पुर्वरंग
श्रीनिवास बराच वेळ हातातल्याअ नवीन 500-2000 च्या नोटांकडे पाहत होता. अचानक दरवाजावर लगबग झाली, तसे त्याने दचकून पाहिले, तो आई हातात मोठमोठया पिशव्या घेऊन आत येत होती. श्रीनिवासने उठून आईच्याह हातातल्या पिशव्या घेतल्या, आणि त्याने बाजूला ठेवल्या. श्रीनिवास आईजवळ जाऊन बसला व म्हणाला, “आई बराच वेळ मी विचार करतोय, या नोटांचा रंग वेगळा कसा गं?”
बराच वेळ आई श्रीनिवासकडे पाहत होती, तिने आपल्या पर्समधील 2000 ची नवी नोट काढली, आणि श्रीनिवासकडे देत म्हणाली,” नोटांचा रंग जाऊ दे, ही नोट जाऊन भाजीवाल्याला दे, मग बघ कुणाचा रंग वेगळा दिसतोय ते?”. श्रीनिवासने अवाक होऊन आईकडे पाहिले, तेव्हा आई गालातल्या गालात हसत होती.
प्रतिक्रिया
4 Feb 2017 - 5:00 pm | जव्हेरगंज
कळली नाही!!!!
थोडं समजवा!
4 Feb 2017 - 5:15 pm | चिनार
गल्ली चुकली दादा..संपादकांना पाठवा आधी..