शेव

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
3 Oct 2008 - 2:10 am

सर्वात सोपी आणि झटकन होणारी म्हणजे शेव्....तसेच पटकन खाऊन संपणारी..:)
साहित्यः
१ वाटी तेल
१ वाटी पाणी
अंदाजे ४ वाट्या बेसन (हरभरा डाळीचे पीठ) शक्यतो ताजे आणि बारीक
तिखट,मीठ, हळद
ओव्याची पूड
कृती:
१. तेल आणि पाणी एकत्र करून फेटावे, हँड ब्लेंडर चा उपयोग करावा. पांढरे होईपर्यंत फेटावे.
२.त्या तेलात १ च.ओवापूड, मीठ, ४ च.तिखट, पाव हळद घालावी व त्यात मावेल तेवढे बेसन घालावे व पिठ भिजवावे जास्त घट्ट नको.
३.पसरट कढईत तेल गरम करावे. शेवपात्रात वरील पीठ घालुन डायरेक्ट कढईतच शेवेचा चवंगा पाडावा. थोड्यावेळाने हलक्या हाताने उलटवून दोन्ही बाजुने तळावा.
४.अशा रीतीने सर्व पिठाची शेव करावी.
५.वरील पिठासाठी शेवपात्रातील चकती बारीक/मध्यम वापरावी फार जाड वापरू नये.
टीप: शेव कढईत टाकताना गॅस मोठा असावा, नंतर मध्यम आच करून मंद तळावी.

प्रतिक्रिया

चकली's picture

3 Oct 2008 - 2:30 am | चकली

अनारसे, शेव...दिवाळी जवळ आली जाणवायला लागले !

चकली
http://chakali.blogspot.com

ईश्वरी's picture

3 Oct 2008 - 6:39 am | ईश्वरी

खरच ...दिवाळी जवळ आली हे जाणवायला लागले आता. स्वाती, झट्पट शेवेची कृती छान आहे.
ईश्वरी

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 8:58 am | विसोबा खेचर

मिपाच्या अन्नपूर्णादेवी,

शेवेची पाकृ झकासच!

शेव, चिरोटे, अनारसे झाले. अजून दिवाळीचा बराच फराळ बाकी आहे! :)

आपला,
(ओल्ड मंक सोबत शेव आवडणारा) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Oct 2008 - 10:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई,

झकास पाकृप्रमाणे एक झकास फोटू पण डकव ना इथे! वजनवाढीवर नियंत्रण ठेवत असल्यामुळे खाईन का नाही शंका आहे पण डोळ्यांना सुख का नसावं?

अदिती

मनस्वी's picture

3 Oct 2008 - 10:57 am | मनस्वी

पाकृ एकदम सोपी आहे!
पीठ भिजवताना त्यात लसूण पेस्ट पण घातली तर?

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 11:02 am | विजुभाऊ

भिजवताना लवन्ग पूड /मिरे पूड आणि जिरे टाकल्यास तीन वेग्वेगळ्या स्वादाच्या शेव तयार होतात
( शेव चे अनेक वचन शेवा होते का?)
( मासा चे स्त्रीलिन्ग आणि माशी शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे
"मासा" चे स्त्रीलिन्ग आणि "माशी" शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे

"मासा" चे स्त्रीलिन्ग आणि "माशी" शब्दाचे पुलिन्ग अर्थाच्या शब्दांच्या शोधात आहे

मासीण आणि माशोबा कसे वाटतात? मी माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला गोष्ट सांगतांना मासीणकाकू छान समुद्रात स्विमिंग करतात आणि माशोबाकाका पिल्लूंसाठी फळे आणि खाऊ आणतात! काही हरकत? ;)

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 11:19 am | विजुभाऊ

काही हरकत?
नाय बॉ मी कशाला घेऊ हरकत.
काकाकाकु ना चालत असेल तर ते प्रेमाने एकमेकाना कायपण म्हणु दे ना.
आमचे एक मित्र आणि त्यांची बायको प्रेमाने एकमेकाना टोणी आणि टोण्या असे बोलावतात.
( शक्यता: ते मिपा सदस्य असु शकतात ( बापरे ! मी पळतो))

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत