm | अभ्या..
घरगुती मेनू, घरगुती फोटो, चव ही मस्त घरचीच.
वा वा वा वा वा.
आता घरगुती कौतुक
.
येऊद्या आणि
5 Mar 2017 - 8:22 pm | स्रुजा
सहीच !
5 Mar 2017 - 9:03 pm | आदूबाळ
इतक्या थोर पदार्थाला त्या निर्बुद्ध मालिकेच्या नावे खपवू नका हो...
6 Mar 2017 - 7:08 am | सविता००१
खपवायचय काय? पण मला हा पदार्थच मुळी या मालिकेमुळे कळाला. बाकी निर्बुद्ध मालिका हे मान्यच.
5 Mar 2017 - 9:06 pm | जुइ
बघतेच करुन!
5 Mar 2017 - 9:13 pm | पिंगू
आता पुणे वारी करायलाच हवी..
6 Mar 2017 - 8:26 am | सविता००१
आमंत्रण लागतंय की काय?- या कधीही.
@मनिमौ: तू येणार असं कळ्ल्यापासून सेनापती बापट रोड ला लायटिंग करून ठेवलीये. ये;)
6 Mar 2017 - 12:48 pm | पुंबा
फोटो दिअसले नाहीत हे किती बरंय. नुसत्या वर्णनानेच इतकी वाट लागलीये. तोंपासु पाकृ.
6 Mar 2017 - 2:57 pm | मितान
तोंडाला पाणी सुटलं !!!!!
फेसबुकवर वाचली पाहिली तेव्हापासून करायची आहे. आता स्वतःच स्वतःला आग्रह करायलाच हवाच आहेच :))
6 Mar 2017 - 4:21 pm | कपिलमुनी
कोल्हापूरमधे पुडाची वडी मिळते.
गृहिणी आणि वहिनी नावाची घरगुती फराळाची दोन दुकाने आहेत , तिथे अतिशय उत्तम पुडाचा वड्या मिळतात
8 Mar 2017 - 11:04 am | पियुशा
ओह माय माय !!!
9 Mar 2017 - 3:59 am | सानिकास्वप्निल
तोंपासु!! मस्तचं दिसातायेत पुडाच्या वड्या सव्या :)
यम्मी! यम्मी!
9 Mar 2017 - 9:52 am | निवेदिता-ताई
मस्तच, मला फार आवडतात
14 Mar 2017 - 8:19 am | सही रे सई
व्वा मस्तच आहे.. काका हलवाई कडे मिळते ही , त्याची टेस्ट खतरनाक भारी असते.. मी एक दोनदा सिंहगड रोड वरच्या काका कडून आणली होती ही .. पुणेकरांनी try केली नसेल तर नक्की आणून बघा.
20 Mar 2017 - 12:43 pm | सूड
आता आणून बघायलाच हवी.
19 Mar 2017 - 3:20 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसत आहेत ग पुडाच्या वड्या.
मितान म्हणते तसं स्वत:च स्वतःला आग्रह करायला हवा आहे. कधी मुहूर्त लागतो बघू या.
ए फ्रा मध्ये चांगल्या होतील. गिल्टफ्री खाता येतील.
स्वाती
20 Mar 2017 - 12:49 pm | जागु
रेसिपी मस्तच. मिरच्यांऐवजी मसाला चालेल का? कारण मिरच्या मुलांच्या तोंडात येणार.
धुवून , कोरडी करून मग , मला वाटल एखाद धान्य घ्यायचय की काय. खुपच निराशा झाली हो .. :))