मी काय केले असते ?(फक्त प्रोढाकरीता)

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
5 Oct 2008 - 9:08 pm
गाभा: 

http://www.misalpav.com/node/3884
http://www.misalpav.com/node/3525

सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली आहे की माझी लेखनाची शैली क्लिष्ट आणि काही जणांना अगम्य वाटली आहे.मनोरंजक नक्कीच वाटली असावी.माझीसुद्धा करमणूक झाली. असो. आता मूळ मुद्द्याकडे वळू या.शक्य तितकं सोपं करून सांगतो आहे.
यशस्वी लैंगीक जीवन म्हणजे सहजीवनाचा पाया आहे.
यशस्वी पालकत्व त्यावर अवलंबून आहे.
जर पती-पत्नी यांना बांधणारा मूळ धागा कमकुवत असेल तर फॅमीली लाईफ वर त्याचा फार दुरगामी परीणाम होतो.पण या मुद्द्याकडे फारसं गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं जात नाही कारण पुरुष :ज्याच्यावर पुढाकार घेण्याची जबाबदारी निसर्गाने दिली आहे तो स्वताच बर्‍याच वेळा उदासीन असतो आणि आपल्या पत्नीस लैंगीक जीवनात पूर्णपणे फुलण्याची संधी मिळवून देत नाही.
अशा वेळी पत्नीने जर पुढाकार घेतला तर त्याला मानसीक धक्का बसतो आणि मुळात कमकुवत असलेले संबंध आणखी दुर्बल होण्याची शक्यता असते.
पूर्णपणे विकसीत कामजीवन हा सुखी पालकत्वाचा मूळ मुद्दा हे ठासून सांगण्यात माझा लेख कमी पडला आहे असे कदाचीत वाटण्याची शक्यता आहे , म्हणूनच लेखातली पहीली ओळ वाचा. मधला चार ओळी दूर करा.
रामदास यांच्या पहिल्या कवितेत मला समान सहगमाचे व सुखी काम जीवनाचे चित्रण दिसले आणि दुसर्‍याकवितेत (समस्यापूर्तीत) त्यांनी जाचणारी जर ,निर्‍या, पायताण अशा प्रतिमा वापरून लैंगीक सुखाची मागणी आणि त्याची पूर्तता याचं चित्रण केलं आहे असं वाटलं म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.
बाकी या विषयात प्रत्येक जण आपापल्या परीनी समृद्ध असण्याचा दावा करू शकतो पण पुरुषांच्या अपुरेपणाचे चित्र मला दाखवायचे होते म्हणून उपयोग केला नाही तर शेपटीसारखे लिंग पण गळून पडेल अशी थोडीशी चमत्कारीक कल्पना माझ्या डोक्यात आली ती पण या लेखात लिहीली आहे .
आता थोडं सोपं करून लिहीलं आहे .या प्रकाशात आधीचा लेख परत वाचावा.
---------------------------------------------------------------- १९७५ साली एका सर्वेक्षणा मध्ये ५०० पुरुष व तेवढ्याच स्त्रिया निवडून त्यांना आधीच्या लेखात मी तुमच्यासमोर जो प्रश्न ठेवला तसाच प्रश्न ठेवण्यात आला होता.
इन्कम गृप नोकरीदार,मध्यमवर्गीय : साधारण एकाच रेंज मधील.
वय २५ ते ३५ .
मल्टीपल चॉइस प्रश्नहोता. आताच्या सि.इ.टी प्रमाणे.
१) ७०% पुरुषानी बायकोच्या चरित्र्याबद्दल आयुष्यभर संशय राहिला असता असे म्हटले .

२) २५% पुरुषांनी घटस्फोटाचा मार्ग निवडला.

३) ९२% स्त्रियांनी आपण असे करणार नाहीचा चॉइस निवडला. कारण चारीत्र्याबद्दल संशय निर्माण होण्याची भिती.

२००८ सालात सुद्धा सुमारे ५% मुले न होणार्‍या दांपत्यात आग रामेश्वरी, तर बंब सोमेश्वरी चा त्रास असतो.अशात
पुरुषाला जर स्त्रीने मार्ग दाखवला तर परत " बराच अनुभव दिसतो तुला" ची भीती .

सो कॉल्ड नविन शतकातमध्ये सुद्धा परत तेच जवळजवळ लागू. असे माझ्या डॉक्टर मित्राचे (जो या विषयाचा तज्ञ आहे.)म्हणणं आहे.
आता मी काय केले असते ह्याचं उत्तर देतो.
"हे फक्त आजच्या दिवसापुरता का?का कायम ? हा प्रश्न विचारला असता. ( नाही तर एक मुलानंतर सिलींग न्याहाळण्याचाच प्रोग्राम असतो.)
जेवणामध्ये अफ्रोडेसीकची(कामोत्तेजना वाढण्यासाठी)मात्रा वाढवली असती.
सिगारेट सोडली असती.(चैतन्य नलीका वापरणार्‍यांनी सावध असावे.)
हातकड्या, व्हायब्रेटरची वगैरे ची गरज आहे का? ची विचारणा केली असती.
बेडरुम मध्ये रेफ्रिजरेटर बसविला असता .(आइस क्युब करिता. )
गावावरुन दोन चार मधाच्या बाटल्या आणल्या असत्या.
कोन आइस्क्रीम चा आवडता फ्लेवर विचारला असता.
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असे म्हणुन कामाला लागला असतो.
हे आज २००८ साली आणि तेव्हा सुद्धा.
शयनेशु रंभा सगळ्यांनाच हवी असते पण सांभाळणे सोपे नसते.पुरुष प्रधान संस्कृतीत बाई कशी हवी ते सांगण फार सोपं .
असाच श्लोक पुरुष मंडळीं करीता आहे काय ?
माझ्या कानावर कधी आला नाही.
-----------------------------------------------------------------
विस्कळीत (डीसफंक्शनल) कामजीवन हे कौंटुंबीक जीवनावर दूरगामी परीणाम करते.
त्यातून विसंवाद .हे विसंवाद मुलांसमोर वेगळे रुप धारण करून येतात आणि पुढचे परीणाम
ते भोगत असतात कारण.......
वाचा माझ्या अगोदरच्या लेखाचे पहीले वाक्य.
A Happy Child-> A Happy Adult-> A Happy Couple-> A Happy child is the essence of all my narrations to date.

(सध्या पल्स पोलीओचे चार थेंब स्टेशनवर देताना बघतो तेव्हा वारंवार असं वाटतं की कामावरून परत जाणार्‍या पुरुषांसाठी अशीच काही व्यवस्था करायला काय हरकत आहे बॉ? )
पण माझा डॉक्टर मित्र सांगतो ते खरंच आहे.
औषधात कामजीवन नाही .मेंदूत आहे.म्हणजे मेंदू ठिक तर सगळंच ठिक.
----------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर

औषधात कामजीवन नाही .मेंदूत आहे.म्हणजे मेंदू ठिक तर सगळंच ठिक.

सहमत.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 5:41 am | मदनबाण

७०% पुरुषानी बायकोच्या चरित्र्याबद्दल आयुष्यभर संशय राहिला असता असे म्हटले .
काका, माझा मित्र तर म्हणतो की त्याची होणारी बायको ही कौमार्य भंग न झालेली असेल याची तो अपेक्षाच ठेवत नाही !! मी त्याला विचारल की तु हे असं खात्रीने कसे सांगतोस ?? त्यावर तो म्हणाला की अत्ता पर्यत त्याने इतक्या मुलींची अफेअरस पाहिली आहेत की होण्यार्‍या बायको विषयी त्याने मनाची तयारीच करुन ठेवली आहे..
९२% स्त्रियांनी आपण असे करणार नाहीचा चॉइस निवडला. कारण चारीत्र्याबद्दल संशय निर्माण होण्याची भिती.

मी या विषया वर एक कार्यक्रम बघितल्याच आठवतय (डिस्कव्हरी किंवा एनजीसी वर)
त्या मधे एक छोटासा प्रयोग केलेला असतो..ज्या मधे काही स्त्रीयांना एका प्रयोगात प्रश्न विचारला(अनेक वेगवेगळ्या प्रश्नांपैकी एक) जातो की तुमचे किती पुरुषांबरोबर शरिर संबंध झालेला आहे ?त्या वर त्या अजिबात नाही असे उत्तर देतात्..पण दुसर्‍या प्रयोगात अशा स्त्रीयांना एका खोलीत बसवुन एक यंत्र हाताला लावले जाते व त्यांना सांगितले जाते की जर विचारलेल्या प्रश्नांचे खोटे उत्तर दिले तर त्यांच्या हाताला शॉक लागेल्..मग तेच प्रश्न त्यांना विचारले जातात आणि जेव्हा विचारले जाते की तुमचे किती पुरुषांबरोबर शरिर संबंध झालेला आहे ?तेव्हा १, ४ ,६,अशी उत्तरे मिळतात कारण आपण खोटे बोललो तर यंत्रा द्वारे आपल्याला शॉक लागेल या भितीमुळे त्या खरे उत्तर देतात !!! पण खरी गम्मत अशी आहे की अशी शॉक देण्याची कुठलीच सिस्टीम त्या यंत्रात नसतेच मुळी... म्हणजे आपल चारित्र्य वाईट नाही किंवा ते तसं असल तरी ते न सांगण्या कडे स्त्रीयांचा कल असतो.
आणि सध्य परिस्थीती पाहता बर्‍याच स्त्रीयांचे विवाहा पुर्वी किंवा विवाहा नंतर परपुरुषा बरोबर संबंध असतातच्...(हे सत्य आहे)अर्थात हा आकडा अजुन १००% वर पोहचला नाही हे नशीब.
औषधात कामजीवन नाही .मेंदूत आहे.म्हणजे मेंदू ठिक तर सगळंच ठिक.
१००% सहमत.....

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 9:04 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मनाची तयारी न करुन जातो कुठे? नाही तर मग हस्त- कर्मी हा उपाय आहे की. स्वस्त आणि मस्त.
सर्वेक्षणात ठीक आहे. पण रोजच्या आयुष्यात स्त्रीयाना कुठलेही वेडे वाकडे प्रष्न विचारले की आयुष्यभर दु:खाची गॅरंटी. ते फक्त कादंबरीत असते. एकमेकांची कन्फेशन्स.

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 9:11 am | मदनबाण

पण रोजच्या आयुष्यात स्त्रीयाना कुठलेही वेडे वाकडे प्रष्न विचारले की आयुष्यभर दु:खाची गॅरंटी.
सहमत्...विवाहबाह्य संबंध हे आता इतके सहजपणे होतात की त्यामुळे कन्फेशन्स तरी किती देणार !!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

टुकुल's picture

6 Oct 2008 - 11:03 am | टुकुल

>>>विवाहबाह्य संबंध हे आता इतके सहजपणे होतात की त्यामुळे कन्फेशन्स तरी किती देणार !!
मदनबाणा --विवाहबाह्य संबध हे सहजपणे होतात, हि गोष्ट मि तरी मानतो कि चुकीची आहे, आणि ति करताना/केल्यानंतर तिचा खेद व्हावा, नाहीतर त्या नात्याला काही अर्थच नाही उरत

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 5:25 pm | मदनबाण

गैरसमज कसला ?जे काय आज काल समोर दिसते,घडते,कळते तेच लिहल आहे..त्या साठी एक उदा. देतो.
आमच्या पेक्षा मोठ्या मुलांचा एक ग्रुप होता त्या ग्रुप मधील एका मल्याळी पोराचे एका बाई बरोबर संबंध होते,,सदर बाईचा नवरा परदेशात कामास असुन बर्‍याच दिवसांनी भारतात येत असे..तो मुलगा त्या बाईच्या मागे अक्षरशःवेडा झाला होता..हे प्रकरण एव्हढे पुढे गेले की तो तिला आपल्या स्वतःच्या घरी देखील बोलवु लागला..शेवटी व्हायचे तेच झाले त्याच्या आईला शेवटी ही सगळी भानगड समजली..मग ते कुटुंब कॉलनी सोडुन गेल..
सती सावीत्री चे दिवस केव्हाच गेले..आता दुसरं उदा. एक भय्या मुलगी कॉलनीत राहिला आली,,तिच्या घरी सुतारकामाचे काम चालु होते...बहिण बाहेर गेली व घरात कोणी नाही हे पाहुन तिने सरळ त्या सुतारालाच तिच्याशी संबंध ठेवण्यास विचारले,,,ते त्या अवस्थेत असतानाच बाहेर गेलेली तिची मोठी बहिण अचानक घरी आली..हे त्या मुलीचा लक्षात येताच तिने बचाव बचाव म्हणुन ओरडण्यास सुरुवात केली,,पोलिस केस झाली बलात्कार करण्याचा प्रयत्न केला म्हणुन तिने कांगावा केला..पण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आले. !!!
पोलिस प्रकरण झाले नसते तर आम्हा कोणालाच हा घडलेला प्रकार कधीच कळला नसता..
वरील दोन्ही उदा. एक स्त्री विवाहीत होती तर एक तरुण मुलगी होती..
तुम्ही माना किंवा न-माना विवाह पुर्व आणि विवाह पश्चात अनैतिक संबंध आजचा समाजात वाढलेलेच दिसुन येतात...तुम्ही आणि मी किती हे असं काही घडत नाही म्हंटल तरी वास्तवात बदल होत नाही !!!!
कोल्हापुरला लॉज वर धाडीत पकडलेल्या स्त्रीया या चांगल्या घरातील आणि विवाहीत होत्या !!!

सर्वच स्त्रीया या वाईट असतात किंवा अशाच असतात असे मुळीच नाही पण अनैतिक संबंधात आज वाढ झालेली आहे हे मात्र खरं.....

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मुक्तसुनीत's picture

6 Oct 2008 - 8:26 am | मुक्तसुनीत

तुमच्या म्हणण्याचा आशय तुमच्या गेल्या लेखात उमजल्यासारखा झाला होताच. हे तुम्ही इथे स्पष्टपणे, मुद्देसूदपणे लिहीलेत हे खूप बरे झाले. कदाचित तसे करताना तुमच्या स्वतःच्या शैलीशी तडजोड करावी लागली असेल ; पण मला वाटते एकंदर गोळाबेरीज करता हे तुम्ही योग्यच केलेत.

आता मुख्य विषयाबद्दल. एकंदरीत अत्यंत संवेदनक्षम असा हा विषय आहे हे मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. सुखमय काम जीवन याचा संबंध अनेकविध गोष्टींशी येत असावा : आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक अंगाबद्दलची सुरक्षितता हे काही मूलभूत असे घटक. या प्रश्नांची उत्तरे अर्थातच शयनगृहाबाहेरची आहेत. नवरा /बायको स्वतः नीट खाऊ-पिऊ शकत असेल , नि दुसर्‍याचे पोषण करू शकत असेल (किंवा त्यांचे एकत्रित उत्पन्न पुरेसे असेल ) आणि नोकरी-धंद्यात किमान स्थैर्य आणि समाधान असेल , रहात्या घराबद्द्लची स्थिती समाधानकारक असेल तर बेडरूममधे काही एक निवांतपणा मिळणार.

वरचा "रोटी कपडा और मकान" हा मूलभूत प्रश्न बाजूला ठेवला तरी पुढच्या बाबतीत अनेक कारणे संभवतात. श्री. प्रभूंनी अनेक उपाय सुचवले आहेत ( आईस क्युब्स, मध , वगैरे वगैरे). हेदेखील उचित असे असतीलच. परंतु एकंदरीने पहाता , एक मूल होऊन गेलेल्यांच्या कामजीवनाला सोडवण्याकरतासाठीच्या उपाययोजनेत हे सर्व उपाय सर्वाधिक महत्त्वाचे नसावेत असे मला वाटून गेले.

तारुण्याची पहिली लाट ओसरता ओसरता , लहान मुलाच्या आगमनानंतरच्या महिन्या/वर्षांदरम्यानचा काळ हा एकंदरीने धकाधकीचा असू शकतो. नोकरी धंद्यातली उमेदवारीची वर्षे सरत असतात. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्याबद्दलच्या लोकांच्या आणि तुमच्या स्वतःच्या अपेक्षाही उंचावलेल्या असतात. या अपेक्षांना पूर्ण करण्याचा ताण असतो. कदाचित या दरम्यानच आपण आपले पहिलेवहिले घर बांधायच्या भानगडीतही असू शकतो. नवरा बायको वर या गोष्टीचे टेन्शन असणे स्वाभाविक.

दुसरे आणि थोडे जास्त नाजूक कारण असू शकते मध्यमवयाच्या उंबरठ्यावर उभे असणार्‍या स्री/पुरुषाच्या आकर्षकतेबद्दलचा. बाळंतपणानंतरची पत्नी, विशेष आउटडोअर आयुष्य नसणारा नवरा , खाण्यापिण्याच्या सवयी, या सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो. घडत असलेल्या गोष्टींच्या परिणामांमधे आणि त्यावरील उपाययोजनांमधे खूप अंतर पडले तर एकंदर कामजीवनावर परिणाम होऊ शकतो.

मी आधीच म्हण्टल्याप्रमाणे , प्रश्न गुंतागुंतीचा आहे.

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 8:44 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
धन्यवाद. ह्या विषयात कुठ्ल्याही एक फ्रेम ओफ रेफ्रन्स ने चालताच येत नाही हे अगदी मान्य.
लेखातला १ ला भाग माझा.- संकलक रामदास
२ रा भाग माझा विचार- लेखक रामदास
३ रा भाग माझा- संकलक रामदास
हा लेख ह्या पद्द्तीने लिहिणे माझ्या आवाक्याबहेरचे आहे. अनेक विचार एकाच वेळी येतात आणि सर्वच महत्वाचे आहेत असे मला वाट्ल्याने जरा गोंधळ होतो. बोलक असताना ही पद्धत स्मॅश हीट होते पण लेखक मध्ये तीच फसते.
मुनिवर्यांचे जाहीर आभार.
आपला नम्र
वि.प्र.

संजय अभ्यंकर's picture

6 Oct 2008 - 10:35 am | संजय अभ्यंकर

डॉ. प्रभूंच्या लेखाशी सहमत!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2008 - 11:01 am | llपुण्याचे पेशवेll

प्रभूसाहेब सविस्तर लिखाणाबद्दल धन्यवाद.
याबाबत मी असे म्हणेन की स्त्रियांवर बंधने लादणारी पूर्वीची पिढी या बाबतीत मात्र जागरूक होती असे वाटते. कारण एकदम चावट असणारे आणि चावट विषयांवर द्वयर्थी विनोद(अगदी बायकांसमोर करणारे आमचे मामा आजोबा. आमची आजी मिळून एकूण सर्व १० भावंडे) आणि एकूणच मागच्या पिढीची कुटुंबाची सदस्यसंख्या.
२००१ साली माझ्या चुलत भावाचे लग्न झाल्यावर सत्यनारायणाच्या पुजेच्या वेळेला शरुमामांनी (आजोबांनी ) त्याला विचारले "य मग मन्या काय झाले काल तोंडओळख का चिरपरिचय?" माझ्या एका आतेभावाच्या वैवाहीक जीवनात थोडी कुरबूर चालू आहे अशी चर्चा होती. एका पूजेच्या वेळेत श्रावणात शरुमामानी त्याला गाठले आणि म्हटले 'नोकरीसाठी कायम बाहेर असतोस ठीक पण घरात असतोस तेव्हा तरी घरच्यासारखा वाग. आमच्या वेळेला बायकोला घराबाहेर पडायला बंदी होती पण आम्ही त्याची घरात काळजी घेत होतो. कारण घरी जेवायला नाही मिळाले तर खाणावळ शोधायला लागणारच..'
प्रभूसाहेबानी सांगितलेली गोष्ट विचार करून कृती(लग्न झालेल्यानी) सुध्दा करण्यासारखी आहे.
प्रभू साहेबानी स्पष्टीकरण केल्यामुळे त्यांचा लेख आमचासाठी सुगम झाला. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच.

पुण्याचे पेशवे

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 11:06 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
नाय राहिले ते आजोबा, माय आणि मावशी. आता सगळे घुसमट्लेले. मो़क्ळे बोलले संस्कार बाट्तात म्हणे. पोरे रात्री गपचुप डाक चीक बघतात ते पण माहित नस्ते.

नीधप's picture

6 Oct 2008 - 4:20 pm | नीधप

विषय कळला पण चर्चेतून नेमके काय अपेक्षित आहे ते कळले नाही.
आता पर्याय देते त्यातलं नक्की काय उद्दीष्ट आहे चर्चेचं ते तेवढं सांगा
१. आत्ता आणि पूर्वी. गेले ते दिन गेले इत्यादी
२. लग्न आणि एकूण लैंगिक व्यवहार यांच्याबद्दलचा अवेअरनेस
३. कामजीवन आणि स्टिरीओटाइप्स चा उहापोह
४. लैंगिक स्वातंत्र्य आणि चारित्र्य
५. लग्नाशिवाय संबंध, लग्नाबाहेरील संबंध इत्यादी

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 6:31 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
२ मात्र नक्की

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 6:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट नक्की कळली आहे की माझी लेखनाची शैली क्लिष्ट आणि काही जणांना अगम्य वाटली आहे.मनोरंजक नक्कीच वाटली असावी.
काका, सगळ्यात पहिले म्या "ढ" विद्यार्थ्याचाही विचार केल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
पण नेहेमीच असं सरळ, साधं आणि सोप्या भाषेत लिहिलंत तर तुमचा मुद्दा लगेचच समजेल आणि तुमच्या क्लिष्ट भाषेवर आणि पद्धतीवर चर्चा होण्याऐवजी मुख्य मुद्द्यालाच हात घालता येईल. :-)

अशा वेळी पत्नीने जर पुढाकार घेतला तर त्याला मानसीक धक्का बसतो
याला अपवादासाठी म्हणूनही अपवाद नसतो का? माझं मत वेगळं आहे.

औषधात कामजीवन नाही, मेंदूत आहे.म्हणजे मेंदू ठिक तर सगळंच ठिक.
अगदी!

बाकी आता "गाईड" असल्यामुळे समजलं का लेख समजला आणि पटला.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर

हम्म! मजेशीर चर्चा आहे! :)

आपल्याला तर या सगळ्याचा काहीच अनुभव नाय बा! :)

आपला,
(सरळमार्गी अविवाहीत सज्जन..) तात्या.

--

साला नाडी असो की वैवाहिक संबंध असो, संगणक असो की भुतंखेतं असोत, मिपावर सगळ्या चर्चा बाकी जोरदार चालतात याचा आपल्याला आनंद वाटतो..! :)

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 7:02 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
तात्या साहेब हे मला माहित नव्हते. असो. चर्चा आवड्ली ना. ह्या भान्गडीत पडणार नाही अशी ,
आपण भिष्म प्रतिज्ञा केली आहे का?

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

आपण भिष्म प्रतिज्ञा केली आहे का?

तसंच समजा हवं तर! साला कोण अडकणार त्या बेडीत? प्रेम नको, वाद नको, भांडणं नको, काही नको..!

माझी बायको, माझी मुलं, माझी नातवंडं..! साला नकोच कुठले ८४ च्या फेर्‍यात अडकवणारे मोहपाश..!

एकटा आहे तो बरा आहे. एकटा आलो होतो, एकटाच जाईन..!

साला घरात मरून पडलो तर दोन दिवसांनी बॉडीला घाण मारल्यामुळे मुलशीपाल्टीवाले येऊन झक मारत क्रियाकर्म करतीलच! :)

साला, मुलाच्याच हस्ते अग्नी हवा या अट्टाहासाची भानगडच नाही! आणि अभ्यंकरांच्या वंशात आम्ही जेवढे दिवे लावले तेवढे पुरेसे आहेत, वंशाच्या दिव्याची किंवा दिवट्याची साली भानगडच नको...! :)

बरं शिवाय अविवाहीत असल्याचा एक फायदा म्हणजे हवं तेव्हा कुणाच्याही प्रेमात पडण्याकरता, हळूच लाईन मारण्याकरता मोकळा..! एखाद्या तरुणीकडे पाहून, किंवा एखाद्या मादक स्त्रीकडे पाहून मनोमन घायाळ व्हायचं म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्वत:च्या धर्मपत्नीशी प्रतारणाच नव्हे काय? छे..! साला व्यभिचार वाईट..! :)

एकदा लग्न झालं की एकपत्नीव्रत मनोमन निभवायला लागतं! ते आपल्या खुशालचेंडू अन् भ्रमरि वृत्तीला झेपणार नाही! त्यापेक्षा नकोच ना ते बायकोशी प्रतारणा करण्याच़ पाप! :)

आपला,
(एकला जीव सदाशिव) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2008 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर

रडवलत तात्या तुम्ही आम्हाला.....

आधी का नाही भेटलात?

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2008 - 2:44 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्म्म्म

रडवलत तात्या तुम्ही आम्हाला.....

हे वाक्य वाचलं आणि वाटलं... काका एकदम एवढे टची झाले!!!! आउटलाईन झाले का? ;)

आधी का नाही भेटलात?

मग हे वाक्य वाचलं... खात्री झाली की काका अजून लायनीवरच आहेत.

धन्य हो काका.... मी पण सहमत, तुमच्याशी. :)

बिपिन.

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 6:58 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
There is always an exception to any rule.I hope everybody lead an exceptional life by getting rid of mess in top balcony. I also understand that there are many other reasons for the mess like stress of modern day fast life. In japan the current lot depends on "PERK UP' Drip for 10 mts. to fight depression for 60 hours aweek work load. marathi font bighadala aahe g DH muli.

अवलिया's picture

6 Oct 2008 - 7:07 pm | अवलिया

चांगली झाली आहे चर्चा.
आणि चक्क काम या विषयाशी संबंधित असुनही अजुन कोणी उडवली नाही याचा आनंद वाटला.
प्रभु साहेबांनी स्पष्ट लिहिले असते तर लेख उडवला गेला असता असे मात्र मला अजुनही वाटते.

असो. प्रभु साहेबांनी लिहिलेले सगळ्यांपर्यत पोहोचले आहेच. त्यामुळे मागे मी लेख ज्या कारणा करता लिहिला होता त्याचे सार्थक झाले असे वाटते. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा मला काही उपयोग नाही किंवा होण्याचा संभव नाही.

(संन्यासी) नाना

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 7:15 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
तुम्ही संन्यासी आहात हे कळ्ल्यावर आश्चर्य वाटले.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2008 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

कोन्ला "ईषय"
कळतो
कोन्ला "ईषय"
गळतो
कोन्ला "ईषय"
फळतो
आता आमी पळतो
प्रकाश घाटपांडे

सखाराम_गटणे™'s picture

6 Oct 2008 - 9:11 pm | सखाराम_गटणे™

>>जर पती-पत्नी यांना बांधणारा मूळ धागा कमकुवत असेल
प्रभु साहेबांनी अशी लेखाची सुरवात केली आहे. हे मुळात सगळ्यात जास्त महत्वाचे आहे.
जर एकमेकांवर विश्वास असेल तर काहीही करणे अशक्य नाही. सुरवातीचे काही दिवस तरी एकमेकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे ठरते. लग्नाच्या आधी भेटताना आपापल्या भावना स्पष्ट शब्दांत सांगणे कधीही सांगणे चांगले, करीयर, नातेवाईकांशी सबंध या बद्दल माहीती देणे, काही अपेक्षा असतील तर सांगणे कधीही चांगले.
मन जर नात्याबद्द्ल निर्मळ, निस्वार्थी असेल तर विश्वास निर्माण व्हायला वेळ लागत नाही.
तसेच एकमेकांबद्दल आदर असणे, दुसर्‍यांच्या अडचणी समजुन त्या प्रमाणे मदत करणे ह्या गोष्टी विश्वास निर्माण करायला मदत करतात.
>>आपल्या पत्नीस लैंगीक जीवनात पूर्णपणे फुलण्याची संधी मिळवून देत नाही.
कामजीवनात लाजण्यात काही अर्थ नसतो, कारण आपण जे करतो ते सगळेच करतो, फक्त आपल्या भावना योग्य प्रकारे मांडता आल्या पाहीजेत.
मला असे वाटत नाही की स्त्रीया लैंगीक जीवनात पुढाकार घेत नाहीत. स्त्रीया पण पुढाकार घेतात पण त्यांची पुढाकार घेण्याची पद्दत वेगळी असते, पुरुषांच्या मानाने हळुवारपणा असतो, भावनात्मकता असते.
स्त्रीया पुढाकार घेताना, पायावर पाय घासणे, पाठीमागुन येउन गळ्यात पडणे/सौम्य मिठी मारणे,छातीवर डोके ठेवणे. असे काही करतात.

>>माझा मित्र तर म्हणतो की त्याची होणारी बायको ही कौमार्य भंग न झालेली असेल याची तो अपेक्षाच ठेवत नाही
मला तर वाटत नाही की इतकी परीस्थीती वाईट आहे म्हणुन, हे महत्वाचे आहे की तुझा मित्र कोणत्या समाजातील मुलींबद्दल बोलतो आहे. माझ्या अनुभवातुन सांगतो, लग्नाआधी संबध येण्यार्‍या मुलांचे प्रमाण हे मुलीपेक्षा जास्त आहे. पण दुर्देव हे आहे की पुरुषाच्या असल्या संबधाला मर्दानगी संबोधण्यात येते आणि स्त्रीयांच्या सबंधाला व्याभिचार म्हटले जाते. संशय घेणे हे चुकीचे असते पण योग्य त्या पुराव्याशिवाय संशयालाच वस्तुस्थीती समजणे म्हणजे मुर्खपणा आहे.
बरीचशी एकतर्फी प्रेम करणारी मुले, मुली बद्दल वाईट गोष्टी पसरवत असतात.
सर्वसामान्य घरातील मुलींबद्दल इतकी वाईट परीस्थीती नाही. आणि अशा मुली शोधणे फारसे अवघड नसते. फक्त तुम्ही कसे मुलीला विचारता यावर अवलंबुन असते. दुसर्‍या तिसर्‍या भेटीत असली गोष्ट विचारायला हरकत नाही, पण तिचा तुमच्यावर विश्वास हवा, आधी सुरवात तुमच्यापासुन करा, आधी तुमचे कोठे प्रेम-प्रकरण/संबध असेल तर तीला सांगा, नाहीतर तीला वाटेल की हा आपल्याला आपल्या पेक्षा कमी समजतो आणि ती कधीच सांगणार नाही.
ऑर्कुट, गुगल मधुन जास्तीची माहीती मिळु शकेल. आधी पुर्ण चौकशी करा, मगच लग्नाचा विचार करा. आणि लग्न केल्यानंतर हा विचार कधीच करु नका.

-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 2:16 am | बिपिन कार्यकर्ते

श्री. गटणेभाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा. अजून काय लिहू?

तरी अजून थोडं...

मला तर वाटत नाही की इतकी परीस्थीती वाईट आहे म्हणुन, हे महत्वाचे आहे की तुझा मित्र कोणत्या समाजातील मुलींबद्दल बोलतो आहे. माझ्या अनुभवातुन सांगतो, लग्नाआधी संबध येण्यार्‍या मुलांचे प्रमाण हे मुलीपेक्षा जास्त आहे.

जर मुलांचे प्रमाण जास्त आहे तर तितकीच (थोडं कमी असेल एखाद वेळेस) मुलींची पण संख्या असायला पाहिजे ना? सगळीच मुलं काय.... समजून घे. आणि आपण नेहमी नेहमी एकच चूक करतो. हे प्रकार गावापेक्षा शहरात जास्त चालतात वगैरे मानतो. असं काही नाही रे... मान्य आहे की मी स्वतः शहरात वाढलोय पण गावाकडचे मित्र आहेतच की रे... कळतात गोष्टी इकडच्या तिकडच्या. शेवटी काय... माणूस इथून तिथून सारखाच. राहवलं नाही म्हणून एक विनोद सांगतो... (डिसक्लेमरः खालील मजकूर मुद्दाम लपवलेला आहे. ज्याला कोणाला पटकन वाईट वाटत असेल तर तो मजकूर वाचू नये. असभ्य वाटला तर संपादक मंडळ खुश्शाल उडवू शकतात.)

एक शहरातला मुलगा आजूबाजूच्या मुलींकडे बघून विचार करतो की लग्न करीन तर गावातल्या मुलीशीच... त्या प्रमाणे तो गावी जातो. लग्न वगैरे होते. तो बायकोला म्हणतो चल आपण हनिमूनला जाऊ.
ती : "हनिमून म्हणजे काय?"
तो : "जाऊ तेव्हा कळेल"

तसे ते दोघं जातात आणि ७-८ दिवसांनी परत येतात.

बायको म्हणते "आपण जाऊन आलो, सगळं झालं पण हनिमून म्हणजे काय?"
तो म्हणतो, "अगं आपण जे केलं तेच हनिमून"

त्यावर ती बायको उत्तरते "हात्तिच्या, हेच काय? हे तर आम्ही गावाला शेतात नेहमी करायचो. त्यासाठी एवढ्या दूर यायची खर्च करायची काय गरज?"

आता बोल?

बिपिन.

टारझन's picture

7 Oct 2008 - 2:39 am | टारझन

यावेळी गटणेचं जिवनविषयक कामसुत्र जरा संभ्रमात टाकणारं आहे ... यावेळी गटण्याने आख्खा प्रतिसाद फिल्मी लिहीला आहे असं वाटतं ..गटणे माफ करावं स्पष्ट बोललो ...

मन जर नात्याबद्द्ल निर्मळ, निस्वार्थी असेल तर विश्वास निर्माण व्हायला वेळ लागत नाही.
निर्मळ? निस्वार्थी ? अरे कोणी आपल्या जोडीदाराबद्दल स्वार्थ किंवा कपट ठेवतो का रे ? आणि असेल तर मग रिलेशनच खतम की रे ..
स्त्रीया पुढाकार घेताना, पायावर पाय घासणे, पाठीमागुन येउन गळ्यात पडणे/सौम्य मिठी मारणे,छातीवर डोके ठेवणे. असे काही करतात.
बापरे ... हे मी फक्त बॉडपटांत पाहीलेलं आहे.. स्वानुभव वेगळे आहेत. :) छातीवर डोकं ठेवणं ही कामुक क्रिया नाही ते ... माझा ३ वर्षाचा शेजारी मित्र सार्थक पण माझ्या कुशीत येउन झोपी जातो .. स्पर्श एक मानसिक समाधान देणारी क्रिया आहे असे वाटते .. आलिंगणाचेही प्रकार असावेत ...
तसेच एकमेकांबद्दल आदर असणे, दुसर्‍यांच्या अडचणी समजुन त्या प्रमाणे मदत करणे ह्या गोष्टी विश्वास निर्माण करायला मदत करतात.
लग्नाच्या पहिल्या रात्री या गोष्टी बोलत बसलास तर भविष्य आधारात असेल लेका ...

हे महत्वाचे आहे की तुझा मित्र कोणत्या समाजातील मुलींबद्दल बोलतो आहे.
सरसकट विधाने टाळ सख्या ... नाय तर गोची होइल आं ...

माझ्या अनुभवातुन सांगतो, लग्नाआधी संबध येण्यार्‍या मुलांचे प्रमाण हे मुलीपेक्षा जास्त आहे.
तुला मुलांचे आणि मुलींचे दोन्हींचे अनुभव आहेत ? बापरे :) (अत्तिशय हलके घे रे .. पण वाक्य जरा जपून लिही राजा )
पण दुर्देव हे आहे की पुरुषाच्या असल्या संबधाला मर्दानगी संबोधण्यात येते आणि स्त्रीयांच्या सबंधाला व्याभिचार म्हटले जाते
हे मात्र सही बोलला आहेस ... पण तुला रे काय माहीत मुली-मुलींमधे काय चर्चा होते ? एखाद्या पुरूषाचे जर बाहेर संबंध असतील तर समाज त्याला नावं ठेवतोच.. मित्रा-मित्रांमधे संबंधांला पुरुषार्थ दाखवणारं म्हणू शकतोस ..

आधी सुरवात तुमच्यापासुन करा, आधी तुमचे कोठे प्रेम-प्रकरण/संबध असेल तर तीला सांगा, नाहीतर तीला वाटेल की हा आपल्याला आपल्या पेक्षा कमी समजतो आणि ती कधीच सांगणार नाही.
बाप्पा __/!\__ असा सल्ला कोणाला देउन कोणाची लाईफ खलास होइल रे ... अज्ञानात सुख असतं रे .. झाला तो भुतकाळ .. तो उकरून का डोक्याला तरास ? आणि समजा त्याने सांगितलं .. हो होतं माझं एकीवर प्रेम दहावीत असताना ... आणि ती म्हणाली .. अरेच्चा एकच? माझे तर डायरेक्ट संबंधच होते ... ते ही ७ जणांशी ... काय सिन होइल रे ? आता कोण कोणाला कमी समजेल तो विचार कर आणि सांग .. त्यामुले इथेही असहमत ...

ऑर्कुट, गुगल मधुन जास्तीची माहीती मिळु शकेल.
पुर्ण पणे असहमत ... कोण लिहीतो रे खरी माहीती ... परिक्षणावरून असं दिसून येतं .. १००० मधे ५ मुली थोडी माहिती टाकतार ऑर्कुटवर .. आणि किती पोरी ऑर्कुटींग करतात ? आणि ऑर्कुटवरची माहिती खरी पकडावी का ?

गटणेंचा हा प्रतिसाद दिवसाच वाचुन डोळे धन्य झाले होते .. आणि डोकं गुंगलं होतं .. क्षणभर वाटलं . "भांगेचे परिणाम" हा लेख वाचल्याचा परिणाम तर नाही ना ..

(गटणेश पर्सनल काही नाही ... नोंद घ्यावी)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

सखाराम_गटणे™'s picture

7 Oct 2008 - 7:34 am | सखाराम_गटणे™

>>निर्मळ? निस्वार्थी ? अरे कोणी आपल्या जोडीदाराबद्दल स्वार्थ किंवा कपट ठेवतो का रे ? आणि असेल तर मग रिलेशनच खतम की रे ..
काही जण पैश्यासाठी किंवा पैश्यासाठी पण लग्न करतात, आजुबाजुला बघ, किती हुंडाबळी आहेत ते, आणि ते आय ए एस, वकील, पोलिस, सॉफ्ट्वेअर ईजिनिअर ह्यांच्या घरी पण होते.
>>बापरे ... हे मी फक्त बॉडपटांत पाहीलेलं आहे.. स्वानुभव वेगळे आहेत.
असेल ही कदाचित मी माझे ज्ञान टाकले येथे,
शेवटी आपण समोरच्या ला कसे वागवतो ह्यावर समोरचा/ची काय करतो/ते अवलबुंन असते.
>>काय सिन होइल रे ? आता कोण कोणाला कमी समजेल तो विचार कर
>>बाप्पा __/!\__ असा सल्ला कोणाला देउन कोणाची लाईफ खलास होइल रे
नाही मला नाही वाटत, आयुष्यभर आपल्या जोडीदाराचे आधीच कुठे तरी संबध असतील् अशा विचाराने कुढत बसण्यापेक्षा सगळ्या गोष्टी ठिकठक करुन घेतलेलया चांगल्या.
मी हे ज्या वाक्याला उत्तर दिले आहे त्या वाक्य पुन्हा वाच आणि त्या मुलाची मनस्थीती समजावुन घे.
>>ऑर्कुट, गुगल मधुन जास्तीची माहीती मिळु शकेल.
मी काही मार्ग सांगितले, किती खरी आहे किती खोटी आहे ज्याचे त्याने ठरवावे, फक्त संशय आणि वस्तुस्थीती ह्यातले भान राहीले म्हणजे झाले.
आणि बाकीचे मार्ग आहेतच ना.

-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

टारझन's picture

7 Oct 2008 - 9:42 am | टारझन

काही जण पैश्यासाठी किंवा पैश्यासाठी पण लग्न करतात, आजुबाजुला बघ, किती हुंडाबळी आहेत ते, आणि ते आय ए एस, वकील, पोलिस, सॉफ्ट्वेअर ईजिनिअर ह्यांच्या घरी पण होते.
अर्रे भावा इथं प्रश्न आहे 'हॅपी मॅरिड सेक्स लाइफ' चा तु म्हणतो त्या केस मधे कुठचा स्कोपच नाही... आता त्याने/तिने पैशासाठी लग्न केलं असेल ... तर प्रश्न येतोच कुठे बाकीच्या गोष्टींचा ..

आयुष्यभर आपल्या जोडीदाराचे आधीच कुठे तरी संबध असतील् अशा विचाराने कुढत बसण्यापेक्षा सगळ्या गोष्टी ठिकठक करुन घेतलेलया चांगल्या.
याचाच अर्थ या केस मधे आधीपासनंच डाउट आहे किंवा विश्वास नाही... आणि नाती विश्वासावर टिकतात.

किती खरी आहे किती खोटी आहे ज्याचे त्याने ठरवावे, फक्त संशय आणि वस्तुस्थीती ह्यातले भान राहीले म्हणजे झाले.
ऑर्कुट हा कधीच रेफरंस होउ शकत नाही ... ०% ... मग कसं बरं हा एक उपाय होउ शकेल ?

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

भाग्यश्री's picture

7 Oct 2008 - 10:18 am | भाग्यश्री

ह्म्म ऑर्कुट तसं थोडंसं उपयोगाला येतं हा.. प्रोफाईलमधली माहीती कोणीच वाचत नाही.. पण फोटो!(ते महत्वाचे!) शिवाय मित्र-मैत्रिणींनी लिहीलेली टेस्टीमोनिअल्स.. अर्थात याने केवळ वरवरची माहीती कळते.. इथे जो 'विषय' चाल्लाय त्यामधे ऑर्कुटचा काहीच उपयोग नाहीए!

पण नातं हे मुळात विश्वासावर असतं हे खरं.. जसं टार्‍या म्हणतो तसं डोळे झाकून विश्वास ठेवावा तसंच, दुसर्‍यानेही जर खरंच काही घडले असेल तर सांगायला हरकत नाही.. अर्थात तेव्हढा कंफर्ट झोन असेल, मॅच्युरीटी असेल तर काही बोलण्यात अर्थ आहे. पण जर समोरची व्यक्ती तितकी मॅचुअर नसेल तर तितकीशी गंभीर बाब नसली तरीही गैर्समज होऊ शकतात..

Dilipkumar's picture

7 Oct 2008 - 5:18 pm | Dilipkumar

>आधी सुरवात तुमच्यापासुन करा, आधी तुमचे कोठे प्रेम-प्रकरण/संबध असेल तर तीला सांगा, नाहीतर तीला वाटेल की हा आपल्याला आपल्या पेक्षा कमी समजतो आणि ती कधीच सांगणार नाही.

मुहब्बत जब सुकुन्-ई-झिन्दगी बर्बाद कर देती है, तो लब खामोश रहते है, निगाहे फरियाद करती है......

दिलीपकुमार.

मृदुला's picture

7 Oct 2008 - 4:42 am | मृदुला

मल्टीपल चॉइस प्रश्नहोता. आताच्या सि.इ.टी प्रमाणे.

इथेही सीईटी! :-)

तीसबत्तीस वर्षात परिस्थिती बदलली असावी असे वाटते. (१९७५ साली कोणते गाणे वापरले होते?)
गेल्या १० वर्षांत विविध प्रांतांतील, सामाजिक स्तरांतील मैत्रिणींबरोबर लग्नपूर्व खरेदीच्या अनुभवातून म्हणते.

विनायक प्रभू's picture

7 Oct 2008 - 3:59 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मी म्हण्तो आहे त्या विषयात विषेश काहीही फरक नाही.