मिपा कडून खेळाडूस मदत - प्रस्ताव

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
1 Oct 2008 - 11:16 pm
गाभा: 

आत्ताच ही बातमी वाचली.

चार वेळा हिंदुस्तान श्री व दोन वेळा महाराष्ट्र श्री पटकवलेल्या सुहास खामगावकर या मराठमोळ्या पैलवानाला खुराकाला पैसे नाहीत.

अशा बातम्या वाचल्या की वेदना होतात. जगात देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता असणारे असे खेळाडू जागतीक स्पर्धे पर्यंत सुद्धा पोचत नाहीत हे आपले दुर्दैव.

आपल्या मुर्दाड व भ्रष्ट राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सुद्धा आपला खारीचा वाटा उचलावा असा विचार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या पैलवानाने नाव कमावले तर... किती समाधान मिळेल ना आपल्याला!
आपण आपली इच्छा असेल तर होईल तितकी मदत एकत्र करुन या मराठी मल्लाला देऊ या. काय म्हणता?

तुम्हा सर्व मिपा कर बंधु भगिनिंना सहभागी होण्याची विनंती.

त्यासाठीचे नियोजन (एक कच्चा अराखडा):

  • आपल्याला मुंबई/पुण्यातून एक-दोन तसेच अमेरिकेत एक (जमल्यास अन्य देशात सुद्धा) असे मिपा कर प्रतिनिधी नेमू. ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे प्रतिसादात कळवावे.
  • या प्रतिनिधिंकडे आपण आपली मदत (पैसे रुपाने) पाठवू.
  • आपल्या प्रतिनिधिंनी या पैलवानाशी संपर्क साधावा (भ्रमणध्वनी ९८९२६८४९२१ - सदरील बातमी वरून) व मिपा सदस्यांतर्फे शुभेच्छा कळवाव्यात. स्पर्धेला जायला पैसे कधी हवे आहेत याची माहिती घ्यावी (किती तारखेच्या आत). तसेच आपल्याकडून त्यांना पैशाव्यतिरिक्त आणखी काही मदत करता येईल काय यावर आपल्याला सल्ला द्यावा.

मि.पा.च्या सन्माननिय सदस्यांचे, सरपंचांचे तसेच संपादकीय मंडळांचे सल्ले/सहभाग मोलाचा आहे. येऊ द्या.

ता.क.- सदर मल्ल माझ्या मित्र परिवारातील वा नातेवाईक नाही अथवा मी त्यांना वैयक्तिक रित्या ओळखत नाही.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 12:43 am | विसोबा खेचर

प्रतिनिधिंकडे आपण आपली मदत (पैसे रुपाने) पाठवू.
मि.पा.च्या सन्माननिय सदस्यांचे, सरपंचांचे तसेच संपादकीय मंडळांचे सल्ले/सहभाग मोलाचा आहे. येऊ द्या.

भास्करराव, सर्वप्रथम आपल्या उदात्त हेतूबद्दल यत्किंचितही शंका न घेता त्याचे स्वागतच करतो..

परंतु एक गोष्ट तेवढीच विनम्रतेने परंतु स्पष्ट सांगू इच्छितो की अद्याप तरी मिसळपाव डॉट कॉम हे नांव कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहाराशी जोडले जाऊ नये असे धोरण आहे.

मिपाकर सभासद वैयक्तिकरित्या आपल्या प्रस्तावाचे स्वागत आणि त्याला आर्थिक मदत अगदी अवश्य करू शकतात, मी स्वत:ही करणार आहे. परंतु या आर्थिक व्यवहारामध्ये मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचा काहीही सहभाग नसेल. मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही कारणासाठी मिसळपावच्या सभासदांकडून पैसे गोळा करत नाही, तसे कुठलेही आवाहन करत नाही एवढेच कृपया ध्यानात घ्या...

कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात/मागणीत/वर्गणीत/देणगी इत्यादी गोळा करण्यात मिस़ळपाव डॉट कॉम मुळीच सहभागी होऊ इच्छित नाही याची नोंद घ्यावी...

सदर निवेदन मी मिसळपाव डॉट कॉमचा मालक या नात्याने देत आहे..

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 12:54 am | विसोबा खेचर

मिसळपाव डॉट कॉम त्याच्या कुठल्याही सभासदला कुठल्याही कारणास्तव कुठल्याही सभासदाकडून पैसे, देणगी, वर्गंणी, इत्यादी गोळा करण्याचे अधिकार/उत्तरदायित्व देत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी..

क्षमा करा भास्करराव, परंतु पैशाचे व्यवहार जास्तीत जास्त स्पष्ट आणि स्वच्छ असलेले बरे असतात म्हणून स्पष्ट खुलासा करावा लागला...

आपण आणि इतरही मिपाकर मिसळपावचे हे धोरण समजून घेतील अशी आशा करतो..

तात्या.

भास्कर केन्डे's picture

2 Oct 2008 - 3:13 am | भास्कर केन्डे

आदरणीय तात्या,

आमच्या सरपंचाच्या खुलाशाबद्दल तसेच मार्गदर्शनाबद्दल आभार!

मला सुद्धा सभासदांच्या कडून मदत असेच म्हणायचे होते/आहे. मिपा चे अर्थिक व्यवहाराशी नाते जोडले जाऊ नये यामगचा आपला हेतू चांगलाच आहे व हे आम्ही मिपाकर चांगले समजतो.

पण "दात टोकरुन पोट कसे भरणार" या उक्तीनुसार मी एकट्याने केलेली मदत कदाचित त्या खेळाडूच्या एकाही कामाला पुरणार नाही. म्हणून म्हटले पहावे आपल्या सोबत कोणी आहे का. हो पण मिपा च्या नावे नव्हे तर वैयक्तिक सभादांच्या नावे असे स्पष्ट म्हणायला हवे होते (जसे की मिपा कट्टा जो की सभासदांनी जमवला व ज्याची जबाबदारी मिपाच्या मालकावर नसावी असे वाटते). असो. आमचे ते लिहिण्यात चुकलेच.

मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या कसल्याच कार्यात भाग घ्यायला आवडत नाही. म्हणून उपक्रम स्तुत्य असूनही शिवसेनेच्या फंडातून पैसे द्यायची इच्छा नाही.

आपला,
(मिपाकर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भास्कर केन्डे's picture

2 Oct 2008 - 3:14 am | भास्कर केन्डे

मिपाकर सभासद वैयक्तिकरित्या आपल्या प्रस्तावाचे स्वागत आणि त्याला आर्थिक मदत अगदी अवश्य करू शकतात, मी स्वत:ही करणार आहे.
--- आपल्या पाठिंब्याने आनंद झाला.

आपला,
(आनंदी) भास्कर
आम्ही येथे वसतो.