सूर्य नमस्कार यज्ञ

खग्या's picture
खग्या in जनातलं, मनातलं
17 Jan 2017 - 7:17 pm

अमेरिकेत दर वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात सूर्यनमस्कार यज्ञ केला जातो. याचा प्रमुख उद्देश लोकांमध्ये योग आणि सूर्यनमस्कारांविषयी जागरूकता वाढवणे आणि अधिकाधिक लोकांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी उद्युक्त करणे असा आहे.

कोण आयोजित करत?

सूर्यनमस्कार यज्ञ हिंदू सेवा संघातर्फे आयोजित केला जातो. हिंदू सेवा संघ हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच लोकहिताला वाहिलेली एक संस्था आहे. हिंदी स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखा जगभरात लागतात. बऱ्याचश्या शाखा शनिवारी अथवा रविवारी लागतात. आपल्याशी संलग्न लोकांना एकत्र आणून उत्तम विचारांची देवाणघेवाण व्हावी असा शाखांचा उद्देश असतो. त्याच बरोबर माफक व्यायाम आणि मुलांसाठी खेळ असा देखील कार्यक्रम असतो.

आपण कसे योगदान देऊ शकता?

योगदान देण्यासाठी फक्त सूर्यनमस्कार घाला. दिवसाला १३ सूर्यनमस्कार घालणे इतकंच योगदान आपल्या संगळ्यांकडून अपेक्षित आहे.

माझ्या योगदानाचा फायदा कसा होईल?

अर्थात सूर्यनमस्काराचा फायदा सगळ्यांनाच माहित आहे. मागील वर्षीचा सूर्यनमस्कार यज्ञ मी व्यायामाची सुरवात करण्यासाठी वापरला. आणि वर्षभरात आळस आणि इतर मोहांवर मत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात बऱ्याच अंशी यशस्वी सुद्धा झालो. या वर्षी व्यायामात अजून नियमितपणा आणायचा आहे.

इतरांना उत्तेजना मिळण्यासाठी आपण घातलेल्या सूर्यनमस्काराची संख्या या धाग्यावर खुशाल टाकावी.

विशेष सूचना: याचा उद्देश जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालण्याची स्पर्धा असा नाही. आपल्याला जमेल आणि सोसेल इतपत व्यायाम आपणच करावा. रोज १३ सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत असंही बंधन नाही. जितके जमतील तितके त्रास होणार नाही अशा बेताने अवश्य घालावेत.

जीवनमानशिफारस

प्रतिक्रिया

अरे व्वा.. उद्यापासून जरूर प्रयत्न केला जाईल.

निश्चितच सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायामप्रकार आहे. प्रयत्न केला जाईल.

समर्पक's picture

18 Jan 2017 - 3:57 am | समर्पक

( सेवा संघ नव्हे, हिंदू स्वयंसेवक संघ... ) अँड्रॉइड व ऍपल ऍप सुद्धा आहे त्यांचे, रोजची संख्या नमूद करण्यासाठी. या वर्षीची आजपर्यंतची नमस्कारसंख्या पावणेदोन लाखावर पोहोचली सुद्धा... २५ राज्ये सहभागी. अनेक ठिकाणी शहर व राज्याकडून विशेष प्रमाणपत्रही देण्यात आलेली आहेत. योग दिवसाच्याही आधीपासून या क्षेत्रात व्यापक प्रमाणात साजरा केला जाणारा हा आरोग्य उत्सव नक्कीच कौतुकास्पद आहे!

सध्या इथे आल्यानंतर या उपक्रमाशी संलग्न आहे. कोणाला तुमच्या जवळपासच्या (युएस मधील) लोकल चॅप्टर विषयी महिती हवी असेल तर व्यनि करा.

http://www.hssus.org/sny/

पैसा's picture

18 Jan 2017 - 11:54 am | पैसा

चांगला उपक्रम! सूर्यनमस्कार हा उत्तम व्यायामप्रकार आहे. सगळ्यानी घालावेत. मी तेवढी रेग्युल्;अर नाहीये, पण आळस करून उपयोगी नाही.

इशा१२३'s picture

18 Jan 2017 - 2:58 pm | इशा१२३

छान उपक्रम!मी रोज २५-३० सूर्यनमस्कार घालते.सुर्यनमस्कार दिवस जवळ येत असल्याने सध्या वाढवलेत.

इशा१२३'s picture

18 Jan 2017 - 2:59 pm | इशा१२३

छान उपक्रम!मी रोज २५-३० सूर्यनमस्कार घालते.सुर्यनमस्कार दिवस जवळ येत असल्याने सध्या वाढवलेत.

अजया's picture

19 Jan 2017 - 9:53 am | अजया

अरे वा. मीही रोज ३०-४० नमस्कार घालते. रथसप्तमीला १०८ चा संकल्प आहे आमचा.